प्रार्थना किटक

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in कलादालन
19 Jan 2011 - 9:17 pm

रविवारी सकाळी येऊरच्या डोंगरात भटकताना हे महाशय दिसले. प्राणी नुसता धीटच नाही तर हौशी निघाला. बेट्याने स्वतःचे मनसोक्त चित्रण करुन घेतले.

पायवाटेने जाताना लक्ष गेले तर हा मस्त कोवळे उन खात बसला होता. पाय पानावर ताणुन कुठे भक्ष्य दिसतय का याची पाहणी चालली असावी

m1

त्याचे फोटु काढतो म्हणताना त्याने थोबाड माझ्याकडे केले - 'चल काय काढायचे ते फोटु काढ नी हो पुढे'

m2

लाल पिवळ्या पानावर तो हिरवागार किडा खुलुन दिसत होता

m3

जागा बदलत मी पवित्रा घेतला आणि त्यानेही आपले नाव सार्थ करणारी अवस्य्था धारण केली

m4

माझा मित्र त्याला जवळुन टिपायच्या नादात इतका जवळ गेला, की साहेब थेट त्याच्या क्यामेर्‍यावरच उतरले

m5

ते मजेशीर दृश्य टिपत असताना माझ्याकडे वळत त्याने मस्त पैकी हास्य चेहेर्‍यावर खेळवले - 'अगदी क्लोज अप स्मितहास्य'

m6

छायाचित्रणस्थिरचित्र

प्रतिक्रिया

आत्मशून्य's picture

19 Jan 2011 - 11:56 pm | आत्मशून्य

पण एखादे भीतीदायक एनीमेटेड कॅरॅक्टर बघतोय असेच वाटत आहे.

मुक्तसुनीत's picture

19 Jan 2011 - 11:59 pm | मुक्तसुनीत

फारच सुंदर फोटो !

धनंजय's picture

20 Jan 2011 - 12:37 am | धनंजय

+१

बिपिन कार्यकर्ते's picture

20 Jan 2011 - 9:42 am | बिपिन कार्यकर्ते

+२

श्रावण मोडक's picture

23 Jan 2011 - 2:34 pm | श्रावण मोडक

+३

विकास's picture

20 Jan 2011 - 1:34 am | विकास

असेच म्हणतो! एकदम मस्त!

सुनील's picture

19 Jan 2011 - 11:59 pm | सुनील

छान. नाकतोड्याच्या जातीतला दिसतोय!

सर्वसाक्षी ....छायाचित्रे खुप मस्त आली आहेत...
बाकी त्या कीड्याला तुम्ही मॉडेलिंग मध्ये ब्रेक दिलात... ;)

अडगळ's picture

20 Jan 2011 - 2:30 am | अडगळ

शेवटून दुसरा फोटो मस्तच आहे . ऊर्जा आणि माज पुरेपूर भरलेला पवित्रा आहे. कुठल्याही क्षणी बुरूजावरून उडी मारुन खालच्या सैन्यावर तुटून पडेल. प्रार्थना कीटक हे नाव काय पटत नाही. जुलमाचे वाटते. महाबली खली ला " काय हजारे अण्णा " असं म्हटल्यासारखं वाटतंय.
बाकी फोटो सगळेच अप्रतिम.

शुचि's picture

20 Jan 2011 - 5:10 am | शुचि

बाई गं त्याचं ढुं** असं नांगीसारखं का दिसतय?

स्वानन्द's picture

20 Jan 2011 - 10:14 am | स्वानन्द

रात्री पार्टी झाली असेल, आणी सकाळी मोकळं व्हायच्या आधीच सर्वसाक्षी राव त्यांच्या या अवस्थेला साक्षी राहिले ;)

बाकी फोटो एकदम डिस्कव्हरी श्टाईल!!
नेहमीचाच प्रश्नः कंचा क्यामेरा?

मदनबाण's picture

20 Jan 2011 - 6:25 am | मदनबाण

सुंदर !!! :)

योगेश२४'s picture

20 Jan 2011 - 8:42 am | योगेश२४

४था फोटो जबरदस्त :-)

स्पा's picture

20 Jan 2011 - 9:48 am | स्पा

शेवटचा फोटो अफलातून...

सहज's picture

20 Jan 2011 - 9:48 am | सहज

सर्वसाक्षीजी , जयपाल ही मंडळी खरी त्यांच्या कॅमेराचा पुरेपुर चांगला वापर करतात. आम्ही नुस्ते कॅमेरे खरेदी करुन कपाटात ठेवतो. फोटोची वेळ आली की मोबाईलच्या कॅमेरातुन वेळ भागवुन नेतो.

अप्रतिम. असेच सुंदर फोटो काढत रहा.

बरीच मंडळी की बोर्डचा पुरेपुर चांगला वापर करतात .आम्ही नुसते लॉग इन करून थांबतो . लिहायची वेळ आली की खरडीतून हौस भागवून घेतो.
(हघ्याहेवेसांन)

sneharani's picture

20 Jan 2011 - 10:16 am | sneharani

अप्रतिम फोटो!!

प्रचेतस's picture

20 Jan 2011 - 10:25 am | प्रचेतस

मस्त, मस्त मस्त....

स्मिता.'s picture

20 Jan 2011 - 10:38 am | स्मिता.

सगळेच फोटो छान आहेत. खरं तर रंग आणि क्लॅरिटी सुरेख आहेत पण मला कोणतेही किडे आवडत नसल्याने फोटोंना सुंदर म्हणता येत नाहीये.

गवळण म्हणतात ना याला? समोरचे दोन्ही हात कायम ताकाची रवी घुसळल्या सारखे घुसळतो म्हणुन आम्ही अस म्हणतो.
फोटो आणी कमेंटस दोन्ही छान.

येउर हल्ली एव्हढ सुरक्षित नाही म्हणतात, मधल्या काळात तिथे फार भयानक प्रकार घडले ना?

भडकमकर मास्तर's picture

21 Jan 2011 - 3:39 pm | भडकमकर मास्तर

फोटो एकदम मस्त आहेत..
अवांतर :
येउर हल्ली एव्हढ सुरक्षित नाही म्हणतात, मधल्या काळात तिथे फार भयानक प्रकार घडले ना?

पण कीटकांसाठी येऊर अजूनही सुरक्षित असावे बहुतेक...

व्वा !! तोंडाला पाणी सुटले , विकांताचा मेणु फिक्स .. फोटु क्लासंच :)

नरेशकुमार's picture

21 Jan 2011 - 3:45 pm | नरेशकुमार

घरी करुन खानार आहेस कि भायेर जाउन खानार आहेस ?
.
.
.
अ‍ॅक्चुली मी काय म्हनतो,
घरी करनार असशिल तर सोमवारी पाकक्रुती (फोटोसहीत) आली पाहीजे... बरंका !

नंदन's picture

20 Jan 2011 - 12:01 pm | नंदन

सगळेच फोटो झकास!

रामदास's picture

20 Jan 2011 - 12:22 pm | रामदास

येऊरच्या जंगलाचा पुरेपुर फायदा घेतात.आम्ही नुसतेच येऊरजवळ राहतो. काही करावंसं वाटलं की टिव्हीवर मॅन /वाईल्ड बघतो.
साक्षी ,नेहेमीप्रमाणे उत्तम अविष्कार.

फोटो आणि लिखाण दोन्ही छान वाटल.

झक्कास छायाचित्रण.. इतक्या जवळून अगदी मनोजागते फोटो काढलेत..

- पिंगू

परिकथेतील राजकुमार's picture

20 Jan 2011 - 2:01 pm | परिकथेतील राजकुमार

अफलातुन फोटू काढल आहेत.

झकास .

सर्वसाक्षी, आजपासुन तुम्हाला आम्ही फोटो काढण्यातलं गुरु केलं. अतिशय छान फोटो आणि त्याखालची वाक्यं.

धन्यवाद.

आपली हरकत नसेल तर या फोटोंविषयी तांत्रिक माहीती देउ शकाल काय?

हर्षद.

प्राजक्ता पवार's picture

20 Jan 2011 - 4:57 pm | प्राजक्ता पवार

छायाचित्रे व लिखाण दोन्ही मस्तं .

महेश काळे's picture

21 Jan 2011 - 10:05 am | महेश काळे

फारच सुंदर फोटो !

स्वाती दिनेश's picture

21 Jan 2011 - 3:14 pm | स्वाती दिनेश

झकास प्रकाशचित्रे,
स्वाती

फोटो दिसत नसल्याने निराशा झाली

मराठे's picture

21 Jan 2011 - 8:00 pm | मराठे

खत्तरनाक फोटो ! मस्त !

या किड्याचे विडियो पण चांगले येत असावेत.. ट्राय करून बघा कधी जमलं तर...

प्राजु's picture

21 Jan 2011 - 8:14 pm | प्राजु

सुरेख फोटो. आणि त्यासोबत लिहिलेली कथा सुद्धा मस्त!! एकदम छान.

मनिम्याऊ's picture

21 Jan 2011 - 9:08 pm | मनिम्याऊ

या किटकाला "खंडोबाचा घोडा" असेही म्हणतात. जरा दुर्मिळच आहे हा किडा

jaypal's picture

22 Jan 2011 - 4:28 pm | jaypal

अजुन कोल्जअप हवा अस वाट्त .
मझ्या किड्याची आठवण करुन दिलीत.

अवलिया's picture

23 Jan 2011 - 1:38 pm | अवलिया

जबरा फटु !