कॉकटेल लाउंज : गाथा बीयरची

सोत्रि's picture
सोत्रि in पाककृती
16 Feb 2012 - 1:10 am

हुतेक मद्यसेवन करणार्‍यांची मद्यसेवनाची सुरुवात ही बीयरनेच होत असावी असा माझा अंदाज आहे, निदान माझीतरी तशीच झाली. 1993 साली डिप्लोमाच्या इंडस्ट्रिअल टूरला जाताना व्हि.टी. स्टेशनवर काही सिनीयर मित्रांनी बीयरचा प्लान बनवला आणि मुंबई ते औरंगाबाद अश्या ट्रेन प्रवासात बीयर पहिल्यांदा ओठी लागली. ती चव आणि तो अनुभव अजूनही जश्याच्या तसा आठवणींच्या कप्प्यात साठवला गेला आहे. त्यानंतर बर्‍याच बीयर्स ट्राय केल्या. खजुराहो, महाराणी, एल्पी, हेवर्ड्स 5000, कॅनन 10000, ओल्ड मॉन्क... अश्या कितीतरी. तेव्हा फक्त एकच मापदंड असायचा, 'किती कडक (Strong) आहे'?

पुढे बर्याच वर्षांनी एकदा कामानिमीत्त अमेरिकेत नॉर्थ कॅरोलिना येथे गेलो होतो. त्या प्रोजेक्टचा एक डिझायनर, जॉन बंकर, बोस्टनहून नॉर्थ कॅरोलिनाला आला होता. आमच्या डिझाइन साइन ऑफ नंतर पार्टीला जायचे ठरले. जॉनची आणि माझी तोपर्यंत कामामुळे खुपच गट्टी जमली होती. त्याच्याजवळच बसलो होतो मी. यथावकाश बीयरच्या ऑर्डरी सोडायचे ठरले. जॉनने मला विचारले,"तुला कोणता एल आवडतो?" माझी बत्तीच गुल झाली, एल बी डब्ल्युच झाला म्हणा ना. 'किती कडक आहे' ह्या एकमेव मापडंदाने पिणार्‍या मला तो प्रश्न काही झेपलाच नाही. पण अंगी असलेल्या हुशारीने मी त्याला प्रती प्रश्न केला, "तुझ्या आवडीचा कुठला?". कट्टर बोस्टनवासी होता तो, त्याने मग बोस्टन एल कसा चवदार असतो, नॉर्थ कॅरोलिनाच्या बीयर कश्या 'पानीकम' हे सांगायला सुरुवात केली. मी आपला सर्व काही समजतयं असा आव आणून ऐकत होतो, झाकली मूठ सव्वा लाखाची हो. मग काहीतरी संधी साधून दुसर्‍या कंपूत पळ काढला.

त्यानंतर एका महिन्यानी त्यांची टीम भारतात आली. अर्थातच जॉनही होता. मग वेलकम पार्टीला पुण्यातल्या मानस रिसोर्टला घेऊन गेलो त्यांना. ह्यावेळी मी पुढे होतो कारण आमच्या टीम मधला पिणारा मी एकटाच. परत बीयरच्या ऑर्डरी सोडायचे ठरले. जॉनने मला विचारले,"अरे एक इंडिया पेल एल असतो, तो भारतातलाच का? तसे असेल तर तोच मागवू यात." माझ्या पोटात एकदम गोळाच आला. मागच्या वेळी तिकडे अमेरिकेत दुसर्‍या कंपूत पळ काढता आला होता. इथे आमच्या टीम मधला पिणारा मी एकटाच, त्यामुळे पळ काढून फारतर त्या मानस रिसोर्ट्च्या तलावात उडी मारावी लागली असती आणि ते शक्य नव्हते. मग त्याला काहीतरी थातूरमातूर सांगून, पटवून फोस्टर्स आणि किंगफिशर ऑर्डर केल्या. त्या बाटल्या आल्यावर लेबल पाहून जॉन म्हणाला, "अरे ही तर लागर आहे." ते ऐकून माझी अवस्था लागीर झाल्यासारखी झाली होती. ही झाली एवढी फटफजिती पुरे म्हणून त्यानंतर लगेच अभ्यास वाढवायला घेतला.

तशी मी बीयर जास्त आवडीने नाही फार पीत पण बीयरचा जो पहिला घोट घशातून उतरत जातो आणि जे काही काळीज थंड होते ना त्याला तोड नाही, निव्वळ स्वर्गसुख...

चला! नेहमीप्रमाणे नमनाला घडाभर तेल जाळून झाले, आता बीयरच्या गाथेकडे वळूयात.

बीयर बनवायला जास्त काही सामग्री लागत नाही. बीयरसाठी लागणारे महत्वाचे 4 घटक म्हणजे

  1. पाणी
  2. बार्ली (सातू/जव)
  3. हॉप्स
  4. यीस्ट

आता प्रत्येक घटकाची माहिती करून घेवुयात :

1. पाणी

बीयरमधे 90% पाणी असते. आता असे म्हणाल च्यामारी, 90% पाण्यासाठी का एवढे पैसे मोजायचे? पण हे पाणी काही साधेसुधे नसते; ते असते 'मंतरेलेले पाणी' :) खरंच, जे पाणी बीयर तयार करण्याच्या प्रक्रियेत वापरले जाते ते मिनरल वॉटर दगडांतून उगम पावणार्‍या झर्‍याचे किंवा नदीच्या उगमाचे (स्प्रिंग वॉटर) असावे लागते. दगडांमधील रासायनिक घट्क (क्षार) पाण्यात मिसळून एक वेगळी चव आलेली असते त्या पाण्याला. ती चव म्हणजेच ते क्षार फार महत्वाचे असतात.आता सध्याच्या आधुनिक जगात केमिस्ट लॅबोरेटोरी मध्ये जिप्सम किंवा एप्सम क्षार (Gypsum or Epsom Salts) पाण्यात मिसाळून तशी चव कृत्रिमरीत्या आणू शकतात. त्यामुळे बीयरच्या चवीसाठी पाणी हा अत्यावश्यक घटक असतो.
तर आता ते पाणी मंतरलेले कसे हे ही लक्षात आले असेलच ;)

2. मॉल्टेड बार्ली (सातू/जव)

बार्ली म्हणजे सातू किंवा बिहारींचा सत्तू ह्या धान्याला हलके मोड येउ देतात. त्यानंतर भट्टीत (Kiln) ते भाजले जातात. साधारण 30 तास लागतात ह्या भाजण्याच्या प्रक्रियेला. ह्या भाजण्याचा तीव्रतेवर (भट्टीचे तापमान) बीयरची चव अवलंबून असते. हलकेच (कमी तापमान) भाजले तर caramel चव मिळते तर जास्त प्रमाणात (जास्त तापमान) भाजले तर कॉफी किंवा चॉकलेटची चव मिळते बीयरला.बार्ली ऐवजी wheat and rye ही धान्येही वापरली जातात वेगवेगळ्या चवीसाठी.

3. हॉप्स

हॉप्स ही वेलीवर वाढणारी एक प्रकारची फुले असतात. बीयरला खराब करणारे जिवाणू मारण्यासाठी किंवा त्यांची पैदास फर्मेंटेशन प्रक्रियेत होउ नये म्हणून हॉप्सची फुले वापरली गेली सुरुवातीच्या काळात. बीयरला जो एक कडसरपणा असतो तो ह्या हॉप्समुळे येतो. ह्या हॉप्समुळे बीयरला एक विषीष्ट प्रकारचा स्वाद ही मिळतो. तो स्वाद ह्या हॉप्सच्या वापरलेल्या प्रजातीवर अबलंबून असतो. 50 पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रजातींची व्यावसायिकरीत्या पैदास केली जाते ज्या देतात बीयरला Citrus, pineapple, green grass, pepper आणि pine असे विवीध स्वाद. बीयरला एक गंधही असतो जो ह्या हॉप्समुळेच येतो.

4 . यीस्ट


शास्त्रिय चित्र
व्यावसायिक चित्र

सर्वात महत्वाचा घटक म्हणजे यीस्ट. एकपेशीय असलेला हा सूक्ष्म जीव मॉल्टेड बार्लीला आंबवताना आणि त्यातल्या शर्करेला (Carbohydrates) अल्कोहोल आणि कार्बन डाय ऑक्साईड मध्ये रुपांतरीत करतो. ह्या यीस्ट्चे दोन मुख्य प्रकार असतात, एल (Ale) आणि लागर (Lager), जे बीयरची स्टाइल किंवा प्रकार ठरवतात आणि हॉप्सच्या जोडीने बीयरला एक स्पेसिफिक स्वाद प्रदान करतात.

बीयरच्या स्टाइल्स किंवा प्रकार

एल (Ale)
लागर (Lager)

Saccharomyces Cerevisiae असे नामाधिमान असलेला हा यीस्टचा प्रकार Aerobic असतो म्हणजे ह्या यीस्टला हवेतल्या ऑक्सीजनची आवश्यकता असते फर्मेंटेशनसाठी. त्यामुळे हे यीस्ट वरच्या बाजूने (हवेशी संपर्क राखून) मॉल्टेड बार्लीला आंबवते. ह्वेचा संपर्क जरूरी असल्यामुळे साधारण उबदार/गरम तापमान लागते फर्मेंटेशनसाठी.
Saccharomyces Carlsbergensis (Carlsberg ह्या बीयरला तिचे नाव ह्या यीस्टच्या प्रकारावरूनच पडले आहे) असे नामाधिमान असलेला हा यीस्टचा प्रकार Anaerobic असतो म्हणजे ह्या यीस्टला हवेतल्या ऑक्सीजनची आवश्यकता नसते फर्मेंटेशनसाठी. त्यामुळे हे यीस्ट खालच्या बाजूने (हवेशी संपर्क जरूरी नल्याने) मॉल्टेड बार्लीला आंबवते. ह्वेचा संपर्क जरूरी नसल्यामुळे थंड तापमान असले तरीही चालते फर्मेंटेशनसाठी.

एलमुळे तयार होणार्‍या बीयरचे काही प्रकार

  • ब्राउन एल
  • पेल एल
  • इंडिया पेल एल
  • पोर्टर
  • स्कॉटिश एल
  • बोस्ट्न एल
  • स्टॉन्ग एल
  • स्टाउट

लागरमुळे तयार होणार्‍या बीयरचे काही प्रकार

  • अमेरिकन लागर
  • बॉक लागर
  • पिल्सनर
  • व्हीट बीयर
  • व्हियेन्ना लागर

बीयरच्या रंगछटा
बार्ली भाजण्याचे तापमान, यीस्ट्चा प्रकार आणि हॉप्सची प्रजात ह्यानुसार बीयरच्या खालिल चित्रात दाखवल्याप्रमाणे विवीध रंगछटा असतात.

पुण्यात उंद्रीला 'कॉरिंथियन्स क्लब' म्हणून एक क्लब आहे तिथे बीयर लोकली ब्रु केली जाते आणि एल आणि लागर ह्या दोन्ही प्रकारच्या बीयर्स तिथे मिळतात. माझे ते अत्यंत आवडते ठिकाण आहे. एक 'बीयर कट्टा' तिथे करूयात असे सुचवून ही बीयर गाथा इथे संपवतो :)

नोट: सर्व चित्रे आंतरजालावरून साभार

प्रतिक्रिया

गणपा's picture

16 Feb 2012 - 1:38 am | गणपा

तुला साष्टांग दंडवत.

मेघवेडा's picture

16 Feb 2012 - 2:56 am | मेघवेडा

तंतोतंत.

रेवती's picture

16 Feb 2012 - 2:51 am | रेवती

छान माहिती. नाहीतर आतापर्यंत पाणी हे पिण्यासाठी, सातू हे लग्न झाल्यावर शिवामूठ वाहताना आणि सूप करून पिण्यासाठी, यीस्ट ब्रेड बनवताना वापरतात एवढेच माहित होते. शेवटचा फोटू छान.

मस्त माहिती रे सोत्री.

साला आयरिश बीयर (स्पेशली गिनीज) बद्दल काहीतरी लिही की बीयर बद्दलच्या भागात. जागातले सगळ्यात जास्त बीयर प्रेमी कोण तर आयरीश पब्लीक.

(सॅम अ‍ॅडम्स विंटर ऐल आणी बॉस्टन लागर प्रेमी) - प्रभो

घ्या! इथून काय शिकून गेले .......तर हे!

टिनटिन's picture

16 Feb 2012 - 12:13 pm | टिनटिन

गिनीसला तोड नाही. मुम्बईत कुठे मिळते का ?

मिळते. हायपरमार्टच्या मॉल्समधे आता बियर शॉप्स आली आहेत. त्यात मिळेल.

गिनेसच्या "माय गुडनेस..माय गिनेस" सीरीजमधल्या अ‍ॅड कँपेन्स या आत्तापर्यंतच्या सर्वात यशस्वी आणि उत्तम उदाहरण अशा जाहिराती समजल्या जातात. "माय गुडनेस..माय गिनेस" ही टॅगलाईनही एक मॉडेल टॅगलाईन म्हणून पाहिली जाते. मनाला टीज करणार्‍या या जाहिरातींच्या सीरीजमधे गिनेस बियरचा कॅन किंवा बाटली कोणत्यातरी आपात्कालीन (अर्र्..गया हाथ से..) अशा स्थितीत दाखवून पाहणार्‍याच्या मनात टेन्शन आणलं जायचं.. :) त्यातली काही उदाहरणं..

जालावरुन साभारः

शिवाय एक "गिनेस इज गुड फॉर यू" अशी खूप पॉप्युलर झालेली टॅगलाईन होती. ती खूप प्रसिद्ध झाल्यावर काही सरकारी ऑथॉरिटीजनी त्यावर आक्षेप घेतला. अल्कोहोल "गुड फॉर यू" असू शकत नाही म्हणून..

तेव्हा गिनेसने आपल्या टॅगलाईनला "गिनेस इज नॉट गुड फॉर यू.."करुन टाकली.. तरीही ती चालली.. धन्य..

>>>"गिनेस इज नॉट गुड फॉर यू.."

=) ) =) ) =) ) =) ) =) ) =) )
=) ) =) ) =) )
=) ) =) ) =) )

धन्य... धन्य !!!

वरील प्रतिसादात हायपरमार्ट ऐवजी हायपरसिटी वाचावे. मालाड, ठाणे, वाशी इ ठिकाणी आहेत.

शिवाय गोदरेज नेचर बास्केट या चेनच्या काही दुकानांतही ही शॉप्स निघाली आहेत. अन्यत्र न मिळणार्‍या वाईन /बियरही इथे मिळतात.

इष्टुर फाकडा's picture

16 Feb 2012 - 3:47 am | इष्टुर फाकडा

एरोबिक असते म्हणजे ह्या यीस्टला हवेतल्या ऑक्सीजनची आवश्यकता नसते फर्मेंटेशनसाठी. त्यामुळे हे यीस्ट वरच्या बाजूने (हवेशी संपर्क राखून) मॉल्टेड बार्लीला आंबवते. ह्वेचा संपर्क जरूरी असल्यामुळे साधारण उबदार/गरम तापमान लागते फर्मेंटेशनसाठी.

काही गोंधळ होतो आहे का मीच कन्फ्यूज झालोय ??

बाकि लेख नेहमी सारखाच दर्जेदार.

हुप्प्या's picture

16 Feb 2012 - 8:13 am | हुप्प्या

एरॉबिक आणि अनेरॉबिकची उलटापालट झाली आहे.

एरॉबिक म्हणजे ज्याला ऑक्सिजन लागतो अशी प्रक्रिया.
इथे बघा
http://en.wikipedia.org/wiki/Aerobic_%28disambiguation%29
आणि
http://en.wikipedia.org/wiki/Anaerobic_respiration

पण बाकी लेख माहितीपूर्ण आणि रोचक.
आभार.

सोत्रि's picture

16 Feb 2012 - 8:30 am | सोत्रि

ह्याला म्हंते 'संपादकाच्या डुलक्या'.

असो, गणपाभौ तुम्ही केलेला बदल चुकीच्या ठिकाणी केला गेला आहे.

- (स्वसंपादनाची सोय परत चालू करा अशी मागणी कराणारा) सोकाजी

श्रावण मोडक's picture

16 Feb 2012 - 12:12 pm | श्रावण मोडक

संपादकांच्या डुलक्या हा इतिहास झाला हो. या अशा धाग्यावर डुलक्या असं लिहून तुम्ही संपादकांचा अवमान का करता. आजकाल तो एक वेगळा इफेक्ट असतो. ;)

गणपा's picture

16 Feb 2012 - 12:47 pm | गणपा

बघताय हं मी.

श्रावण मोडक's picture

16 Feb 2012 - 2:24 pm | श्रावण मोडक

अर्र... तुम्ही आहात होय? मला माहितीच नव्हतं. स्वारी हां... ;)

शिल्पा ब's picture

16 Feb 2012 - 8:00 am | शिल्पा ब

इंग्लिश लोक बीअरला एल म्हणतात...लेख आवडला.
मला इंडीया पेल एल जास्त आवडते.

मस्त रे..

ए एल ई चा उच्चार आले.. म्हणजे चहात घालतात ते असा असावा
अशी समजूत होती.. अडाणीपणा सगळा..

आता कळलं. धन्यु.

गोल्डन ईगल नावाचा प्रकार एका हॉटेलात मिळाला होता.

सर्वात उत्तमआआत्तापर्यंतच्यातली.

पुन्ह कुठे मिळेल कोण जाणे.

स्पा's picture

16 Feb 2012 - 8:46 am | स्पा

झकास

चिंतामणी's picture

16 Feb 2012 - 8:55 am | चिंतामणी

या महत्वाच्या वाक्याने तु माहितीपुर्ण लेखाचा छान समारोप केलास.

उन्हाळा सुरू होणारच आहे. त्यामुळे तु लेख वेळेवर टाकलास असे म्हणतो.

तर तुच आता एक 'बीयर कट्टा' तिथे करण्याचे मनावर घेउन तारीख ठरवुन टाक. Facebook smileys

मद्याचार्य सोकाजीरावांना _/\_

प्यारे१'s picture

16 Feb 2012 - 9:53 am | प्यारे१

अर्रर्रर्रर्रर्र...........!

बंद केली की रे मी ;)

सोत्रिला सा. न. घालायला इकडे लाईन लावा! गणपा आणि इतर ज्येष्ठ तिकडे ;)
-(बळंचकर) प्यारे

अमोल केळकर's picture

16 Feb 2012 - 9:56 am | अमोल केळकर

मस्त माहिती :)
आजच्या ड्राय डे दिवशी या लेखावरच समाधान मानावे लागत आहे .

अमोल केळकर

नावातकायआहे's picture

16 Feb 2012 - 5:20 pm | नावातकायआहे

ड्राय डे? म्हंजि काय? :-(

नावातकायआहे's picture

16 Feb 2012 - 5:24 pm | नावातकायआहे

.

आनंदी गोपाळ's picture

16 Feb 2012 - 10:37 pm | आनंदी गोपाळ

आहे का तुमच्या कडे?
असेल तर त्यात पाणी भरा.
त्यात उडी मारा.
अन जीव द्या!

छ्या!
च्याय्ला! दारू पिता अन ड्रायडे पाळता??? पुण्यात रहाता का? कोरड्या दिवशी कुठे मिळते ते सांगतो. व्यनि करा.

जयंत कुलकर्णी's picture

16 Feb 2012 - 10:53 am | जयंत कुलकर्णी

पूर्वी मिळायच्या अशा काही बियर्स.
लंडन पिल्स्नर
डॉबर्ग
पेलिकन
स्टड
गोल्डन ईगल
सोलन वॉटर
चायला अजून दोनतीन होत्या त्या आत्ता नेमक्या आठवत नाहीत.

लंडन पिल्स्नर परत आली आहे..

गोल्डन ईगल अजून आहे. पण उत्तर भारतात जास्त.

ठाण्यात एका पंजाबी हॉटेलात मिळाली होती. इतरत्र मात्र कुठे मिळाली नाही.. अफलातूनच होती ती..

जयंत कुलकर्णी's picture

16 Feb 2012 - 11:37 am | जयंत कुलकर्णी

पण हे दोनीही ब्रँड मल्यांनी विकत घेतले आहेत. मधे जहिरात म्हणून १०० रु. तीन या दराने विक्री करत होते. आता माहीत नाही.

प्यारे१'s picture

16 Feb 2012 - 12:59 pm | प्यारे१

>>>जहिरात म्हणून १०० रु. तीन या दराने विक्री करत होते.

उत्तम माहिती. ;)

५० फक्त's picture

16 Feb 2012 - 11:02 am | ५० फक्त

उत्तम माहिती, आभासी वैमानिकांना लेक्चर देण्यासाठी उत्तम. धन्यवाद.

मुक्त विहारि's picture

16 Feb 2012 - 11:33 am | मुक्त विहारि

एक बोम्बे पिल्सनर पण होती....

मॅन्ड्रेक's picture

16 Feb 2012 - 11:34 am | मॅन्ड्रेक

छान..

अन्या दातार's picture

16 Feb 2012 - 12:03 pm | अन्या दातार

एल आणि लागर यांचा उच्चारासहित अर्थ आज कळला. धन्स हो सोत्रि :) :)

बीअर कट्टा करण्यास प्रचंड अणुमोदण!!!!!

कॉमन मॅन's picture

16 Feb 2012 - 12:07 pm | कॉमन मॅन

सुंदर माहिती..

बिअर हा उन्हाळ्यातल्या सर्वात आवडता प्रकार आहे; पण हे ज्ञान आजच झालं.

>>>>>>>>>ही बीयर गाथा इथे संपवतो
म्हणजे काय ???
म्हणजे काय???

गाथा संपवली की फक्त लेख संपवला?
असं नका करु अर्कशास्त्री सोकाजी...

शाहिर's picture

16 Feb 2012 - 12:39 pm | शाहिर

बर्याच दिवसांपूर्वी "Tue, 12/07/2011 - 13:58" रोजी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद !!

विजुभाऊ's picture

16 Feb 2012 - 2:15 pm | विजुभाऊ

ड्राउट म्हणजे काय असते? बेंगलोरला हा प्रकार पाहिला होता.

म्हंजे डायरेक्ट बॅरल/केग मधून..नळ लावून. बाटलीतून नाही.

असं नसावं असा मला ड्राउट आहे... बाटलीवरच ड्राउट (किंवा ड्राफ्ट जे असेल ते) लिहिलेलं पाहिलं आहे अनेकदा..

मेघवेडा's picture

16 Feb 2012 - 2:44 pm | मेघवेडा

ड्राफ्ट बीयर्स म्हणजे वर प्रभ्या म्हणतो त्याप्रमाणं डिरेक्ट बॅरलमधून सर्व्ह केल्या जाणार्‍या. त्यामुळे त्या अनपाश्चराईज्ड असतात आणि त्यांची नैसर्गिक चव इन्टॅक्ट असते. तेंव्हा या ड्राफ्ट बीयर्सची चव आणि बॉट्ल्ड बीयरची चव यात जमीन अस्मानाचा फरक आहे हे कुणाला वेगळं सांगायला नको. तर अशा त्या कास्कमधून सरळ ओतल्या गेलेल्या टॅपवरच्या अर्थात ओरिगिनल ड्राफ्ट बीयरची चव बॉट्ल्ड माध्यमातून देतो अशी केलेली जाहिरात म्हणजे त्या 'ड्राफ्ट' लिहिलेल्या बाटल्या. तद्दन मूर्खपणा आहे हा. कास्क/ड्राफ्ट बीयर्स इतके दिवस टिकणारच नाही! बॉटलिंग करण्याचा प्रश्नच येत नाही. तेंव्हा 'ड्राफ्ट बॉट्ल्ड बीयर' असं काही असूच शकत नाही. केवळ खप वाढवण्यासाठी केलेला स्टंट आहे तो!

गवि's picture

16 Feb 2012 - 2:48 pm | गवि

कास्क मधून डायरेक्ट सर्व्ह केलेल्या बीयरला ड्रॉट किंवा ड्राफ्ट बीयर म्हणतात. ह्याची चव खूपच फ्रेश आणि भारी असते.

बीयर जेव्हा बॉटल्ड किंवा कॅन्ड केली जाते तेव्हा पाश्चरायझेनश (Pasteurization) नावाची प्रक्रिया केली जाते, बीयरचे शेल्फ लाइफ वाढण्यासाठी. कॅन्ड ड्रॉट किंवा ड्राफ्ट बीयर ह्यांच्या मधे पाश्चरायझेनश केलेले नसते त्यामुळे तीची चव फार फ्रेश असते पण शेल्फ लाइफ फारच कमी असते. निदान जपानमधल्या ड्रॉट किंवा ड्राफ्ट बीयर तरी अश्याच होत्या.

बाकी बर्‍याच कंपन्या मार्केटिंग म्हणूनही ड्रॉट किंवा ड्राफ्ट बीयर असे स्वत:च्या प्रोडक्ट्सना म्हणतात, त्याचा अर्थ असा असतो की त्यांनी बॉटलिंगची एक अशी पद्धत शोधली आहे की त्यांची बीयर ड्रॉट किंवा ड्राफ्ट बीयरची चव देते.

- (ड्राफ्ट) सोकाजी

प्रभो's picture

16 Feb 2012 - 2:53 pm | प्रभो

ह्येच माहिती होतं. धन्यु रे सोकाजी.

(ब्ल्यु मून ड्राफ्ट प्रेमी) प्रभो

जयंत कुलकर्णी's picture

16 Feb 2012 - 2:37 pm | जयंत कुलकर्णी

माझ्या माहितीप्रमाणे न पाश्चराईज केलेली बियर. यामुळे याची नैसर्गिक चव intact असते. पण त्यामुळेच ही कमी टिकते म्हणून थंडगार आणावी लागते आणि संपवावी लागते. अर्थात तिर्थप्राशनकार :-) योग्य माहिती देतीलच....

साला हे सगळ वाचल्यावर आज बीयर पीणे आले.

मी-सौरभ's picture

16 Feb 2012 - 6:34 pm | मी-सौरभ

तुमची बीअर चा कॅन वाली कोंबडी आठवली.

बियर म्ह्णजे दारू आणि दारु म्हणजे अपेय.. अशा गोष्टींचं नावही काढायचं घरात म्हणजे अब्रम्हण्यम्! अशा एका सोवळ्या कुटूंबात वयाची पंचवीस वर्षं आम्ही घालवली. आधी नोकरीही गावातल्या गावातच त्यामुळे तिथेही फारसं काही वेगळं वातावरण नव्हतं. नंतरच्या नोकरीत मात्र वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला लागायचं वेगवेगळे लोक भेटायचे.

पहिल्यांदा मुंबईच्याबाहेर जायचा योग आला तोच मुळी अमेरिकेत.. तेही सँटा बार्बरा ह्या अतिप्रसिद्ध आणि अति-उच्च्भ्रू शहरात. तिथल्या ऑफिसमधल्या लोकांबरोबर डीनरला गेलेलो असताना 'वॉट वूड यू लाईक टू ड्रिंक?' ह्या ठराविक प्रश्नाला 'वॉटर - नो आईस' हे आमचं ठराविक उत्तर गेलं. नंतर माझ्या बरोबरच्या एका भारतीय मित्राने 'व्हॉट डू यू हॅव ऑन टॅप?' असं त्या ललनेला विचारल्याचं मी ऐकलं! मी मनातच त्याला शिव्या दिल्या. म्हटलं हा इज्जत घालवणार. इतक्या चांगल्या हॉटेलात नळाचं पाणी प्यायची अवदसा कशाला आठवली ह्याला! पुलंच्या निळू दामल्याने जसं माँजिनीज मधे 'व्हॉट इस हॉट?' असं विचारून वेटरला घाम आणला होता तसं त्या लललेचं होणार असं मला वाटून तिच्या कडे बघितलं तर तिने हसून 'सॅम अ‍ॅडम्स, गिनेस' वगैरे काय काय नावं तोंडावर फेकली !! मला काहीच कळेना ! म्हणजे ह्या हॉटेलांमधे नळातून डायरेक दारु येते की काय ?? मजा आहे साल्यांची !!

डिनर नंतर रूमवर परतल्यानंतर त्या मित्राला हे सगळं काय प्रकरण आहे ते विचारून घेतलं तेव्हा बैजवार ध्यानात आलं. 'केल्याने देशाटन, पंडित मैत्री' वगैरे जे म्हणतात ते काही उगीच नाही.

योगप्रभू's picture

16 Feb 2012 - 9:06 pm | योगप्रभू

सोका,
उन्हाळ्याच्या स्वागतासाठी आधीपासूनच सज्ज झालायस रे. पण मस्त लेख. अगदी बीअरच्या सुखद घुटक्यासारखा.

बीअर असो, की व्हिस्की त्यात पाण्याचे महत्त्व आहेच. म्हणूनच अस्सल स्कॉच ही स्कॉटलंडमधील नैसर्गिक प्रवाही खनिज पाण्याचा सार्थ अभिमान मिरवते.

दुसर्‍या महायुद्धाच्या काळापर्यंत मुंबईत सुंदर जर्मन लागर सहज मिळत असे, असे संगीतकार सी. रामचंद्र यांच्याबाबतच्या एका आठवणीत वाचले आहे.

डोंगरे ब्रुअरीजची डोबर्ग लागर ही मला ठाऊक असलेली जुनी बिअर. याच डोंगरेंचे बालामृत प्रसिद्ध होते. त्यावरुन काहीजण डोबर्गला 'मोठ्या माणसांचे बालामृत' असे चेष्टेने म्हणत. त्यानंतर खजुराहोने बराच काळ धुमाकूळ घातला, पण नंतर तिची लोकप्रियता बघून खजुराहो डुप्लिकेट मिळायला लागली. हेवर्ड्स २००० व ५०००, नॉकआऊट आणि लंडन पिल्सनर हे ब्रँड त्यावेळीही होतेच. पण बिअरमध्ये नवे काही करण्याचे प्रयोग भारतात फारसे झाले नाहीत. नाही म्हणायला एका कंपनीने 'झिंगारो' नावाची बीअर काढली होती. तिच्या लाँचिंगला मी गेलो होतो. या बिअरच्या पाण्यासाठी कंपनीने खोपोलीजवळ उगमापासून एक झराच खरेदी केला होता आणि ते पाणी औषधी व खनिजयुक्त असल्याचा उत्पादकांचा दावा होता. ती बीअर फारशी चालली नाही. नंतर तिचे नाव ऐकू आले नाही.

भारतीय बिअर उद्योगात धूमशान माजवले ते मल्ल्याने. किंगफिशर ब्रँडमध्येच 'स्ट्राँग' प्रकार सादर करून त्याने मजा आणली. किंगफिशर आजही पॉप्युलर आहे. परवा परवा 'फॉस्टर' या दर्जेदार ऑस्ट्रेलियन लागरचा 'स्ट्राँग' प्रकार बाजारात आला आहे. मी आणला आहे, पण टेस्ट नाही केलेला अजून. 'कार्ल्सबर्ग' थोडा कडवट वाटला. मला दाद द्यावीशी वाटते ती 'बडवायजर'या अमेरिकन बीअरला. ती माईल्ड आहे आणि सगळ्या बीअरमध्ये ही एकमेव अशी आहे, जिने पंच बसत नाही (पंच म्हणजे घुटका घेतल्यानंतर छातीत ठोसा मारल्यासारखे वाटणे. कधी कधी चिकणी सुपारी खाल्ल्यानंतर अशी भावना होते.)

चल येतोस का 'फॉस्टर स्ट्राँग' टेस्ट करायला? :)

पाषाणभेद's picture

16 Feb 2012 - 10:13 pm | पाषाणभेद

सोत्री, आपले भारतातले कोणते कोणते ब्रांड लागर अन एल मध्ये मोडतात ते सांगितले तर आमच्यासारख्या गरजूंवर फार फार उपकार होतील मालक.

धमाल मुलगा's picture

16 Feb 2012 - 10:17 pm | धमाल मुलगा

फेब्रुवारी निम्मा उलटून गेलाच . मार्चमधल्या उकाड्याची धग हळूहळू घशाला जाणवायला लागली आहे. की बीयरगाथा आपल्याच्यानं तरी कोरड्या घशानं ऐकवणार नाही.

कोरिएन्थनमधली टॅप बीअर घेऊनच गाथेचा पाठ ऐकु म्हणतो. :)

चिगो's picture

17 Feb 2012 - 2:30 pm | चिगो

बियरबद्दल अत्यंत उपयुक्त आणि रंजक माहिती..
वर पाभेंनी म्हटल्याप्रमाणे भारतात उपलब्ध बियर्सबद्दल अशी माहिती दिल्यास गरजूंना लाभ मिळेल.. ;-)

नि३सोलपुरकर's picture

18 Feb 2012 - 1:05 pm | नि३सोलपुरकर

सोत्री साहेब,
रंजक माहिती ....धन्यवाद !!

'बीयर कट्टा' साठी हात वर केलेला.

प्रभाकर पेठकर's picture

20 Feb 2012 - 3:49 am | प्रभाकर पेठकर

भर उन्हातून घरी आल्यावर थंSSSSड गाSSSSर बिअर चे दोन घोट घशातून पोटात उतरले की, मेंदू एखाद्या तळ्याकाठी पाण्यात पाय सोडून बसल्याचा भास होतो.

सोकाजी राव,

माहितीपुर्ण धागा. ज्ञानात भर पडली. तरी एक प्रश्न उरतोच,
'लागर' आणि 'एल' मध्ये चवी व्यतिरिक्त काही फरक असतो का?

लेख आवडला. बरीच नवी माहिती मिळाली!

बहुसंख्य मद्यपींची सुरुवात बियरनेच होते तशी आमचीही झाली.

मुकंद आयर्न ह्या कंपनीपासून सुरू होणारा ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्टा बाँबे बियर ह्या कंपनीपाशी थांबतो. ठाण्याची स्थानिक बियर म्हणून का कुणास ठाऊक पण इतर बियरपेक्षा थोडी स्वस्त असायची (अजूनही आहे?). तेव्हा सुरुवात त्यानेच होणे क्रमप्राप्तच होते!

त्या॑नंतर मात्र भारतात तरी एलपी दा जवाब नही! किंगफिशर फारशी आवडली नाही.

ठाण्यात हायवेवर रॉयल चॅलेंज म्हणून एक रेस्टॉरंट आहे. तिथे आर सी बियर (आणि व्हिस्की) थोडी स्वस्त मिळते.

अमेरिकेत "बड"चे नाव बडे असले तरी ती पानीकम बियर घशाखाली उतरत नाही. त्यापेक्षा मिलर बरी!

बियर प्यावी ती उत्तर युरोपियनच. किंवा अधूनमधून वेगळी चव म्हणून लिंबाची चकती घातलेली मेक्सिकन करोना!

इंग्लंडात स्थानिक बियर प्याव्यात. लंडनच्या दक्षिणेत हार्वीज म्हणून एक लागर मिळते. उत्तम! आयरीश पबमध्ये काळसर्-कडवट गिनीज.

बियरचा संबंध उगाच उन्हाळ्याशी घातला जातो. बियर उत्तम असेल तर ऐन थंडीतदेखिल मजा आणते!

आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसूत हेदेखिल बियरचे भोक्ते होते असा आम्हाला दाट संशय आहे. उगाच का त्यांनी "काठोकाठ भरू द्या प्याला, फेस भराभर उसळू द्या" असे म्हटले?

टवाळखोर's picture

20 Feb 2012 - 5:55 pm | टवाळखोर

खुप सुंदर माहिती. मी लागरचा भोक्ता आहे. तशी माझी अपेयपानाची सुरुवात व्होडकाने झाली, पण बिअरची चव जे समाधान देते त्याची तुलनाच नाही.

ता.क. मी बरेच दिवस मिपा वाचतोय पण मनापासून तुम्हाला प्रतिक्रिया द्यायची म्हणून मिपाचे खाते खोलले :)

मुक्त विहारि's picture

11 Oct 2014 - 2:56 pm | मुक्त विहारि

"मिपाचे सदस्यत्व घेण्यामागची कारणे..." ह्या माझ्या आगामी लेखात ह्याचा संदर्भ नक्की दिल्या जाईल....

विजुभाऊ's picture

11 Oct 2014 - 2:22 pm | विजुभाऊ

चला .ओक्टोबर हीट वर उतारा आलाय इथे.....

मुक्त विहारि's picture

11 Oct 2014 - 2:57 pm | मुक्त विहारि

कधी येताय?

तुम्ही सांगा.बंदा हाजीर होईल.....

मुक्त विहारि's picture

12 Oct 2014 - 2:44 pm | मुक्त विहारि

आमंत्रण पाठवले आहे...

एस's picture

12 Oct 2014 - 12:11 pm | एस

...

;-)