वन लाइनर्स

गणेशा's picture
गणेशा in जनातलं, मनातलं
7 Jan 2011 - 4:06 pm

पार्श्वभुमी :
हा थ्रेड माझा मिसळपाव वरील पहिलाच थ्रेड होता, आता नविन ओळखी नविन मित्र त्यांच्या साठी पुन्हा येथे देत आहे. (कोणी आधी वाचला असेल तर पुन्हा येथे दिल्यामुळे शमस्व)

व.पु. काळे हे माझे आवडते लेखक, त्यांच्या मुळे वाचनाचे वेड आनखिन वाढले होते .. त्यांच्या कथा कादंबरी आणि त्यातील वाक्य म्हणजे ग्रेटच त्यातल्ता त्यात पार्टनर .. आपण सारे अर्जुन.. तु भ्रमत आहासी वाया .. हय कादंबर्या म्हणजे कळसच .
त्यांच्याच प्रेरणेतुन काही तरी लिखान हाती घेतले आणि त्यात आलेली माझी वाक्य मलाच आवडुन गेली.. कविता ह्या आत्मकेंद्रीत असल्याने सार्वभौमत्व लवकर मिळत नाहि त्यांना. पण लेख किंवा वाक्य खरेच बर्याच जणांच्या आयुष्याला स्पर्शुन जात असतील असे वाटते.

व.पु भारी आहेत का नाहीत हा विषय येथे नको प्लीज , ज्याची त्याची आवड वेगळी.
माझे वनलाईनर आवडले तर बिन्धास्त रिप्लाय द्या . नाही आवडले तरी तसे सांगा..

------------------------------------

1. "समर्थन हे चुकीच्या गोष्टींना लागते, जे बरोबर असते ते शास्वत असते त्याला आधाराची गरज नसते."

2. मिळालेल्या सुखापेक्षा त्या पलिकडील न मिळालेल्या सुखाकडे मन धावत असते आणि या अस्थिरतेचे रुपांतर होते असमाधाना मध्ये, माणुस असाच जीवनाचा प्रवास करतो आणि मनाच्या सुखासाठी यशाचे डोंगर तयार करतो . पण जेंव्हा जेंव्हा तो शिखरावर आरुढ होतो त्याला दिसते फक्त दरी आत्म्याच्या दबलेल्या स्वरांची दरी "

३. "आपण आपल्या माणसांशी आणि मनाशी प्रामाणिक रहायचे बस्स.. या सारखे सुख जगात दूसरे कुठलेच नाही "

4. "शब्दांना चेहरा नसतो.. तो असतो स्वछ आरसा मनाचा ...जेंव्हा या आरशास चेहरा चिकटतो..तेंव्हा समजावे शब्दरुपी आरशावरती मानवी अहंकाराचे प्रतिबींब उमटले ते"

5. कलाकारास वय नसते .. आणि त्याच्या कलाकृतीस कुठलेही बंधन.. लहान-मोठे पणाचे नाते एकदा का कलाकाराशी जोडले की उरतो फ़क्त आभास..बस्स.. कलाकृतीवरील निस्सीम प्रेमा ऐवजी राहतो फ़क्त एक क्रुत्रिम देखावा..

6. "अखंड दु:ख भोगणार्‍यांना ही दूसर्‍यास दु:ख देवूनच आनंद उपभोगता येतो "

7. "परीवर्तन .. परीसा प्रमाणे राहुन येणार्‍या प्रत्येक गोष्टीचे सोने केल्यास मिळणार्‍या यशास परीवर्तन म्हणतात "

8. "हातात असलेले फुलपाखरू उडाले की मागे उरतात ते रंग,फक्त रंग आणि ते ही फिकट , तसाच हा काळ .. तो ही असाच पटकन निघून जातो आठवणींचे रंग मागे ठेवून "

9. " काळाच्या प्रवाहात आयुष्य वाहत जात अण् या प्रवाहात शरीर रुपी अंगरख्याची लक्तरं होतात .. म्हातारपण हे आत्म्याच्या उच्छादी पणाला शाप असतं "

10. " मन हे एक वृक्ष असते अन आठवणी त्या वृक्षाची पाने, ओळखीच्या दृष्यांची झुळूक एकदा का आली की ही पाने सळतात.. पूर्ण वृक्ष शहारून जातो अन कधी कधी तर नयनांवाटे गालावर अश्रू फुलांची ओघळण होते."

11. "शिखरावरती पोहचण्यासाठी प्रत्येकाचे मार्ग वेगळे असतात आणि दृष्टिकोन भिन्न फक्त शिखरावरती पोहचल्यावर प्रत्येकाने निर्मायची असते ताकद आपल्या पायात शिखरावरती ठाम उभे रहाण्यासाठी ... "

12. "ambulance वरील अक्षरे उलटी असतात कारण प्रत्येक जीविताचा प्रवास हा जीवनाकडून मरणाकडे चालू असतो, फक्त ambulance मधील व्यक्तीचा प्रवास हा उलटा मरणाकडून जीवनाकडे चालु असतो"

15. "नातं कीतीही सुंदर असले ना तरी त्यातील बंध कोठे सैल आहेत आणि कोठे घट्ट हे नातं निभावणार्‍यालाच माहीत असते, म्हणुन त्या अनुशंघाने आपण नातं निभवत रहायच ,बुट पायात घातला तर कदाचीत तो टोचणारच पण म्हणुन त्याला फेकून ध्यायचे नसते, आपल्या पायचे वळण आपोआप त्याला मिळते"

16. " आयुष्यामध्ये धडपड नसेल तर मिळालेल्या यशास ही काही अर्थ आणि आनंद नसतो "

17. "यशाच्या वाटेवर जाण्यासाठी फक्त नविन मार्गाची इच्छा असणे गरजेचे नाही तर परीचीत रस्ते सोडण्याचे धेर्य बाळगणे गरजेचे असते"

18. "लिहिण्याला प्रामाणिकतेची जोड मिळाली की फक्त लिखाण होत नाही तर तो आयुष्याचा शिलालेख बनतो"

19 . "राजकारण हे प्रत्येक माणसाच्या मनात दडलेले असते .. माणुस जितका शांत तितका त्याचा रंग गडद"

21. " प्रतिष्टावंतानी विचार करावा .. आपली जी प्रतिष्टा आहे ती समाजामध्ये आहे की मनामध्ये कारण या जगात प्रतिष्टा मिळवण्यासाठी बर्‍याचदा मनाला गहान ठेवावे लागते"

22. " आपल्या विचारांशी प्रामाणिक रहाणे, हेच या जगातील सर्वश्रेष्ट कर्तव्य आहे "

23. "सुख आणि दु;ख हे एकटेपणाच्याच दोन समान बाजू आहेत. माणसाचे दु:ख हे धृव तार्यासम असते.. अटळ आणि एकटे.. सुखा मध्ये माणुस अविरत आनंदी असतो, सूर्यासम.. अविरत.. स्वयंप्रकाशित.. पण सुर्यासही शाप असतो एकटेपणाचा म्हणुनच कदाचीत सुर्यासोबत कोणीच तारा नसतो सोबतीला"

24. "चांगल काय आणि वाईट काय यांची सिमा जशी ठरलेली , तसेच गुरु आणि शिष्य
यांचे नाते असते.. अबाधीत ..समांतर"

25 .एकटेपणा हाच आयुष्याचा एकुलता एक सोबती आहे ..

२६. "काही प्रश्न असे असतात की त्यांची उत्तरे शोधली नाहीत तर जीवनाची असाध्य उत्तरे आपणास मिळतात"

27 ." या जगात मैत्रीला स्थर नसतो , पण जर माणुस आपल्याच विचारांच्या टेकडीवरून मैत्रीकडे पहात असेल तर त्याला ती ठेंगणीच वाटणार.... अस्थीर विचार मैत्रीचा स्थर ठरवू शकतात, पण मैत्री विचारांचे स्थित्यंतरे पेलुन आपल्या जाग्यावर सदैव स्थिर असते "

28. "जोपर्यंत पुरुष तन सोडून मनाकडे वळत नाही, तो पर्यंत मुलींनी आपणास मन नाही असेच समजून वागावे, मुली एकदा का मनाच्या चक्रात अडकल्या की समोरच्याची दृष्टी त्यांना अस्पष्ट दिसते .. आणि या चक्रात त्या स्वताला परावलंबी समजतात आणि मनाच्या गुरुत्वीय शक्तीभोवती फ़िरताना त्या कधी दूर फ़ेकल्या जातात त्यांनाच कळत नाही "

29 "मन आणि विचार यात काहीच फरक नसतो, आपल्या विचरांना एक रुप देण्यासाठीच माणसाने मनाचे अस्तित्व निर्माण केले.. पण आता माणुसच विचार करतोय मनाचे स्थान कोठे आहे .. पण तो विसरलाय विचार हाच मनाचा जन्मदाता आहे "

30 ."वय वाढते शरीराचे .. मन तरुण असते ..भावनांना चिरतारुण्याचे वरदान लाभलेले असते..म्हणुन कुठलाही कलाकार वयस्कर नसतो, त्याच्या नजरेत सदा तारुण्य असते.. "

३१. आपल्या कलाकृतीच्या निर्मितीचा अहम नसलेला एकमेव कलाकार म्हणजे निसर्ग.

31. "अस्थिर जीवन झाले की जगणे व्यर्थ वाटते माणसाला, आणि मग मनाच्या धुसर खिडकीतुन दिसतो फक्त एक मार्ग.. शेवटाचा.., भाबडे पणा हा अस्थिरतेची पहीली शिकार असतो त्यामुळे विचारांची ढाल हाती घेवुन अस्थिरतेचा सामना करावा प्रत्येकाने "

32. relations हे माणसांसाठी असतात .. माणसे relations साठी नसतात ..

33. "कुठल्याही कलाकारास त्यानी केलेल्या विविध कलाकृतींच्या निर्मितीमध्ये कधीच फ़रक जानवत नसतो त्याला दिसतो तो फ़क्त आनंद.. एक निस्सीम कलाकृतीच्या निर्मितीचा आनंद" ..

34 " स्वप्न आणि अस्तित्व यांचा मेळ घालण्यासाठी सत्याच्या वाटेवर चालत रहावे .. तेंव्हाच माणसास मिळते एक स्वप्नवत अस्तित्व .. सत्य हाच जीवनात यशस्वी होण्याचा एकमात्र महामार्ग आहे" ..

35."आपण काय आहोत आणि कोण आहोत हे समाजाला दाखवताना दुसर्यास तुच्छ लेखुन वक्तव्य करणे म्हणजे आपल्याच विचारांवर आपणच केलेला निर्घुन बलात्कार असतो" ----

36 लादलेली नातीं न मानता मानुसकीच्या नात्यांनी समाजात वावरणे हेच आपण आपल्याशी निभावलेले सर्वस्रेष्ट नातं आहे ..

37. "ज्यांना स्वताचे मत नसते, कींवा ते व्यक्त करता येत नाही, त्या व्यक्तिंस दूसर्‍यास मत विचारण्याचा अधिकार नसतो..."

38. " जेंव्हा माणुस स्वताचा अहम बाजुला ठेवुन सारासार विचार करतो, तेंव्हाच त्याला स्वताचे आणि इतरांचे खरे रुप स्पष्ट दिसते.."

39. "इतिहास हा वर्तमानावर अवलंबुन असतो ना की वर्तमान इतिहासावर"

40. "कलाकार हा त्याच्यावर झालेले वार सहन करु शकतो, परंतु त्याच्या कलेवर झालेले वार त्याच्या ह्रद्याच्या ठिकर्या उडवून जातात.."

41. संस्कृती आणि आपले विचार यात तफ़ावत आली तरी चालते ..पण आपले विचार, जर विचार करण्यास लावत असले तर आपण तरी त्या विचारांचा रीस्पेक्ट केला तरी बस्स ..बाकी संस्कृती ही विचारांच्या अस्तित्वावर तर टीकुन आहे

42. " 'माझा' हा मनातील भावच 'परके'पणाचा जन्मदाता असतो, कुठल्याही वस्तुविषयी 'माझा' हा भाव निर्मान झाला की इतर जे ' आपले' या संज्ञेत बसतात, त्याविषयी ही आपोआप परकेपणाची जाणीव निर्मान होते."

43. " 'शुभविवाह' ह्या शब्दाविषयी जरी वलय असले, तरी शुभविवाह हा नविन जोडप्यासाठी मंदिराबाहेरील पायरीसमानच असतो,'संसार' हेच खरे मंदिर.. आणि शुभसंसार हाच खरा भक्तीमार्ग"

44. "क्रियेटीविटी आणि त्यातुन मिळणारा आनंद हीच जीवनाची खरी संपत्ती असते.."

45. विचार हे प्रत्येकाच्या मनात असतात .. आणि प्रत्येकाच्या विचारांचा रीस्पेक्ट करणे हे आपल्या मनावर असते

47. मैत्रीमध्ये आपला फ़्रेंड मित्र आहे की मैत्रीण असा जेंव्हा विचार केला जातो तेंव्हाच त्यातिल निखळता निखळली जाते ... आणि मग उरते ती फ़क्त अस्तित्वाची आणि समाजकारणाची एक रेघ, उरतो फ़क्त एक पशुतुल्य माणुस आणि स्त्री ...

48. " गगनभेदी इमारती बांधुन स्व:तावरच खुष असणारा माणुस, आकाशाच्या ईवल्याश्या तुकड्यावरही आपला हक्क प्रस्थापित करु शकत नाही. म्हणुनच आनंदाचे परिमान उंची न मानता, काही क्षणांचे खोल समाधान मानावे .."

49. " समाधान आणि सुख यात फ़रक आहे .. समाधान हे आत्मिक असते, सुख हे सार्वभौम असते.
माणसाचा प्रवास सार्वभौमतेकडुन आत्मिकतेकडे जेंव्हा होतो तेंव्हा जीवनास पुर्णत्व लाभते"

50. समाज म्हणजे काय ?
विशिष्ट चालीरीती आणि रुढींवर जातीची पगडी घेवून स्वार झालेले लोक म्हणजे समाज

51 एकजुट ह्या शब्दातुनच फ़ुट आहे हे अधोरेखीत करुन आपला असणारा मराठी माणुस आपल्या तुकड्यांवर प्रेम करु लागला की एकजुट हे एक स्वप्न वाटते.. दुभंगलेले स्वप्न "

52. यशस्वीतेचे कोठलेही परिमान न मानुन, येणारा प्रत्येक क्षण सुखाचा असो वा दुखाचा योग्य पद्धतीने जगणे म्हणजेच कदाचीत यशस्वी आयुष्य असेन

53. "प्रेम हे प्रखर असते, त्यामुळे कधी कधी त्याची प्रखरता डोळ्यासमोर धुसरता निर्माण करते"

54. "माणसाचे विचार मनातुन येतात, भाषेतुन येते ते फ़क्त त्या विचारांचे प्रतिबिंब"

55. "वाईट घडलेल्या गोष्टींकडे जग जागरुकतेने पहात असते, आणि चांगल्या गोष्तींकडे एक अपवाद म्हणुन,
त्यामुळे आपण आपल्या गोष्टी आपल्या मनाने करत जायचे"

56. "आघात हा मनावर होतो, शरीरावर होते ती जखम. जखम कालांतराने बरी होते, परंतु आघाताचे तरंग आयुष्यभर मनात संचार करत असतात."

57. "इतिहास हा कागदाच्या पानावर नाही तर मनावर कोरला गेला पाहिजे "

58. "प्रत्येक वर्तमान हा कालांतराने भुतकाळ होत जातो, परंतु त्याचा इतिहास बनवणे हे प्रत्येकाच्या मनगटात असते."

59. तन हे विहिर माणले तरी प्रेम हे पाणी असते हे जाणावे.
प्रेम विहिरिवर करायचे की पाण्यावर हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो.

60. प्रेमाचा रंग जरी दिसत नसला तरी आयुष्य रंगीत करण्याची ताकद प्रेमा मध्येच असते.

61. "प्रेमाला व्याख्येत लिहिणे जरी सोपे असले तरी प्रेमाला जीवनात अखंड बसवने तितकेच अवघड असते, हे ज्याला जमते तो माणुस."

62. जोड मिळाल्याने अजोड अशी निर्मिती होते. तशेच अपुर्णत्वाचे सैल बंध ही, पुर्णत्वाचे आकाश विणत असतात...

63. शुन्य भावनेच्या पाठीमागे, विचारांची एक शलाखा असते .. एक रेघ असते , जेव्हड्या शुन्य भावना जास्त तेव्हडी विचारांची रेघ मोठी

64. "यशाच्या मार्गावरील अमुर्त अपयश हे आनंद देण्याचे कारंजे असते"

65. "मुर्ख लोकांची परिसिमा दाखवताना .. त्यांच्या रेषेला आपला स्पर्ष होणे सहाजीकच असते .. त्या रेषेलाच बांध म्हणुन शकतो आपण .. कधी तरी आपले एखादे विचारांचे पान घोंगावत तो बांध ओलंढतोच .. म्हणुन आपल्या हद्दीतील विचारांचा व्रुक्ष काही जागा बदलत नसतोच मुळी..."

66. " माणुस सवईचा गुलाम झाला की ती सवयच माणसाची ओळख बनते .. आणी कधी कधी त्याचे आयुष्य ह्याच सवईने अधोरेखीत होते "

-- शब्दमेघ

मुक्तकसुभाषितेजीवनमानविचारमतप्रतिसादअनुभवप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

नन्दादीप's picture

7 Jan 2011 - 4:07 pm | नन्दादीप

मस्त....

स्पा's picture

7 Jan 2011 - 4:09 pm | स्पा

अप्रतिम.....

विजुभाऊ's picture

7 Jan 2011 - 4:25 pm | विजुभाऊ

व पु आणि दवणे एकत्र केले की नक्की काय होईल याची कल्पना करवत नाही

नंदन's picture

7 Jan 2011 - 4:36 pm | नंदन

>>> व पु आणि दवणे एकत्र केले की नक्की काय होईल याची कल्पना करवत नाही
--- विजूभौ, ह्या विरजणाचे आनन्ददायक श्रीखंड करणे शक्य आहे का? ;)

विजुभाऊ's picture

8 Jan 2011 - 12:23 pm | विजुभाऊ

>>> व पु आणि दवणे एकत्र केले की नक्की काय होईल याची कल्पना करवत नाही
--- विजूभौ, ह्या विरजणाचे आनन्ददायक श्रीखंड करणे शक्य आहे का?

वपु आणि दवणे यांच्या सोबत "हम साथ साथ है" छाप राजश्री चा गोड्ड गोड्डुला पिक्चर हे कोंबिनेशन असेल तर ते अनुभवल्यानन्तर बहुतेक ; रामनाथ ची मिसळ "ज्यादा तिखट मारके" मिर्ची सोबत किमान साताअठ दिवस खायला लागेल तेंव्हा कुठे नॉर्मल वाटेल
वीट यावा इतकी अवीट गोडी.....

गणेशा's picture

7 Jan 2011 - 7:57 pm | गणेशा

विषयांतर वाटले असो.

अतिविषयांतर :

आमच्या गावी कुंभार आळी होती..
मडके, कींवा किल्ल्यासाठी खेळणी किंवा बैलपोळ्यासाठीचे बैल ह्या गोष्टी साठी आम्ही तिकडे त्यांच्याकडे जात..

तेंव्हा जाणवत ..
सगळे कुंभार आपापले काम खुप छान करत असत , पण काहींचा मावळा इतका सुंदर दिसत तर दुसर्‍याने बनवलेले शिवाजी महाराज अप्रतिम, काहींचे चित्ते जबरदस्त तर काहींची हिरकणी
काही कुंभारांच्या गवळणी अतिशय सुरेख असत .. तर काहींचे रंग देण्याचे कौशल्य जबरदस्त होते.
प्रत्येकाचे वेगळे असे काही तरी स्वताचे होते.. व्यवसाय एकच होता .. पण नक्कीच त्यातील कला.. रंग.. की आनखिन काही तरी खुप वेगळे आणि सामर्थवान होते ..
बरेच लोक येत सगळ्यांकडे मस्त रेलचेल होतीच.
काही जण मात्र घरीच मुलांना बळेच विटांचा कसला तरी किल्ला बनवुन देत आणि रात्री त्यात बॉंब लावत. कुंभाराकदे न जाताच काय त्या मातीच्या गोष्टींचे अस्तित्व असते का.. कश्याला पाहिजेत ते असे म्हणत असत ..

कुठलीही कला ही वाईट नसते .. कदाचीत ती आपल्याला चांगली वाटली नाही तरी चालते.. कदाचीत ती चांगली नसेल ही पण त्याची निर्मीती करतानाची जी नशा त्या निर्मात्याने अनुभवलेली असते त्या नशेस सलाम.

पक्या's picture

7 Jan 2011 - 4:51 pm | पक्या

शमस्व नाही रे ' क्षमस्व'

हल्ली खूप जणांना शमस्व लिहीताना पाहिले आहे.
जसे आभार - आभारी तसेच क्षमा - क्षमस्व

चुक लक्षात आलेली आहे..
पुढील वेळे पासुन "क्षमस्व" च.

सुहास..'s picture

7 Jan 2011 - 4:56 pm | सुहास..

काल - परवा चेपुवर भावाशी बोलत असताना, त्याने एक छान वाक्य वापरले , मला भावले म्हणुन येथे देत आहे.

Either you are IN the LIFE, or OUT !!

गवि's picture

7 Jan 2011 - 5:45 pm | गवि

काही पूर्वी सुचलेली (ब्लॉगवर लिहिलेली) वन लायनर्स :

१. खोटं बोलून अडकण्यापेक्षा खरं बोलून अडकलेलं बरं..

२. काम करण्याच्या ताणापेक्षा ते न करण्याचा ताण जास्त असतो..
..कारण बहुतेक वेळेला ते आपण करतोय असं दाखवत रहावं लागतं..

गणेशा's picture

7 Jan 2011 - 5:50 pm | गणेशा

येवुद्या आनखिन

'अखंड दु:ख भोगणार्‍यांना ही दूसर्‍यास दु:ख देवूनच आनंद उपभोगता येतो'

हे वाक्य तसे सहसा कोणाला आवडले नव्हते. तुम्हाला आवडले हे पाहुन छान वाटले.

खरे तर माझी एक मैत्रीण होती (कंपणीत टीम लीडर).. तीचे आयुष्य जराशे दु:खी होते पहिल्यापासुन असे मला वाटायचे (लग्न ठरत नसल्याने, आणि आधी ही) .. बरेच प्रॉब्लेम होते.
तरीही ती कलीग बरोबर मुद्दामुन काहीतरी अपेक्षा करायची कामा संधर्भात आणि मेन काम स्वताला ठेवुन छातुर मातुर काम त्यांना द्यायची.. कधी कधी ती खुपच कुरघोडी करायची म्हनुन हे वाक्य तीच्या मुळे लिहिले होते .

अशी असंख्य माणसे मी पाहिलेली होती.. जे स्वता दु:खी असले तरी दुसर्याला दु:खी करुन कींवा पाहुन त्यांना आनंद मिळत असे..

याला अपवाद ही नक्कीच आहेत म्हनुन त्या अपवादात्मक सर्व दु:खी जनांची माफी. तरीही मला वाटते जे ह्याला अपवाद असतील ते अखंड दु:खी नसतीलच मुळी

असो . शब्दांच्या परिसिमे मध्ये माणसांना कधीच बांधता येत नाही.

शिल्पा ब's picture

7 Jan 2011 - 9:53 pm | शिल्पा ब

अशा लोकांना मराठीत सेडीस्ट म्हणतात.

गणेशा,

अतिशय धन्यवाद, पुन्हा एकदा बपुंची आठवण करुन दिल्याबद्दल.

१. खर्च झाल्याचं दुखः नसतं वाईट वाटतं ते हिशोब लागत नाही म्हणुन.
२. द मोअर यु टॉक पर्सनल द मोअर इट बिकम्स युनिर्व्हसल - ह्याचा अतिशय छान अनुभव आत्ताच घेतो आहे.
३. आपण आपला अर्जुन होउ देउ नये, त्याला भगवान मिळाला, आपल्याला मिळेलच याची खात्री नाही.

हर्षद.

हर्षद व.पुंची काही वाक्ये दिल्याबद्दल धन्यवाद.

त्यांची संग्रहीत वाक्य माझ्याकडे आहेत नक्कीच देयीन नंतर ..

तरीही मला त्यांचे मा सगळ्यात आवडलेले वाक्य देण्याचा मोह होतो आहे.. त्यावरुनच मी माझ्या घराला " पारिजात" हे नाव दिले आहे.

"पारिजातकाचे आयुष्य लाभले तरी चालेल .. पण लयलुट करायची ती फक्त सुगंधाचीच " .. व.पु काळे

तसेच
"कबुतरास गरुडाचे पंख लावता ही येतील , पण गगन भरारीचे वेड रक्तात असावे लागते, आणि ते दत्तक घेता येत नाही " .. व.पु काळे

हे वाक्य ही खुप छान आहे.

असो थांबतो त्यांची वाक्ये लिहायला १ वपुर्झा पण कमी पडले होते ...

दैत्य's picture

7 Jan 2011 - 10:50 pm | दैत्य

व्हेरी हेवी!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Jan 2011 - 4:06 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

हा थ्रेड माझा मिसळपाव वरील पहिलाच थ्रेड होता, आता नविन ओळखी नविन मित्र त्यांच्या साठी पुन्हा येथे देत आहे. (कोणी आधी वाचला असेल तर पुन्हा येथे दिल्यामुळे शमस्व)

जुना धागाच पुनरुज्जीवित केला असतात तरी चाललं असतं. नवीन धाग्याचं श्रीखंड करायचं च्यालेंज निदान विजुभाऊंवर पडलं नसतं.

(आयला, ही तर कविता झाली की! शरदिनीताई, कांपिटीसन हो तुम्हाला आता!!)

अडगळ's picture

8 Jan 2011 - 4:28 am | अडगळ

"नापास झालास तर *डीवर लाथा बसतील "असा एकच वनलायनर आमच्या पिताजींनी आमच्या लहानपणी टाकला होता.त्याहून परिणामकारक वनलायनर अजून वाचनात वा ऐकण्यात आला नाही.

एका चर्माकाराच्या दुकानाच्या पाटीवर ल्हिलेलं होतं
" गतप्राण पादत्राणात त्राण आनण्याचे एकमेव दुकान"

प्रकाश१११'s picture

9 Jan 2011 - 7:53 pm | प्रकाश१११

लादलेली नातीं न मानता मानुसकीच्या नात्यांनी समाजात वावरणे हेच आपण आपल्याशी निभावलेले सर्वस्रेष्ट नातं आहे ..

37. "ज्यांना स्वताचे मत नसते, कींवा ते व्यक्त करता येत नाही, त्या व्यक्तिंस दूसर्‍यास मत विचारण्याचा अधिकार नसतो..."

38. " जेंव्हा माणुस स्वताचा अहम बाजुला ठेवुन सारासार विचार करतो, तेंव्हाच त्याला स्वताचे आणि इतरांचे खरे रुप स्पष्ट दिसते.."

39. "इतिहास हा वर्तमानावर अवलंबुन असतो ना की वर्तमान इतिहासावर"

40. "कलाकार हा त्याच्यावर झालेले वार सहन करु शकतो, परंतु त्याच्या कलेवर झालेले वार त्याच्या ह्रद्याच्या ठिकर्या उडवून जातात.."

गणेशा हे मला वाटते स्वताचे विचार नि शब्द आहेत .तसे असेल तर खूप छान .मस्त .

फुले जेव्हा सुटे सुटे असतात तेव्हा त्याचा आपण सुगंध घेत असतो फुलांचा हार बनवतो तेह्वा त्यात कलाकुसर असते .

मेहनत असते . आणि तो हार अधिक उठून दिसतो . शब्दाची फुले मस्त गुंफली जातात तेह्वा त्याची कविता होते .एकत्र गुंफल्यामुळे

शब्द देखील स्वतंत्र प्रकशित होत राहतो . त्याच्यातून लोलाकामधून सूर्यकिरण सरकले कि रंगाची उधळण करतात तेवढी ताकद त्या शब्दात ,ओळीत ,वाक्यात येत असते .

व.पु. मोठेच होते शब्दाचे जादुगार होते . हे खूप सत्त्य आहे. आपल्याला एखादी कविता समजत नाही ,पण त्यातील शब्द आपल्याला मंत्रमुग्ध करतातच ना ?

कवी ग्रेस ,पु.शी. रेगे , बा.सी. विंदा हे आपल्याला त्यांच्या शब्दात बांधून ठेवतातच ना . ?? छोटी छोटी वाक्ये आपण छान लिहून जातो परंतु ती एकत्र गुंफून त्याचा दागिना करणे ही बाब कठीण असते . ती चपखल बसवावी

लागतात .त्यासाठी मेहनत हवी खूप शुभेच्छा .

ज्ञानराम's picture

10 Jan 2011 - 12:27 pm | ज्ञानराम

सर्वच वन लाइनर्स छान आहेत , अप्रतीम.
धन्यवाद गणेशा..