कावळा

आनंदयात्री's picture
आनंदयात्री in जनातलं, मनातलं
14 Jun 2008 - 12:23 am

कधी तरी कुठे तरी वाचलेली कथा-

आटपाट नगरात एक गरीब कष्टकरी कुटुंब रहात असते. ३ मुलं आणी त्यांचे आई बाबा. आई वडील दोघेही मजुर आणी कुटुंबाचे बस्तान एका लहानग्या झोपडी मधे.
एका वर्षी प्रचंड असा दुष्काळ पडतो. ते गरीब कुटुंब अन्नाला महाग होते. घरात असलेले किडुक मिडुक विकुन कसातरी आला दिवस ढकलने चालु असते. हळुहळु परिस्थिती अजुनच बिकट होते. मुले लहान असतात, त्यांचे पोट भरावे म्हणुन ते दोघे अर्धपोटी रहायला सुरुवात होते. नवरा एक दिवस रोजच्या त्रासाला कंटाळुन तिरीमिरीत घर सोडुन परगांदा होतो. आई ला धीर सोडुन चालणार नसते, ती लेकरांना कशी सोडून जाणार, ती कंबर कसते आणी कसेबसे आपल्या लहानग्यांचे पोट भरायला सुरुवात करते. पण दिवस अजुनच वाईट येतात. कुटुंबाची अन्नान्न दशा होते. रोजच्या उपासमारीने एकादिवशी बिचारी दगावते.

आता घरात ३ मुले. मोठा जेमतेम ५ वर्षांचा मधला ३ वर्षांचा आणी लहानगा फ़क्त १ वर्षांचा. आई बोलत का नाही, नुसती झोपुनच का आहे या विचाराने भांबावलेले पोरं अन रड रड रडणारा सगळ्यात लहाना छोटु. यथावकाश ४ लोक जमा होतात अन त्या मुलांच्या आईचे क्रियाकर्म उरकले जाते. नंतरचे दिवस खरे परीक्षेचे असतात. लेकरांचे अगदी हालहाल होत्तात. दहाव्या दिवशी कुठुन तरी मुलांचा मामा येतो आणी येतांना बांधुन मुठ्भर तांदुळ आणतो. मुले आनंदतात, त्याना वाटते आज मामा आला आज चांगले जेवायमला मिळनार. पण मामा सांगतो बाळानो आज आईचा १० वा दिवस आधी गंगेवर जायला हवे.

मुले बिचारी २ दिवसांची भुकेली तशीच मामा बरोबर गंगेवर जातात. मामाने भाताचा पिंड करुन कावळा शिवायसाठी ठेवलेला. सगळ्यात लहाना भुकेने पार व्याकुळ झालेला. मोठा मुलगा म्हणतो मामा अरे थोडा भात दे ना छोटुला. तर मामा म्हणतो बेटा आधी कावळा शिवुदे पिंडाला. बराच वेळ होतो कावळा काही पिंडाला शिवत नव्हता, इकडे पोरं भुकेनी अगदी व्याकुळ झालेली.

बराच वेळ होतो लहाना रडुन रडुन अगदी अर्धमेला होतो. अजुन एकदा लहाना असेल नसेल त्या ताकदीने जोरात रडायला सुरुवात करतो आणी तोंडातुन फेस येउन आचके देउन बेशुद्ध पडायला येतो. मोठया मुलाला रहावत नाही, त्याला काय होते ते समजतही नसते त्याला फक्त त्याच्या पोटातला आगडोंब छोटुच्या पोटात पण आहे एवढेच समजत असते. तो मामाचा हात झिडकारतो अन पळत जाउन त्या पिंडामधला एक घास भात छोटुला भरवतो. पुढच्याच क्षणी झर्रकन झेप घेउन एक कावळा त्या उरलेल्या पिंडाला शिवतो.

नोंदः लेखन इतरत्र पुर्वप्रकाशित.

कथा

प्रतिक्रिया

चतुरंग's picture

14 Jun 2008 - 12:34 am | चतुरंग

भुकेलेल्याचा देव भाकरीत असतो. हे विसरुन पिंडदान वगैरेला काय अर्थ? डोळस कथा सांगितल्याबद्दल धन्यवाद यात्री!

चतुरंग

विसोबा खेचर's picture

14 Jun 2008 - 1:23 am | विसोबा खेचर

भुकेलेल्याचा देव भाकरीत असतो. हे विसरुन पिंडदान वगैरेला काय अर्थ?

हेच म्हणतो..!

मलाही ही कथा पूर्वी कुठेतरी वाचल्याचे आठवत आहे.

असो,

सदर लेखन हे सध्या इथेच राहील परंतु ते यात्रीचे नसून कुणा मिपाबाह्य व्यक्तिचे आहे त्यामुळे ते मिपाच्या धोरणात बसत नाही इतकेच पुन्हा पुन्हा आणि कळकळीने सांगावेसे वाटते!

आपला,
(एकच मुद्दा अनेकदा सांगून कंटाळलेला!) तात्या.

आनंदयात्री's picture

14 Jun 2008 - 11:34 am | आनंदयात्री

तात्या,

मिपाच्या धोरणात बसते अशी खात्री केली आहे. सदर कथा मीच 'आनंदयात्री' याच नावने सुमारे २ वर्षापुर्वी मनोगतावर प्रसिद्ध केली होती आणी ही कथा मी माझ्या आजोबांच्या तोंडुन अनेकदा ऐकली आहे.
हे कोणत्याही ईपत्रात आलेले किंवा कोणाच्याही ब्लॉगवरुन उचललेले किंवा कोणत्याही मराठी प्रथितयश लेखकाचे साहित्य नाही.

>> ते यात्रीचे नसून कुणा मिपाबाह्य व्यक्तिचे आहे

कृपया हे शब्द मागे घ्यावेत ही कळकळची विनंती.

आपला,
(मिपाच्या धोरणाचा आदर आणी व्यवस्थित पालन करणारा नॉट इक्वल ) आनंदयात्री

विसोबा खेचर's picture

14 Jun 2008 - 4:39 pm | विसोबा खेचर

सदर कथा मीच 'आनंदयात्री' याच नावने सुमारे २ वर्षापुर्वी मनोगतावर प्रसिद्ध केली होती आणी ही कथा मी माझ्या आजोबांच्या तोंडुन अनेकदा ऐकली आहे.

ओक्के! मला हे माहीत नव्हतं. मला ही कथा इतरत्र कुठेतरी वाचली आहे एवढंच आठवत होतं त्यामुळे मला ते पुढे ढकलेले किंवा मिपाबाह्य व्यक्तिने लिहिलेले लेखन वाटले!

हे कोणत्याही ईपत्रात आलेले किंवा कोणाच्याही ब्लॉगवरुन उचललेले किंवा कोणत्याही मराठी प्रथितयश लेखकाचे साहित्य नाही.

खुलाश्याबद्दल शतश: आभार..

कृपया हे शब्द मागे घ्यावेत ही कळकळची विनंती.

येस्स! माझे शब्द मी मागे घेतो.. माझाच गैरसमज झाला होता. क्षमस्व....!

तात्या.

आनंदयात्री's picture

14 Jun 2008 - 9:46 pm | आनंदयात्री

शतशः धन्यवाद तात्या :).
यापुढेही मिपावर आम्ही जे जे लिहुत ते ते ऑथेंटिकच असेल याची आम्ही तुम्हाला या निमित्ताने ग्वाही देउ इच्छितो.

आपलाच,
(समाधानी) आनंदयात्री

few peoples are more equal असे सारखे सारखे म्हणनार्‍यांना यातुन काही बोध मिळो हिच ईशवरचरणी प्रार्थना !

ईश्वरी's picture

14 Jun 2008 - 12:40 am | ईश्वरी

खूपच आवडली गोष्ट , आनंदयात्री.
काळीज हेलावणारी आहे. भूकेपुढे ख्ररच इतर गोष्टींना काही किमंत नसते.
आपल्याकडे म्हणतातच ना आधी पोटोबा मग विठोबा
ईश्वरी

प्राजु's picture

14 Jun 2008 - 9:12 am | प्राजु

हेच म्हणते...
काळीज हेलावणारी आहे. भूकेपुढे ख्ररच इतर गोष्टींना काही किमंत नसते.
आपल्याकडे म्हणतातच ना आधी पोटोबा मग विठोबा...

भूक हा माणसाचा सगळयात मोठा विकपॉइंट आहे....
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

पद्मश्री चित्रे's picture

14 Jun 2008 - 6:51 am | पद्मश्री चित्रे

भुके पुढे खरच सार मागे पडत...
छान आहे कथा.

यशोधरा's picture

14 Jun 2008 - 8:00 am | यशोधरा

भुकेलेल्याचा देव भाकरीत असतो. हे विसरुन पिंडदान वगैरेला काय अर्थ?

खर आहे. गोष्टीचा शेवट मन हेलावणारा....

अनिल हटेला's picture

14 Jun 2008 - 8:26 am | अनिल हटेला

मन विषण्ण करणारी पण तितकीच ह्रदयद्रवक !!!!

अभिज्ञ's picture

14 Jun 2008 - 9:26 am | अभिज्ञ

आवडले.
कथा आणिक खुलवता आली असती असे वाटते.

II राजे II's picture

14 Jun 2008 - 10:59 am | II राजे II (not verified)

आवडली छोटी कथा पण मोठा बोध देणारी.... बोध कथा !!
अजून येऊ देत.

राज जैन
मृगजळाचा पाठलाग नेहमीच जीवघेणा ठरतो... आपली पाण्याची बाटली नेहमी आपल्या जवळ बाळगावी... ;)

नंदन's picture

16 Jun 2008 - 12:53 pm | नंदन

राजभाईंशी सहमत.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

प्रगती's picture

14 Jun 2008 - 1:54 pm | प्रगती

कथा खूपच सुंदर आहे मनाला भिडली.

इनोबा म्हणे's picture

14 Jun 2008 - 4:52 pm | इनोबा म्हणे

कथा आवडली.

भुकेलेल्याचा देव भाकरीत असतो. हे विसरुन पिंडदान वगैरेला काय अर्थ?
अगदी खरं आहे.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

शितल's picture

14 Jun 2008 - 6:53 pm | शितल

कथेचा आशय खुप हलवा आहे.

प्राजु म्हणते ते खरे आहे.
भुक माणसाचा सगळ्यात मोठा विक पॉईन्ट आहे.

स्वाती दिनेश's picture

14 Jun 2008 - 7:44 pm | स्वाती दिनेश

भुकेलेल्याचा देव भाकरीत असतो. हे विसरुन पिंडदान वगैरेला काय अर्थ? डोळस कथा सांगितल्याबद्दल धन्यवाद यात्री!
चतुरंग यांच्या सारखेच म्हणते.
स्वाती

ब्रिटिश टिंग्या's picture

14 Jun 2008 - 7:57 pm | ब्रिटिश टिंग्या

भुकेलेल्याचा देव भाकरीत असतो. हे विसरुन पिंडदान वगैरेला काय अर्थ? डोळस कथा सांगितल्याबद्दल धन्यवाद यात्री!

टिंग्या

धमाल मुलगा's picture

16 Jun 2008 - 12:17 pm | धमाल मुलगा

जगदंब...जगदंब!!!!

अरे आनंदयात्री, काय रे हे?

किती हृदयद्रावक कथा आहे. च्छ्या:! वाचता वाचताच डोळे पाणावले बुवा :(

बाकी, चतुरंगराव म्हणतात त्याप्रमाणे..

भुकेलेल्याचा देव भाकरीत असतो. हे विसरुन पिंडदान वगैरेला काय अर्थ?

हेच खरं.

मनस्वी's picture

16 Jun 2008 - 12:28 pm | मनस्वी

चटका लावणारी कथा आहे.
आनंदयात्री.. स्वैर कथनही छान झाले आहे.
काही लोकांना वाईट परिस्थितीत नातेवाईकांना साथ देण्याचे तारतम्य का नसते?

मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

ऋचा's picture

16 Jun 2008 - 1:50 pm | ऋचा

सुंदर कथा आहे.
एका प्रखर वास्तवाची जाणीव झाली.
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"