दाबेली

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
29 Mar 2012 - 4:01 am

.

साहित्य दाबेली मसाला:

४ बटाटे उकडून , कुस्करून घेणे
१-१/२ कांदा बारीक चिरून
१ टीस्पून लाल-तिखट (आवडीप्रमाणे कमी-जास्त)
एक ते दीड टेस्पून दाबेली मसाला (बाजारात सहज उपलब्ध आहे , नाही मिळाल्यास : २-३ लाल-सुक्या मिरच्या + २-३ दालचिनीच्या काड्या + ३-४ लवंगा + १ /२ चमचा धणे + १/२ चमचा बडीशेप + १/२ चमचा काळीमिरी + १ चक्रीफुल + १ तमालपत्र , सगळं कोरडचं भाजून मिक्सरवर वाटून बारीक पावडर करावी.)
मीठ चवीनुसार
तिखट-मीठाचे शेंगदाणे
द्राक्ष मधे चिरुन घ्यावी
बारीक चिरलेली कोथिंबीर
बटर आणी तेल

.

पाकृ:

कढईत थोडं तेल व बटर एकत्र गरम करुन घ्यावे.

.

त्यात कांदा घालून गुलाबी रंगावर परतून घ्यावा.

.

त्यात चवीप्रमाणे मीठ, लाल-तिखट व दाबेली मसाला घालून परतून घेणे.

.

त्यात पाऊण ग्लास पाणी घालून उकळी आणा.

.

उकळी आली की त्यात उकडून, कुस्करून घेतलेले बटाटे घालावे व सगळं एकजीव करावे.

.

मिश्रण जरा घट्ट झाले की त्यात चिरलेले द्राक्ष , शेंगदाणे व कोथिंबीर घालावी. (मला डाळिंब नाही मिळाले म्हणून डाळिंबाचे दाणे घातले नाही , तुम्ही घालून शकता.)

सर्व्हिंग :

दाबेलीसाठी पाव
तयार दाबेली मसाला (सारण)
तिखट-मीठाचे शेंगदाणे
बारीक शेव
बारीक चिरलेला कांदा
बारीक चिरलेली कोथिंबीर
मधो-मध चिरून घेतले द्राक्ष
बटर
गोड चटणी ( १ वाटी चिंच गरम पाण्यात भिजवून त्याचा कोळ काढून घ्यावा, गरम पाण्यात १/२ वाटी खजूर भिजवून, वाटून घेणे. चिंचेचा कोळ उकळायला ठेवावा, उकळी आली की त्यात गुळ , वाटलेला खजूर, लाल-तिखट, सुंठपूड, जीरे पावडर व मीठ घालावे.)

तिखट चटणी ( २ लाल मिरच्या २ मिनिटे गरम पाण्यात उकळून घेणे + १०-१२ लसूण पाकळ्या + मीठ + लिंबाचा रस असे एकत्र वाटून घेणे.)

.

पावाला मधोमध अर्धवट कापून घेणे. एका बाजूला गोड चटणी लावणे व दुसर्‍या बाजूला तिखट चटणी लावणे.

.

त्यात तयार दाबेली मसाला भरणे, त्यात शेव, शेंगदाणे, कांदा व कोथिंबीर घालून दाबेली तयार करावी. तव्यावर बटर सोडून तयार दाबेली शेकून घ्यावी.

.

गरमा-गरम दाबेलीचा आस्वाद घ्या :)

.

प्रतिक्रिया

नेत्रेश's picture

29 Mar 2012 - 5:07 am | नेत्रेश

जबरदस्त प्रेझेंटेशन आणी मस्त डिटेलवार पाककृती

मोदक's picture

29 Mar 2012 - 8:34 am | मोदक

+१ हेच बोल्तो...

चिंतामणी's picture

29 Mar 2012 - 8:53 am | चिंतामणी

हेच बोलतो.

डावखुरा's picture

5 Apr 2012 - 8:44 am | डावखुरा

मीपण हेच बोल्लो तर चालेल ना?
[काका तुमची काही हरकत?]

स्वानन्द's picture

29 Mar 2012 - 5:50 am | स्वानन्द

एकदम डिट्टेल माहिती आणि लाजवाब फोटो!!!

निवेदिता-ताई's picture

29 Mar 2012 - 8:44 am | निवेदिता-ताई

+१..........

सानिका तु़झ्या शेजारी रहायला येवु का...म्हणजे शेजारणीला अशा मस्त मस्त पदार्थांची चव मिळेल ..:p

चिंतामणी's picture

29 Mar 2012 - 8:54 am | चिंतामणी

राणीच्या देशात जावे लागेल. :)

काय हे?
चला सखयांनो ईनो घेऊ या!;)

जेनी...'s picture

29 Mar 2012 - 10:29 am | जेनी...

इनो ऑन जळ्जळ गॉन :D

प्रचेतस's picture

29 Mar 2012 - 8:10 am | प्रचेतस

खल्लास.

५० फक्त's picture

29 Mar 2012 - 8:18 am | ५० फक्त

मज्जा आली

हा प्रकार घरी करायच्या भानगडीत कधी करेन असं वाटत नाही, तसा प्रयत्न करुन सुद्धा बिघडवता येणार नाही असा प्रकार आहे.

इकडं हल्ली डेक्कनवरच्या दाबेलीची चव बरीच पाणचट झाली आहे, वारज्यात एक दाबेलीवाला आहे, तो चांगली देतो.

मोदक's picture

29 Mar 2012 - 8:32 am | मोदक

>>>इकडं हल्ली डेक्कनवरच्या दाबेलीची चव बरीच पाणचट झाली आहे

चव कधी चांगली होती..? ;-)

त्या दाबेलीवाल्याच्या मागच्याच बिल्डींगमध्ये दीड वर्ष राहिलो आहे मी... ती दाबेली खाण्याची इच्छा कधीही झाली नाही.

चिंतामणी's picture

29 Mar 2012 - 8:56 am | चिंतामणी

दूस-याची ट्रेड शिक्रेटस ओपन नाही करायची.

खाणा-यांचा विचार करा.

ट्र्रेड सिक्रेट राहु द्या ओ काका, उद्या सकाळी रविवार पेठ रेल्वे रिझर्वेशन सेंटरजवळ येता आहात का ? कर्णाला साबुदाण्याचा भाव माहित होता का यावर चर्चा करावी म्हणतो ?

चिंतामणी's picture

29 Mar 2012 - 2:06 pm | चिंतामणी

येतो. आठवणीसाठी एकदा फोनव.
किती वाजता ते कळव.

मृत्युन्जय's picture

29 Mar 2012 - 1:20 pm | मृत्युन्जय

त्या दाबेलीवाल्याच्या मागच्या बिल्डींगमध्ये राहिल्यावर कश्याला होइल खायची इच्छा? कोथरुडात एक लै भारी हलवाइ आहे. आम्ही त्याच्याकडुन सणासुदीला आनंदाने गोडधोड आणतो. मात्र त्याच इमारतीत राहणार्‍या माझ्या बहिणीने त्याच्या दूधाच्या पातेल्यात कुत्र्याला तोंड घालताना बघितल्यानंतर तिने त्याच्याकडुन मिठाईचा रिकामा बॉक्स आणणे पण टाळले.

संभाजी पार्क मध्ये पार्कमधुन खाण्याच्या भागाकडे जाताना..तिथे एकदम मस्त मिळते अजुन..नाव आथवत नाही..ट्राय करा..

जेनी...'s picture

29 Mar 2012 - 8:29 am | जेनी...

भारियेस एकदम तु तर

मस्त ......!!

प्रभाकर पेठकर's picture

29 Mar 2012 - 9:50 am | प्रभाकर पेठकर

दाबेली मसाल्याची पाकृ शोधत होतो. आज मिपावर आल्याचे सार्थक झाले. धन्यवाद सानिका. आणि हो, एका चांगल्या पाकृ बद्दल अभिनंदनही.

जाई.'s picture

29 Mar 2012 - 10:04 am | जाई.

मस्तच

सस्नेह's picture

29 Mar 2012 - 10:46 am | सस्नेह

फोटो बघूनच खल्लास ! मग खाल्ल्यावर काय होईल ?
सानिकाजी, खूप दिवस शोधत होते दाबेलीचि पाकृ. आभारी आहे. पण पदार्थांची जमवाजमव बाकी बरीचशी आहे..

मृत्युन्जय's picture

29 Mar 2012 - 10:49 am | मृत्युन्जय

मी हल्ली पाकृंना प्रतिसाद देत नाही (त्रास होतो. जळजळ होते). पण तरीही इथे प्रतिक्रिया नोंदवल्याशिवाय राहवत नाही.

खल्लास प्रेझेंटेशन आहे. परदेशात राहुन दाबेली पण घरी करावी लागते (इथे कॉर्नर ला जाउन १०- १२ रुपयात चापता येते) पण ती इतकी निगुतीने करुन तुम्ही दिल बाग बाग कर दिया :)

इरसाल's picture

29 Mar 2012 - 10:52 am | इरसाल

आज उपवास हाय.
काब्रे जळवता आहात.
पुढची पाकृ कोणतीही टाका पण स्वप्निलचा फोटो मस्ट ;)

पियुशा's picture

29 Mar 2012 - 11:47 am | पियुशा

सनिका तै दाबेली मस्तच :)
पण दाबेलीत द्राक्ष ?
मी तरी कधी नाही खाल्ली , मस्त लागत असेल बहुधा !!!
मला डाळिंबाचे दाणे घातलेली अन वर भरपुर चीज घातलेली दाबेली फारफार आवडते.

परिकथेतील राजकुमार's picture

29 Mar 2012 - 11:59 am | परिकथेतील राजकुमार

मला डाळिंबाचे दाणे घातलेली अन वर भरपुर चीज घातलेली दाबेली फारफार आवडते.

ते लगेच लक्षात येतेच. ;)

पाकृ खत्तरनाक आणि फटू भयानक जीवघेणी आहेत.

सानिकातै तुमच्याकडे ब्राह्मण वैग्रे जेवायला बोलावतात का श्रावणी शनीवारी वैग्रे ? गेला बाजार मुंजा मुलगा तरी ?

मला डाळिंबाचे दाणे घातलेली अन वर भरपुर चीज घातलेली दाबेली फारफार आवडते.

ते लगेच लक्षात येतेच.


हम्म ...तुझी तब्येत सुधरत नाही त्यात माझा काय दोष ? ईनो घे ईनो ;)

सानिकातै तुमच्याकडे ब्राह्मण वैग्रे जेवायला बोलावतात का श्रावणी शनीवारी वैग्रे ? गेला बाजार मुंजा मुलगा तरी ?

अलबत ,घालतात हो घालतात ;)
मुंजा मुलगा घालतात पण तुझ्यासारखे (पींम्पळावरचे )मुंजे नाहीत ;)

कवितानागेश's picture

29 Mar 2012 - 1:39 pm | कवितानागेश

सानिकाताइ,
मिपावरच्याच ५ सवाष्णी, कुमरिका वगरै बोलवा हो.
मुंजा नक्को! ;)
( कुणाकडे कोपर मारुन बाजूला ढकलणारी स्मायली आहे का? )

सानिकास्वप्निल's picture

29 Mar 2012 - 3:49 pm | सानिकास्वप्निल

डाळिंबाचे दाणे तर घालतातच पण आमच्या मुलुंड ला तर द्राक्ष, अननस घातलेली दाबेली ही मिळते :)
द्राक्ष घालून बघ चव छान लागते हं
प्रतिसादाबद्दल धन्यवाद गं पियुडे :)

प्रभाकर पेठकर's picture

29 Mar 2012 - 6:22 pm | प्रभाकर पेठकर

होय. द्राक्षं घालतात दाबेलीत. पण, इथे आपल्या पाककृतीत ती जरा अंमळ मोठी आणि जास्त दिसताहेत.

सानिकास्वप्निल's picture

29 Mar 2012 - 7:11 pm | सानिकास्वप्निल

पेठकर काका :)

कच्छी दाबेली मध्ये द्राक्षं खूप छान लागतात.
मी घातली होती. इथे नेहमीच डाळिंब मिळते असे नाही.. त्यामुळे मग द्राक्षे हा चांगला पर्याय आहे डाळींबाला.

सानिके.. पत्ता पाठवच गं मला तुझा.

गणपा's picture

29 Mar 2012 - 12:48 pm | गणपा

बहुतेक डाळींब उपलब्ध झाल नसावं. म्हणुन त्याची जागा द्राक्षाने घेतली असावी. :)

धागा उघडल्याच सार्थक झालं. :)

परिकथेतील राजकुमार's picture

29 Mar 2012 - 12:58 pm | परिकथेतील राजकुमार

बहुतेक डाळींब उपलब्ध झाल नसावं. म्हणुन त्याची जागा द्राक्षाने घेतली असावी.

त्यांनी धाग्यात चांगले ठळक अक्षरात लिहिले आहे ना. :-

(मला डाळिंब नाही मिळाले म्हणून डाळिंबाचे दाणे घातले नाही , तुम्ही घालून शकता.)

हे नुसते फटू बघून प्रतिक्रिया देणारे असे अलगद सापडतात. ;)

पाककृतींचे धागे वाचायचे असतात होय रे.. धन्स. ;)

हे म्हणजे आधी मॅन्युअल वाचून 'कामाला' सुरुवात करणं झालं. ;)

दाबेली जेव्हा पुण्यात अगदी नवी नवी होती, तेव्हा एकाने मला उल्लू बनवले होते त्याची आठवण झाली. मी दाबेली खाल्ली आणि आत कसले सारण भरतात त्याची चौकशी केली तेव्हा त्या विक्रेत्याने मला थापा मारल्या, की याची खास फळभाजी असते. ती केवळ राजस्थानच्या वाळवंटात होते. मग ती मुंबईच्या बाजारातून मेहनतीने आणावी लागते वगैरे वगैरे. मीपण दोघाचौघांना तीच माहिती सांगितली. नंतर जेव्हा दाबेलीतील मसाल्याची रेसिपी समजली तेव्हा माझेच मला हसू आले.

एनीवे. झकास फोटो आणि प्रिपरेशन.

स्मिता.'s picture

29 Mar 2012 - 1:07 pm | स्मिता.

अगं एऽऽऽ बाई, का आमच्यावर हे असे अत्याचार करतेस??
इनोची मोठ्ठी बाटली पण संपली ना... रेवतीताईंकडूनच इनो घेते आता.

अत्रुप्त आत्मा's picture

29 Mar 2012 - 1:11 pm | अत्रुप्त आत्मा

प्रेझेंटेशन आणी डिटेलवारीला... सलाम सलाम सलाम... :-)

बाकी नेहमीची प्रतिक्रीया मनात कल्पावी...

ही दाबेली स्वतःच्या "बेली" मध्ये आत्ताच घातली जावी असे प्रकर्षाने वाटून राहिले आहे :)

मृगनयनी's picture

29 Mar 2012 - 1:26 pm | मृगनयनी

सानिका ताई...... का ओ.. दर आठवड्याला असे नमकीन टेस्टी अत्याचार करता आमच्यावरती? ;) ;)

असो.

राणीच्या देशात द्रोण पाहून ड्वॉले पाणावले.

सानिकास्वप्निल's picture

29 Mar 2012 - 3:55 pm | सानिकास्वप्निल

चिंतामणी काका अहो राणीच्या देशात कुठे मिळतात ओ द्रोण
हे तर आपल्या भारतातून आणले गेले आहे, जरा जास्तचं हौशी ना आम्ही ;)
प्रतिसादाबद्दल धन्यवाद :)

चिंतामणी's picture

29 Mar 2012 - 11:35 pm | चिंतामणी

आणि अर्थातच सादरीकरणाला

__/\__

स्वातीविशु's picture

29 Mar 2012 - 2:49 pm | स्वातीविशु

सॉल्लिड रेसिपी...फोटो तर खुपच जीवघेणे आहेत.

पावभाजी मसाल्याची रेसिपीसाठी खुप धन्यवाद. वीकांताला करुन खावी असा विचार आहे. :)

रुमानी's picture

29 Mar 2012 - 3:18 pm | रुमानी

झकास !फोटु पण मस्तच !

स्वाती२'s picture

29 Mar 2012 - 3:58 pm | स्वाती२

मस्त! मस्त! मस्त!
सानिका, मसाल्याच्या कृतीसाठी शतशः धन्यवाद!

पाककृती बघून कितीही इनो घेतला तरी जळजळ जात नाहीये.. आता तर खाल्लीच पाहिजे.

- पिंगू

सुहास झेले's picture

29 Mar 2012 - 5:14 pm | सुहास झेले

अल्टिमेट !!

Pearl's picture

29 Mar 2012 - 5:27 pm | Pearl

वॉव..... मस्तच...सही... तोंपासू.
माझी फेवरेट डिश.. धन्स सानिका
सगळे फोटो पण सही आले आहेत...

सुहास..'s picture

29 Mar 2012 - 10:53 pm | सुहास..

_/\_

लय भारी !!

यु लकी स्वप्नील ;)

प्रसाद प्रसाद's picture

3 Apr 2012 - 6:35 pm | प्रसाद प्रसाद

असेच म्हणतो !!!!!!!

मी धागा उघडलाच नाही.

मी फोटो पाहिलेच नाहीत.

मी पाककृती वाचलीच नाही.

मी दाबेलीचं प्रेझेन्टेशन पाहिलंच नाही.

मला जळजळ झालीच नाही.

मी इनो घेतलंच नाही.

मी दाबेलीच खातच नाही.

मूळात मला दाबेली आवडतंच नाही.

जौच द्या..... :-(

सांजसंध्या's picture

30 Mar 2012 - 7:50 am | सांजसंध्या

फोटो छान आलेत. करूनच बघेन आता :)

स्वाती दिनेश's picture

30 Mar 2012 - 10:09 am | स्वाती दिनेश

दाबेली मस्तच,
मी ही भारतातून येताना नेहमी आठवणीने दाबेली मसाला पाकिटे घेऊन येते. :)
स्वाती

जागु's picture

30 Mar 2012 - 10:57 am | जागु

वा मस्तच.

सांजसंध्या's picture

30 Mar 2012 - 1:27 pm | सांजसंध्या

मी पण द्राक्ष घालूनच केली.

मला डाळिंब नाही मिळाले म्हणून डाळिंबाचे दाणे घातले नाही , तुम्ही घालून शकता.)

हे आत्ता पाहीलं !!

मदनबाण's picture

30 Mar 2012 - 2:03 pm | मदनबाण

शॉलिट्ट ! :)

अरुणा's picture

30 Mar 2012 - 5:08 pm | अरुणा

सुरेख ..... फेवरेट आहे माझि हि डिश ... करुन बघेन च आता ... :)

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Mar 2012 - 5:19 pm | बिपिन कार्यकर्ते

झकास!

मी-सौरभ's picture

30 Mar 2012 - 8:25 pm | मी-सौरभ

कित्ती गं!
चान गं! मस्त गं!
बनवतेस गं!
जीवघेणे गं, फोटो गं, डकवतेस गं!!

सानिका.... एकदम सही !!
मला दाबेली इतकी आवडते की मी तिन्ही त्रिकाळ खाऊ शकते. त्यात अशी आयती मिळाली तर विचारायलाच नको :)
तुला सांगू.......पुण्यात "सिद्धी" चा दाबेली मसाला मिळतो. त्याची चव अशी काय लागते म्हणून सांगू..... आठवणीने पण तोंडाला पाणी सुटले !!
त्या मसाल्यात काहीच करायची गरज नसते. फक्त बटाटे उकडायचे...मॅश करायचे.. थोडं तेल गरम करुन त्यात तो मसाला घालायचा आणि मग त्यात बटाटे , भाजलेले शेंगदाणे,डाळींब, कांदा कोथिंबीर, शेव वगैरे घालायचे. एकदम सोप्पं :)

श्रीयुत संतोष जोशी's picture

8 Apr 2012 - 9:35 am | श्रीयुत संतोष जोशी

१ नं पाकक्रिया . अगदी झकास. फोटो पण खास आहेत

अरुणा's picture

9 Apr 2012 - 11:48 am | अरुणा

मी कालच हि रेसिपी करुन पाहिली ... एकदम छान झालेली :) धन्यवाद ...
मला दाबेलीची रेसिपी हवीच होती ... इकडे बन्गलोर मधे अजिबात नाही मिळ्त :( दाबेली मसाला हि नाही मिळ्त .. त्यामुळे खूप खूप धन्यवाद ...

महेश काळे's picture

31 May 2012 - 11:52 am | महेश काळे

धन्यवाद सानीका

आर्या१२३'s picture

31 May 2012 - 5:16 pm | आर्या१२३

मस्त मस्त!!!
तोंडाला पाणी सुटले अगदी! :)

सुमीत भातखंडे's picture

1 Jun 2012 - 10:57 am | सुमीत भातखंडे

.