माझं हे सारं सामान गं सखू...

धन्या's picture
धन्या in जे न देखे रवी...
20 Sep 2011 - 3:07 pm

बाजाराला निघालो मी घाई घाई, पिशवीची आठवण राहीलीच नाही
सामान माझं सारं आहे थोडं खाली, तू जराशी वाकशील का?
माझं हे सारं सामान गं सखू, तुझ्या पिशवीत टाकशील का?

तालुक्याच्या बाजाराला लागलाय सेल, केली खरेदी मी बराच वेळ
माझं सामान झालंय बरंच मोठं, पिशवी जराशी फाकशील का?
माझं हे सारं सामान गं सखू, तुझ्या पिशवीत टाकशील का?

वाण सामान आणि ताजा भाजीपाला, मासोळीचाही मी बाजारहाट केला
ताजा, कडक बोंबील माझा, तुझ्या पापलेटनी झाकशील का?
माझं हे सारं सामान गं सखू, तुझ्या पिशवीत टाकशील का?

सांगत असतो धन्या तो मला, पिशवी नेत जा रे नेहमी बाजाराला
वापरू नये कधी हात सामानाला, आतापुरतं तू झाकशील का?
माझं हे सारं सामान गं सखू, तुझ्या पिशवीत टाकशील का?

कविता

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

31 Aug 2022 - 6:14 am | कर्नलतपस्वी

कवीता लई डेजर हाय. काल वाचली अन डोक्यात दही झालं.

बिलंदर काका अन बेरकी सखू
सामान झाल जड ओझ कुठ टाकू
कुठ बी टाक, इथ तीथ नको टेकू
घरातलीच पिशी आन
हिथ तीथ नको झाकू