झाडांनी दखल घेतलीय
बहरणारा ऋतू संपत आल्याची
कशी जाणीव होते झाडाना ..?
या बर्फाळ हवेची
श्वास गुदमरू लागल्याची
पाने पिवळी होऊ लागलीत
आता कधीपण सुरु होईल पानगळ
झाडांनी सर्व तयारी केलीय
काळीज घट्ट करून
पानाना निरोप देण्याची
निष्पर्ण होऊन जातील सर्व झाडे
कालच कितीतरी पाने गळून गेली
नि आज सकाळी
खच्चून सडा पडला पानांचा ...
काष्ट शिल्प
तशी झाडे ओकीबोकी ...!!
त्यांच्या जाण्याच्या जाणीवेने दिशाही झाकोळून गेल्या
ढगाचा कल्लोळ आभाळात
आणि झाडे केविलवाणी .....
गळत्या पानाना कुशीत घेऊन
फक्त मुकी मुकी
झाडांनी मन घट्ट करून
तयारी केलीय कधीपासून
आपल्या पानाना निरोप देण्याची......!
तो ह्या परदेशात
बघत बसलाय पानगळ
झाडांचे नग्नपण
ओले ओले
चिंब मन .....
त्याने घराच्या बाहेर रोखून ठेवलय बर्फाळ थंडीला
आणि खोलीत टांगून ठेवलाय हवा तो ऋतू
गरम .उबदार
हवा तसा .......!
प्रतिक्रिया
15 Aug 2011 - 7:09 am | शुचि
छान आहे. आवडली.
16 Aug 2011 - 2:43 pm | गणेशा
कविता नेहमीप्रमाणे सुंदर..
पुन्हा निसर्ग .. आणि त्यात समरस होउन जाणारे मनाचे भावविश्व मस्त लिहिले आहे.
पुन्हा एकदा, एक खरीखुरी कविता वाचल्याने खुप छान वाटले..
16 Aug 2011 - 7:02 pm | निनाव
अमेझिंग!!!
तुम्ही चित्रच उभे करता प्रकाश दा तुमच्या शब्दांनी.
सुंदरच कविता..खूप खूप आवडली.
विशेषतः
<<
झाडांनी सर्व तयारी केलीय
काळीज घट्ट करून
पानाना निरोप देण्याची
निष्पर्ण होऊन जातील सर्व झाडे
कालच कितीतरी पाने गळून गेली
नि आज सकाळी
खच्चून सडा पडला पानांचा ...
काष्ट शिल्प
तशी झाडे ओकीबोकी ...!!
>> - हे खूपच छान वाटले मला.
17 Aug 2011 - 8:21 am | पाषाणभेद
प्रकाशजी बर्याच दिवसांनी आलात. आवडले काव्य.