[ज्योतिष] दिनांक ३१ जुलै २०११ रोजीची शुभ अमावस्या

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
25 Jul 2011 - 11:18 am

दिनांक ३१ जुलै २०११ रोजी सायन सिंह राशीत ७ अंश १९ मि.वर होणारी अमावस्या गोचर हर्षल बरोबर नवपंचम योग करते. याशिवाय गोचर प्लुटो बरोबर quincunx () नावाचा एकच त्रासदायक योग करते, आदल्या दिवशी दिनांक ३० जुलै २०११ रोजी चंद्र-शुक्र युती होत असून ही युती हर्षल बरोबर नवपंचम योग करत असल्याने, ही अमावस्या बर्‍याच प्रमाणात शुभ ठरण्याची शक्यता आहे. जन्म पत्रिकेत रवि, चंद्र, लग्न, ख-मध्य व शुक्र हे जर सुस्थितीत असतील तर अमावस्ये दरम्यान केलेले मोठे आर्थिक व्यवहार फायदेशीर ठरतील किंवा पूर्वी केलेल्या व्यवहारांचे लाभ पदरात पडतील.

अधिक वाचण्यासाठी - http://rajeev-upadhye.blogspot.com/2011/07/blog-post_25.html

ज्योतिष

प्रतिक्रिया

सविता's picture

25 Jul 2011 - 11:30 am | सविता

बर.... लॉटरीचे तिकीट काढून ठेवते.

पण त्या दिवशी तिकिट विकत घेऊ की त्या दिवशी निकाल असलेले तिकिट आधीच घेऊन ठेऊ?

चिरोटा's picture

25 Jul 2011 - 11:33 am | चिरोटा

छान. जन्मपत्रिकेत ते ग्रह सुस्थितीत नसतील तर त्या दिवशी वांदा का?

युयुत्सु's picture

25 Jul 2011 - 11:33 am | युयुत्सु

टु बी ऑ न सेफर साईड दो न्ही पर्याय चांगले आहेत... :)

सुनील's picture

25 Jul 2011 - 11:49 am | सुनील

हीच ती गटारी अमावास्या. ती शुभ असायचीच. यात नवल ते काय?

सहज's picture

25 Jul 2011 - 3:45 pm | सहज

शुभ आहे हे मान्य!! गटारी जिंदबाद!! १ ऑगस्टला सासु सासरे परत जाणार आहेत.

आणी काय शुभ होणार आहे ?? ते सांगा

दिनांक ३१ जुलै २०११ रोजी सायन सिंह राशीत ७ अंश १९ मि.वर होणारी अमावस्या गोचर हर्षल बरोबर नवपंचम योग करते.

३१ जुलैला सायनला इतका महत्वाचा खास इव्हेंट असताना खुद्द कुर्ला सायन परिसरातसुद्धा कुठेही जाहिरात होर्डिंग काही म्हणता काही नाही..

अत्रुप्त आत्मा's picture

25 Jul 2011 - 5:15 pm | अत्रुप्त आत्मा

भविष्यात गटारीच आहे....(यात काहीही शंका नाही...ह्ही ह्ही) .....
....पण गटारीत पण भविष्य (काढलेलं)बघुन हसुन हसुन टाइट झालो.खरच ज्योतिषात अ-गाधं ताकद आहे...हरं,,,हरं,,,महादेव...

परिकथेतील राजकुमार's picture

25 Jul 2011 - 5:44 pm | परिकथेतील राजकुमार

जन्म पत्रिकेत रवि, चंद्र, लग्न, ख-मध्य व शुक्र हे जर सुस्थितीत असतील तर अमावस्ये दरम्यान केलेले मोठे आर्थिक व्यवहार फायदेशीर ठरतील किंवा पूर्वी केलेल्या व्यवहारांचे लाभ पदरात पडतील.

काय हे युयुत्सु गुर्जी ? येवढे सगळे ग्रह सुस्थितीत असल्यावर फायदा होणारच की ;) हे म्हणजे "आजवर तुम्ही सगळ्यांसाठी खूप केलेत, खस्ता खाल्ल्यात पण लोकांना त्याची किंमत नाही." टैप भविष्य आहे.

बादवे असे सुस्थितीतील ग्रह कोणाच्या पत्रिकेत असल्यास मला लाखभर रुपये उसने द्यावेत असे मोठे आर्थिक व्यवहार फायदेशीर ठरतील.

भविष्यमणी

चला आता यांची काळजी मिटली. ;)

परिकथेतील राजकुमार's picture

25 Jul 2011 - 5:52 pm | परिकथेतील राजकुमार

च्यायला ! मला वाटले कुंद्याच्या खात्याचा दूवा आहे.

राजेश घासकडवी's picture

25 Jul 2011 - 5:54 pm | राजेश घासकडवी

१३ जुलै २०११ हा शुभ दिवस होता की अशुभ यावर तुमचं गणित काय सांगतं?

युयुत्सु's picture

25 Jul 2011 - 6:17 pm | युयुत्सु

का हो, भूतकाळात तुम्ही का अड्कून पडलात.

राजेश घासकडवी's picture

25 Jul 2011 - 6:31 pm | राजेश घासकडवी

भूतकाळातल्या माहितीच्या घटनांच्या आधारे गणिताची, शास्त्राची तपासणी करून घ्यावी म्हणत होतो. चिकित्सा बरी असते शास्त्रप्रकृतीला.

तुम्हाला उत्तर शोधून काढता येत नसेल तर तसं सरळ सांगा की. उगाच मला का तिरकस बोलता?

युयुत्सु's picture

25 Jul 2011 - 7:02 pm | युयुत्सु

अहो १३ जुलै हा दिवस वाईटच होता, पण त्यापेक्षा १ जुलैची अमावस्या जास्त भयानक होती. मी +/- ७ दिवसांची दिवसांचा अवधी त्यासाठी दिला होता. त्यात ६ दिवसांची एरर आली.

अहो मी तुमच्याशी तिरकस बोलणार नाही तर कुणाशी बोलणार ;)

राजेश घासकडवी's picture

26 Jul 2011 - 7:54 am | राजेश घासकडवी

अहो १३ जुलै हा दिवस वाईटच होता,

पटत नाही. तुमचे ते कुठचे ग्रहयोग वगैरेच्या भाषेत समजावून सांगितलं तर बरं.

पण त्यापेक्षा १ जुलैची अमावस्या जास्त भयानक होती.

हेही कळलं नाही. म्हणजे दहशतवाद्यांनी त्यादिवशी प्लॅन केला, असं म्हणायचं आहे का?

मी +/- ७ दिवसांची दिवसांचा अवधी त्यासाठी दिला होता. त्यात ६ दिवसांची एरर आली.

१ जुलैपासून १३ जुलै सहा दिवसाची एरर हे कळलं नाही.

१ जुलैपासून १३ जुलै सहा दिवसाची एरर हे कळलं नाही.

अहो.. सात दिवसांची नॉर्मल टॉलरन्स लेव्हल..ती एरर नव्हे. त्याच्या उप्पर फक्त सहा दिवसांची एरर..

पंगा's picture

26 Jul 2011 - 10:36 am | पंगा

...इफेक्टिवली, टॉलरन्सवर पुन्हा टॉलरन्स?

हे असे तर कितीही वेळा करता येईल की मग! मज्जा आहे!

पुर्वी झाडपाला हलवत, धुपाचा धुर करत, अंधार्‍या रात्री सगळ्या टोळीला बोलवून अंगात आल्याचे तंत्रज्ञान वापरुन त्या दिवसापासुन किती श्रम, मेहनत घेउन ते आज पार अधुनिक गणीत करुन अंदाज दिला जातोय, फक्त ६ दिवसाच्या एरर! तरी तुमचे असे बोलं! करायचे तरी किती तुमचे समाधान आम्ही? हजारो वर्षापूर्वी पट्या लिहल्या होत्या कारण तेव्हा लिखीत पुरावे मागता म्हणुन तुम्ही चिकित्सक कायमच विरोध करता. १५व्या शतकातल्या तुटपुंज्या साधनांवर काम करणार्‍या शास्त्रज्ञांना देखील तुम्ही लोकांनी नावेच ठेवली होतीत व आज गोडवे गाता ना त्यांच्या श्रमाचे. आज आम्ही फक्त ६ दिवसाची एरर आणली. काही वर्षांनी बघा अगदी परफेक्ट अंदाज देउच!
हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब....

विश्वाच्या उद्धाराला, लोकांच्या भल्याकरता ज्योतीषाचे व्रत घेतले तरी नावेच ठेवणार तुम्ही कृतघ्न लोक.

पंगा's picture

26 Jul 2011 - 11:35 am | पंगा

काही वर्षांनी बघा अगदी परफेक्ट अंदाज देउच!

या भाकितावर टॉलरन्स किती?

युयुत्सु's picture

26 Jul 2011 - 11:06 am | युयुत्सु

रा.घा.,

तुमचे ते कुठचे ग्रहयोग वगैरेच्या भाषेत समजावून सांगितलं तर बरं.

स्फोटाच्या दिवशी प्लुटो-शनी-हर्षल ही "टि स्क्वेअर" रचना कार्यरत होती. त्यात शनी मुंबईच्या ख-मध्यावर होता. त्यामुळे "टि स्क्वेअर" अतिशय बलवान झाला होता. घटना घडली तेव्हा चंद्राने प्लुटोशी केलेल्या युती मुळे या बलवान झालेल्या "टि स्क्वेअर" रचनेला ट्रिगर मिळाला.

१ जुलैपासून १३ जुलै सहा दिवसाची एरर हे कळलं नाही.

प्रत्येक ग्रह योगाचा (रचनेचा) प्रभावकाल असतो. मी नमूद केलेली एरर ही प्रभावकालातील एरर आहे.

ही "टि स्क्वेअर" रचना बृहच्चौकोनाच्या पेक्षा एक पायरी कमी पण अत्यंत बलवान आणि त्रासदायक रचना आहे.

पंगा's picture

26 Jul 2011 - 11:16 am | पंगा

कुठल्या जमान्यात वावरताय, मालक? टी-स्क्वेअर जाऊन ड्राफ्टरचा वापर तर आम्ही कॉलेजात शिकत असतानाच सुरू झाला होता... गेला बाजार पंचविसाहून अधिक वर्षे होऊन गेली त्याला.

विनायक प्रभू's picture

25 Jul 2011 - 6:05 pm | विनायक प्रभू

पुर्वी व्यवहार करताना काळजी घेतली होतीस ना?
नाही तर चांगलाच लाभ होइल हो.

अमोल केळकर's picture

26 Jul 2011 - 12:56 pm | अमोल केळकर

चांगली माहिती

अमोल केळकर