Veg Lasagna /Lasagne

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
6 Feb 2012 - 6:37 pm

साहित्यः
२-३ वाट्या मिक्स भाज्या (बेबीकॉर्न , रंगीत भोपळी मिरच्या, गाजर )
भरताचे वांगे (अर्धेच ) बारीक चिरुन मीठाच्या पाण्यात घालून ठेवणे
२ कांदे बारीक चिरुन
मुठभर पालकाची पाने
२-३ लसुण पाकळ्या बारीक चिरून
बेसील (इटालियन तुळस ;) )
तयार Lasagna /Lasagne सॉस (मी डॉलमियो/ दॉलमियो सॉस वापरला आहे)
किसलेले मोझ्झरेला चीज
किसलेले पारमेझान चीज
२ टीस्पून पांढरी किंवा काळीमिरपूड
१-२ टीस्पून ड्राईड हर्ब्स
ऑलिव्ह ऑईल
तयार Lasagna / Lasagne शीट्स (पास्ता शीट्स)
मीठ चवीनुसार

.

पाकृ:

एका भांड्यात पाणी व थोडे तेल घालून उकळायला ठेवावे. पाणी उकळू लागले की त्यात पास्ता शीट्स घालाव्यात. पास्ता शीट्स शिजल्या की भांडे गार पाण्याखाली धरावे व शीट्स चाळणीत काढून ठेवावे.

.

एका पॅनमध्ये ऑलिव्ह ऑईल गरम करावे व त्यात बारीक चिरलेला लसुण व कांदा घालून परतणे.

.

कांदा परतला गेला की त्यात मिक्स भाज्या घालून परतावे.

.

भाज्या चांगल्या परतल्या की त्यात चिरलेले वांगे व पालकाची पाने घालावीत.

.

वांगे जरा मऊ झाले की त्यात पास्ता सॉस घालावा व सगळं एकत्र करावे.

.

त्यात थोडेच मीठ (पास्ता सॉसमध्ये ही मीठ असतं व चीजमध्ये ही त्याप्रमाणे थोडेच घालावे ) ड्राईड हर्ब्स व मिरपूड घालावी.

.

काचेच्या चौकोनी डिशला थोडं बटर लावून घ्यावे. त्यावर थोडा तयार केलेला सॉस पसरावा.

.

आता त्यावर शिजवलेल्या पास्ता शीट्स लावावे. ( पास्ता शीट्स शिजवताना काळजी घ्यावी,माझ्या काही शीट्स एकमेकांना चिकटल्या होत्या त्यामुळे मला त्याचे तुकडे कापावे लागले :( तसेही आपल्याला थर द्यायचे आहेत म्हणून चालून गेले )

.

त्यावर पुन्हा तयार केलेला सॉस पसरावा, बेसीलची पाने घालावी व किसलेले पारमेझान चीज भुरभुरावे.

.

त्यावर पुन्हा पास्ता शीट्स लावाव्यात व परत सगळे सॉस, बेसील व पारमेझान चीज लावावे , असे सगळे थर तयार कारावे.शेवटी पास्ता शीटने सगळे कव्हर करावे.

.

आता त्यावर पुन्हा सॉस, पारमेझान चीज लावावे. शेवटी किसलेले मोझ्झरेला चीज पसरावे.

.

प्री-हीट केलेल्या ओव्हनमध्ये १८० डीग्रीवर ४०-४५ मिनिटे बेक करावे.

.

Veg Lasagna /Lasagne तयार आहे :) गरमा-गरम सर्व्ह करा.

.

हे घ्या :)

.

नोटः

*हल्ली अशा ही Lasagna /Lasagne शीट्स मिळतात ज्या प्री-कुक कराव्या लागत नाही...थेट पाकृत वापरता येतात तुम्ही त्याही वापरु शकता.
*भाज्या तुम्ही कोण्त्याही वापरु शकता मश्रुम, Courgettes, भोपळा.
*तुम्ही नुसता पालक व रीकोटा चीज घालून ही हे बनवु शकता.
*आवडत असल्यास पास्ताचे थर देताना मध्ये व्हाईट सॉस ही लावु शकता.

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Feb 2012 - 6:43 pm | बिपिन कार्यकर्ते

लासान्या आवडतंच. सध्या आमची एक पाकृ एक्स्पर्ट मैत्रिण उपलब्ध आहे, तेव्हा हे करून बघितल्या जाईल! :)

फोटो मात्र अतिशय टेम्प्टिंग आहेत! :(

स्मिता.'s picture

6 Feb 2012 - 6:55 pm | स्मिता.

माझं फेवरेट्ट आणि फोटू अ‍ॅज युज्वल! इथे पाकृ दिल्याबद्दल अनेकानेक आभार... पण नुसतं पाकृ वाचून जिभेचे चोचले नाही ना पुरवले जात :(

फक्त पालक व रीकोटा चीज घालून केलेलं लसान्या आवडत नाही. फार लगेच नकोसं होतं.

Maharani's picture

6 Feb 2012 - 7:26 pm | Maharani

माझी आवडती पाकृ !! share केल्या बद्द्ल धन्यवाद!! TEMPTING!!

मानस्'s picture

6 Feb 2012 - 7:46 pm | मानस्

छान दिसतोय पदार्थ, पण इथे पुण्यात यातलं बरचसं साहित्य मिळेल असं वाटत नाही.

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Feb 2012 - 8:56 pm | बिपिन कार्यकर्ते

इथे मिळतंय का बघा बरं! मिळालं तर बनवा आणि आम्हाला बोलवा! :)

http://pune.metromela.com/Dorabjee%27s/store/Camp/796

निवेदिता-ताई's picture

6 Feb 2012 - 10:27 pm | निवेदिता-ताई

पण पुणे तिथे काय उणे--- अस म्हणतात ना..

पिंगू's picture

6 Feb 2012 - 9:25 pm | पिंगू

झकास.. मस्त बनलाय.. फक्त तोंडी तारीफ करु शकतो, प्रत्यक्ष बनवायला केव्हा वेळ मिळेल माहित नाही..

- पिंगू

माझी अतिशय लाडकी डीश आहे..

मी पालक रिकोटा घालून करते... :)

पियुशा's picture

7 Feb 2012 - 10:22 am | पियुशा

झक्कास !!!!!!

जाई.'s picture

6 Feb 2012 - 9:49 pm | जाई.

खल्लास

अत्रुप्त आत्मा's picture

6 Feb 2012 - 10:20 pm | अत्रुप्त आत्मा

शेवटून दोन फटूंमुळे पहाता क्षणीच प्रचंड भूक लागल्या ग्येली आहे... आता कधी खाइन असं झालेलं आहे...

छान!
पालक व रिकोटा वापरून एक दोनदा लसानिया केले पण टेस्टमध्ये वेगळेपण नव्हते.
आता भाज्या घालून करून पाहीन.

भोपळी मिरचीला पर्याय चांगले आहेत हे.

नेहमी प्रमाणे फोटो कातील. शेवटुन दुस-या फोटोत चिजला आलेला रंग फारच Tempting आहे.

अवांतर - यूरोपीअन लोक भोपळी मिरची खातात का???????
.

प्राजु's picture

7 Feb 2012 - 1:42 am | प्राजु

खातात ना! न खायला काय झालं??
फक्त ग्रीन पेप्पर, रेड पेप्पर, यल्लो पेप्पर, बेल पेप्पर अशी नावे असतात.

मयुरपिंपळे's picture

6 Feb 2012 - 11:33 pm | मयुरपिंपळे

सानिका खुपच छान फोटु आहे... पण तुम्ही एवढे छान छान फोटु काढता पण कॉपीराईट्स हे कोपरात का टाकत नाही.
त्यामुळे सर्व मज्जा निगुन जाते.. असे मला वाटते. Smiley

प्राजु's picture

7 Feb 2012 - 1:40 am | प्राजु

सानिका... तुला एगप्लान्ट पार्माजान येतं का करायला?
किंवा चिकन पार्माजान सुद्धा सांग.

सुहास झेले's picture

7 Feb 2012 - 6:15 am | सुहास झेले

जबरी.... भूक लागली. शेवटचे दोन फोटो कहर आहेत कहर.... :) :)

प्रचेतस's picture

7 Feb 2012 - 8:36 am | प्रचेतस

कातिल पाकृ. आता लवकरच लासान्या चापायला कुठेतरी जायला पाहिजे.

सविता००१'s picture

7 Feb 2012 - 9:56 am | सविता००१

नेहमीप्रमाणेच झकास. आता तू इकडे कधी येणार आहेस ते सांगून ठेव. म्हणजे एअर्पोर्ट वरून तुला किड्नॅप करते आणि आणते माझ्या घरी ;)

गवि's picture

7 Feb 2012 - 10:23 am | गवि

टकाटक. चीझ टाकलेला पदार्थ म्हणजे माझ्या जिभेवरचे सगळे बड्स तरारून येतात आणि त्यांना रीन्झ करायला लाळेच्या सगळ्या वाहिन्या मोकळ्या होतात.

अवांतर : स्वप्नीलचे वजन सध्या किती आहे ?

सानिकास्वप्निल's picture

7 Feb 2012 - 10:44 pm | सानिकास्वप्निल

हो नॉन-व्हेज नक्की बनेल :)
अवांतर : स्वप्निल अगदी फिट आहे :) भरपुर खा आणी व्यायाम करा हे आम्ही अगदी कटा़क्षाने पाळतो ;)

प्राजक्ता पवार's picture

7 Feb 2012 - 3:43 pm | प्राजक्ता पवार

मस्तं ! :)

छान !

वरदुराज पण येवु द्यात !!

स्वाती२'s picture

7 Feb 2012 - 6:18 pm | स्वाती२

मस्त!

Pearl's picture

7 Feb 2012 - 7:52 pm | Pearl

मस्तच. माझीही आवडती डिश. पण घरी नव्हती करून पाहिली.
रेसिपी छान आणि सोपी वाटते. करून पाहिन आता. धन्स.

१-२ टीस्पून ड्राईड हर्ब्स - हे नक्की कोणते ड्राइड हर्ब्स घ्यायचे? कारण हर्ब्स सेक्शन मध्ये ड्राइड हर्ब्सचे खूप प्रकार असतात. मग कन्फ्यूज व्हायला होते.

सानिकास्वप्निल's picture

7 Feb 2012 - 10:38 pm | सानिकास्वप्निल

ड्राईड हर्ब्स मध्ये सगळ्या प्रकारचे हर्ब्स असतात, थाईम, ऑरेगॅनो, रोझमेरी, बेसील वगैरे :)
तुम्हाला जर का mixed ड्राईड हर्ब्स मिळाले तर उत्तम नाहीतर तुम्ही ऑरेगॅनो ही वापरु शकता तसे ही आपण ह्यात फ्रेश बेसील वापरत आहोत :)

गणपा's picture

7 Feb 2012 - 7:39 pm | गणपा

एकदम 'हेल्दी' पाकृ. :)
कधी योग येणार चाखायचा कोण जाणे.

पैसा's picture

7 Feb 2012 - 10:15 pm | पैसा

पण मला शेजारच्या अंकलच्या दुकानात फक्त मीठ आणि मिरपूड मिळेल, आणि भाजी मार्केटात भाज्या मिळतील त्यातून काही पदार्थ तयार करता येतो का हे बघावं लागेल! ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Feb 2012 - 10:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पाकृती होईल तेव्हा होईल किंवा वाटेला येईल तेव्हा येईल पण, पाककृतीच्या निमित्तानं टाकलेले फोटो स्पष्ट, स्वच्छ, आणि जीवघेणे असतात एवढेच सांगण्यासाठी ही पोच. :)

-दिलीप बिरुटे