कसा घट्ट आपलेपणा ..!!

प्रकाश१११'s picture
प्रकाश१११ in जे न देखे रवी...
29 Jan 2011 - 4:12 pm

कसा घट्ट आपलेपणा निर्माण होत असतो ह्या शब्दातून
ह्या पत्रातून
काही घेणेदेणे नसते
काही मागणे नसते

निव्वळ आनंद वाहत
असतो झुळझुळ
शब्दाशब्दातून
कसे तारुण्य असते
निळ्या निळ्या आभाळासारखे
मन पाखरू
नि मस्त उडत असते
गोजिरवाणे पंख उभारून

मी कोण
कुठला
काय करतोय ..?
खूप उत्सुकता असते ना..?
जाणून घेण्याची

आंबा कापला तर मस्त वाटते
तोंडाला चळकण पाणी सुटते
पण कोंबडी..?
मी तर दूर उभां राहून आभाळ बघत बसतो

पण मी नाही विचारणार तुम्ही कोठल्या ...
काय करता..,,?
मग मी घाबरून तुम्हाला म्याडम म्हणेल
तुम्ही काय आहात हे नाही मला ठाऊक
तुम्ही माझ्या मनातल्या छान प्रतिमा आहात
सुंदर अश्या गझल आहात
तुम्ही परदेशी आहात म्हणजे
तुम्ही विमान आहात
तुम्ही गरुड आहात
तुम्ही निळे आभाळ आहात
खाली डोकावून बघाल तर एक शेत दिसेल
नांगरलेले काळेभोर
कधीकधी हिरवे गार
कधी कधी नुसतेच रेताड

तुम्ही जेथे राहता
तेथे मी आलो आहे
तुमचे बोट धरून फिरलो आहे
तुमचे रोड,सेक्टर मला ठाऊक आहेत
कल्पनेचे पंख लावून मी मस्त उडतो आहे
आणि हे मला खूप आहे

कधी एखादे पाखरू दिसले
झाडावर बसलेले
तर मला आठवा
आणि त्यालां हात करा
बघा ते छान गिरकी घेईल
नि आभाळात जाईल
तेवढे फक्त बघा.
माझी तेवढी आठवण तुम्हाला पुरी आहे. ...!!

शांतरसकविता

प्रतिक्रिया

कच्ची कैरी's picture

29 Jan 2011 - 4:51 pm | कच्ची कैरी

लगे रहो प्रकाशभाई ! मस्त कविता हं!खरच तुमच्या शब्दांत घट्ट आपलेपण आहे .

शुचि's picture

30 Jan 2011 - 6:53 am | शुचि

सुंदर :)
का माहीत नाही, आपली ही कविता वाचून डोळ्यात पाणी आले.

पियुशा's picture

30 Jan 2011 - 12:22 pm | पियुशा

व्वा व्वा क्या बात
:)

गणेशा's picture

1 Feb 2011 - 2:06 pm | गणेशा

मस्त