संस्कृती जाहली मरणप्राय
जगवणारी तुरळक गणती
मेली संस्कृती केंव्हाच
सर्वत्र जाहिरात होती ll १ ll
संपली, काळवंडली संस्कृती
उजळवणारी तजवीज थोडी
गाडून टाकणारी तिजला
गर्दी संपत नव्हती ll २ ll
जमवाया लोक जागृतीस
मित्रास कळविला मोर्चा
बघू उद्या म्हणाला
हात दुरूनच केला ll ३ ll
दुष्परिणाम प्रगतीचे
तुडवीत संस्कुती होते
मात्र लोकांना याचे
अप्रूप काहीच नव्हते ll ४ ll
रक्षणास बोलावता
आले उपायास नव्हते
विकृतीचे बसता फटके
ते मोर्चात सामील होते ll ५ ll
- सार्थबोध
प्रतिक्रिया
24 Apr 2012 - 10:07 am | प्रचेतस
छान कविता.
24 Apr 2012 - 6:59 pm | चित्रगुप्त
संस्कृती जाहली तरुण
जगवणारी असती बक्कळ
मेली संस्कृती जीर्णशीर्ण
सर्वत्र नांदे नवसंस्कृती ll १ ll
जन्मली, तरारली नवसंस्कृती
उजळवणारी तरुण पिढी
नवनवोन्मेशशालिनी सुवदनी
नांदे घरा- घरातुनी ll २ ll
वारू सुटले प्रगतीचे
तुडवीत अंधभक्ती, अंधश्रद्धे
लोकांना वाटे याचे
बहु कवतिक ll ३ ll
ऐसी भावना ठेविता
तरुणपण राहे सर्वदा
येरव्ही येई वृद्धता
जाणावे निश्चित ll ४ ll
24 Apr 2012 - 7:13 pm | परिकथेतील राजकुमार
कविता वाचून हृदयाला घरे पडले.
संस्कृतीला मरणप्राय करणारे स्वतःच मरणप्राय होवोत.
जय हिंद जय महाराष्ट्र !
24 Apr 2012 - 10:44 pm | अत्रुप्त आत्मा
छान भावना व्यक्त केलीये.... :-)