पूर्वी ,म्हणजे जेव्हा 'ख्वाबों को सच बनाने का ख्वाब देखने की ऊमर थी ' तेव्हाचे लिहिलेले आहे .. सध्या थोडा मोकळा वेळ असल्याने टंकून काढले.
स्वप्न ऊराशी जे बाळगले,
त्या स्वप्नी मन रंगी रंगले |
तारा जुळल्या, सूर ऊमटले,
पण सत्याशी नाते तुटले ||
त्या स्वप्नाशी नाते जुळता,
स्वप्न मना ते सत्यची गमले |
पण सत्याची चाहूल लागता,
'सत्य' काय ते मना ऊमगले ||
सत्य पूर्ण ते मना ऊमगता,
स्वप्नांच्या तारा तणतणल्या |
सूर बहकले, रंग ऊधळले,
सत्य मनावर स्वार जाहले ||
जरी सत्य हे स्वप्नच होते,
पण ते कारे सत्यच होते |
त्या स्वप्नाचे रंग निराळे,
अन सत्याला काठही काळे ||
स्वप्नी छेडल्या ज्या तारा मी.
अन सूर ऊमटले स्वप्नील जे |
त्या तारंच्या अन त्या सूरांच्या,
शोधात भटकलो सत्यात मी ||
सत्याचे सर्व मार्ग धुंडुनी,
अंती थांबलो, श्रांत वृक्षतळी |
तनु श्रांतली , त्यात सावली,
मनास निद्रा गाढ साधली ||
निद्रेत पुन्हा ते मन ऊधळले,
अन स्वप्नांच्या नगरी पोहोचले |
व्दारात थांबूनी ऊसंत घेता,
मार्ग आपुला सिंहावलोकिला ||
मार्गावरची नजर हटेना,
ऊरात आनंद तो मावेना |
सत्य म्हणावे कि ते स्वप्न,
मनास काही काही सुचेना ||
त्या मार्गाच्या एका बाजूस,
होती ऊधळण अनेक्ररंगी |
अन मार्गाची दुसरी बाजू,
ल्यायली होती किनार काळी ||
मनास गमले सत्य अखेरी,
स्वप्न सत्य अन सत्यची स्वप्न |
या बाजूने बा त्या बाजूने,
जाणे अपुले स्वप्नांच्या नगरी ||