उडाली पाखरे परदेशी ,मोकळा चौसोपी वाडा.
पोपडे पडे ओसरीस ,नाही अंगणी शेणसडा..
परसदारी तो औदुंबर, असे शांतपणे उभा.
ना त्यास प्रदक्षिणा, ना कुणी राखे निगा.
कोनाड्यातील आरसा ,उडाला त्याचा हि पारा
भीतीवरील कुंकु खुणा, मिरवी सौभाग्याचा तोरा
अडगळीतली रेशमी वसने, सांगे शृंगाराच्या कथा
कोप~यातली उभी काठी, रडे वार्धक्याच्या व्यथा.
कोप~यातल्या खाटेवर, श्वास मंदसा घुमे कुणाचा?
ना हाती जीवनमरण ,भोग भोगणे खेळ नियतींचा
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2169
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्या बात है अविनाशजी !!!
क्या बात है अविनाशजी !!!
_____/\_____!!!!!!
केवळ अप्रतिम. खरंच कवितांच्या दालनाचा उगवतीचा काळ येतोय.
छान जमली आहे कविता! वातावरण
छान जमली आहे कविता!
वातावरण डोळ्यासमोर उभे राहिले.
वा....
कोप~यातल्या खाटेवर, श्वास मंदसा घुमे कुणाचा?
ना हाती जीवनमरण ,भोग भोगणे खेळ नियतींचा
वा. खुपच छान...
छान जमलिये
छान जमलिये :)
व्वा. एकदम सही. अकुकाका जियो.
व्वा.
एकदम सही.
अकुकाका जियो.
जब्रा कविता.
जब्रा कविता.
मस्त!!
मस्त रचना.
खुप आवडली.
मस्तच
मस्तच
अप्रतिम कविता
अप्रतिम कविता
व्वा व्वा...सुंदर चित्र उभ
व्वा व्वा...सुंदर चित्र उभ र्हायलय...! फारच छान...मस्त मस्त मस्त :-)
अप्रतिम. आज सगळ्या सुंदर
अप्रतिम.
आज सगळ्या सुंदर कविताच येत आहेत.
एकदम करुण... चित्रदर्शी शब्द
:( एकदम करुण... चित्रदर्शी शब्द आलेत...
ही तर " औदुंबर " च्या तोडीची कविता
बालकविंची औदुम्बर ही कविता आता आठवली. ही आपली कविता प्रत्ययकारी आहे. तेथे घेऊन जाते. अन शेवटी अस्वस्थ करते.
प्लस +११११११११११११११११११
आता याचं तरी विडंबन कुणी करू नका रे !