Skip to main content

खेळ नियतींचा

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 16/03/2012 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
उडाली पाखरे परदेशी ,मोकळा चौसोपी वाडा. पोपडे पडे ओसरीस ,नाही अंगणी शेणसडा.. परसदारी तो औदुंबर, असे शांतपणे उभा. ना त्यास प्रदक्षिणा, ना कुणी राखे निगा. कोनाड्यातील आरसा ,उडाला त्याचा हि पारा भीतीवरील कुंकु खुणा, मिरवी सौभाग्याचा तोरा अडगळीतली रेशमी वसने, सांगे शृंगाराच्या कथा कोप~यातली उभी काठी, रडे वार्धक्याच्या व्यथा. कोप~यातल्या खाटेवर, श्वास मंदसा घुमे कुणाचा? ना हाती जीवनमरण ,भोग भोगणे खेळ नियतींचा
लेखनविषय:

वाचने 2139
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

क्या बात है अविनाशजी !!! _____/\_____!!!!!! केवळ अप्रतिम. खरंच कवितांच्या दालनाचा उगवतीचा काळ येतोय.

कोप~यातल्या खाटेवर, श्वास मंदसा घुमे कुणाचा? ना हाती जीवनमरण ,भोग भोगणे खेळ नियतींचा वा. खुपच छान...

मस्त रचना. खुप आवडली.

बालकविंची औदुम्बर ही कविता आता आठवली. ही आपली कविता प्रत्ययकारी आहे. तेथे घेऊन जाते. अन शेवटी अस्वस्थ करते. प्लस +११११११११११११११११११ आता याचं तरी विडंबन कुणी करू नका रे !