दास्तान ए हिंदुस्तान भाग १ ( सिटी ऑफ लेक , द वेनिस ऑफ इस्ट ,उदयपूर )

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture
निनाद मुक्काम प... in भटकंती
30 Mar 2012 - 3:06 pm

भारत दौरा करून आता ४ महिन्याहून जास्त काळ लोटला पण अजून दोन आठवडे केलेल्या मनोसोक्त भटकंतीच्या रम्य आठवणी मनात रुंजी घालत आहेत. प्रत्येक वेळी भारतात येणे हे मी सहसा एखाद्या चुलत, मावस भावांचे लग्न ठरले की ठरवतो. ह्यामुळे बहुसंख्य नातेवाईकांना एकाच वेळी भेटता येते. एरवी अश्या अनेक आप्त स्वकीयांच्या लग्नात येणे जमत नाही. मग फेसबुक वर त्यांच्या फोटोवर आपल्या प्रतिक्रिया देणे व आपण मुकलेले क्षण ह्या आभासी जगतातील आभासी दुनियेत पहाणे, उपभोगणे एवढेच माझ्या हाती उरते. दुसरा प्रमुख हेतू म्हणजे भारत दर्शन.

परदेशात पंचतारांकीत हॉटेलात माझ्या कामानिम्मित मला अनेक पर्यटन मी भारतीय आहे हे कळल्यावर त्यांच्या भारत सहलीची रसभरीत गाथा ऐकवत. व मी अजून भारतीय असून ताजमहाल पहिला नाही.ह्या बद्दल कुहुतल वजा कीव करत.
. वयाची २३ वर्षे भारतात होतो तेव्हा आमचे पर्यटन हे शाळेच्या सहली किंवा नातेवाईकांची लग्ने किंवा महराष्ट्रातील जवळपासच्या राज्यापर्यंत मर्यादित होते. त्यामुळे ठरवून समग्र भारत दर्शन करायचे मी ठरवले होते.. लग्नानंतर मधुचंद्रासाठी आम्ही देवाची भूमी केरळात जाऊन आलो. तेथील रम्य समुद्र किनारे ,निसर्ग ,हाउस बोट ,खाद्य संस्कृती ,आयुर्वेद व त्यांचा पर्यटनात सुयोग्य वापर ह्यामुळे माझी पत्नी भारताच्या प्रेमात पडली. जर्मनीत गेल्यावर आपल्या मुठभर नातेवाईकात ह्या सफरीचे रसभरीत वर्णन केले.म्हणून ह्यावेळी तिची धाकटी बहिण सुद्धा आमच्यासोबत येणार होती.

. ह्या मोहिमचे पडघम मोहिमेच्या सहा महिन्यापूर्वी वाजायला सुरवत झाली. सरत शेवटी एखाद्या टूर चे पेकेज घेण्यापेक्षा आपण स्वतः ची खाजगी टूर आखायची व एखाद्या टूर कंपनीला ती व्यवस्थित आखायला द्यायची असे ठरले. ठाण्यातील मराठी टूर कंपनी क्रोस वल्ड ह्यांच्याशी अनेक सल्लामसलत झाल्यावर उदयपुर ,जोधपुर कनकपुर , मनवर केम्प ,जयपूर , अजमेर व पुष्कर , रणथंबोर , आग्रा व मग दिल्ली ते मुंबई असा भरगच्च कार्यक्रम आखला.मुंबई ते उदयपुर विमान प्रवास मग चारचाकी वाहनाने भटकंती करत दिल्ली व तेथून मुंबई विमानाने गाठायची असा बेत होता. सोबत आईबाबा सुद्धा होते. ह्या दोन आठवड्यांच्या भटकंतीत भारताच्या विराट व अर्वाचीन संस्कृतीचे दर्शन घडले. आम्ही सारेच इतिहासाचा भव्य कालखंडाचे ओझरते दर्शन पाहून मंत्रमुग्ध झालो. तोच अनुभव मोजक्या शब्दात सचित्र मांडायचे ठरवले आहे.

मुंबई ते उदयपुर हा विमान प्रवास किंगफिशर ने पार पडला. एम विटामिन अभावी कर्मचारी वर्ग पार खंगला होता. पूर्वीची शान ,आब कुठेस दिसला नाही. पण तरीही अपुरे संख्याबळ असूनदेखील किंगफिशर च्या पंचतारांकीत सेवेचा डोलारा त्यांनी उभारला होता. छोट्या पण नीटनेटक्या विमानतळावर आमचे आगमन झाले. बाहेर आमच्या नावाची पाटी घेऊन नरहर सिंग उभा होता. गाडीत बसल्यावर प्रथम आम्ही आमच्या हॉटेलात जगदीश महल मध्ये पोहोचलो. २०० वर्ष जुनी ही प्रशस्त हवेली आता हॉटेलात रुपांतरीत झाली होती. तिला पाहून मला विरासत मधील अनिल कपूर च्या हवेलीची आठवण झाली
.
उदयपुर ची ओळख सिटी ऑफ लेक किंवा पूर्वेचे वेनिस अशी आहे.( वेनिस हे तरंगते शहर आहे तर उद्यापुरात काही तलाव आहेत पण इंग्रजांच्या काळात अतिशयोक्ती ने परिपूर्ण अशी उपमा ह्या शहराला चिकटली)
. उदयपुर शहराचे प्रमुख आकर्षण कुठल्याही टिपिकल राजस्थानी शहराप्रमाणे तेथील राज्यकर्त्यांचे राजवाडे आहे.. आणि बहुतेक राजवाड्यांमध्ये राजा त्याच्या परिवारासमवेत राहतो. मात्र राजवाड्यांचा त्यांच्या वास्तव्याचा भाग वगळता उर्वरित भाग आपली राजेशाही थाट टिकवण्यासाठी
पर्यटकांसाठी गलेलठ्ठ तिकीट आकारून दर्शनास उपलब्ध करून दिला जातो.

उदयपुर चा सिटी पेलेस ची मुहूर्तपेढ १५५९ साली झाली. आणि सलग ३०० वर्ष अवरीत बांधकामानंतर हा भव्य दिव्य महाल पूर्ण झाला. ह्या दरम्यान अनेक महाराजांची संपूर्ण हयात ह्या राजवाड्याच्या निर्मितीस गेली.
उदयपूरच्या अवतीभवती अरवली पर्वताच्या रांगा हिरवळीने समृद्ध झालेल्या दिसल्या. राजस्थान म्हणजे वाळवंट अशी आपली समजूत भूगोलाचे पुस्तक आणि बॉलीवूड मूळे निर्माण झाली आहे. मात्र राजस्थानचा काही निवडक टप्पा वगळता ( जैसरमेर ) आम्ही हिवाळ्यात गेल्यामुळे मला सर्वत्र वनराई दिसली. उदयपुरच्या इतिहासातील प्रमुख टप्पे म्हणजे महाराणा राणाप्रताप ची हळदी घाटची लढाई आणि मग मोगलांचा अरवली रांगावर पर्यायाने संपूर्ण मेवाडवर कब्जा. झाला. आजही शहराच्या मध्यवर्ती चौकात चेतक चा भव्य पुतळा दिसतो.१७व्य शतकात राऊ आपल्या मराठा फौजेसह येथे दाखल झाला. आणि ह्या शहराच्या इतिहासातील सर्वात जबर खंडणी वसूल केली. आज आंजा वर हीच बाब विशेतः अधोरेखित केलेली आहेत. म्हणजे मराठे म्हणजे खंडणी बहाद्दर आणि मुघल म्हणजे जणू ......

सिटी पेलेस मध्ये जातांना अनेक सरकारी अधिकृत व खाजगी गाईड आपल्यामागे लागतात.पण कटू अनुभव असा येतो कि हि लोक दीड तासात ह्या भव्य दिव्या राजवाडा मनात येईन तसे वर्णन करून तुमच्या शंका ,कुशंका असल्यागत दुर्लक्षित करून तुमची बोळवण करतात. त्यांचे प्रमुख लक्ष्य पर्यटकाला येथील प्रसिद्ध चित्रकलेचे पेंटिंग आणि पश्मीना शाली विकण्यात असते. म्हणजे हे दुकानात पर्यटकांचे सावज घेऊन जातात. व त्याबद्ल्यास ह्यांना बिदागी म्हणजे ह्यांच्या धंद्यांच्या भाषेत प्रत्येक दुकानात ह्यांचा खाचा असतो.( आम्ही हॉटेल व पर्यटन शेत्रातले असल्याने ह्यातील सर्व खाचखळगे आम्हाला माहित होते. म्हणून आम्ही चोरावर मोर व्हायचे ठरवले..म्हणजे एका गाईड समोर आम्ही फार मोठी आसामी असल्याचा डौल उभा केला. व परदेशातून भारतात पर्यटनासाठी आलो आहोत. माझा जर्मनीत मोठा व्यवसाय असून मी भारतात नेहमीच येत असतो. आज माझ्या पत्नी व परिवारा समवेत भारत दर्शन करायला आलो आहोत. तस्मात आम्हाला भरपूर खरेदी कपडे ,सोने ,चांदी करायची आहे. हे सर्व पाहून त्यांच्या तोंडाला पाणी सुटले. आज किमान १५ हजाराचा खाचा कुठेही गेला नाही अशी त्याला खात्री पटली.( उदयपुर सोनारांसाठी प्रसिद्ध आहे. )त्याने जीव तोडून आम्हाला राजवाड्याचे सुरेख वर्णन करायला सुरवात केली.

हे अंगण त्या पेलेस चा मध्यवर्ती भाग.तो राजवाड्याच्या तिसरया मजल्यावर आहे. व तेथे जाण्यास जुन्या धाटणीचे गोलाकार अरुंद जिने आहेत.सदर राजवाडा हा अरवलीच्या पर्वतरांगेवर बांधला असल्याने हा मध्यवर्ती भाग म्हणजे डोंगराचे पठार आहे. म्हणून येथे मोठे वृक्ष दिसून येतात.

ह्या महालातील सर्वात विहंगम दृश म्हणजे मोर चौक. येथील भिंतीवर ५००० निळ्या, हिरव्या. सोनेरी,चंदेरी मोसेक चे छोट्या तुकड्यांनी मोरांची चित्रे चौकाच्या भिंतीवर आढळून येतात.
हा वानगीदाखल नमुना ,अश्या चित्रांनी संपूर्ण चौकाच्या भिंती सजल्या आहेत. भान हरपून आम्ही दुष्टीसुख अनुभवत होतो. सदर मोसेक चे छोटे तुकडे इटली व जगभरातून मागवले केले होते.

राजवाड्याच्या सज्जातून टिपलेले उदयपुर


पिकॉक कोर्ट यार्ड अर्थात मोर चौक महालातील आतील दालने त्यात सोन्याने मढवलेली अनेक कलाकुसरीचे सामान पाहता १५व्य शतकात ऐश्वर्याच्या बाबतीत युरोप आगदिच पानीकम होता ह्याची नकळत कबुली दोन्ही बहिणींनी दिली. युरोपातील कोणत्याही महालाला ह्या महालाची नखाची सुद्धा सर नाही. ह्यावर दुमत नव्हते.


ह्या राजवाड्यातील जगप्रसिद्ध आदिदितीय व भारतीय चित्रकलेचा अविष्कार असलेले चित्र पाहिल्याशिवाय हि यात्रा सफल होऊ शकत नाही. १५व्य शतकात थ्रीडी इफेक्ट्स असणारे हे चित्र जगभरात प्रदर्शनात मांडले जाते.
नुकतेच ते आमच्या शहरात म्युनिक मध्ये आले होते. हे चित्र जवळून पाहिल्यावर प्रथमदर्शनी असे दिसते कि राजवाड्यातील चौकाचे हे चित्र आहे. . पण जरासे मागे जाऊन पहिले तर असे अधून येते कि हे चित्र पहिल्या मजल्यावरून काढले आहे. सदर फोटो आम्ही लांबून घेतला असल्याने हे चित्र पहिल्या मजल्यावरून चौकाचे काढलेले दिसते. मात्र जवळ गेल्यावर हेच चित्र भर चौकात उभे राहून काढल्याचे दिसते.
अर्थात हा दृष्टीभ्रमाचे वर्णन करायला माझी लेखणी तोकडी आहे. ते अनुभवण्यात खरा आनंद आहे.

हि चित्रकला काढणार्या कलाकारांची पिढी जतन करण्यासाठी येथील कलासक्त राजाने ह्या महालाच्या भल्यामोठ्या प्रांगणात त्यांना दुकाने काढून दिली आहेत. येथे अशी चित्रे विकत मिळतात. .आम्हाला आमच्या गाईड ने तेथे नेल्यावर तेथील एका चित्रकाराने ५ मिनिटे आम्हाला चित्रकलेचे प्रात्यक्षिक दाखवले.( माझा चित्रकलेशी ३६ आकडा असला तरी ह्या बहिणी युरोपियन चित्र आणि शिल्पकला कोळून प्यायल्या होत्या. मात्र भारतीय अदाकारी पाहून त्या थक्क झाल्या. येथे काश्मीर मधून निर्वासित झालेले जगप्रसिद्ध पश्मीना शाली विणणारे विणकर राजाने पदरी ठेवले होते. त्यांचाही कलाकुसरीचा नमुना आम्ही पहिला. आम्ही ह्यातील महागड्या गोष्टी विकत घेऊ ह्या समजुतीवर त्यांचे आम्हाला दाखवणे चालले होते. मी त्या गाईड ला सांगितले कि पहिले सोने खरेदी करूया. आणि तेथून पळ काढला. मग एका गल्लीबोळात त्याचा खाचा असलेल्या एका सोनाराच्या दुकानात आम्ही गेलो. थोड्यावेळाने काही आवडले नाही अशी बतावणी करून त्याला त्यांची बिदागी देऊन कटवले. त्यांचे खाचा बुडाल्याचे दुख साफ चेहेर्यावर दिसत होते. मात्र विदेशी पर्यटकांना नेहमी चुना लावणाऱ्या त्याचा पचका झाला होता. आता रात्री जगातील उत्कृष्ट अश्या उपहारगृहात जेवायची संधी आम्हाला महत्प्रयासाने मिळाली होती. गेली सहा महिने आणि त्या आधी कितीतरी वर्ष ह्या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहत होतो.
क्रमशः

प्रतिक्रिया

पियुशा's picture

30 Mar 2012 - 3:24 pm | पियुशा

मस्त फोटु :)

मनराव's picture

30 Mar 2012 - 3:39 pm | मनराव

मस्त मस्त मस्त...........!!!

येऊ द्यात ...वाचतो आहे.....

सुंदर फोटो आणि अनुभव...

या भागात जायचा प्लॅन आहे.. तुझ्या लेखाचा उपयोग होईल. प्रिंट मारुन घेऊन जातो...

धन्यवाद...

दादा कोंडके's picture

1 Apr 2012 - 12:39 am | दादा कोंडके

मस्तच!
नुसतच कलादालनामध्ये फोटो टाकण्यापेक्षा त्यासोबत थोडी माहिती आणि अनुभव असतील तर तीथं जाणार्‍यांना सुद्धा उपयोग होइल.

परिकथेतील राजकुमार's picture

30 Mar 2012 - 4:00 pm | परिकथेतील राजकुमार

डोळ्याचे पारणे फिटले रे फटूंनी.

मात्र फोटो जास्ती आणि लिखाण कमी असल्याने थोडी निराशा झाली. फटू खूप बोलून जातात हे खरे असले तरी प्रत्यक्ष जे काही अनुभवले आहेस ते शब्दात वाचायला अधिक आवडेल.

शुद्धलेखन ( व्याकरण नव्हे. व्याकरणाला आम्ही देखील फाट्यावर मारतो) आणि पॅरा पाडून करत असलेले लिखाण आता अधिक वाचनीय वाटते आहे. शैलीमधील बदल स्वागतार्ह. मात्र अजूनही काही ठिकाणी पूर्णविराम मागे पुढे का बरे होत आहे ? तू डायरेक्ट मिपावरती लिखाण करतोस का कुठे दुसरीकडे करून इथे डकवतोस ?

पु.भा.प्र.

मस्त लिखाण आणि फोटोही !!
शेवटचा भारीच.
सौधातून घेतलेला फोटो आणि महालाचे फोटो वगैरे पाहून एका विशिष्‍ट सिनेमाची आठवण झाली. ;-)

पैसा's picture

30 Mar 2012 - 6:04 pm | पैसा

मस्त फोटो आणि वर्णन! आणखी लवकर लिही!

स्मिता.'s picture

30 Mar 2012 - 6:17 pm | स्मिता.

वर्णन आणि फोटो दोन्हीही छानच. या लेखमालेतून राजस्थानची मिनी-ट्रिप घडेल हे निश्चित.
पुढचे भागही तपशीलवार येऊ दे. पुलेशु.

सविता००१'s picture

30 Mar 2012 - 6:22 pm | सविता००१

फोटो आणि लेखन दोन्हीही अतिशय सुरेख! आता पुढचे भाग पण पटापट येउद्या......

छो.राजन's picture

30 Mar 2012 - 10:00 pm | छो.राजन

अप्रतिम, सुरेख फोटोग्राफ्स आणि वर्णन एका वेगळ्याच दृष्टिकोनांतून.

५० फक्त's picture

30 Mar 2012 - 9:27 pm | ५० फक्त

सुंदर फोटो, याबरोबरच तु केलेल्या प्रवासव्यवस्थेची माहिती देशील काय? अगदी शेवटच्या भागात दिलीस तरी चालेल.

रेवती's picture

31 Mar 2012 - 1:57 am | रेवती

छानच!
वाचतिये.

वर्णन छान आहे. पण अधीक असावे असे वाटते.

फोटोबद्दल काय बोलायचे. भन्नाट आहेत.

पुढचे भाग लौकर येउ देत.

सुदर लिखाण अणि फोटोही सुरेख.

मृत्युन्जय's picture

31 Mar 2012 - 10:25 am | मृत्युन्जय

चांगले लिहिले आहे रे निनाद. राजस्थान सफरीच्या आठवणी जाग्या झाल्या

मदनबाण's picture

31 Mar 2012 - 11:40 am | मदनबाण

सुंदर लेखन व मस्त फोटु. :)
आरशांचे काम पाहुम इंदुर मधील शीश महाल आठवला ! :)

मुक्त विहारि's picture

31 Mar 2012 - 12:04 pm | मुक्त विहारि

मस्तच....

भारीच आहे. साला आयुष्यात इथे कधी जाता येईल त्याची वाट बघतोय.

- पिंगू

तर्री's picture

31 Mar 2012 - 9:00 pm | तर्री

लेखन व फोटो आवडले.

अविनाशकुलकर्णी's picture

1 Apr 2012 - 12:22 am | अविनाशकुलकर्णी

छान ...

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

1 Apr 2012 - 1:22 am | निनाद मुक्काम प...

बहुतांशी फोटो हे माझ्या पत्नीने काढले आहेत. मी फोटोगिरी मध्ये कच्चा आहे.
प्रतिसादाबद्दल आणि सूचनेसाठी धन्यवाद.
गुगल मराठी वर टंकत असल्याने पूर्णविराम पुढे मागे होत आहेत. मात्र पुढच्यावेळी काळजी घेईन. हा राजवाडा पाहतांना मी मंत्रमुग्ध झालो होतो. मात्र त्याच वेळी मनात एक उगाच अनामिक दडपण होते.

माझी मेव्हणी पहिल्यांदा भारतात आली होती. आणि माझ्या आई बाबांसोबत आमची हि पहिलीच टूर टूर होती. खरे तर माझी हि त्यांच्या समवेत दुसरी किंवा तिसरी टूर असेल. एरवी प्रचंड नातेवाईकांचा गोतावळा समवेत आम्ही भटकंती करायचो. किंवा एखाद्या टूर कंपनीसोबत मी बिनधास्त पणे सगळ्या अनोळखी सवंगड्यासोबत जीवाभावाचे मित्र असल्यासारखे मजा करायचो. पण आता मी ह्या छोटेखानी टूर चा अनाधिकृत टूर लीडर होतो. प्रस्तुत महाल पाहतांना पालकांशी मराठी त्या गाईड शी हिंदी आणि बहुतेक वेळा शंका इंग्रजीत आणि जर्मन भाषेचा शिकाऊ उमेदवार असल्याने त्या दोघींशी जर्मन भाषेत संवाद साधत होतो. ह्यात खूपवेळा पालकांशी इंग्रजी किंवा जर्मन किंवा बायकोशी चटकन एखाददुसरा शब्द मराठी किंवा हिंदी अशी माझी तारांबळ उडाली होती.

त्यात अजून दयनीय अवस्था त्या गाईड ची झाली होती. ह्या बहिणींनी त्यांचा डोक्याचा भुगा केला होता. हि शिल्पकलेची नेमकी कोणती शैली? मग हे असेच का? ह्या मागे काही विशेष कारण? किंवा त्या मोर चौक सारखाच एक चौक फ्रांस मधील राजवाड्यात आहे. त्यांच्यात नि ह्याच्यात काही कार्यकारणी भाव..... (पण खरेच त्या काळात संपूर्ण युरोपला भारताचे आकर्षण होते. भारताच्या राजांच्या युरोप सहली पुढे सुरु झाल्या आणि अनेक युरोपियन प्रवासी भारतात येऊन गेले. त्यामुळे त्या फ्रेंच राजवाडा जो १७ व्या शतकात बांधल्या गेला त्या चौकाची मूळ प्रेरणा भारतीय असू शकते.)
तो सरकारी गाईड कधी काळी सरकारी परीक्षा रट्टा मारून किंवा कॉपी करून किंवा वशिल्याने पास झाला असावा अशी दाट शंका त्यांच्या कामाच्या स्वरूपावरून येत होती. त्यात त्याचे असे हाल. इतके प्रश्न ,इतक्या शंका.

म्हणून ह्या महालाविषयी जास्त माहिती माझ्या डोक्यात शिरली नाही. पण मी ह्यातून एक धडा शिकलो. ह्यानंतर कोणत्याही ठिकाणी गाईड घेतला नाही.
आणि साहेबांची भाषा हेच आमच्यात संवादाचे माध्यम ठरवले. म्हणजे कोण काय बोलतोय हे एकाच वेळी सर्वांना समजेल.
पुढच्या भागात उर्वरित उदयपुर चा उर्वरित सफरनामा लिहीन

सफरनामा लिहीन. त्यात फोटोसह लिखाण समप्रमाणात ठेवेन.
.

आमचे हॉटेल जगदीश महल हे उदयपूरच्या गल्लीबोळात होते. खरे तर हि पुश्तेनी हवेली. तिच्यात जास्त बदल न करता तिचे हॉटेल मध्ये रुपांतर करण्यात आले होते.
ह्यात कामाला तेथील स्थानिक व अप्रशिक्षित स्टाफ होता. त्यांची आम्हाला कोणतीही असुविधा होऊ नये म्हणून चाललेली धावपळ खरच कौतुकास्पद होती. पण मी ह्या हॉटेल चे बुकिंग एक वेगळा राजेशाही खानदानी घरात राहण्याचा अनुभव यावा म्हणून केले होते.

आमच्या हवेलीचे फोटो काढले गेले नाही आहेत पण ह्या हॉटेल च्या साईट ला जरू भेट द्या. निव्वळ अप्रतिम

संध्याकाळी तेथील गच्चीवर बुफे जेवण असते. आणि उदयपुर शहर सुद्धा मस्त दिसते.

ह्यापुढे मग सकाळी ८ ते ११ लाईट नसणे किंवा तिसर्या मजल्यावर चिंचोळ्या जिन्यातून तिसर्या मजल्यावर चढाई करणे आदी गैरसोयी सर आखो पे.
आता भेटूया पुढच्या गुरवारी

लोभ असावा.
http://www.shreejagdishmahal.com/

सानिकास्वप्निल's picture

1 Apr 2012 - 12:29 pm | सानिकास्वप्निल

सुंदर फोटो आणी वर्णन
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत :)

चिगो's picture

2 Apr 2012 - 1:52 pm | चिगो

राजस्थानात भटकायला जायची बरेच दिवसांपासून इच्छा आहे.. वृत्तांतरुपाने तुम्ही ती थोडीफार पुर्ण करत आहात..

मस्त सफर आणि वर्णन.. धन्यवाद..