ही ऊन उतरली संध्या
भावप्रखर तळपते
जे नसते नशीबी त्याचे
कढ काढून काढून जळते
मज प्रेमच वाटे माझे
जरी फिरलो माघारी
दोष जरी का माझा
दुसर्याच्या माथी मारी
तो पसरी रंग सोन्याचे
ढळता भास्कर गगनी
अभागी आम्ही मात्र
रमतो आत्मभजनी
हर्ष असो वा दु:ख
राग लोभ वा मत्सर
अपुल्या मनाचे घोडे
सावरून घे क्षणभर!
प्रतिक्रिया
26 Mar 2012 - 4:28 pm | कौन्तेय
कमी शब्दांत भरगच्च भावना -
"तो पसरी रंग सोन्याचे
ढळता भास्कर गगनी
अभागी आम्ही मात्र
रमतो आत्मभजनी"
छान -
26 Mar 2012 - 5:13 pm | गणेशा
मस्त ..
लिहित रहा.. वाचत आहे..
26 Mar 2012 - 5:17 pm | पैसा
छान कविता
26 Mar 2012 - 5:26 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
सुंदर रचना!!
खुप आवडली.
26 Mar 2012 - 6:15 pm | निश
भारी समर्थ साहेब, मस्त कविता.
26 Mar 2012 - 6:46 pm | चौकटराजा
भारी आणि समर्थ कविता !
भास साहेब , हा आत्मरति चा रोग आहे ना हा १९८० नंतर जास्तच फोफावला आहे. आम्ही तुम्हाला दाद देत आहोत . हीच दाद हा या रोगावरचा
रामबाण उपाय आहे.
आमच्याच एका जुन्या कवितेतील ओळ आठवली
फ्लॅटात, मठात आम्ही उद्विग्न
जन जंगली सुखे नाहले