उशीर झाला?? ... Dont Worry

आपला आभि's picture
आपला आभि in जनातलं, मनातलं
5 Feb 2011 - 2:59 am

आमच्या गप्पा आणि गोष्टी

हलो हलो .. हा अरे आलोच
किती वेळ १५ मिनिटात येतो म्हणाला होतास...
अरे हो तेव्हाच निघालो होतो पण ट्राफिक मध्ये अडकलोय ..
कधी निघालास ?
अरे अर्धा तास झाला निघून.... पण काय करणार ट्राफिक किती आहे...
आताही सिग्नलला थांबलो आहे .. चल सिग्नल सुटेल .. ठेवतो..
शांतपणे हा मोबाईल खिशात ठेऊन चहाचा शेवटचा घोट संपवतो आणि दुचाकीकडे चालू लागतो... दुचाकीला किक मारून हा निघतो..
उशीर करण्याची अनेक कारण आहेत ..इथे तर लिस्ट च देता येईल ...
हो आलोच जवळच आहे...
अरे ट्राफिक मध्ये अडकलोय...
घरून फोन आला म्हणून उशीर झाला..
पेट्रोल संपल.. त्यामुळे वेळ लागला...
लाईट गेली होती.. अंघोळ राहिली होती
निघालोच होतो पण ऑफिस मध्ये अचानक काम आल..
मीटिंग होती....
अरे मामानी( का मामी ? असा गोड प्रसंग आम्हाला कधी आला नाही बाप्पां ...) अडवलंय....
ATM ला थांबलोय पण खूप मोठी रांग आहे ?
उशिरा येन हा भारतीय लोकांचा गुणधर्मच आहे ..त्यासाठी आपल्याकडे अनेक कारण तयार असतात. त्यातही एक creativity आहे. मुळातच उशीर कारण हि पण एक prestige ची गोष्ट आहे अस आम्ही मानतो.. (जस अजित आगरकर स्वताला अष्टपैलू मानतो). आता उशिरा येन आणि उशीर झाल्यामुळ दिलीगिरी व्यक्त करत दिनवानेपणे कारण सांगणे ... हि तर सर्वसामान्य लोकांची लक्षण आहेत. आता ह्या खेळत निर्ढावलेले उशिरा आल्यावर कस वागतात बघू. मुळात हि लोक १५-२० मिनिट उशीर होण वगैरे क्षुल्लक वेळेला किंमत देत नाहीत .. १५-२० मिनिटाचा तो वेळ त्यात कसला उशीर मानायचा.. तर हि लोक क्वचितच एवढा कमी उशीर करतात. यांचा उशीर म्हणजे १-२ तास उशिरा येन असत.. आता एवढा उशीर केल्यावर समोरचा आधीच वैतागलेला असतो. त्याला अपेक्षा असते हा आल्यावर अत्यंत खजील चेहरा करून येईल, दिलगिरी व्यक्त करेल.. पण हे लोक अत्यंत निर्ढावलेले असल्याने जणू काही वेगळ घडलाच नाही असा चेहरा घेऊन येतात.. अत्यंत मख्ख चेहरा ठेवतात (मख्ख चेहरा....?? अभिनय करत असलेला सुनील शेट्टी अथवा .. नाहीतर कुठल्याही परिस्थितीत खेळत असलेला द्रविड आठवा.. काहीच नाही तर आपले दिग्विजयसिंग आठवा ). समोरचा कितीही वैतागलेला असला त्याचे एकेक बौन्सर सोडून देतात. परत वार करतात कि मी आलो तेच महत्वाच नाही का ? बघा परत कुणाची हिम्मत होत नाही झापायची ...

अल बरुनी नावाचा एक प्रवाशी इ.सनाच्या ११ शतकात भारतात आला होता. (या बाहेरच्या लोकांना काही काम नसतात उठसुठ भारतात येतात भेटी द्यायला आणि उगाच इतिहासाचा अभ्यास वाढवून ठेवतात. उगीच ती चित्रविचित्र नाव पाठ करा. आपली लोक बघा कुठ फिरायला गेले नाहीत ना युध्द करायला. उगीच बाकीच्या लोकांचा इतिहास कशाला वाढवून ठेवा.. ) तर ह्या अल बरुनी या माणसाने भारताविषयी, इथल्या लोकांविषयी बराच काही लिहून ठेवलंय. त्याने म्हटलंय कि भारतातले लोक अस समजतात कि त्यांच्यासारख विज्ञान कुठे नाही , त्यांच्यासारखी संस्कृती, भाषा, गणित कुठेच नाही.थोडक्यात भारतासारख्या प्रगत देश कुठेच नाही अस भारतीय लोक मानतात. (बहुदा हे लिहिताना तो पुण्यात असावा. बघा बघा जुन्या इतिहासकालीन नोंदी काढून पहिल्या पाहिजेत). तर ह्याने भारतीयांच्या प्रत्येक गोष्टींबद्दल अगदी सविस्तरपणे लिहिलंय.खूपच सविस्तर लिहिलंय .. पण आपल्या उशिरा येणाच्या सवयीबद्दल कुठेच काही लिहल नाही. म्हणजे हि सवय जुनी नाही तर अलीकडच्या काळातली असावी. पण हि सवय चटकन फोफावली आणि तिचा चांगलाच विस्तार झाला. आजकाल कुणी उशिरा येत नाही हो ? ऑफिस ला लोक उशिरा जातात. रेल्वे उशिरा धावते. विमाने उशिरा उडतात. नेते सभेला उशिरा येतात. खेळाची मैदान उशिरा तयार होतात. (बघा कोलकाता...) CBI वाले उशिरा धाडी टाकतात आणि काही लोकांना अटक करायला विसरून जातात आणि नंतर उशिरा अटक करतात, विजेचे प्रकल्प सुरु व्हायला उशीर होतो.......... तर आपला सगळा देशच उशिरा चालतो.

आता या उशिरा येण्यातही एक कला आहे. उशिरा आल्याची कारण सांगण हा नंतरचा भाग झाला. पण उशीर करणं हि कला समजून घेतली पाहिजे.
तुम्हाला अचानक काहीतरी महत्वाच काम निघाल, ट्राफिक मध्ये अडकलात, वेळेवर झोपेतून उठला नाहीत म्हणून तुम्हाला उशीर झाला तर हि एक सर्वसामान्य बाब आहे. यात कसली आलीय creativity ? खर कसब तर यापैकी कोणतीच गोष्ट घडली नसताना उशीर करणे यात आहे . आता या कलेत पारंगत मंडळी कसा उशीर करतात पाहू. या लोकांना आता बाहेर निघायचं आहे आणि हे आवरत आहेत. आतापर्यंत सगळ वेळेवर झालाय आणि हे वेळेवरच पोहोचणार अस एकंदरीत चित्र आहे. नेमक बाहेर पडण्यापूर्वी आरशात पाहताना यांना जाणवत कि शर्ट काही match होत नाही. मग हे आपल्या सोबत्याला विचारतात तो म्हणतो (नेहमीप्रमाणेच) अरे मस्त दिसतोय ना.. याला काय झाल ? तरीही हे शर्ट बदलतात. पण त्यानंतर लक्षात येत कि आधीचाच चांगला होता. मग पुन्हा तो शर्ट घातला जातो. ह्यामध्ये एक १० मिनिट निघून जातात (अजून काही पुरेसा उशीर झाला नाही). मग पुढे हे पादत्राण घालायला जातात. बाहेर पडणार एवढ्यात लक्ष्यात येत अरेच्चा मोबाईल राहिला वाटत, पुन्हा आत पळतात. मग रीतसर घराला कुलूप लाऊन बाहेर पडणार तेवढ्यात यांच्या लक्षात येत अरे चहा पिला पाहिजे आणि सोबत जळती काडी पेटवली पाहिजे (हि लोक तर प्रत्येक ठिकाणी उशीर करतात). पुन्हा त्या कार्यक्रमात १५-२० मिनिट जातात. आता सगळ आवरून एकदाच बाहेर पडतात. घरातून रस्त्याकडे चालायला लागतात आणि एकदम काहीतरी आठवल्यासारख करून पुन्हा घराकडे पळतात. आता यावेळी काही विसरलेल नसत. हे त्यांच्याही लक्षात येत. पण घराच्या बाहेर थांबलेल्या आपल्या सोबत्याला (सख्याला) वाटू नये कि हा उगीच परत गेला म्हणून थोडा वेळ घरात रेंगाळतात.
अशा रीतीने चांगला पाऊन एक तासाचा उशीर केल्यानंतर यांच्या जीवाची शांती होते.
तर या उशीर करण्याच्या कलेबद्दल मी लिहल. पण उशिरा आल्याबद्दल कारण सांगणे याबद्दल काय वेगळे सांगणे नलगे...
यात सगळे भारतीय एवढे निपुण आहेत आहेत कि ते कधी आपल्या दूरच्या आजीला मारतील , कधी गाडी puncture करतील, कधी मित्राचा अपघात करतील हे सांगता येत नाही !!! तुम्हालाही असे बरेच अनुभव -प्रती-अनुभव आले असतील त्यामुळे या गोष्टी मी वाचकांच्या कल्पनाशक्तीवर सोडून देतो.

उशिरा येण हि मुळात आपली राष्ट्रीय संकृती आहे त्यामुळे यापुढे उशीर झाला तर अजिबात वाईट घेऊ नका. उशीर करा आणि समोरचा उशिराच येईल अशी अपेक्षा करा (अर्थात तुम्ही यात आधीच निगरगट्ट आहात हे ओळखतो आम्ही..)
त्यामुळे याबद्दल जास्त न बोलता मी आपले उशीर पुराण संपवतो.

गप्पा आणि गोष्टी करायला इथे या

विनोदविरंगुळा

प्रतिक्रिया

अर्धवटराव's picture

5 Feb 2011 - 6:37 am | अर्धवटराव

शालजोडीतुन कसलं हाणलय खेटरानं.

(आदर्श लेटलतीफ) अर्धवटराव

भाकरी's picture

5 Feb 2011 - 7:43 am | भाकरी

.................आपली लोक बघा कुठ फिरायला गेले नाहीत ना युध्द करायला. उगीच बाकीच्या लोकांचा इतिहास कशाला वाढवून ठेवा.....................

:-):-):-):-):-)

नरेशकुमार's picture

5 Feb 2011 - 9:01 am | नरेशकुमार

लेख जरा लवकरंच टाकलाय नव्हं.

असो, शालजोड्या पसंत आहेत.

जोशी 'ले''s picture

5 Feb 2011 - 9:06 am | जोशी 'ले'

हा... अगदि पाचच मिनिटात सव्वीस्तर प्रतीक्रीया देतो..

शुचि's picture

5 Feb 2011 - 9:11 am | शुचि

>> बहुदा हे लिहिताना तो पुण्यात असावा.>>
खी: खी:

बाबा अभि, वेळ न पाळणं हा माझा आणि बायकोच्या (माझ्या) भांड्णाचा ९५% मुद्दा असतो. घड्याळ हे फक्त त्यातील सेल बदलण्यासाठी घरात आणलेले आहे असा काही लोकांचा समज असतो.

बाकी जे शालजोडीतुन मारले आहेत ना ते लई जबरा आहेत.

हर्षद.

मुलूखावेगळी's picture

5 Feb 2011 - 11:45 am | मुलूखावेगळी

लेख खरेच छान लिहिलाय
अगदि बरोबर निरीक्षन नोंदवलीत
मला तर कुठेही वेळेवर जाउन लोकांची वाट बघायची इतकि सवय लागलिये कि बस्स्स
आता त्यांचे उशिरा येने पन एन्जॉय करते
माझी १ मैत्रिन आहे ती तर मल संडेला २ वाजता येनार मह्न्ते आनि येते ४.४० नन्तर आनि सगळा प्लअ‍ॅन चा बोर्या वाजवते
आता अशा लोकाना मात्र मी मनावर घेने सोडलेय

परिकथेतील राजकुमार's picture

5 Feb 2011 - 1:15 pm | परिकथेतील राजकुमार

११ व्या शतकात पुणे अस्तित्वात होते आणि तिथे राहून अल बरुनी ह्या थोर इसमाने काही लेखन देखील केले हे वाचुन डोळे पाणावले.

अवलिया's picture

5 Feb 2011 - 1:49 pm | अवलिया

आणि तेव्हा पुण्यात उशीर करणारे कूणी नव्हते हे वाचून तर उर अभिमानाने भरुन आला. ;)

सचिन's picture

5 Feb 2011 - 1:44 pm | सचिन

घड्याळाचे काय घेऊन बसलात्....आमच्याकडे तर कॅलेन्डरही न पाळणारे लोक आहेत. काय करता ?

अरुण मनोहर's picture

5 Feb 2011 - 2:01 pm | अरुण मनोहर

आभिजीत... ह्या आधीचे लिखाण- सप्टेंबर २०१०!

देर आये दुरुस्त आये.

असेच (पण लवकर लवकर) लिहीत रहा.

आपला आभि's picture

5 Feb 2011 - 3:36 pm | आपला आभि

वाह अरुण ...!!! फारच बारीक नजर ठेऊन आहात आमच्यावर ...
तुमची सांख्यिकी बुद्धी आवडली ...

एकदम मस्त..माझे काही उशीर करणारे मित्र/नातेवाईक आहेत..त्यांना पाठवतो हा लेख..

बर्‍याच वेळेला या लोकांच्या उशिर करण्याच्या सवयीमुळे संताप संताप होतो. त्यात राग अशा गोष्टीचा येतो की लोकं असे म्हणतात.. " ११ चा कार्यक्रम आहेना ...म्हणजे १२ पर्यंत लोकं येतील..मग लगेच सुरू करू..". किंवा " ११ चा कार्यक्रम आहेना ...म्हणजे १२ पर्यंत जाऊया..."

सध्या मी परदेशात आहे. येथील बरेचसे भारतीय हमखास उशीर करणारे आहेत. त्यांना त्याची लाज ही वाटत नाही. ज्या कार्यक्रमास परदेशी आणि भारतीय लोंकांना बोलावले असेल तेथे फक्त परदेशी लोंक आणि काही तुरळक प्रमाणात भारतीय बरोबर वेळेला हजर असतात. कार्यक्रम सुरू होऊन १ तास झाला तरी आपले लोक येतच असतात. फार राग येतो..

एकदोनदा तर असे झाले होते की कोणीमला कोठेतरी भेटायला बोलावले होते. ठरल्यावेळेला मी तेथे हजर आणि ते महाशय मात्र घरातच...फोन केला तर..."अरे तू पोचलास काय..इतक्या लवकर?" हे पुन्हावर .. अरे भा*खाऊ तुच तर वेळ ठरवली होतीस ना?

मी एकदोन वेळेला अशा लेट लतिफ लोकांना हिसका दाखवला आहे. त्यांनी समजा ११ वा. कोठे भेटायचे ठरवले आणि जर ते १५ मि. उशिरापर्यंत आले नाहीत तर सरळ मी त्यांना डावलून माझा ठरलेला कार्यक्रम सुरू केला किंवा सरळ त्याठिकाणाहून निघून गेलो होतो. नंतर त्यांच्यात थोड्याफार सुधारणा दिसल्या होत्या.

आणखी एक गोष्ट..कोठेही पिकनिकला अशा उशीर करण्यार्‍या लोंकाबरोबर गेलो की ही लेट लतिफ लोकं डो़क्याचा पार भुगा करतात. उठणार उशिरा, आरामात (घरी असल्यासारखे) आवरणार..अशा लोकांमुळे माझे देशात आणि परदेशात बरेचसे स्पॉट पहायचे राहून गेलेत..

रेवती's picture

6 Feb 2011 - 8:18 am | रेवती

तुच तर वेळ ठरवली होतीस
नुकतेच असे झाले. मैत्रिणीच्या मुलाच्या वाढदिवसाला दुपारी ३.०० ची वेळ दिली.
वाढदिवस कराटेक्लासच्या पार्टीहॉलमध्ये होता. बरेचदा मी वेळेवर जाते (पण अपवाद आहेतच;)).
सगळे अमेरिकन मित्र आणि मी एकटी भारतीय असे हजर होतो. बर्थडेबॉयशिवायच खेळ सुरु झाले.
साडेतीनला यजमान हजर झाले. आम्हालाच विचारले कि वेळ तीनची दिली होती का?
आपण पाहुण्यांना 'हॅलो' म्हणायला वेळेवर हजर नसल्याचा कोणताही अपराधी भाव नव्हता कि एकदाही 'सॉरी' नव्हते.
एका उशीरा आलेल्या मैत्रिणीने सरळ सांगितले कि आमचे असेच आहे. पटले तर बोलवा. आम्ही वेळेवर येणार नाही.
वर दिलेली अनेक कारणे आहेतच. एकदा बाहेर वेळ दिलेली असल्याने मी घर लॉक करत होते व प्रेग्नंट मैत्रिण अचानक आली. तिला शॉपिंगला गेल्यावर त्रास सुरु झाला. अश्यावेळी मदत करण्यावाचून पर्याय नव्हता. उशीर झाल्याने यजमानिणीला माफीसह स्पष्टीकरण दिले तर तिला पटले नाही. मी थापा मारते आहे असे वाटले.

रमताराम's picture

5 Feb 2011 - 9:14 pm | रमताराम

Reaching early has a major disadvantage... there is no one to welcome you!
हे कुण्यातरी मोठ्या माणसाने म्हटलेलं नि आमच्या स्वानुभवातून पटलेलं. आमचे सारे दोस्तच असले.

एक प्रातिनिधिक संध्याकाळः

पहिला फोन येतो.
'किती वाजता भेटायचे?' -मित्रवर्य
'मी मोकळाच आहे, तू सांगशील तेव्हा येतो.'-आम्ही.
'मी ही मोकळाच आहे, तू सांग.' -मित्रवर्य.
'ठीक आहे पाचला भेटू." -आम्ही.
'नको, साडेपाच ठीक आहे' -मित्रवर्य (च्यामारी मग आधीच सांगायला काय झाले होते.)
सव्वापाच पाच-वीसला दुसरा फोन 'पावणेसहा होतील रे'. तोवर आम्ही निघायच्या तयारीत, जागच्याजागी चडफडतो.
आम्ही बरोबर पावणेसहाला पोचतो. सहा पर्यंत महाराज गायब. आम्हीच फोन करतो. 'कुठे आहेस रे xxx'. आता वर उल्लेख केलेल्या असंख्य कारणांपैकी रँडमली एक-दोन कारणे ऐकून घेतो. मग सुमारे सव्वा-सहा साडे-सहा पर्यंत महाराज पोचतात, ते ही आमचे भाग्य थोर असेल तर. साडेपाच ते सहा पर्यंत इथे घालवून साडेसहाला काही आणखी काही करू असा प्लान केला असेल तर गेला बोंबलत. जय हो!

एवढे असून आम्ही अजून शहाणे होत नाही. साडेपाच ठरले तर साडेसहाला पोचायचे असते हे अजून टाळक्यात शिरत नाही. काय करणार, म्हणतात ना जित्याची खोड...

(त्रस्त) बैठाराम

पैसा's picture

5 Feb 2011 - 11:19 pm | पैसा

मला इथे यायला जरा उशीर झाला वाटतं! काय करणार, कीबोर्ड झोपला होता ना!

आणखी एक फायदा विसरला बरं का! पिच्चरात पोलीस उशीरा येतात म्हणूनच हीरोला हिरोगिरी करायला मिळते नाय का?

आपला आभि's picture

6 Feb 2011 - 7:42 am | आपला आभि

सर्वांनाच असे अनुभव आले हे ऐकून आम्ही धन्य झालो .. India Shining !!!!!