Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by युयुत्सु on Mon, 07/25/2011 - 11:18
लेखनविषय (Tags)
ज्योतिष
दिनांक ३१ जुलै २०११ रोजी सायन सिंह राशीत ७ अंश १९ मि.वर होणारी अमावस्या गोचर हर्षल बरोबर नवपंचम योग करते. याशिवाय गोचर प्लुटो बरोबर quincunx () नावाचा एकच त्रासदायक योग करते, आदल्या दिवशी दिनांक ३० जुलै २०११ रोजी चंद्र-शुक्र युती होत असून ही युती हर्षल बरोबर नवपंचम योग करत असल्याने, ही अमावस्या बर्‍याच प्रमाणात शुभ ठरण्याची शक्यता आहे. जन्म पत्रिकेत रवि, चंद्र, लग्न, ख-मध्य व शुक्र हे जर सुस्थितीत असतील तर अमावस्ये दरम्यान केलेले मोठे आर्थिक व्यवहार फायदेशीर ठरतील किंवा पूर्वी केलेल्या व्यवहारांचे लाभ पदरात पडतील. अधिक वाचण्यासाठी - http://rajeev-upadhye.blogspot.com/2011/07/blog-post_25.html
  • Log in or register to post comments
  • 5367 views

प्रतिक्रिया

Submitted by सविता on Mon, 07/25/2011 - 11:30

Permalink

बर.... लॉटरीचे तिकीट काढून

बर.... लॉटरीचे तिकीट काढून ठेवते. पण त्या दिवशी तिकिट विकत घेऊ की त्या दिवशी निकाल असलेले तिकिट आधीच घेऊन ठेऊ?
  • Log in or register to post comments

Submitted by चिरोटा on Mon, 07/25/2011 - 11:33

Permalink

वा

छान. जन्मपत्रिकेत ते ग्रह सुस्थितीत नसतील तर त्या दिवशी वांदा का?
  • Log in or register to post comments

Submitted by युयुत्सु on Mon, 07/25/2011 - 11:33

Permalink

टु बी ऑ न सेफर साईड दो न्ही

टु बी ऑ न सेफर साईड दो न्ही पर्याय चांगले आहेत... :)
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Mon, 07/25/2011 - 11:49

Permalink

गटारी

हीच ती गटारी अमावास्या. ती शुभ असायचीच. यात नवल ते काय?
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Mon, 07/25/2011 - 15:45

Permalink

शुभ आहे

शुभ आहे हे मान्य!! गटारी जिंदबाद!! १ ऑगस्टला सासु सासरे परत जाणार आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by शाहिर on Mon, 07/25/2011 - 12:10

Permalink

ब्लोग ची जाहिरात आहे ..बाके काही नाही !!

आणी काय शुभ होणार आहे ?? ते सांगा
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Mon, 07/25/2011 - 15:01

Permalink

दिनांक ३१ जुलै २०११ रोजी सायन

दिनांक ३१ जुलै २०११ रोजी सायन सिंह राशीत ७ अंश १९ मि.वर होणारी अमावस्या गोचर हर्षल बरोबर नवपंचम योग करते. ३१ जुलैला सायनला इतका महत्वाचा खास इव्हेंट असताना खुद्द कुर्ला सायन परिसरातसुद्धा कुठेही जाहिरात होर्डिंग काही म्हणता काही नाही..
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Mon, 07/25/2011 - 17:15

Permalink

बा बो...काय धाडस?

भविष्यात गटारीच आहे....(यात काहीही शंका नाही...ह्ही ह्ही) ..... ....पण गटारीत पण भविष्य (काढलेलं)बघुन हसुन हसुन टाइट झालो.खरच ज्योतिषात अ-गाधं ताकद आहे...हरं,,,हरं,,,महादेव...
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 07/25/2011 - 17:44

Permalink

जन्म पत्रिकेत रवि, चंद्र,

जन्म पत्रिकेत रवि, चंद्र, लग्न, ख-मध्य व शुक्र हे जर सुस्थितीत असतील तर अमावस्ये दरम्यान केलेले मोठे आर्थिक व्यवहार फायदेशीर ठरतील किंवा पूर्वी केलेल्या व्यवहारांचे लाभ पदरात पडतील.
काय हे युयुत्सु गुर्जी ? येवढे सगळे ग्रह सुस्थितीत असल्यावर फायदा होणारच की ;) हे म्हणजे "आजवर तुम्ही सगळ्यांसाठी खूप केलेत, खस्ता खाल्ल्यात पण लोकांना त्याची किंमत नाही." टैप भविष्य आहे. बादवे असे सुस्थितीतील ग्रह कोणाच्या पत्रिकेत असल्यास मला लाखभर रुपये उसने द्यावेत असे मोठे आर्थिक व्यवहार फायदेशीर ठरतील. भविष्यमणी
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Mon, 07/25/2011 - 17:50

Permalink

चला आता यांची काळजी मिटली.

चला आता यांची काळजी मिटली. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 07/25/2011 - 17:52

In reply to चला आता यांची काळजी मिटली. by गणपा

Permalink

च्यायला ! मला वाटले

Image removed. Image removed. च्यायला ! मला वाटले कुंद्याच्या खात्याचा दूवा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Mon, 07/25/2011 - 17:54

Permalink

१३ जुलै

१३ जुलै २०११ हा शुभ दिवस होता की अशुभ यावर तुमचं गणित काय सांगतं?
  • Log in or register to post comments

Submitted by युयुत्सु on Mon, 07/25/2011 - 18:17

In reply to १३ जुलै by राजेश घासकडवी

Permalink

का हो, भूतकाळात तुम्ही का

का हो, भूतकाळात तुम्ही का अड्कून पडलात.
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Mon, 07/25/2011 - 18:31

In reply to का हो, भूतकाळात तुम्ही का by युयुत्सु

Permalink

तपासणी

भूतकाळातल्या माहितीच्या घटनांच्या आधारे गणिताची, शास्त्राची तपासणी करून घ्यावी म्हणत होतो. चिकित्सा बरी असते शास्त्रप्रकृतीला. तुम्हाला उत्तर शोधून काढता येत नसेल तर तसं सरळ सांगा की. उगाच मला का तिरकस बोलता?
  • Log in or register to post comments

Submitted by युयुत्सु on Mon, 07/25/2011 - 19:02

In reply to तपासणी by राजेश घासकडवी

Permalink

अहो १३ जुलै हा दिवस वाईटच

अहो १३ जुलै हा दिवस वाईटच होता, पण त्यापेक्षा १ जुलैची अमावस्या जास्त भयानक होती. मी +/- ७ दिवसांची दिवसांचा अवधी त्यासाठी दिला होता. त्यात ६ दिवसांची एरर आली. अहो मी तुमच्याशी तिरकस बोलणार नाही तर कुणाशी बोलणार ;)
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Tue, 07/26/2011 - 07:54

In reply to अहो १३ जुलै हा दिवस वाईटच by युयुत्सु

Permalink

नीट कळलं नाही

अहो १३ जुलै हा दिवस वाईटच होता,
पटत नाही. तुमचे ते कुठचे ग्रहयोग वगैरेच्या भाषेत समजावून सांगितलं तर बरं.
पण त्यापेक्षा १ जुलैची अमावस्या जास्त भयानक होती.
हेही कळलं नाही. म्हणजे दहशतवाद्यांनी त्यादिवशी प्लॅन केला, असं म्हणायचं आहे का?
मी +/- ७ दिवसांची दिवसांचा अवधी त्यासाठी दिला होता. त्यात ६ दिवसांची एरर आली.
१ जुलैपासून १३ जुलै सहा दिवसाची एरर हे कळलं नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Tue, 07/26/2011 - 10:17

In reply to नीट कळलं नाही by राजेश घासकडवी

Permalink

१ जुलैपासून १३ जुलै सहा

१ जुलैपासून १३ जुलै सहा दिवसाची एरर हे कळलं नाही. अहो.. सात दिवसांची नॉर्मल टॉलरन्स लेव्हल..ती एरर नव्हे. त्याच्या उप्पर फक्त सहा दिवसांची एरर..
  • Log in or register to post comments

Submitted by पंगा on Tue, 07/26/2011 - 10:36

In reply to १ जुलैपासून १३ जुलै सहा by गवि

Permalink

म्हणजे...

...इफेक्टिवली, टॉलरन्सवर पुन्हा टॉलरन्स? हे असे तर कितीही वेळा करता येईल की मग! मज्जा आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Tue, 07/26/2011 - 11:34

In reply to म्हणजे... by पंगा

Permalink

तुम्हाला काही कौतुकच नाही मेलं!

पुर्वी झाडपाला हलवत, धुपाचा धुर करत, अंधार्‍या रात्री सगळ्या टोळीला बोलवून अंगात आल्याचे तंत्रज्ञान वापरुन त्या दिवसापासुन किती श्रम, मेहनत घेउन ते आज पार अधुनिक गणीत करुन अंदाज दिला जातोय, फक्त ६ दिवसाच्या एरर! तरी तुमचे असे बोलं! करायचे तरी किती तुमचे समाधान आम्ही? हजारो वर्षापूर्वी पट्या लिहल्या होत्या कारण तेव्हा लिखीत पुरावे मागता म्हणुन तुम्ही चिकित्सक कायमच विरोध करता. १५व्या शतकातल्या तुटपुंज्या साधनांवर काम करणार्‍या शास्त्रज्ञांना देखील तुम्ही लोकांनी नावेच ठेवली होतीत व आज गोडवे गाता ना त्यांच्या श्रमाचे. आज आम्ही फक्त ६ दिवसाची एरर आणली. काही वर्षांनी बघा अगदी परफेक्ट अंदाज देउच! हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब.... विश्वाच्या उद्धाराला, लोकांच्या भल्याकरता ज्योतीषाचे व्रत घेतले तरी नावेच ठेवणार तुम्ही कृतघ्न लोक.
  • Log in or register to post comments

Submitted by पंगा on Tue, 07/26/2011 - 11:35

In reply to तुम्हाला काही कौतुकच नाही मेलं! by सहज

Permalink

?

काही वर्षांनी बघा अगदी परफेक्ट अंदाज देउच!
या भाकितावर टॉलरन्स किती?
  • Log in or register to post comments

Submitted by युयुत्सु on Tue, 07/26/2011 - 11:06

In reply to नीट कळलं नाही by राजेश घासकडवी

Permalink

रा.घा., तुमचे ते कुठचे

रा.घा.,
तुमचे ते कुठचे ग्रहयोग वगैरेच्या भाषेत समजावून सांगितलं तर बरं.
स्फोटाच्या दिवशी प्लुटो-शनी-हर्षल ही "टि स्क्वेअर" रचना कार्यरत होती. त्यात शनी मुंबईच्या ख-मध्यावर होता. त्यामुळे "टि स्क्वेअर" अतिशय बलवान झाला होता. घटना घडली तेव्हा चंद्राने प्लुटोशी केलेल्या युती मुळे या बलवान झालेल्या "टि स्क्वेअर" रचनेला ट्रिगर मिळाला.
१ जुलैपासून १३ जुलै सहा दिवसाची एरर हे कळलं नाही.
प्रत्येक ग्रह योगाचा (रचनेचा) प्रभावकाल असतो. मी नमूद केलेली एरर ही प्रभावकालातील एरर आहे. ही "टि स्क्वेअर" रचना बृहच्चौकोनाच्या पेक्षा एक पायरी कमी पण अत्यंत बलवान आणि त्रासदायक रचना आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by पंगा on Tue, 07/26/2011 - 11:16

In reply to रा.घा., तुमचे ते कुठचे by युयुत्सु

Permalink

"टी-स्क्वेअर" रचना???

कुठल्या जमान्यात वावरताय, मालक? टी-स्क्वेअर जाऊन ड्राफ्टरचा वापर तर आम्ही कॉलेजात शिकत असतानाच सुरू झाला होता... गेला बाजार पंचविसाहून अधिक वर्षे होऊन गेली त्याला.
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Mon, 07/25/2011 - 18:05

Permalink

परा

पुर्वी व्यवहार करताना काळजी घेतली होतीस ना? नाही तर चांगलाच लाभ होइल हो.
  • Log in or register to post comments

Submitted by अमोल केळकर on Tue, 07/26/2011 - 12:56

Permalink

चांगली माहिती अमोल केळकर

चांगली माहिती अमोल केळकर
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com