फुलपाखरु भाग १

मदनबाण's picture
मदनबाण in कलादालन
1 Nov 2011 - 9:27 am

*टिप :--- सॉफ्टवेयर वापरुन कोणताही बदल केलेला नसुन फोटो फक्त रिसाईझ केले आहेत.

(पाखरु प्रेमी हौशी फोटुग्राफर) ;)

छायाचित्रणस्थिरचित्र

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

1 Nov 2011 - 9:37 am | प्रचेतस

सुरेख फोटू रे बाणा.
फुलपाखरे खूपच छान टिपली आहेत. आम्ही फुलपाखरांचे फोटू काढायला जावं तर ती खट्याळ लगेच उडून जातात. :(

गवि's picture

1 Nov 2011 - 9:41 am | गवि

मस्त रे..

किसन शिंदे's picture

1 Nov 2011 - 9:41 am | किसन शिंदे

मस्तच!!

काँक्रिटच्या जंगलात तुला बरी फुलपाखरं गवसली.

काँक्रिटच्या जंगलात तुला बरी फुलपाखरं गवसली.
ठाण्यात ओवळेकरवाडी फुलपाखरांच्या बागेसाठी प्रसिद्ध आहे,दिवाळीत मित्र म्हणाला चलतोस का ? मी म्हणालो येतो. :)
जयपाल बरोबर तिथे जायचा विचार बर्‍याच वेळा आला होता,पण काही जमलं नाही.

रेवती's picture

1 Nov 2011 - 7:25 pm | रेवती

भारी आलेत फोटू.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Nov 2011 - 9:45 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त रे.........!!!

-दिलीप बिरुटे

अरे फुलपाखरांचे फोटो काढणं हे महान पेशन्सचं काम आहे. फोटो काढायला त्यांनी स्थिर बसणं हेच महाकठीण. कौतुक आहे तुझं..

मबा, तुझे फोटो इतके मस्त आहेत की फक्त त्यांची ब्यूटी बघावी.. माहितीची गरजच नाही, पण कधीकधी नावाने ओळखून आपली फुलपाखरांशी मैत्री जास्त वाढते असा अनुभव असल्याने न राहवून लिहितोय.

स्ट्राईप्ड टायगर, ब्लू टायगर आणि (कदाचित) ब्लू पॅन्सी अशी तीन फुलपाखरं दिसताहेत. पैकी स्ट्राईप्ड टायगर आणि ब्लू टायगर ही दोन्ही वाईट चवीची आहेत (पक्ष्यांच्या दृष्टीने.. गैरसमज नसावा). स्ट्राईप्ड टायगरच्या अळ्या अतिशय रंगीबेरंगी आणि भयंकर असतात. रुईच्या किंवा वडाच्या झाडावर फीड करतात. ब्लू टायगर वाघनखीच्या (भिंतीवर चढणारा वेल वाघनखीच ना?) पानांवर फीड करतात. ही झाडे माहीत असली की ती अळी मिळवता येते. मग घरी बरणीत ठेवून तिला तीच पानं आणून काही दिवस दिली की तिथेच ती कोष करते (त्यासाठी एक झाडाची काडी बरणीत तिरकी ठेवावी.

काही दिवसांनी कोष पारदर्शक होऊन बाहेरुनच आतलं बनलेलं फुलपाखरु (फोल्डेड!!) दिसायला लागतं.. ९९ टक्के कोष पहाटेपहाटे उघडतात. सुरळीसारखं ओलसर पाखरु बाहेर येऊन त्या काडीवर लटकतं.. मग पंख हळूहळू उलगडतात. पंख ओले असताना फुलपाखरु अत्यंत असहाय्य असतं. पंख लवकरच वाळून कडक होतात. दहा पंधरा मिनिटांत काडी घराबाहेर न्यायची की ते भुरकन उडून जातं. या सगळ्या प्रक्रियेत अत्यंत अ‍ॅडिक्टिव्ह आनंद आहे...

प्रचेतस's picture

1 Nov 2011 - 11:16 am | प्रचेतस

फुलपाखरांचा तुमचा अभ्यास कमाल आहे गवि.
कोषातून बाहेर येत असलेले फुलपाखरू पाहणे नक्कीच आनंददायी अनुभव असेल.

मदनबाण's picture

1 Nov 2011 - 11:47 am | मदनबाण

धन्यवाद विहारी... :)
तुमच्यामुळे फुलपाखरां संदर्भात नविन माहिती कळाली... :)

स्ट्राईप्ड टायगर, ब्लू टायगर आणि (कदाचित) ब्लू पॅन्सी अशी तीन फुलपाखरं दिसताहेत.
असांच कुठलासा टायगर कोशातुन नुकताच बाहेर आला होता,त्याला टिपण्याची नामी संधी मला त्यावेळी मला मिळाली.
तो फोटु मी पुढच्या भागात टाकीन. :)

गवि's picture

1 Nov 2011 - 12:00 pm | गवि

वा वा. टाक लवकर तो फोटो.

(कदाचित) ब्लू पॅन्सी अशासाठी म्हटलं की त्याचे पंख मिटलेले आहेत, म्हणून बाहेरची बाजूच दिसतेय. आणि आता फुलपाखरांचा छंद सुटून पंधरा वर्षं झाली आहेत. तू सुंदर दिवसांची आठवण करुन दिलीस म्हणून खूप आभारी आहे. ठाण्यात अशी फुलपाखरांची बाग आहे हे ऐकून आनंद झाला. मी पण येतो तुझ्यासोबत, कधी जाणार असलास तर. अरे प्रत्येक फुलपाखराला ठराविक झाडाचीच पानं लागतात, आणि तसली झाडं आपल्या आजुबाजूला लावली तर फुलपाखरांची बाग बनवता येते. आम्ही फुलपाखरांच्या फॅन मित्रांनी कॉलेजात असताना एका संस्थेच्या एकरभर जागेवर असं प्लॅन करुन प्लँटेशन केलं आणि तिथे फुलपाखरांचं अक्षरशः पीक आलं होतं.. त्याविषयी कधीतरी सांगीन..विशेष म्हणजे परिसरातल्या जवळजवळ सर्व जातींच्या फुलपाखरांनी हजेरी लावली. तिथे तू फोटो काढायला हवा होतास.

गवि: मस्त माहिती देताय, त्या 'फुलपाखरी प्लँटेशन'विषयी सविस्तर लेख लिहाच!

ज्ञानराम's picture

1 Nov 2011 - 12:21 pm | ज्ञानराम

सुरेख

छान किती दिसते फुलपाखरु..... !!!

अन्या दातार's picture

1 Nov 2011 - 5:36 pm | अन्या दातार

वप्या, आधी छानच्या आधी 'अय्या' लिहायचे विसरलास का?? ;)

दादा कोंडके's picture

1 Nov 2011 - 1:40 pm | दादा कोंडके

वरून चौथं फुलपाखरु फुलांपेक्षा कचर्‍यावरच जास्त दिसतं!

कच्ची कैरी's picture

1 Nov 2011 - 4:03 pm | कच्ची कैरी

वॉव !!!! मदनबाण तुम्ही काढलेले फोटो आणि गविंनी दिलेली माहिती मस्तच! धागा उघडल्याचे सार्थक झाले.

मीनल's picture

1 Nov 2011 - 7:39 pm | मीनल

सुंदर. अप्रतिम

पैसा's picture

1 Nov 2011 - 7:43 pm | पैसा

सगळेच फोटो आणि गविनी दिलेली माहिती मस्त!

प्रत्येक चित्रात फोकस अतिशय छान साधला आहेस आणि फुलांची पार्श्वभूमी अचूक निवडली आहेस. पेशन्सला दाद.

गविंनी दिलेली माहितीसुद्धा अतिशय मनोरंजक आहे. एक लेख होऊन जाउदे राव.

-रंगा

सुहास झेले's picture

2 Nov 2011 - 10:52 am | सुहास झेले

व्वा व्वा... लई भारी... !!

पुढचा भाग लवकर येऊ देत.

सुधांशुनूलकर's picture

2 Nov 2011 - 2:39 pm | सुधांशुनूलकर

फोटो खूप छान आले आहेत.

क्र. २ फोटोमधलं फुलपाखरु आहे 'ग्रास डेमन'. हे छोटंसं फुलपाखरु स्किपर (फॅमिली हेस्परिडी) या जातीचं आहे. पावसाळा आणि हिवाळा-उन्हाळा या ॠतूंमधे ग्रास डेमनच्या पंखांवरची रंगसंगती वेगवेगळी असते. स्किपर जातीच्या फुलपाखरांचं वैशिष्ट्य म्हणजे, यांच्या अळ्या पानाची बोगद्यासारखी गुंडाळी करून त्यात रहातात. त्या बोगद्यातच त्यांचा कोष होतो. यांचे डोळे मोठाले असतात.

फोटो क्र. ४ मधलं फुलपाखरू 'कॉमन बुशब्राऊन' आहे (ब्लू पँझी नव्हे).

अधिक माहिती इथे वाचा.

गविंनी लिहिलंय : काही दिवसांनी कोष पारदर्शक होऊन बाहेरुनच आतलं बनलेलं फुलपाखरु (फोल्डेड!!) दिसायला लागतं.. ९९ टक्के कोष पहाटेपहाटे उघडतात. सुरळीसारखं ओलसर पाखरु बाहेर येऊन त्या काडीवर लटकतं.. मग पंख हळूहळू उलगडतात. पंख ओले असताना फुलपाखरु अत्यंत असहाय्य असतं. पंख लवकरच वाळून कडक होतात. दहा पंधरा मिनिटांत काडी घराबाहेर न्यायची की ते भुरकन उडून जातं. या सगळ्या प्रक्रियेत अत्यंत अ‍ॅडिक्टिव्ह आनंद आहे...

अगदी खरं आहे ते ! रेड पियरो या जातीच्या फुलपाखराचा संपूर्ण जीवनक्रम मी दीड-दोन इंचावरून चित्रित (व्हिडिओ चित्रण) केला आहे. त्यात फुलपाखरू कोषातून बाहेर येताना स्पष्टपणे दिसतं. फुलपाखराच्या जन्माविषयी एक फार सुंदर आठवण लिहीन तेव्हा तो व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करीन.

बाकी, फुलपाखरांवरच्या धाग्यांना सुरुवात केली ती जागुताईंनी (माझ्या आठवणीप्रमाणे). एका नव्या, इंटरेस्टिंग विषयाला सुरुवात केल्याबद्दल त्यांचे आभार मानायला हवेत !

मराठमोळा's picture

2 Nov 2011 - 3:02 pm | मराठमोळा

खुपच सुंदर..
मस्त फोटु.. एकदम आवडेश. :)

जाई.'s picture

2 Nov 2011 - 6:55 pm | जाई.

छान आलेत फोटो

पूनम ब's picture

2 Nov 2011 - 7:50 pm | पूनम ब

अप्रतिम..खूपच सुरेख आहेत सर्व फोटो..

दत्ता काळे's picture

2 Nov 2011 - 7:57 pm | दत्ता काळे

फोटो सुरे़ख आले आहेत.

अतुल पाटील's picture

2 Nov 2011 - 9:40 pm | अतुल पाटील

अप्रतिम

बाणाकडून जरा वेगळ्या पाखरांची अपेक्षा होती.. ;)

- (बाणाचा मित्र) पिंगू

प्रकाश१११'s picture

2 Nov 2011 - 11:06 pm | प्रकाश१११

निव्वळ अप्रतिम .खूप आवडले.!!

प्रतिक्रिया देणार्‍या सर्व मंडळींचा म्या लयं लयं आभारी हाय. :)
लवकरच पुढचा भाग टाकेन.

५० फक्त's picture

3 Nov 2011 - 11:52 am | ५० फक्त

लै भारी फोटो,

वा! बुवा. सुंदर फोटो काढले आहेत. आवडले.

कमालीची स्पष्टता आणि सापेक्षपृथकता (रिझोल्युशन) आहे प्रकाशचित्रांच्या कडांमधे. सुरेख.

सोत्रि's picture

3 Nov 2011 - 6:56 pm | सोत्रि

खुप छान फोटो!

- (मन फुलपाखरू झालेला) सोकाजी

कॅमेरा फॉर्मात रे, आता लेखणी पण येवु देत !

हुकुमीएक्का's picture

6 Jun 2014 - 12:07 am | हुकुमीएक्का

फोटो सुंदर आलेत. चौथा आणि शेवटचा तर एकदम झकास.

एस's picture

6 Jun 2014 - 12:49 pm | एस

@सुधांशुनूलकरसाहेबः

रेड पियरो या जातीच्या फुलपाखराचा संपूर्ण जीवनक्रम मी दीड-दोन इंचावरून चित्रित (व्हिडिओ चित्रण) केला आहे. त्यात फुलपाखरू कोषातून बाहेर येताना स्पष्टपणे दिसतं. फुलपाखराच्या जन्माविषयी एक फार सुंदर आठवण लिहीन तेव्हा तो व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करीन.

@गविसाहेब:

गवि: मस्त माहिती देताय, त्या 'फुलपाखरी प्लँटेशन'विषयी सविस्तर लेख लिहाच!

दोघांनाही - नेकी और पूछपूछ? आत्तापर्यंत टाकला नसेल तर कृपया टाका आणि टाकला असेल तर लिंक द्या.

बादवे, मदनबाण - खूप छान प्रतिमा.

हुकुमीएक्का's picture

20 Jun 2014 - 10:19 pm | हुकुमीएक्का

फुलपाखरांचे फोटो काढताना फोटोग्राफरचा खरा कस लागतो. कारण जराशी हालचाल झाली की फुलपाखरू उडून जाते. त्यामुळे कॅमेरा सेटिंग, बॅकग्राऊंड, व जास्त हालचाल न करता कॅमेरा सेट करणे ह्या सर्व गोष्टींसाठी खुप वेळ जातो. Patience खुप लागतात. फोटो छानच आलेत. *good*

बोका-ए-आझम's picture

21 Nov 2014 - 8:33 pm | बोका-ए-आझम

मस्त!