सलाम राम राम

मीचजणु's picture
मीचजणु in जनातलं, मनातलं
3 Jun 2008 - 12:06 am

मनोहरची बाईक मध्य रस्त्यात बंद पडली. रात्रीचा अंधार आता चांगलाच जणवत होता. थंड हवेची लाट अंगावर काटे आणत होती, व तेवढ्यात भिती होती तेच झाले. थेंब थेंब टीपके चेह-यावर जाणवले आणि हा हा म्हणता धो धो पाऊस सुरु झाला. मनोहरने लगबग बाईक झा़डाखाली लावली. रस्त्यावर कुणीच नव्हते, एवढ्या रात्री या अरण्यातील रस्त्यात कोण असणार. एका मोटारीचा प्रकाश दुरुन येताना दिसला, मनोहरने पुढे येऊन हात दाखवला, पण मोटार सर् पाणी उडवत गेली. मनोहर ओला चिंब भिजला.

"अरे मनोहर असा पावसात का भिजतोयस?", त्याला ऐकू आले. मागे रिक्षा मधून आदिती बोलावत होती. असे अचानक तीला पाहुन तो क्षणभर गोंधळला. स्वतःला सावरत त्याने तिला कहाणी सांगीतली. तिने लगेच त्याला बसायला जागा केली आणि रिक्षा काळोखात निघाली.

अगदी काही तासांपुर्वी तर ते भेटले होते पार्टी मध्ये. मनोहर आणि आदिती महाविद्यालयातील वर्गसोबती. अभ्यासातील दिवसांनतर किती वर्षांनी ते भेटले होते तर आज अचानक पार्टी मध्ये. आणि आता लगेचच पावसात.

आदितीने मनोहरला न्याहाळले, इतक्या वर्षांत त्याच्या मध्ये खुप फरक तिला जाणवला. हा तोच बावळट, बॅटरी मनोहर आहे हे तिला पचेना. मनोहरने शरीरसंपदेवर चांगलीच काळजी घेतली होती, ओल्या कपड्यामध्ये त्याच्या परीश्रमाचे फळ दिसत होते. त्याचे व्यक्तिमत्व ही या वर्षांत बरेच बदलले. गप्पांचा डाव चांगलाच रंगला. जुन्या आठवणी उगारत हास्याचे फौवारे उडत होते. पहिल्यांदाच इतके मनमोकळेपणे ते बोलत होते. आदितीच्या स्वभावात बराच बदल होता. उध्धट, ताठ आदिती समंजस झाली होती, पण तिचे ते स्मित हास्य जसेच्या तसे.

रिक्षा केव्हा मनोहरच्या घरा जवळ थांबली दोघांनाही कळाले नाही. गप्पा तर अर्धवटच राहील्या होत्या. मनोहरने "थॅक्यू कॉफी"चे निमंत्रण दिले व ती लगेच तयार झाली. घरा पर्यंत पोहचता ती ही चांगलीच भिजली.

मनोहरचे घर छान सजवलेले होते. मनोहरच्या जिवनातील या नवीन छटांचा अनुभव ती प्राशन करत गेली. त्याने तिच्या हातात टॉवेल व कुर्ता पायजमा देत म्हटले, " थंडी लागेल, कपडे बदलून घे, दुध तापायला ठेवले आहे, आत्ता गरमा गरम कॉफी आणतो. तु कॉलेज मधील दिवसात माझ्या स्पेशल कॉफीचे वर्णन तर ऐकले असेलच". त्याने जाता जाता सिडी प्लेयर चालू केला. थोड्या वेळात गरम कॉफीचे दोन पेले घेउन आला, हवेत सुर पसरत होते... घन ओथंबून येती... बनांत राघू भिरती... पंखा वरती सर ओघळती... झाडांतून झडझडती...

सात्विकला लंचटाईम मध्ये फोन आला, मनोहर ओरडला, " तु काका झालायस, काका! लवकर ये, बाळ वाट बघतय!" सात्विकने निशाला थेट होस्पिटल मध्ये बोलावले. स्वतः थेट पोहचला, बाळ अगदी गोंडस होते. जणू दुसरी आदितीच. मनोहर भलत्याच उत्साहात बर्फी वाटत होता. आदिती - मनोहरला सोडून सात्विक बाहेर आला, निशा अजून पोहचली नव्हती. 'बायकांचा मेकअप' करीत सात्विकने फोन लावला. निशाच्या मनात दुसरेच काही होते. बाळाला भेटायला तीला कसेसेच वाटत होते. आदिती, मनोहर एवढे हुशार, व्यवस्थित पण असा निर्णय - लग्नाच्या आधी मुल???

निशाला अगदी चित्रपटातली द्रुश्ये दिसु लागली. आदिती आणि मनोहर आता तर आनंदात आहेत, पण पुढे मागे त्यांचात काही बिनसले तर? त्यांनी वेगळे राहण्याचा विचार केला तर? त्यांच्यात काही प्रेम उरले नाही तर? आदितीचे कसे होणार मग? कसं एकटीच आयुष्य काढणार ती? आणि तो निशःपाप जीव, त्याने कुणाचे काय वाकडे केले? त्याला का ह्या यातना?

सात्विकचा आवाज ऐकताच, चित्रपट बंद झाला, निशाने हसण्याचा प्रयत्न केला. दोघेही आत गेले. बाळाला पाहुन निशा आखेरीस हसली. आदिती बरोबर गप्पा मरत बसली.
"काय नाव ठरवले आहे तुम्ही दोघांनी?", निशाने विचारले.
"श्रेया, मनोहरची चॉईस आहे"
"छान आहे, श्रेया मनोहर कापसे"
"छे, श्रेया आदिती गाडगीळ, अजुन आमचे लग्न कोठे झाले आहे?", आदितीने डोळा मारला.
निशाने हसण्याचा परत प्रयत्न केला.

बाहेर कटिंगचा स्वाद घेत, सात्विक मनोहरला समजावत होता, "अरे मनोहरा, चांगली मुलगी आहे आदिती, तुझ्या बाळाची आई आहे ती, कधी करताय तुम्ही लग्न?"
"कशाला उगीच लग्नाची भानगड, किती सुखी आहोत आम्ही. लग्न झाल्यावर काय होते बघतोच आहे मी", मनोहरने टोमणा मारला.
"फालतू विनोद नको, तुझ्या लग्नाची मला केवढी हौस आहे माहीत आहे ना तुला"
"मी कोठे नाही म्हटले आहे? वेळ आल्यावर ते पण होईल"
"तु म्हणाला होतास कि बाळंतपणाच्या गडबडीत नको, आता झालं ना, बोल लागु का तयारीला?"
"अरे का काळजी करतोयस, मझ्या आयुष्यात सर्व अचानकच घडतं, अगदी त्या रात्री सारखं"
"तुझं नशीब अगदी फॉर्म मध्ये आहे, मानलं पाहीजे पठ्ठया, मला आनंद आहे".
सात्विक चहाचा पेला ठेउन उठला.

मनोहर काही वेळ तिथेच बसला.

हवेत सुर पसरत होते... घन ओथंबून येती... बनांत राघू भिरती... पंखा वरती सर ओघळती... झाडांतून झडझडती...
मनोहर गरम कॉफीचे दोन पेले घेउन आला. आदिती मनोहरकडे एक टक बघत होती, ओल्या कपड्यातच होती.
तिने सरळ मनोहरच्या मिठीत जाउन... मनोहर हादरला... मिठीत जाउन हुंदके द्यायला लागली. संदेश तीची अशीच काळजी घ्यायचा, अशाच तास अन् तास गप्पा मारायचा. संदेशच्या आठवणीचा बांध फुटला, व धो धो अश्रु वाहु लागले.

आदिती आणि संदेश ब-याच दिवसा पासुन एकमेकानां ओळखत होते. मैत्रीचे प्रेमात कधी रुपांतर झाले कळलेच नाही. दोघेही कामा निमित्त अमेरीकेला गेले. संदेशची इच्छा असुन ही ती लग्नाला तयार नव्हती. भांडण रोजचा कार्यक्रम झाला. त्यात तीला कळाले की तीला...

दुधाच्या वासाने तिला मळमळले, ती थेट बाथरुम कडे वळाली

मनोहरला कळून चुकले.

ती ऑपरेशन साठी भारतात आली, संदेशला कसलाही पत्ता लागु न देता. त्याला मात्र कामाच्या करारा मुळे तिथे राहणे भाग होते. तिने घरीही सांगीतले नाही. भारतात येताच आदितीने सायलीला गाठले, व तिच्या मदतीने ऑपरेशनची तयारी केली. तिला सर्व लवकर आटपायचे होते कारण सायली लवकरच विदेशी जाणार होती.

पण आज सात्विक-निशाच्या लग्नाच्या पार्टीत तिचे आयुष्य बदलले. लग्नाचा जोडा पाहुन, तिचे मन विरघळले, तिची ममता जागरुक झाली, आता तिला ते बाळ हवे होते. तिने संदेशला सांगायला फोन लावला.. पण सर्व ऐकताच तो करार मोडून येईल, त्याचे स्वप्न विसकटेल... नाही, तिने निश्चय केला. सायली तर लवकरच जाणार होती, आणि या अवस्थेत ती घरी कशी जाणार...

तेवढ्यात पावसात पुढे मनोहर दिसला.

मनोहरला पार्टीत मुळीच रस नव्हता. रेनकोट न आणल्याचा बहाणा करुन लवकर निघाला. त्यात बाईक बंद पडली, मनोहरला रहावले नाही, थेंब थेंब टीपके चेह-यावर जाणवले, मनोहर पाण्यात पुर्ण भिजला.

कथा

प्रतिक्रिया

अशा कथा 'मेनका' या मासिकामध्ये असतात... पण त्या दीर्घकथा असतात...

खरं सांगू का ?
कथेचं बीज चांगलं आहे पण तुमच्या या कथेमध्ये कुठलीच सुसंगती नाहिये राव :( मनोहर, आदिती, सात्विक, निशा, सायली कोण कुणाचं कोण आहे सांगा राव आपल्याला...

शेवटच्या काही ओळी वाचताना जाणवलं की कथेमध्ये 'फ्लॅशबॅक' तंत्राचा वापर केला आहे.

आपलाच,
(मंदबुद्धी)सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

मीचजणु's picture

5 Jun 2008 - 11:51 pm | मीचजणु

मेनका मासिक मी कधी वाचले नाही, चांगले करमणुक करणारे असावे ही आशा

कोण कुणाचं कोण ... I was reminded of the family tree in the J.R.R Tolkiens 'The lord of the rings', आज कळाले की त्यांनी family-tree साठी एवढी मेहनत का घेतली... :)

मी पण प्रयत्न करीन.. O:)

मन's picture

3 Jun 2008 - 2:07 am | मन

पण नक्की मला समजली तशीच ते आहे का, हे कळलं तर बरं होइल.

आपलाच,
मनोबा

आनंदयात्री's picture

3 Jun 2008 - 12:18 pm | आनंदयात्री

>>मनोहर पाण्यात पुर्ण भिजला.

मनोहर मोठेपणा मानायला हवा. छान कथा.

मनस्वी's picture

3 Jun 2008 - 2:49 pm | मनस्वी

शेवट अवंतिका सारखा कनफ्युझिंग वाटतोय किंवा मी तरी कनफ्युज झाले.

मनोहर ओरडला, " तु काका झालायस, काका! लवकर ये, बाळ वाट बघतय!"

मनोहर अदितीला आणि बाळाला स्विकारतो?

आता तिला ते बाळ हवे होते. तिने संदेशला सांगायला फोन लावला.. पण सर्व ऐकताच तो करार मोडून येईल, त्याचे स्वप्न विसकटेल... नाही, तिने निश्चय केला.

म्हणजे अदिती बाळ घेउन परत संदेशकडे जाते का?

मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

आनंदयात्री's picture

3 Jun 2008 - 2:57 pm | आनंदयात्री

मनोहर बरोबरच रहाते ती !

मनस्वी's picture

3 Jun 2008 - 3:02 pm | मनस्वी

बहुदा...?? बहुदा काय? नक्की काय ते सांग.
हे बहुदाच कनफ्युझिंग आहे ना!

मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

आनंदयात्री's picture

3 Jun 2008 - 3:13 pm | आनंदयात्री

"मीचजणु" बोल ना भो !

विसोबा खेचर's picture

3 Jun 2008 - 11:58 pm | विसोबा खेचर

मीचजणूराव,

मिपावर मनापासून स्वागत!

तात्या.

भडकमकर मास्तर's picture

4 Jun 2008 - 9:17 am | भडकमकर मास्तर

गोष्टीचे शीर्षक सलाम रामराम का बरं?
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/