मागील दुवा
: प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते(१) http://misalpav.com/node/2158
: प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते(२) http://misalpav.com/node/2266
:प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते(३) http://www.misalpav.com/node/2327
:प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते(४) http://www.misalpav.com/node/3153
:प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते(५) http://misalpav.com/node/3583
:प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते (६) http://misalpav.com/node/4650
:प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते (७) http://misalpav.com/node/19477
सूर्यास्ताची शोभा आपण अनुभवलेली असते.
मावळतीला उधळलेल्या रंगांचा मोह पडला नाही असा कोणी आपल्याला भेटलेलाच नसतो.
पण तुला चंद्रास्ताची मोहिनी पडायची.तू म्हणायचास " सूर्यास्त आपले रंग हिरावून नेतो चंद्रास्त रंग देवुन जातो"
तू म्हणायचास म्हणून एकदा ठरवून मी मुद्दम चंद्रास्त पहायचे ठरवले. गावाला मामांकडे आम्ही शेतावर राहिलो होतो . टिपूर चांदणं होते हवेत हलकासा गारवा आम्ही सारी भावंडे गप्पा मारत बसलो.रात्र चढत जाऊ लागली तसे एक एक जण झोपत गेले. मी टक्क जागी राहिले. चंद्रास्त चुकवायचा नव्हता मला.
आसपासच्या वाड्यावस्त्यांवर रस्त्यावर एखाद दुसरा दिव टीमटिमत होता. अधूनमधून पानांची सळसळ एखादा टिटवीचा आवाज सोडला तर कसलाच आवाज नव्हता.
नीरव शांतता म्हणज एकाय ते आज जाणवत होते. चंद्र आता डोक्यावरून पलीकडे चालला होता.थोड्याच वेळेत तो क्षितीजावर पोहोचणार होता.मी आकाशाचा एक तुकडा मनभरून न्याहाळत होते.
चंद्र आता क्षितीजावर होता. कसलेसे एक फांड्याफांद्यांचे झाड चंद्रावर जाळीदार नक्षी उमटवत आमच्या मधे उभे होते.
जसजसा चंद्र क्षितीजाच्या खाली जाऊ लागला तसतसा चंद्राचा आकार गोल ,अर्ध गोल, नुसताच एक तुकडा झाला. एका क्षणी चंद्र पूर्ण नाहीसा झाला.सगळीकडे मिट्ट अंधार झाला.
पुढच्याच क्षणी एक जादू झाली . आकाश दिवाळीतले फटाक्यांचे झाड फुलून यावे त्यातल्या रंगीबिरंगी ठिणग्यानी गारुड करावं तशा लाख्खो चांदण्या प्रकाशमन झालं. चंद्राने जणू काही त्या झाकून ठेवल्या होत्या.
मी मुग्ध होऊन गेले.
किती वेळ गेला कोण जाणे. एकेक चांदणी फिकट व्हायला लागली. काळपट जांभळ्या अकाशाचा रंग हळू हळू गडद निळा व्हायला लागला.
एकेक चांदणी लुप्त व्हायला लागली. पाटी ओल्या स्पंजाने पुसून टाकावी तसं आकाश पुसलं गेलं
कुठुनसा निळसर मोरपंखी रंग पसरत गेला. मग पाण्यात रंगाचा ब्रश बुडवावा तसा उगवतीला पिवळसर तांबडा रंग येत गेला. आणि मग तुरा खोवावा तसला लाल जर्द अवतीर्ण झाला.
कोर्या कॅनव्हासवर कोणी अज्ञात चित्रकार खेळत होता.
गुलमुक्षी .......जर्द लाल्........शेंदरी............... भगवा...........पिवळा........ अशा लाल रंगाच्या छटा भरभरून वापरत होता. अस्मानीचे हे वैभव मला क्षणोक्षणी श्रीमंत करत होतं.
सूर्याच्या आगमनाची वर्दी घेवून भरजरी सोनेरी आला . माझ्या श्रीमंतीत कुबेराचा खजीना दाखल झाला. मग उगवती कपाळावर सुर्याचे लाल बिंब कुंकु म्हणून मिरवु लागली
इतका वेळ असलेली नीरव शांतता गोठ्यातल्या जनावरांच्या घुंघरांच्या आवाजाने मोडली. दूर कुठेतरी ट्रॅक्टरचा आवाज येवू लागला.
आणि माणसांचा दिवस सुरु झाला.
वाचने
8877
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
फार आवडलं
वा! कसली रंगबहार पकडली आहे शब्दांत!
मस्त लिहीलय सगळे धागे वाचले
मस्त विजुभौ. चंद्रास्ताचे
हाच का तो माणूस? ...
अप्रतिम....
सुरेख. अजून लिहा विजूभाऊ.
असेच
In reply to सुरेख. अजून लिहा विजूभाऊ. by यशोधरा
वाचतोय.
उन्हे चाहनेसे अब मै डरता
क्या बात है.
In reply to उन्हे चाहनेसे अब मै डरता by विजुभाऊ
मस्तच लिहलंय. अगदी आम्हीही तो
सुन्दर लेखन...
मस्त !
झकास
गुरु
ज्जे बात !
सुरेख !
अय्या मी कसा वाचला नव्हता हा