गवसला एक पाहुणा : लावणी

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
25 Apr 2011 - 10:23 am

गवसला एक पाहुणा : लावणी

पहाटलेली विभोर लाली
उधाण वारा पिऊन आली
मस्तीतकाया, धुंदीत न्हाया
कशी उतावीळ झाली
गं बाई उतावीळ झाली
मन ऐकेचना, तन ऐकेचना
जाई पुढे, पळते पुढे
सांगू कुणा? मी सांगू कुणा?
सखे गंsssss
नजरेस माझ्या गवसला एक पाहुणा
सखे गं मला गवसला एक पाहुणा ॥धृ०॥

माझ्या राजाची वेगळीच बात
चाल डौलाची मिशीवर हात
त्याचा रुबाब वेगळा तोरा
तरी चालतोय नाकासमोरा
बघा सूटबूट, कसा दिसतोय क्यूट
लाजाळू कसा, टकमक बघेचना ॥१॥

माझ्या गड्याची न्यारी कहाणी
स्पष्ट विचार, साधी राहणी
जुने थोतांड देतो फ़ेकुनी
नव्या जगाचा ध्यास धरुनी
त्याला विसरेचिना, भूल पडेचिना
सखे गं मना, चैन येईचना ॥२॥

जरी वरवर दिसतो तामस
आत हृदयात दडलाय माणूस
जातो अभय सदा धावून
जनसेवेचे व्रत घेऊन
तोच ठसला मनी, होईल माझा धनी
लावा गं सखे, विड्याला काथ, चुना ॥३॥

. गंगाधर मुटे
...*.....**.....***.....****....***....**....*...

शृंगारकविता

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

25 Apr 2011 - 11:20 am | मिसळलेला काव्यप्रेमी

मस्त रचना!
फक्त एक प्रश्न!

त्याला विसरेचिना, भूल पडेचिना

इथे विरोधाभास जाणवतोय! नक्की काय म्हणायचे आहे?

पाषाणभेद's picture

26 Apr 2011 - 12:15 am | पाषाणभेद

आमचंबी एक डबल पान कलकत्ता मिठा, कतरी सुपारी, किमाम, १२०/३००, चुना कम, हरीपत्ती

निनाव's picture

26 Apr 2011 - 2:48 am | निनाव

भारीच!!