आज पहाटे, आळसावल्या मनात सखये उरला तुझाच बंध
आज पहाटे, सुकल्या राताराणीस सखये उरला तुझाच गंध ...
आज पहाटे, सोडले शरीर अन भिरभिरले मन तुझ्याच मागे
आज पहाटे, संपला शिशिर, फुलवितो वसंत नवस्वप्नांचे थवे
आज पहाटे, सरला काळोख, उजळले मन्मनात सोनेरी रंग
आज पहाटे, झालो वैरागी, अन झालो पुन्हा मोहरानात दंग
आज पहाटे, पुन्हा एकदा, बोलले किती एरवीचे तुझे नयन मुके
आज पहाटे, पुन्हा एकदा, दाटले डोळ्यासमोर वास्तवाचे धुके
- विश्वेश
प्रतिक्रिया
10 Jun 2011 - 11:51 am | दत्ता काळे
कविता आवडली. मी परत अशीही वाचून बघितली कि प्रत्येक ओळीच्या सुरवातीला असणारे 'आज पहाटे' हे शब्द गाळले ( कारण शिर्षक ते आहेच कि ). छान वाटली. कारण वाचताना पुनरुक्तीने लय साधण्याच्या ऐवजी अडथळा वाटत होता.
10 Jun 2011 - 12:13 pm | नगरीनिरंजन
असेच म्हणतो.
10 Jun 2011 - 8:14 pm | गणेशा
छान कविता
12 Jun 2011 - 9:11 am | पाषाणभेद
रोमांचीत करणारे काव्य