लावणी हा एक महाराष्ट्रातील नृत्य प्रकार.खास करून उत्तर पेशवाईत अधीक लोकप्रीयता मिळालेला.
दक्षीनेत नृत्याची जशी मंदीरांसोबत /धार्मीक उत्सवांसोबत सांगड घातली जाते. अरंगेत्रम सारखा समारंभ कुटुंबासमवेत मोठ्या थाटात साजरा केला जातो.
गुजरातेत नवरात्र निमित्त स्त्री पुरुष हे एकत्र नाचतात. त्या उत्सवास धार्मीक रंग आहे.
महाराष्ट्रात कोळी लोक सोडले तर स्त्री पुरुष मिलून एकत्र एखादे नृत्य करतात असे कुठेच दिसत नाही.
मागे कोणीतरी म्हणाले की लावणी हा महाराष्ट्राचा अभिमान वाटावा असा ठेवा आहे.
लावणीचे सौम्दर्य गायन कलेत आहे. शब्द कलेत आहे. जी नृत्यांगना त्यावर विभ्रम करीत नाचते तिच्या अदाकारीत आहे.
लहान असताना मला तमाशा म्हणजे वाईट असे सांगितले जात असे. मराठी चित्रपटातून जी काही इमेज निर्माण केली गेली त्यावरून सुद्धा तमाशा आणि लावणी ही काही कुटुम्बासमवेत एकत्र बसून पहाण्याची गोष्ट आहे असे कधीच वाटले नाही
पिंजरा चित्रपटाने तर तमाशा किंवा लावणी हे माणसाचा र्हास करतात असेच ठसवले आहे.
लग्न झालेली स्त्री वरचा अन्याय दाखवताना नवरा तमाशाला गेला आहे आणी ती त्याची वापहात बसली आहे असेही दाखवतात
लावणी आणि लावणी वर नाच करणार्या नृत्य करणारी स्त्री ही लावणी करीत असते त्या काळात तरी पुरुषाची वासना चाळ्वत दिलखेचक अदाकारीने त्याला घायाळ करीत असते. आणि पुरुश दौलत ज्यादा करीत असतो.
स्त्रीला केवळ भोगवस्तू ठरवणारी लावणी आणि लावणी नर्तीका ही मराठी समाजात कधीच भद्रसमाजात स्थान मिळवू शकली नाही.
समाजाने लावणी वर नाचणार्या कोल्हाटी समाजातील मुलीना नेहमी गावकुसाच्या बाहेरच ठेवले आहे. पुरुश समाजाने त्या मुलीना केवळ वसना शमनाचे यंत्रच मानले आहे. कितीतरी वेळा त्या नृत्यांगनाना वेश्येचा दर्जा देऊन हिणवले सुद्धा आहे.
जेंव्हा आपण म्हणतो की स्त्रीला मान द्यायला हवा आणि त्याच वेळेस स्त्रीला शृंगाराच्या नावाखाली बाजारू स्वरूप देणार्या या कलाप्रकराला प्रोत्साहन देखील देतो.
आपण असा दुटप्पीपणा का करतो.
लावणी आणि तमाशा हे खरेच महाराष्ट्राचा गौरवशाली परंपरेचा भाग आहेत?
लावणी मध्ये किंवा लावणी नृत्यप्रकारात नक्की गौरवशाली काय आहे?
लावणी- लावण्यखणी?
गाभा:
प्रतिक्रिया
21 Dec 2010 - 12:19 am | टारझन
सेम हियर .. गावच्या जत्रेत तमाशा आणि भारुड दोन्ही असायचे. आम्ही घरी भारुडाला जातोय सांगुन तमाशाला जायचो .. पण तेंव्हा तमाशात नाच्या बाया सोडुन त्यातल्या सोंगाड्याची कॉमेडी बघायला जायचो हा भाग अलहिदा.
बहुतेक तमाशांमधे बरेच पार्ट कॉमन असतात. एक तर मावशी असते .. .आणि दुसरं म्हणजे काळु-बाळु जोडी असते .. आणि एकाचा बाप आणि एकाची आई .. ह्यांच्यात जुगलबंदी चाललेली असते :)
बाकी गवळण वगैरे लै बोर आणि फालतु प्रकार वाटायचा. त्यामुळे त्यात गौरवशाली काय असेल असे वाटत नाही ;)
21 Dec 2010 - 12:27 am | प्राजु
कॉलिंग बिरूटे सर..!
बिरूटे सरांनी लावणी वर उपक्रमावर अतिशय सुंदर लेख लिहिला आहे.
त्यांनी त्यातील काही भाग इथे लिहावा ही विनंती.
बाकी.. लावणी ही शृंगारिक झाली ती उत्तर पेशवाईत. त्या आधी लावणी म्हणजेच तमाशा या प्रकारात.. पोवाडे, भारूडं, हे ही प्रकार असत होते. यातून मनोरंजनाशिवाय समाजप्रबोधन सुद्धा करत असत. जसे शाहीर राम जोशींची काही गाणी..
पण उत्तर पेशवाईत लावणी म्हणजे फक्त शृंगारिक आणि बाजारू असा समज पसरला गेला आणि दृढ झाला. कारणे माहिती नाहीत. जाणकार यावर प्रकाश टाकतीलच.
21 Dec 2010 - 1:33 pm | टारझन
वारंवार सांगुन पैषे न भरल्यामुळे तुमची बाह्यगमन षेवा तात्पुरती बंद केलेली आहे.
-मोडाफोन
21 Dec 2010 - 12:58 am | शुचि
लावणी वरील लोकसत्ता मधील हा लेखही वाचण्यासारखा आहे.
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=593...
या लेखातील काही अंश -
>>
लावणी हा काव्यप्रकार आशय आणि रचना या दोन्ही दृष्टींनी खास मराठी परंपरेतून आलेला आहे. स्त्री-पुरुषांच्या शंृगारिक आणि वैराग्यपर भावनांना आणि विचारांच्या अभिव्यक्तीचे लावणी हे एक साधन होते. श्रीमंत पेशवे, त्यांचे सरदार, दरकदार हे फाल्गुन महिन्यातल्या शिमग्याच्या सणात तमासगीर मंडळींना खास आमंत्रण देऊन लावण्या ऐकत. त्यासाठी नेहमीच्या लावण्यांसोबत खास रंगोत्सवासाठीही लावण्या रचल्या जात.
महिलांच्या उपस्थितीत म्हणावयाच्या लावण्या वेगळ्या असायच्या. सर्वसामान्य पुरुषांसाठी अतिशृंगारिक आणि स्त्रियांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात देवतापर लावण्या, वैराग्यपर लावण्या अथवा सात्त्विक शृंगाराच्या लावण्या गायल्या जात असत. उतान शृंगारिक लावण्यांचा श्रोतृवर्ग स्वतंत्र, वेगळा आणि मर्यादित संख्येचा असावा किंवा ज्याप्रमाणे शिमग्याच्या सणात होळी पेटवून अर्वाच्य शिव्या देऊन आपल्या मनातील कुवासनांना वाट काढून दिली जाते. एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या, हेवेदावे मनातून काढून टाकण्याचा हा एक राजमार्ग, त्याप्रमाणे स्त्री-पुरुषांच्या मनातील अनावर कामवासनेला वाट लावण्यांच्या रूपात काढून दिली जात असे. >>
21 Dec 2010 - 10:33 am | विजुभाऊ
देवदासी मुरळी या प्रथा नकोत. पण मग त्या प्रथा या आपल्या संस्कृतीचा कधीतरी भाग होता.
बालविवाह हा देखील आपल्या समाजाचा कधीतरी भाग होता. या प्रथा आपण सोडून दिल्या.
पण मग लावणी आणि लावणी नृत्यासारख्या गोष्टीना सम्स्कृती मानून त्यांचे उद्दातीकरण का करायचे.
स्त्रीला केवळ भोगवस्तु मानायला लावणारी प्रथा त्याज्य ठरवणे योग्य नाही का?
( कृपया यात स्त्री हा शब्द स्त्रीयाना सिंगल आउट करणाचा प्रकार मानू नये. त्या अर्थाने पुरुषाना बोर्डावर नाचवायला लावून फेटे ( पदर/ओढण्या) उडवणार्या स्त्रीयांचा उदय अजून व्हायचा आहे )
21 Dec 2010 - 12:48 pm | राजेश घासकडवी
मला वाटतं वाईन जशी जुनी झाल्यावर अधिक चांगली लागते तसं समाजाच्या काही प्रथांचं आहे. एके काळी जे अनिष्ट समजलं जायचं त्यातलं काही टाकलं जातं, काही शुगरकोट करून गोड मानलं जातं. जुनं ते सोनं असं म्हणण्याची पद्धत असते. तमाशात नाचणारणींविरुद्ध जी तक्रार व्हायची ती आता बारबाला वगैरेंबद्दल होती. दोन तीन शतकांनी बारबालांना तसं मानाचं स्थान मिळेल कदाचित.
21 Dec 2010 - 1:31 pm | विजुभाऊ
दोन तीन शतकांनी बारबालांना तसं मानाचं स्थान मिळेल कदाचित.
अरेबापरे.... महाराष्ट्राची थोर परंपरा......
त्यावेळचे गृहमन्त्री मग बहुतेक बारबाला महोत्सव सुरू करतील आणि त्यासाठी चौफुला वगैरे तीर्थ स्थळे असतील.
घासकडबीजीसाहेब श्री......
धाग्याचा खफ करण्यापेक्षा तुमचे विचार मांडावेत अशी अपेक्षा आहे.
कुठेतरी सीरीयस होऊन प्रतिसाद द्यावे ही विनन्ती.
22 Dec 2010 - 12:27 am | अविनाश कदम
श्रीमंत व सरंजामदार लोकांच्या मनोरंजनासाठी आणि सुखचैनीसाठी कनिष्ठ जातीतल्या लोकांना वापरण्याच्या पद्धतीला गौरवशाली परंपरा म्हणत आज अमेरीकेतल्या भद्र समाजातील भारतीयांच्या मुलीही लावणीनृत्यात पारंगत होत आहेत. त्यांचं काय करायचं ?