सलगी

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
12 Apr 2012 - 10:11 am

कौल कौल छत्रामधुनी गीत अंबराचे गळते
रोम रोम कोण पुकारी; हृदयी सल; ना आकळते
जीर्ण; कुडाच्या ह्या भिंती जड होउन पाउल पडते
आर्त कोळुनी जन्माचे पडछाया हसते रडते

किती जाहले राहीले चाक रहाटाचे फिरते
कोरडे जलाशय तरिही आंसवात मन भिरभिरते
ऊर उतू वाहू पाहे बांधावर पाहुन नाते
अंकुरात माया असुनी मातीशी सलगी नडते

.................अज्ञात

करुणकविता

प्रतिक्रिया

अक्षया's picture

12 Apr 2012 - 10:57 am | अक्षया

खूपच छान कविता...
:)

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

12 Apr 2012 - 12:02 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

अंकुरात माया असुनी मातीशी सलगी नडते

व्वाह!! मस्त!!