Skip to main content

प्रार्थना किटक

लेखक सर्वसाक्षी यांनी बुधवार, 19/01/2011 21:17 या दिवशी प्रकाशित केले.
रविवारी सकाळी येऊरच्या डोंगरात भटकताना हे महाशय दिसले. प्राणी नुसता धीटच नाही तर हौशी निघाला. बेट्याने स्वतःचे मनसोक्त चित्रण करुन घेतले. पायवाटेने जाताना लक्ष गेले तर हा मस्त कोवळे उन खात बसला होता. पाय पानावर ताणुन कुठे भक्ष्य दिसतय का याची पाहणी चालली असावी m1 त्याचे फोटु काढतो म्हणताना त्याने थोबाड माझ्याकडे केले - 'चल काय काढायचे ते फोटु काढ नी हो पुढे' m2 लाल पिवळ्या पानावर तो हिरवागार किडा खुलुन दिसत होता m3 जागा बदलत मी पवित्रा घेतला आणि त्यानेही आपले नाव सार्थ करणारी अवस्य्था धारण केली m4 माझा मित्र त्याला जवळुन टिपायच्या नादात इतका जवळ गेला, की साहेब थेट त्याच्या क्यामेर्‍यावरच उतरले m5 ते मजेशीर दृश्य टिपत असताना माझ्याकडे वळत त्याने मस्त पैकी हास्य चेहेर्‍यावर खेळवले - 'अगदी क्लोज अप स्मितहास्य' m6

वाचने 12216
प्रतिक्रिया 38

प्रतिक्रिया

सर्वसाक्षी ....छायाचित्रे खुप मस्त आली आहेत... बाकी त्या कीड्याला तुम्ही मॉडेलिंग मध्ये ब्रेक दिलात... ;)

शेवटून दुसरा फोटो मस्तच आहे . ऊर्जा आणि माज पुरेपूर भरलेला पवित्रा आहे. कुठल्याही क्षणी बुरूजावरून उडी मारुन खालच्या सैन्यावर तुटून पडेल. प्रार्थना कीटक हे नाव काय पटत नाही. जुलमाचे वाटते. महाबली खली ला " काय हजारे अण्णा " असं म्हटल्यासारखं वाटतंय. बाकी फोटो सगळेच अप्रतिम.

In reply to by शुचि

रात्री पार्टी झाली असेल, आणी सकाळी मोकळं व्हायच्या आधीच सर्वसाक्षी राव त्यांच्या या अवस्थेला साक्षी राहिले ;) बाकी फोटो एकदम डिस्कव्हरी श्टाईल!! नेहमीचाच प्रश्नः कंचा क्यामेरा?

सर्वसाक्षीजी , जयपाल ही मंडळी खरी त्यांच्या कॅमेराचा पुरेपुर चांगला वापर करतात. आम्ही नुस्ते कॅमेरे खरेदी करुन कपाटात ठेवतो. फोटोची वेळ आली की मोबाईलच्या कॅमेरातुन वेळ भागवुन नेतो. अप्रतिम. असेच सुंदर फोटो काढत रहा.

In reply to by सहज

बरीच मंडळी की बोर्डचा पुरेपुर चांगला वापर करतात .आम्ही नुसते लॉग इन करून थांबतो . लिहायची वेळ आली की खरडीतून हौस भागवून घेतो. (हघ्याहेवेसांन)

सगळेच फोटो छान आहेत. खरं तर रंग आणि क्लॅरिटी सुरेख आहेत पण मला कोणतेही किडे आवडत नसल्याने फोटोंना सुंदर म्हणता येत नाहीये.

गवळण म्हणतात ना याला? समोरचे दोन्ही हात कायम ताकाची रवी घुसळल्या सारखे घुसळतो म्हणुन आम्ही अस म्हणतो. फोटो आणी कमेंटस दोन्ही छान. येउर हल्ली एव्हढ सुरक्षित नाही म्हणतात, मधल्या काळात तिथे फार भयानक प्रकार घडले ना?

In reply to by स्पंदना

फोटो एकदम मस्त आहेत.. अवांतर : येउर हल्ली एव्हढ सुरक्षित नाही म्हणतात, मधल्या काळात तिथे फार भयानक प्रकार घडले ना? पण कीटकांसाठी येऊर अजूनही सुरक्षित असावे बहुतेक...

In reply to by टारझन

घरी करुन खानार आहेस कि भायेर जाउन खानार आहेस ? . . . अ‍ॅक्चुली मी काय म्हनतो, घरी करनार असशिल तर सोमवारी पाकक्रुती (फोटोसहीत) आली पाहीजे... बरंका !

येऊरच्या जंगलाचा पुरेपुर फायदा घेतात.आम्ही नुसतेच येऊरजवळ राहतो. काही करावंसं वाटलं की टिव्हीवर मॅन /वाईल्ड बघतो. साक्षी ,नेहेमीप्रमाणे उत्तम अविष्कार.

सर्वसाक्षी, आजपासुन तुम्हाला आम्ही फोटो काढण्यातलं गुरु केलं. अतिशय छान फोटो आणि त्याखालची वाक्यं. धन्यवाद. आपली हरकत नसेल तर या फोटोंविषयी तांत्रिक माहीती देउ शकाल काय? हर्षद.