Skip to main content

क्षणभर!

लेखक भारी समर्थ यांनी सोमवार, 26/03/2012 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
ही ऊन उतरली संध्या भावप्रखर तळपते जे नसते नशीबी त्याचे कढ काढून काढून जळते मज प्रेमच वाटे माझे जरी फिरलो माघारी दोष जरी का माझा दुसर्‍याच्या माथी मारी तो पसरी रंग सोन्याचे ढळता भास्कर गगनी अभागी आम्ही मात्र रमतो आत्मभजनी हर्ष असो वा दु:ख राग लोभ वा मत्सर अपुल्या मनाचे घोडे सावरून घे क्षणभर!
लेखनविषय:

वाचने 1199
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

कमी शब्दांत भरगच्च भावना -
"तो पसरी रंग सोन्याचे ढळता भास्कर गगनी अभागी आम्ही मात्र रमतो आत्मभजनी"
छान -

सुंदर रचना!! खुप आवडली.

भारी आणि समर्थ कविता ! भास साहेब , हा आत्मरति चा रोग आहे ना हा १९८० नंतर जास्तच फोफावला आहे. आम्ही तुम्हाला दाद देत आहोत . हीच दाद हा या रोगावरचा रामबाण उपाय आहे. आमच्याच एका जुन्या कवितेतील ओळ आठवली फ्लॅटात, मठात आम्ही उद्विग्न जन जंगली सुखे नाहले