कसे वर्ष गेले हरवून ...!!!

प्रकाश१११'s picture
प्रकाश१११ in जे न देखे रवी...
4 Jan 2011 - 12:24 pm

वर्ष कसे गेले कळलेच नाही
कसे दिवस जातात पटकन हरवून
किती वर्ष गेली हे तरी कोठे समजले कधी .त्याला .??
जल्लोषात नवीन वर्षाचे स्वागत केले
जुने वर्ष संपताना ते बिचारे हताश होऊन गेले
फटाके कुणासाठी वाजले हे त्याला कळले देखील नाही
हिरमुसले रुसले हलकेच निघून गेले
काय दिले त्याने ?
काय घेतले तुम्ही ??
काय घेतले ठाऊक नाही
काय हिरावून नेले हे फक्त लक्षात राहिले
त्याचा जिवाभावाचा भाऊ गेला
आठवण आली की ,
काळीज फुटून जातेय त्याचे
जगणे फक्त ढकलून दिले जाते
काळोखाच्या समुद्रात विरघळून जावेसे वाटते त्याला
शप्पत ... ..शप्पत ..!!
एक अश्वत्थामाची भळभळनारी जखम झाली आहे
त्याच्या खोल हृदयात
वर्ष संपता संपतां
डोळ्यातून एक थेंब टपकला त्याच्या ….!!
एक ओरखडा काळजात उमटला
सरल्या वर्षाचा एक चरचरता डाग तेवढा मागे राहिला
तुम्ही स्वागत करा नवीन वर्षाचे
तो पण करतोय ........
पण काळ ओरबाडून गेला त्याच्या थेंबभर सुखाला
प्रचंड कल्लोळ
आत खोल गाभार्यात
त्याचे काय करू म्हणतोय तो .......????

करुणकविता

प्रतिक्रिया

जुने वर्ष संपताना ते बिचारे हताश होऊन गेले
फटाके कुणासाठी वाजले हे त्याला कळले देखील नाही
हिरमुसले रुसले हलकेच निघून गेले

हे खुपच आवडले. जाणार्या वर्षाची स्तीथी मस्त मांडलेली आहे..

बाकी शेवट गुढतेकडे वळणारा आहे..

पाषाणभेद's picture

5 Jan 2011 - 2:28 pm | पाषाणभेद

कदाचित त्यांची एखादी आठवण असावी.