साहित्यः
२-३ वाट्या मिक्स भाज्या (बेबीकॉर्न , रंगीत भोपळी मिरच्या, गाजर )
भरताचे वांगे (अर्धेच ) बारीक चिरुन मीठाच्या पाण्यात घालून ठेवणे
२ कांदे बारीक चिरुन
मुठभर पालकाची पाने
२-३ लसुण पाकळ्या बारीक चिरून
बेसील (इटालियन तुळस ;) )
तयार Lasagna /Lasagne सॉस (मी डॉलमियो/ दॉलमियो सॉस वापरला आहे)
किसलेले मोझ्झरेला चीज
किसलेले पारमेझान चीज
२ टीस्पून पांढरी किंवा काळीमिरपूड
१-२ टीस्पून ड्राईड हर्ब्स
ऑलिव्ह ऑईल
तयार Lasagna / Lasagne शीट्स (पास्ता शीट्स)
मीठ चवीनुसार
पाकृ:
एका भांड्यात पाणी व थोडे तेल घालून उकळायला ठेवावे. पाणी उकळू लागले की त्यात पास्ता शीट्स घालाव्यात. पास्ता शीट्स शिजल्या की भांडे गार पाण्याखाली धरावे व शीट्स चाळणीत काढून ठेवावे.
एका पॅनमध्ये ऑलिव्ह ऑईल गरम करावे व त्यात बारीक चिरलेला लसुण व कांदा घालून परतणे.
कांदा परतला गेला की त्यात मिक्स भाज्या घालून परतावे.
भाज्या चांगल्या परतल्या की त्यात चिरलेले वांगे व पालकाची पाने घालावीत.
वांगे जरा मऊ झाले की त्यात पास्ता सॉस घालावा व सगळं एकत्र करावे.
त्यात थोडेच मीठ (पास्ता सॉसमध्ये ही मीठ असतं व चीजमध्ये ही त्याप्रमाणे थोडेच घालावे ) ड्राईड हर्ब्स व मिरपूड घालावी.
काचेच्या चौकोनी डिशला थोडं बटर लावून घ्यावे. त्यावर थोडा तयार केलेला सॉस पसरावा.
आता त्यावर शिजवलेल्या पास्ता शीट्स लावावे. ( पास्ता शीट्स शिजवताना काळजी घ्यावी,माझ्या काही शीट्स एकमेकांना चिकटल्या होत्या त्यामुळे मला त्याचे तुकडे कापावे लागले :( तसेही आपल्याला थर द्यायचे आहेत म्हणून चालून गेले )
त्यावर पुन्हा तयार केलेला सॉस पसरावा, बेसीलची पाने घालावी व किसलेले पारमेझान चीज भुरभुरावे.
त्यावर पुन्हा पास्ता शीट्स लावाव्यात व परत सगळे सॉस, बेसील व पारमेझान चीज लावावे , असे सगळे थर तयार कारावे.शेवटी पास्ता शीटने सगळे कव्हर करावे.
आता त्यावर पुन्हा सॉस, पारमेझान चीज लावावे. शेवटी किसलेले मोझ्झरेला चीज पसरावे.
प्री-हीट केलेल्या ओव्हनमध्ये १८० डीग्रीवर ४०-४५ मिनिटे बेक करावे.
Veg Lasagna /Lasagne तयार आहे :) गरमा-गरम सर्व्ह करा.
हे घ्या :)
नोटः
*हल्ली अशा ही Lasagna /Lasagne शीट्स मिळतात ज्या प्री-कुक कराव्या लागत नाही...थेट पाकृत वापरता येतात तुम्ही त्याही वापरु शकता.
*भाज्या तुम्ही कोण्त्याही वापरु शकता मश्रुम, Courgettes, भोपळा.
*तुम्ही नुसता पालक व रीकोटा चीज घालून ही हे बनवु शकता.
*आवडत असल्यास पास्ताचे थर देताना मध्ये व्हाईट सॉस ही लावु शकता.
वाचने
14104
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
लासान्या आवडतंच. सध्या आमची
लसान्याऽऽऽऽ
TEMPTING
छान दिसतोय पदार्थ
इथे मिळतंय का बघा बरं! मिळालं
In reply to छान दिसतोय पदार्थ by मानस्
मिळणारच....
In reply to छान दिसतोय पदार्थ by मानस्
झकास.. मस्त बनलाय.. फक्त
माझी अतिशय लाडकी डीश आहे.. मी
झक्कास !!!!!!
In reply to माझी अतिशय लाडकी डीश आहे.. मी by प्राजु
खल्लास
शेवटून दोन फटूंमुळे पहाता
छान! पालक व रिकोटा वापरून एक
*भाज्या तुम्ही कोण्त्याही वापरु शकता मश्रुम, Courgettes, भोपळा.
खातात ना! न खायला काय
In reply to *भाज्या तुम्ही कोण्त्याही वापरु शकता मश्रुम, Courgettes, भोपळा. by चिंतामणी
छान आहे....
सानिका... तुला एगप्लान्ट
जबरी.... भूक लागली. शेवटचे
कातिल पाकृ. आता लवकरच
सानिका
यम्म..
वेज लसाने ....यात नॉन वेज बनवाल काय ?
हो नॉन-व्हेज नक्की बनेल
In reply to वेज लसाने ....यात नॉन वेज बनवाल काय ? by इरसाल
मस्तं !
छान ! वरदुराज पण येवु द्यात
मस्त!
मस्त डिश
ड्राईड हर्ब्स
In reply to मस्त डिश by Pearl
तुमच्या मेहनतीला _/\_.
छान दिसतंय
पाकृती होईल तेव्हा होईल किंवा