पायर्‍यांची विहीर

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
6 Dec 2010 - 11:43 am

विहीरीला पायर्‍या असतात.
मी लहानपणी पाहिलेली विहीर म्हणजे काळ्यारामाच्या देवळातली.
तीला पायर्‍या होत्या .त्याना पायर्‍या का म्हनायचे हा प्रश्नच होता. भिन्तीतून पुढे आलेल्या दगडाच्या टोकाला पायरी म्हणायचे. त्यातून तोल साम्भाळत आम्ही विहीरीत पडलेला चेंडु घ्यायला जायचो. आणि बहुतेक वेळेस ट्रस्टीकाकांच्या शिव्या खायचो.
काल इथे अहमदाबादपासून पासून १८ किमी वर असलेल्या अडालज गावात असलेली हीपायर्‍यांची विहीर बघायला गेलो. आणि एक भूलोकीचा चमत्कार पहातोय असेच वाटले.
इस १४९९ मध्ये कोण्या रुडाबाईने दुश्काळी काम म्हणून बाम्धून घेतलेल्या या विहीरी चे बांधकाम एक चमत्कारच आहे.
गेली पाचशे वर्षे हा चमत्कार इथल्या लोकानी साम्भाळून ठेवलेला आहे.
गुजरातमध्ये दुश्काळ पडलेला होता. जनतेला रोजगार मिळावा म्हणून वीरसिंह वाघेला राजाच्या राणीने ही विहीर बांधवून घेतली. थोडिशी जैन शैलीची थोडीशी हडप्पन शैलीची ही विहीर.
पाच मजले असलेली विहीर असे म्हम्तले तर आपल्या डोळ्यासमोर काहीच उभे रहात नाही.
त्या जागेवर जाईपर्यन्त काहीच कळत नाही. बाहेर लावलेला बोर्ड पाहूनही काही खुलासा होत नाही.
adalaj waw 1
आपण एका देखण्या प्रवेशद्वारातून पायर्‍या उतरायला लागतो
2
पुढे येणारे दृष्य काय असेल याची अजूनही कल्पना येत नाही

3
आणि शब्द सापडणार नाहीत असे एक भव्य शिल्प दिसायला लागते

4
पाच मजले जमिनीखाली असलेले हे बाम्धकाम म्हणजे कल्पनेचा एक सुंदर खेळ आहे.
भर उन्हातून जाणार्‍या वाटसरुना साधू सन्यासाना घटकाभर विसावा घेता येईल ताजे तवाने होता येईल या उद्देशाने रुडाबाईने ही विहीर बांधली
इथे बाम्धकामुळे उन सावलीचा एक मजेशीर खेळ सुरू होतो.
आणि त्यामुळे जमिनीखाली पाच मजले असूनही हवा आणि उजेड खेळते रहातात
5
स्ट्रक्चरल सौंदर्य म्हनजे काय याची अनुभूती घेत आपण खाली उतरत रहातो
6

भिंतीवरील नक्षी ,आणि भुमिती ची मजा एकाच वेळेस घेता येते

7
आणि मग बांधकामा मधले एक एक चमत्कार बघायला मिळतात.
8
त्याकाळच्या इंजिनीयरिम्गची कमाल. स्प्रिंगप्रमाणे गोलाकार स्पायरल वळणे घेत खाली उतरणारा हा दगडी जिना. एकावर एक रचलेल्या दगडांची टोके एकमेकात फसवून चुना न वापरता केलेले हे बांधकाम अती अद्भुत आहे.
9
वावाटसरूला स्वच्छा पाणी मिळावे म्हणून रचलेली ही विहीर
10
इथून लवकर पाय निघत नाही.
11
या विहीरीत हजारभ सैन्य सहज सामावू शकायचे.
या वविहीरीचे बांधकाम वीस वर्षे चालले होते. कडक उन्हाळ्यातही विहीर आटत नाही.
एका दंतकथे नुसार सुलतान बाघेराने राजा वीरसिंह वाघेलाचापराभव केला आणि रुडाबाईसमोर लग्नाचा प्रस्ताव मांडला
रुडाबाईने विहीरीचे बांधकाम पूर्ण करू दे . ते झाल्यावर लग्न करेन असे वचन दिले.
सुलताना ने जेंव्हा जबरदस्ती करायचा प्रयत्न केला तेंव्हा रुडाबाईने ( रुडा या जुन्या गुजराथी शब्दाचा अर्थ " चांगली") त्या विहीरीत जीव देऊन आपली आयूष्ययात्रा संपवली.
सुलतानाने चिडून विहीर बांधणार्‍या कारागीरांचा वध केला.

संस्कृतीअनुभव

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

6 Dec 2010 - 9:21 pm | यशोधरा

फोटो दिसत नाहीयेत. घरुन पाहते.

पाहिले फोटो, सह्ही आहेत अगदी.. मस्त, मस्त

पियुशा's picture

6 Dec 2010 - 11:47 am | पियुशा

मस्त मस्त मस्त च !

sneharani's picture

6 Dec 2010 - 11:55 am | sneharani

मस्तच.
एवढी मोठी विहीर तिही अशा चांगल्या बांधकामात पहिल्यांदाच पाहतेय.
मस्त फोटो.

llपुण्याचे पेशवेll's picture

6 Dec 2010 - 11:57 am | llपुण्याचे पेशवेll

अशाप्रकारची विहीर किंवा बाव कराडमधे आहे. इतकी आखीव रेखीव नसली तरी ४ मजली आणि कमानी वगैरे चांगली असलेली बाव मी पाहीली आहे.
विजुभाऊंनी दाखवलेली बाव फारच सुंदर कोरीवकाम वगैरे केलेली दिसत आहे. छान आहे.

चिंतामणी's picture

8 Dec 2010 - 12:57 am | चिंतामणी

अशाप्रकारची विहीर किंवा बाव कराडमधे आहे. इतकी आखीव रेखीव नसली तरी ४ मजली आणि कमानी वगैरे चांगली असलेली बाव मी पाहीली आहे.

पुणे कोल्हापुर (प्रसंगी बेळगाव) पर्यन्त प्रवास वारंवार होतो.

जरा सवीस्त माहिती द्याल का?

वेळ काढुन नक्कीच जाईन बघायला.

शिल्पा ब's picture

6 Dec 2010 - 12:01 pm | शिल्पा ब

उत्तम, कुठेही तोडफोड नसलेली जुनी विहीर...
शब्द नाहीत सांगायला...छानच..आणि अजूनही पाणी आहे हे विशेष.

ramjya's picture

6 Dec 2010 - 12:05 pm | ramjya

खरच मस्त आहे ही विहिर....

बीड शहरापासुन ८ कि.मी. वर अशीच एक ऐतेहासिक विहिर आहे( खजाना-बावडी)....

शिल्पा ब's picture

6 Dec 2010 - 12:09 pm | शिल्पा ब

फोटो असतिल तर टाका इथे. नावावरुन मारवाडी वगैरे पद्धतीची किंवा कोणा मारवाडयाने बांधलेली असावी असं वाटतंय.

नंदन's picture

6 Dec 2010 - 12:15 pm | नंदन

छान ओळख. विहीर बांधताना इतकं सुरेख बांधकाम करायला वाव (श्लेष अभिप्रेत :)) मिळत असेल असं वाटलंही नव्हतं.

विजुभाऊ's picture

6 Dec 2010 - 12:31 pm | विजुभाऊ

फोटो कशाचे आणि कित्ती काढू असे झाले होते
12
विशेष म्हणजे हे बांधकाम इतके सुरेख आहे.
इथे खडूने लिहीलेली नावे नाहीत. गुटखा वगैरेची पाउचेस नाहीत. तंबाखू पानाच्या पिचकार्‍या नाहीत.
इथली स्वच्छता वाखाणण्यासारखी आहे
13
उनसावली चा खेळ पहाताना पाय निघत नाही

14
आणि बदामी रंगाच्या दगडावरील कोरीव काम दिलो जानसे केलेले आहे
15

शिल्पा ब's picture

6 Dec 2010 - 12:54 pm | शिल्पा ब

फोटो आवडले.

विशेष म्हणजे हे बांधकाम इतके सुरेख आहे.
इथे खडूने लिहीलेली नावे नाहीत. गुटखा वगैरेची पाउचेस नाहीत. तंबाखू पानाच्या पिचकार्‍या नाहीत.
इथली स्वच्छता वाखाणण्यासारखी आहे

ह्या बद्दल थोडी माहिती वाचली होतीआधी.पण ही माहिती जास्त आवडली.

वरच्या ओळी मनाला स्पर्श करून गेल्या.

विजुभाऊ, विहीरीचे फोटो आणि इतिहास दोन्ही छान.

टारझन's picture

6 Dec 2010 - 1:20 pm | टारझन

एक णंबरी !! एकदम णविण माहिती.
क्यामेरा कॉलिटी सुमार असल्याने तिथे जाऊन आल्या सारखे वाटता वाटता राहिले.

अवांतर :- विजुभाऊ ... क्यामेरा अपग्रेड करा आता ...

अवलिया's picture

6 Dec 2010 - 1:39 pm | अवलिया

वा! त्या विहीरीतले भुत पण मस्त.. तुमच्यासारखेच दिसत आहे थोडे थोडे !

सर्वसाक्षी's picture

6 Dec 2010 - 2:41 pm | सर्वसाक्षी

विजुभाऊ

झकास आहे विहीर. जमिनीखाली पाच मजली विहीर असेल असे सांगुन खरे वाटणार नाही.

एकुण पसारा मोठा असावा त्यामुळे आकाराचा नक्की अंदाज येत नाही. चित्रमालिका पाहता देव्ळाच्या पायर्‍या चढतो त्या ऐवजी उतरुन जायचे व पुढे सलग खोल उअतरत जाणारे मजले असावेत असे वाटते. मग केंद्रभागी विहीर आणि भवताली परिघालगत पसरत गेलेली वास्तु असे स्वरुप आहे का?

वाचुन उत्सुकता निर्माण झाली. अहमदाबादपासून १८ किमी म्हणजे अहमदाबादला गेले असता सहज जाण्यासारखे आहे

साक्षी

परिकथेतील राजकुमार's picture

6 Dec 2010 - 2:51 pm | परिकथेतील राजकुमार

विहीरायण एकदम मस्त हो विजुभौ. फोटु पण छानच आहेत.

शेवटचा फोटु विहीर बांधणार्‍या इंजिनरचा आहे काय ?

शेवटचा फोटु विहीर बांधणार्‍या इंजिनरचा आहे काय ?

=)) =)) =))
तो फोटो आहे होय ? मला वाटलं फोटोफ्रेम आहे :)

विहीरायण एकदम मस्त हो विजुभौ. फोटु पण छानच आहेत.

शेवटचा फोटु विहीर बांधणार्‍या इंजिनरचा आहे काय ?

पराची प्रतिक्रीया positive घेउन एकच सांगतो

मगाशी एक वाक्य राहीले.

त्याच्या निर्मात्याला (इंजिनीर/आर्किटेक्ट) सलाम.

(पराच्या प्रतिक्रीय विषयी चर्चा नंतर करू. पण त्याच्या पोस्टमुळे एक राहीलेला मुद्दा आठवला हे नक्कीच.)

कुंदन's picture

6 Dec 2010 - 3:03 pm | कुंदन

छान लिहिलय विजुभौ....

अवाण्तर : हल्ली विग वापरणे बंद केलेत की काय?

विजुभाऊ's picture

6 Dec 2010 - 3:16 pm | विजुभाऊ

अरे बाबा ती फोटोफ्रेम नाहिय्ये.
ती त्या विहीरीच्या अ‍ॅडमिन्स्ट्रीट्रेटरची जागा आहे. जातानाच्या मार्गावर प्रवेशद्वारातच दोन्ही बाजूना दोन मस्त ऐसपैस केबीन्स आहेत.

अवलिया's picture

6 Dec 2010 - 3:18 pm | अवलिया

अच्छा ! म्हणजे तुम्ही विहीरीचे अ‍ॅडमिन आहात तर..

हां! मागे सांगितले होते तुम्ही आता गुजरातेत अ‍ॅडमिन म्हणुन जात आहे.. समजलं

परिकथेतील राजकुमार's picture

6 Dec 2010 - 3:26 pm | परिकथेतील राजकुमार

अच्छा ! म्हणजे तुम्ही विहीरीचे अ‍ॅडमिन आहात तर..

छुपे का छुपे ?

नाही विजुभौ अ‍ॅडमीन असतील तर विहीरीवरच्या शिलालेखांचे स्क्रिनशॉट घेउन ठेवलेले बरे.

रामदास's picture

7 Dec 2010 - 11:48 am | रामदास

विजूभाऊ विहीरनारायण झाले.

नगरीनिरंजन's picture

6 Dec 2010 - 3:20 pm | नगरीनिरंजन

मस्तच विहीर आहे. नाव काय आहे विहीरीचे? पहेली चित्रपटातही एक अशीच विहीर दाखवली आहे ती आणि ही वेगवेगळ्या आहेत वाटते.

विजुभाऊ's picture

6 Dec 2010 - 3:28 pm | विजुभाऊ

सुरुवातीलाच लिहिले आहे नाव.
याला अडालज नी वाव किंवा रुडाबाईनी वाव असे म्हणतात
सुरभी कार्यक्रमात एकदा याचे दा चित्रीकरण दाखवले होते

स्पंदना's picture

6 Dec 2010 - 3:35 pm | स्पंदना

अप्रतिम विजुभाउ!

काय फोटो आहेत! एक सुफी गुरु त्याच्या शिष्यांना घेउन अश्या एका विहिरीच्या ओवर्‍या ओवर्‍यात बसुन रियाझ करायचे. अन ते करत असलेल्या रियाझाचे साद पडसाद घुमत घुमत एक मेकात मिसळायचे अस वर्णन कुठेतरी वाचल्याच आठवत. तेंव्हा फक्त कल्पना केली होती अश्या विहिरीची , आज तुमच्या मुळे ती कल्पना प्रत्यक्षात डोळ्यासमोर उतरल्या सारख वाटल.

डावखुरा's picture

6 Dec 2010 - 4:09 pm | डावखुरा

मस्त विहिर ...मस्त वर्णन..
अवलिया (पणा केलाच)
अपर्णा ताई सुफींची गोष्ट मस्तच...

आश्चर्याची गोष्ट म्हणजे या विहीरीत एकोज / आवाज घुमणे वगैरे अजिबात होत नव्हते.

शक्य आहे. कारण तुम्ही वर्णन करताना अगदी खाली पर्यंत हवा अन उजेड पोहोचु शकतो अस म्हंटलय. एको साठी आवाज कुठेतरी धडकुन परत फिरावा लागतो नाही का? आणखी असतील तर टाका फोटोज. अप्रतिम शिल्प आहे.

चांगभलं's picture

6 Dec 2010 - 5:10 pm | चांगभलं

फारच सुंदर....
कॅमेरा अजून चांगला हवा होता

स्वाती२'s picture

6 Dec 2010 - 6:10 pm | स्वाती२

अप्रतिम!

एका अनोख्या ठिकाणाची ओळख करुन बद्धल धन्स... :)

या ठिकाणा बद्धलचा हा इडियो पाहण्या सारखा आहे...:)

विजुभाऊ's picture

7 Dec 2010 - 10:16 am | विजुभाऊ

धन्यवाद रे बाण्या.
गुजरात सरकार ने हे ऐतिहासीक स्थळ ज्या पद्धतीने जपलय तसे आपण शनिवार वाडा जाऊदे छअत्रपतींचा एकसुद्धा किल्ला तितक्या चांगल्यापद्धतीने जपलेला नाहिय्ये.

llपुण्याचे पेशवेll's picture

9 Dec 2010 - 4:01 pm | llपुण्याचे पेशवेll

गुजरात सरकार ने हे ऐतिहासीक स्थळ ज्या पद्धतीने जपलय तसे आपण शनिवार वाडा जाऊदे छअत्रपतींचा एकसुद्धा किल्ला तितक्या चांगल्यापद्धतीने जपलेला नाहिय्ये.

नरेंद्र मोदी जिंदाबाद. नरेंद्र मोदी जिंदाबाद. नरेंद्र मोदी जिंदाबाद. नरेंद्र मोदी जिंदाबाद. नरेंद्र मोदी जिंदाबाद. नरेंद्र मोदी जिंदाबाद. नरेंद्र मोदी जिंदाबाद. नरेंद्र मोदी जिंदाबाद. नरेंद्र मोदी जिंदाबाद. नरेंद्र मोदी जिंदाबाद.
नाही का हो विजुभाऊ?

प्राजु's picture

6 Dec 2010 - 9:16 pm | प्राजु

झक्कास!! खूप छान आहे.

डावखुरा's picture

6 Dec 2010 - 10:17 pm | डावखुरा

मदनबाण व्हिडिओ मस्तच....

सुनील's picture

7 Dec 2010 - 12:08 am | सुनील

अजब! छान माहिती.

पिवळा डांबिस's picture

7 Dec 2010 - 1:22 am | पिवळा डांबिस

विहिर व स्थापत्य अप्रतिमच आहे!
हे स्थळ नॅशनल हेरिटेज म्हणून जपायला हवं!!!

एक शंका: खाली उतरून विहिरीचं पाणी पिऊन पुन्हा पाच मजले वर चढून यायचं तर पुन्हा तहान लागणार! मग काय, बोंबलायचं?
:)
-प्यासा डांबिस

रामदास's picture

7 Dec 2010 - 11:53 am | रामदास

तिथे विहीरीजवळ बैठक जमवायची.पाणी हाताशीच आहे. येताना रीकाम्या बाटलीत पाणी घ्यायचे .मग वर यायचे.पुन्हा एक बैठक .मग पाणी भरायला परत खाली उतरायचे.....

पुष्करिणी's picture

7 Dec 2010 - 1:36 am | पुष्करिणी

सुंदर!

पाच मजले जमिनीखाली, अजिबात कल्पना येत नाही..

पुष्करिणी's picture

7 Dec 2010 - 1:36 am | पुष्करिणी

सुंदर!

पाच मजले जमिनीखाली, अजिबात कल्पना येत नाही..

छान.
माझ्या माहेरी विहीर आहे त्याला आत जाण्यसाठी पायर्‍या म्हणजे जिनाच आहे. तिन जिने आहेत दोन पुर्ण आणि एक अर्धा. अर्धा जिना संपुन भोगदा लागतो. उन्हाळ्यात त्या भोगद्यात बसुन मी अभ्यास करायचे. कारण तेंव्हा पाण्याची पातळी भोगद्याच्या खाली जायची. पावसाळ्यात मात्र जिने भरुन जायचे.

सुलतानांच्या काळात हे बांधकाम झाले म्हणुन याला इस्लामी स्थापत्य शैली असे म्हणता येईल काय?

अमोल केळकर's picture

7 Dec 2010 - 12:51 pm | अमोल केळकर

खुप छान. (पन्हाळ गडावर पण अशी पायर्‍या असलेली विहिर आहे बहुतेक. एवढी मोठी नाही )

फोटो मस्तच

अमोल केळकर

कुठे आहे????

जरा संदर्भ देणार का?

llपुण्याचे पेशवेll's picture

9 Dec 2010 - 4:06 pm | llपुण्याचे पेशवेll

माझ्या माहीतीनुसार पन्हाळ्यावरची विहीर ही खरेतर फसवा दरवाजा आहे. म्हणजे पायर्‍या वगैरे आहेत असे वाटून तिथं पुढं दरवाजा आहे असे वाटून सैनिक पुढे गेले तर त्या अंधार्‍या दरवाजातून आतमधे डायरेक्ट पाण्यात पडून मरत. मग तिथे दुसरीकडेच कुठेतरी खरा दरवाजा आहे किल्ल्याचा.

शहराजाद's picture

11 Dec 2010 - 2:28 am | शहराजाद

रानी बावडी (पहेली चित्रपटात दिसलेली) बद्दल ऐकून होते. ही नवी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद विजुभौ. जमले तर बघायला अतिशय आवडेल.

विजुभाऊ's picture

17 Oct 2013 - 11:40 pm | विजुभाऊ

अहमदाबादचा एक धागा आला त्यावरून हे आठवले

निव्वळ अप्रतिम. शब्द नाहीत. चेपुवर गुजरातेतल्या एका मशिदीचे फटूही पाहिले होते, तेदेखील असेच कोरीव कामाने गच्च्च्च्च्च भरलेले. डोळे ठरेनात. गुजरातेत असले गच्च्च भरलेले शिल्पकाम लै जास्त असते असे दिसते. जायला लागतं एकदा तिकडे.

राही's picture

18 Oct 2013 - 1:33 pm | राही

गुजरात-राजस्थानमधले कोरीव काम खरोखर अप्रतिम असते. अहमदाबादजवळच सिद्दी सय्यद मशीद नावाची एक मशीद आहे. त्यातल्या कमानी सुंदर जाळीकामाने नटलेल्या आहेत. भिंती जवळजवळ नाहीतच. सर्वत्र नक्षीदार कमानी. नजर ठरत नाही. जयपुरचा हवामहलही तसाच. राणकपूर आणि दिलवाडा (अबू) येथील जैन मंदिरे तर जगप्रसिद्धच आहेत. राणकपूरचे कोरीवकाम दिलवाड्यापेक्षा थोडे हलक्या प्रतीचे असले तरी निसर्गरम्यतेमुळे अधिक सौंदर्यपूर्ण वाटते. ही दोन्ही स्थापत्ये संगमरवर ह्या मऊ दगडातली असल्यामुळे कदाचित इतके बारीक काम होऊ शकले असावे. सिद्दी सय्यद मशिदीत संगमरवर नाही पण स्थानिक लाल पत्थरातही सुंदर कलाकुसर घडवली आहे. सोन्याचांदीवर फिलिग्रीवर्क होऊ शकते पण हे दगडातले जाळीकाम खरोखर अद्भुत आहे. आपल्याकडे एक एरूळ सोडले तर इतके बारीक आणि नाजुक काम कुठे दिसत नाही. एकाच पत्थरात खोदल्यामुळे वेरूळचा आकृतीबंध आणि निर्मिती आश्चर्यकारक आहे हे खरे पण बारीकी आणि नज़ाकत यामध्ये ही शिल्पे बाजी मारतात असे वाटते. कान्हेरीसारखी लेणी तर अगदी 'स्पार्टन' आहेत. अर्थात प्रत्त्येक स्थापत्य हे त्याच्या अंतिम उपयोगाच्या दृष्टीने बांधले जाते हेही खरेच.
आपल्याकडे

आशु जोग's picture

18 Oct 2013 - 1:21 am | आशु जोग

काही जणांच्या मते ही विहीरीपेक्षा पाण्यात पडलेले देवळाचे उलटे प्रतिबिंब आहे,
खरे आहे का ते !

"दगडांची टोके एकमेकात फसवून चुना न वापरता "
वाचता वाचता हा शब्दप्रयोग खड्यासारखा येऊन बोचला... रसभंग होईल इतका.
असो...

राही's picture

18 Oct 2013 - 12:49 pm | राही

मुळात फसणे म्हणजे गुंतवणे, अडकवणे, गुंगवणे. सावज जाळ्यात फसते म्हणजे अडकते, गुंतते. 'हंसलें ग बाई हंसलें अन कायमची मी फसलें' असे एक जुने भावगीत होते. हिंदीमध्ये हाच अर्थ आहे, मराठीत मात्र थोडासा बदललाय; फसवणे म्हणजे गंडा घालणे, गंडवणे, खोटी माहिती देउन फायदा उकळणे, (लफड्यात) अडकवणे असा झालाय.

रामपुरी's picture

18 Oct 2013 - 11:18 pm | रामपुरी

इथे ज्या अर्थाने तो शब्द वापरला आहे तो मराठीत तरी त्या अर्थाने वापरत नाहीत. शेवटी हिंदाळालेलं मराठी हेच आजकालचं मराठी झालेलं असल्याने हल्ली आश्चर्य जरी वाटत नसलं तरी प्रत्येक वेळी असे शब्दप्रयोग खटकतातच.
"अमुकअमुक माणूस उद्वाहनात फसला" इत्यादी आणि अशाच प्रकारचे इतर शब्दप्रयोग नित्याचे झाले आहेत.

चौकटराजा's picture

18 Oct 2013 - 7:20 am | चौकटराजा

ही रानी की वाव आहे का विजूभौ ?. मग पाटणला आहे ते काय ? ती तर मेहसाण्याच्या जवळ आहे ना ?

सुमीत भातखंडे's picture

18 Oct 2013 - 10:12 am | सुमीत भातखंडे

दिसत नाहीत इथनं. घरी बघेन

मला वाटतं "डार्क नाईट रायजेस" मधे काही दृश्यांचं चित्रिकरण "चांद बावडी - राजस्थान" येथे झालं होतं

विजुभाऊ's picture

18 Oct 2013 - 12:17 pm | विजुभाऊ

ही रानी की वाव नाहिय्ये.
ही आहे "रुडाबाईनी वाव" अहमदाबाद जवळ अडलज नावाच्या खेड्यात आहे. रुडाबाई ने ही बांधली म्हणुन तीचे नाव. अमिताभ बच्चन गुजरात टुरीजम ची जहिरात करतो त्यात ही दिसते.

चौथा कोनाडा's picture

11 Feb 2022 - 12:24 pm | चौथा कोनाडा

छानच !