प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते (८)

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
21 Jan 2012 - 3:52 pm

मागील दुवा
: प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते(१) http://misalpav.com/node/2158
: प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते(२) http://misalpav.com/node/2266
:प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते(३) http://www.misalpav.com/node/2327
:प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते(४) http://www.misalpav.com/node/3153
:प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते(५) http://misalpav.com/node/3583
:प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते (६) http://misalpav.com/node/4650
:प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते (७) http://misalpav.com/node/19477
सूर्यास्ताची शोभा आपण अनुभवलेली असते.
मावळतीला उधळलेल्या रंगांचा मोह पडला नाही असा कोणी आपल्याला भेटलेलाच नसतो.
पण तुला चंद्रास्ताची मोहिनी पडायची.तू म्हणायचास " सूर्यास्त आपले रंग हिरावून नेतो चंद्रास्त रंग देवुन जातो"
तू म्हणायचास म्हणून एकदा ठरवून मी मुद्दम चंद्रास्त पहायचे ठरवले. गावाला मामांकडे आम्ही शेतावर राहिलो होतो . टिपूर चांदणं होते हवेत हलकासा गारवा आम्ही सारी भावंडे गप्पा मारत बसलो.रात्र चढत जाऊ लागली तसे एक एक जण झोपत गेले. मी टक्क जागी राहिले. चंद्रास्त चुकवायचा नव्हता मला.
आसपासच्या वाड्यावस्त्यांवर रस्त्यावर एखाद दुसरा दिव टीमटिमत होता. अधूनमधून पानांची सळसळ एखादा टिटवीचा आवाज सोडला तर कसलाच आवाज नव्हता.
नीरव शांतता म्हणज एकाय ते आज जाणवत होते. चंद्र आता डोक्यावरून पलीकडे चालला होता.थोड्याच वेळेत तो क्षितीजावर पोहोचणार होता.मी आकाशाचा एक तुकडा मनभरून न्याहाळत होते.
चंद्र आता क्षितीजावर होता. कसलेसे एक फांड्याफांद्यांचे झाड चंद्रावर जाळीदार नक्षी उमटवत आमच्या मधे उभे होते.
जसजसा चंद्र क्षितीजाच्या खाली जाऊ लागला तसतसा चंद्राचा आकार गोल ,अर्ध गोल, नुसताच एक तुकडा झाला. एका क्षणी चंद्र पूर्ण नाहीसा झाला.सगळीकडे मिट्ट अंधार झाला.
पुढच्याच क्षणी एक जादू झाली . आकाश दिवाळीतले फटाक्यांचे झाड फुलून यावे त्यातल्या रंगीबिरंगी ठिणग्यानी गारुड करावं तशा लाख्खो चांदण्या प्रकाशमन झालं. चंद्राने जणू काही त्या झाकून ठेवल्या होत्या.
मी मुग्ध होऊन गेले.
किती वेळ गेला कोण जाणे. एकेक चांदणी फिकट व्हायला लागली. काळपट जांभळ्या अकाशाचा रंग हळू हळू गडद निळा व्हायला लागला.
एकेक चांदणी लुप्त व्हायला लागली. पाटी ओल्या स्पंजाने पुसून टाकावी तसं आकाश पुसलं गेलं
कुठुनसा निळसर मोरपंखी रंग पसरत गेला. मग पाण्यात रंगाचा ब्रश बुडवावा तसा उगवतीला पिवळसर तांबडा रंग येत गेला. आणि मग तुरा खोवावा तसला लाल जर्द अवतीर्ण झाला.
कोर्‍या कॅनव्हासवर कोणी अज्ञात चित्रकार खेळत होता.
गुलमुक्षी .......जर्द लाल्........शेंदरी............... भगवा...........पिवळा........ अशा लाल रंगाच्या छटा भरभरून वापरत होता. अस्मानीचे हे वैभव मला क्षणोक्षणी श्रीमंत करत होतं.
सूर्याच्या आगमनाची वर्दी घेवून भरजरी सोनेरी आला . माझ्या श्रीमंतीत कुबेराचा खजीना दाखल झाला. मग उगवती कपाळावर सुर्याचे लाल बिंब कुंकु म्हणून मिरवु लागली
इतका वेळ असलेली नीरव शांतता गोठ्यातल्या जनावरांच्या घुंघरांच्या आवाजाने मोडली. दूर कुठेतरी ट्रॅक्टरचा आवाज येवू लागला.
आणि माणसांचा दिवस सुरु झाला.

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

पैसा's picture

21 Jan 2012 - 6:22 pm | पैसा

चंद्रास्त आणि बरोबरचे सगळे रंग छान टिपलेत.

(या लेखाच्या शेवटी "क्रमशः" का नाही? वाचायला नक्कीच आवडलं असतं!)

विजुभाऊ बॅक इन अ‍ॅक्शन! जियो! सर्व भाग (पुन्हा एकदा) वाचून काढले.

आणि हो, ते 'क्रमशः' राहिलं बरं का. तेवढं संपादन करा, आणि येउ द्या पुढचं जेंव्हा मनात येईल तेंव्हा.

मस्त लिहीलय :)
सगळे धागे वाचले नाहीत अजुन
वाचुन बघते :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Jan 2012 - 2:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त विजुभौ.

चंद्रास्ताचे विविध रंग छानच उमटले आहेत.

-दिलीप बिरुटे

मिसळपाव's picture

22 Jan 2012 - 9:31 pm | मिसळपाव

... 'उमजत नाही' लिहिणारा! 'उमजत नाहि' हे ललित लेखन आहे असं असतं तर प्रश्न नव्हता. पण लेखकाने ते काथ्याकूट/मुक्तक मधे टाकलं होतं. त्यामुळे विजुभाउ, 'का जगायचं?' प्रश्न पडला असला तर या अशा लेखनासाठी, आणिक काय? अहो तुम्हालाच काय, ऑफिसातनं डोकं पिकून आल्यानंतर, "काय साली कटकट आहे, आपलंच हे असं का?" अशा अवस्थेत लटकल्यावर हे असं काहि वाचलं की आमच्यासारख्या वाचकाना सुद्धा रोजचा दिवस जगायचा हुरूप येतो!!

सरत्या क्षणांचं नी त्याबरोबर होणार्‍या रंगांच्या खेळाचं काय वर्णन केलंय तुम्ही? व्व्वा, बहोत खूब!!

मनिम्याऊ's picture

23 Jan 2012 - 11:44 am | मनिम्याऊ

अप्रतिम....

यशोधरा's picture

23 Jan 2012 - 12:54 pm | यशोधरा

सुरेख. अजून लिहा विजूभाऊ.

sneharani's picture

23 Jan 2012 - 2:15 pm | sneharani

असेच म्हणते, लिहा अजून्!मस्त लिहलत!

मन१'s picture

23 Jan 2012 - 3:44 pm | मन१

वाचतो आहे.

विजुभाऊ's picture

23 Jan 2012 - 4:26 pm | विजुभाऊ

उन्हे चाहनेसे अब मै डरता हुं
आईने मे खुदको देखनेसे डरता हुं
ये क्या हो गया है हमे....
अब खुद से मुखातिब होने से डरता हु

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Jan 2012 - 9:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

और भी आने दो.

-दिलीप बिरुटे

किसन शिंदे's picture

23 Jan 2012 - 9:02 pm | किसन शिंदे

मस्तच लिहलंय. अगदी आम्हीही तो 'चंद्रास्त' अनुभवला.

स्वातीविशु's picture

24 Jan 2012 - 11:47 am | स्वातीविशु

अतिशय उत्कट अशा प्रेमाच्या भावना तुमच्या सर्व लेखात सुन्दर रितीने मांडल्या आहेत. अजुन लेख येऊद्या असेच म्हणते.

श्यामल's picture

24 Jan 2012 - 12:27 pm | श्यामल

अस्मानीचे हे वैभव मला क्षणोक्षणी श्रीमंत करत होतं.
सूर्याच्या आगमनाची वर्दी घेवून भरजरी सोनेरी आला . माझ्या श्रीमंतीत कुबेराचा खजीना दाखल झाला. >>>

विजुभौ, मस्त लिहिलंय. असेच लिहीत रहा.

स्पा's picture

24 Jan 2012 - 12:38 pm | स्पा

झकास

विनायक प्रभू's picture

24 Jan 2012 - 1:23 pm | विनायक प्रभू

विजुभौ,
द लवगुरु.

परिकथेतील राजकुमार's picture

25 Jan 2012 - 12:47 pm | परिकथेतील राजकुमार

साला आता कसे आमचे इजुभौ परत आल्यासारखे वाटले. :)

प्राजक्ता पवार's picture

26 Jan 2012 - 9:33 pm | प्राजक्ता पवार

सुरेख !

अय्या मी कसा वाचला नव्हता हा लेख.
विजुभाऊ सलाम!