खूप दिवसांपूर्वी एक पुस्तक वाचण्यात आल. "देवचाफा" त्याचं नाव. विद्याधर पुन्द्लीकांच हे लघुकथांच पुस्तक आहे. त्यातल्या सगळ्याच कथा खूप सुंदर आहेत. पण नुकतीच वाचून झालेली कथा "सती" तिच नाव, हि मला खूप भावली. हि कथा ज्या पद्धतीने लिहिली आहे त्यावरून जे जाणवत कि एखादा ताक्तीचाच लेखक अस काही लिहू शकतो. हि कथा भावन्याच कारण म्हणजे पद्धत, ज्या पद्धतीने विषयाची मांडणी केलेली आहे.
सदर कथा एक खूप नाजूक आणि धाडसी विषयावर भाष्य करते. ह्या कथेची रोचकता आणि सौंदर्य वाच्ल्याखेरीच समजणार नाही.
हि कथा खूप नाजूक अशा विषयावर बेतलेली आहे. ह्या कथेची मांडणी खूप छान पद्धतीने केलेली आहे. हि कथा तीन पात्रांच्या धाग्यांनी विणलेली आहे. आई, मुलगी आणि वडील. ह्यातील वडील म्हणजे काकासाहेब, हे खूप मोठे, विचारवंत, हिमालयाच्या उंचीचे व्यक्तिमत्व. स्वातन्त्र संग्रामात पूर्ण आयुष्याची आहुती दिलेला, प्रसिद्धीची वलय स्वतःभोवती घेऊन वावरणारे व्यक्तिमत्व. जशी ह्याला हिमालयाच्या उत्तुन्गातेची सुवर्ण किनार आहे तशी त्याला अंधाऱ्या सावलीची एक खोचक आणि बोचरी बाजूही आहे. दुसर पात्र म्हणजे त्यांची बायको राधा जीने आपला पूर्ण आयुष्य आपल्या नवऱ्याच्या पायी निर्माल्यारुपणे वाहिल आणि शेवटही तिचा त्याच पद्धतीने झला. तिसर पात्र म्हणजे त्याची मुलगी विभा.
सुरवातीला लेखक मुलीपासून सुरवात करतो, शेवट पर्यंत हि मुलगी आपल पूर्ण काथेभर मार्गदर्शन करते. ती आपल्याला तिच्या आईच्या खोलीत अगदी तिच्या शेजारी झोपून तिच्या मनातील कधी न उलगडलेल्या घड्या उलगडताना दिसते तर कधी वडिलांच्या थोरपण जपताना त्यांच्या मनाचा ठाव घेताना दिसते. पूर्ण कथा हि काकासाहेब आणि राधाबाई ह्यांच्याभोवती गुंफली आहे. विभा हि फक्त जसा महाभारतातला संजय कुरुशेत्राच वर्णन करतो त्या पद्धतीने, सगळ्या घटनांचा आणि त्या मागील कारणांचा उलगडा करते. पण महत्वाचा म्हणजे ती कुठेही गुंतताना किव्वा त्या गोष्टींचा उहापोह करताना दिसत नाही. कुठेहि ती त्या गोष्टी चूक कि बरोबर आहेत हे सांगताना दिसत नाही. ते काम तिने वाचकांवर सोपवलेल आहे.
संपूर्ण कथेत लेखक कोणाचीही बाजू घेताना दिसत नाही. प्रत्तेक जन आपापल्या ठिकाणी बरोबर कसा आहे हे त्यामागच्या कारणांची मीमांसा करून स्पष्ट करतो पण कुठेही कोण एक बरोबर किवा कोण एक चुकीचा हे दाखवलयाच दिसत नाही.
ह्या कथेत माणसांच्या भावनिक, शारीरिक गरजांचा वेगवेगळ्या दृशीने विवेचन केलेले आढळते. जरी काकासाहेब, हे खूप मोठे, विचारवंता, थोर समाजसेवक असले तरी त्यांनाही शारीरिक गरजा असतात, आणि त्या भागवताना त्यांना ते काहीच चुकीचा वाटत नाही, भले ते समाजाच्या दृष्टीने चुकीच असल तरीही. त्या उलट त्यांची बायको राधाबाई, ह्या पूर्ण आयुष्यभर, स्वतःच्या भावनांची, वासनांची राखरांगोळी करून स्वतःच्या नवर्याची मनोभावे सेवा करते आणि शेवटी, व्यक्तीम्हत्वाच्या साव्लीखालीच मारते. दोघेही आपापल्या कृत्याचे समर्थन करतात भले ते परस्पर विरोधी का असेनात.
ह्यातीली काही वाक्य खूप चपखलपणे मनाला भिडतात, ती वाचून अंगावर शहार येतो,. उदा. राधाबाई म्हणते, "विभे पूर्वीच्या काळी एखादी बाई सती जात असेल तर मोठमोठ्याने नगरे ढोल वाजवले जायचे, जेणेकरून तिच्या किंकाळ्या कोणाला ऐकू जाऊ नये म्हणून, तुझ्या वडिलांच्या कीर्तीचे नगरे ढोल आशेच आहेत ग, अग, इतके मोठे, इतके मोठे कि माझ्या किंकाळ्या माझे हुंदके कोणाला ऐकू गेले नाही आणि जाणारही नाहीत"
कलाकार प्रत्तेकात असतो, पण ती कला दुस्र्यासमोर मांडून तिचा आविष्कार करणारे काही मोजकेच असतात त्यातील एक म्हणजे विद्याधर पुंडलिक. शेवटी एवढच सांगतो... मला आवडलेल्या कथांपैकी एक.... जरूर वाचा...
प्रतिक्रिया
13 Feb 2011 - 9:05 pm | शुचि
>> राधाबाई म्हणते, "विभे पूर्वीच्या काळी एखादी बाई सती जात असेल तर मोठमोठ्याने नगरे ढोल वाजवले जायचे, जेणेकरून तिच्या किंकाळ्या कोणाला ऐकू जाऊ नये म्हणून, तुझ्या वडिलांच्या कीर्तीचे नगरे ढोल आशेच आहेत ग, अग, इतके मोठे, इतके मोठे कि माझ्या किंकाळ्या माझे हुंदके कोणाला ऐकू गेले नाही आणि जाणारही नाहीत" >>
खूपच प्रभावी वाक्य आहे.
मुलांना आई-वडील दोघांच्या हृदयाचा ठाव घेता येतो मग ती हृदये एकमेकांपासून कितीही दूर का असेना.
" तेरे दिल से मेरे दिल तक एक राह ज़रूर जाती है
तुझे दिखे न दिखे मुझे तोह नज़र आती है"
हे वाक्य प्रेमी लोकांबद्दल जितकं खरं असतं तितकच आपल्या मुलांबद्दल खरं असतं. त्यामुळे विभा काकासाहेब आणि राधाबाई दोघांचे मन जाणून घेते यात काहीच नवल नाही.
कथा सुंदर वाटते आहे.
13 Feb 2011 - 11:11 pm | ५० फक्त
''हि कथा खूप नाजूक अशा विषयावर बेतलेली आहे. ह्या कथेची मांडणी खूप छान पद्धतीने केलेली आहे. हि कथा तीन पात्रांच्या धाग्यांनी विणलेली आहे. '' - मला एकदम सखाराम गटणेची (ओरिजनल) आठवण झाली.
''त्या उलट त्यांची बायको राधाबाई, ह्या पूर्ण आयुष्यभर, स्वतःच्या भावनांची, वासनांची राखरांगोळी करून स्वतःच्या नवर्याची मनोभावे सेवा करते '' - '' दुसर पात्र म्हणजे त्यांची बायको राधा जीने आपला पूर्ण आयुष्य आपल्या नवऱ्याच्या पायी निर्माल्यारुपणे वाहिल " - हे असं असताना - राधाबाईंच्या ''विभे पूर्वीच्या काळी एखादी बाई सती जात असेल तर मोठमोठ्याने नगरे ढोल वाजवले जायचे, जेणेकरून तिच्या किंकाळ्या कोणाला ऐकू जाऊ नये म्हणून, तुझ्या वडिलांच्या कीर्तीचे नगरे ढोल आशेच आहेत ग, अग, इतके मोठे, इतके मोठे कि माझ्या किंकाळ्या माझे हुंदके कोणाला ऐकू गेले नाही आणि जाणारही नाहीत" -या स्टेट्मेंटला काही अर्थच उरत नाही.
माणसानं त्याग करायचा तर करावा नाही तर करु नये, उगा त्याग करुन त्याची जाहिरात करु नये.
हल्ली ही त्याग करुन त्याची प्रसिद्धि करण्याची पद्धत फार माजली आहे.
असो, झंप्या, छान परिचय करुन दिलात, असाच बाकी कथांबद्दल तुम्ही लिहित रहा आम्ही वाचत राहु.
''
असो, लेख छान झाला आहे.
14 Feb 2011 - 1:22 am | शुचि
मायलेकींच्या मनोगतात कसली अलीये जाहीरात?