✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पायर्‍यांची विहीर

व
विजुभाऊ यांनी
Mon, 12/06/2010 - 11:43  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
35801 वाचन

💬 प्रतिसाद (59)

प्रतिक्रिया

फोटो दिसत नाहीयेत. घरुन

यशोधरा
Mon, 12/06/2010 - 21:21 नवीन
फोटो दिसत नाहीयेत. घरुन पाहते. पाहिले फोटो, सह्ही आहेत अगदी.. मस्त, मस्त
  • Log in or register to post comments

मस्त मस्त मस्त च !

पियुशा
Mon, 12/06/2010 - 11:47 नवीन
मस्त मस्त मस्त च !
  • Log in or register to post comments

मस्त

sneharani
Mon, 12/06/2010 - 11:55 नवीन
मस्तच. एवढी मोठी विहीर तिही अशा चांगल्या बांधकामात पहिल्यांदाच पाहतेय. मस्त फोटो.
  • Log in or register to post comments

अशाप्रकारची विहीर किंवा बाव

llपुण्याचे पेशवेll
Mon, 12/06/2010 - 11:57 नवीन
अशाप्रकारची विहीर किंवा बाव कराडमधे आहे. इतकी आखीव रेखीव नसली तरी ४ मजली आणि कमानी वगैरे चांगली असलेली बाव मी पाहीली आहे. विजुभाऊंनी दाखवलेली बाव फारच सुंदर कोरीवकाम वगैरे केलेली दिसत आहे. छान आहे.
  • Log in or register to post comments

जरा सवीस्त माहिती द्याल का?

चिंतामणी
Wed, 12/08/2010 - 00:57 नवीन
अशाप्रकारची विहीर किंवा बाव कराडमधे आहे. इतकी आखीव रेखीव नसली तरी ४ मजली आणि कमानी वगैरे चांगली असलेली बाव मी पाहीली आहे. पुणे कोल्हापुर (प्रसंगी बेळगाव) पर्यन्त प्रवास वारंवार होतो. जरा सवीस्त माहिती द्याल का? वेळ काढुन नक्कीच जाईन बघायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

उत्तम, कुठेही तोडफोड नसलेली

शिल्पा ब
Mon, 12/06/2010 - 12:01 नवीन
उत्तम, कुठेही तोडफोड नसलेली जुनी विहीर... शब्द नाहीत सांगायला...छानच..आणि अजूनही पाणी आहे हे विशेष.
  • Log in or register to post comments

मस्त आहे..

ramjya
Mon, 12/06/2010 - 12:05 नवीन
खरच मस्त आहे ही विहिर.... बीड शहरापासुन ८ कि.मी. वर अशीच एक ऐतेहासिक विहिर आहे( खजाना-बावडी)....
  • Log in or register to post comments

फोटो असतिल तर टाका इथे.

शिल्पा ब
Mon, 12/06/2010 - 12:09 नवीन
फोटो असतिल तर टाका इथे. नावावरुन मारवाडी वगैरे पद्धतीची किंवा कोणा मारवाडयाने बांधलेली असावी असं वाटतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ramjya

मस्त

नंदन
Mon, 12/06/2010 - 12:15 नवीन
छान ओळख. विहीर बांधताना इतकं सुरेख बांधकाम करायला वाव (श्लेष अभिप्रेत :)) मिळत असेल असं वाटलंही नव्हतं.
  • Log in or register to post comments

फोटो कशाचे आणि कित्ती काढू

विजुभाऊ
Mon, 12/06/2010 - 12:31 नवीन
फोटो कशाचे आणि कित्ती काढू असे झाले होते Image removed. विशेष म्हणजे हे बांधकाम इतके सुरेख आहे. इथे खडूने लिहीलेली नावे नाहीत. गुटखा वगैरेची पाउचेस नाहीत. तंबाखू पानाच्या पिचकार्‍या नाहीत. इथली स्वच्छता वाखाणण्यासारखी आहे Image removed. उनसावली चा खेळ पहाताना पाय निघत नाही Image removed. आणि बदामी रंगाच्या दगडावरील कोरीव काम दिलो जानसे केलेले आहे Image removed.
  • Log in or register to post comments

फोटो आवडले.

शिल्पा ब
Mon, 12/06/2010 - 12:54 नवीन
फोटो आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

ह्या बद्दल थोडी माहिती वाचली होती.

चिंतामणी
Wed, 12/08/2010 - 01:00 नवीन
विशेष म्हणजे हे बांधकाम इतके सुरेख आहे. इथे खडूने लिहीलेली नावे नाहीत. गुटखा वगैरेची पाउचेस नाहीत. तंबाखू पानाच्या पिचकार्‍या नाहीत. इथली स्वच्छता वाखाणण्यासारखी आहे ह्या बद्दल थोडी माहिती वाचली होतीआधी.पण ही माहिती जास्त आवडली. वरच्या ओळी मनाला स्पर्श करून गेल्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

विजुभाऊ, विहीरीचे फोटो आणि

गणपा
Mon, 12/06/2010 - 13:03 नवीन
विजुभाऊ, विहीरीचे फोटो आणि इतिहास दोन्ही छान.
  • Log in or register to post comments

एक णंबरी !! एकदम णविण

टारझन
Mon, 12/06/2010 - 13:20 नवीन
एक णंबरी !! एकदम णविण माहिती. क्यामेरा कॉलिटी सुमार असल्याने तिथे जाऊन आल्या सारखे वाटता वाटता राहिले. अवांतर :- विजुभाऊ ... क्यामेरा अपग्रेड करा आता ...
  • Log in or register to post comments

वा! त्या विहीरीतले भुत पण

अवलिया
Mon, 12/06/2010 - 13:39 नवीन
वा! त्या विहीरीतले भुत पण मस्त.. तुमच्यासारखेच दिसत आहे थोडे थोडे !
  • Log in or register to post comments

झकास

सर्वसाक्षी
Mon, 12/06/2010 - 14:41 नवीन
विजुभाऊ झकास आहे विहीर. जमिनीखाली पाच मजली विहीर असेल असे सांगुन खरे वाटणार नाही. एकुण पसारा मोठा असावा त्यामुळे आकाराचा नक्की अंदाज येत नाही. चित्रमालिका पाहता देव्ळाच्या पायर्‍या चढतो त्या ऐवजी उतरुन जायचे व पुढे सलग खोल उअतरत जाणारे मजले असावेत असे वाटते. मग केंद्रभागी विहीर आणि भवताली परिघालगत पसरत गेलेली वास्तु असे स्वरुप आहे का? वाचुन उत्सुकता निर्माण झाली. अहमदाबादपासून १८ किमी म्हणजे अहमदाबादला गेले असता सहज जाण्यासारखे आहे साक्षी
  • Log in or register to post comments

विहीरायण एकदम मस्त हो विजुभौ.

परिकथेतील राजकुमार
Mon, 12/06/2010 - 14:51 नवीन
विहीरायण एकदम मस्त हो विजुभौ. फोटु पण छानच आहेत. शेवटचा फोटु विहीर बांधणार्‍या इंजिनरचा आहे काय ?
  • Log in or register to post comments

शेवटचा फोटु विहीर बांधणार्‍या

टारझन
Mon, 12/06/2010 - 14:55 नवीन
शेवटचा फोटु विहीर बांधणार्‍या इंजिनरचा आहे काय ?
=)) =)) =)) तो फोटो आहे होय ? मला वाटलं फोटोफ्रेम आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

त्याच्या निर्मात्याला (इंजिनीर/आर्किटेक्ट) सलाम.

चिंतामणी
Wed, 12/08/2010 - 01:05 नवीन
विहीरायण एकदम मस्त हो विजुभौ. फोटु पण छानच आहेत. शेवटचा फोटु विहीर बांधणार्‍या इंजिनरचा आहे काय ? पराची प्रतिक्रीया positive घेउन एकच सांगतो मगाशी एक वाक्य राहीले. त्याच्या निर्मात्याला (इंजिनीर/आर्किटेक्ट) सलाम. (पराच्या प्रतिक्रीय विषयी चर्चा नंतर करू. पण त्याच्या पोस्टमुळे एक राहीलेला मुद्दा आठवला हे नक्कीच.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

छान लिहिलय

कुंदन
Mon, 12/06/2010 - 15:03 नवीन
छान लिहिलय विजुभौ.... अवाण्तर : हल्ली विग वापरणे बंद केलेत की काय?
  • Log in or register to post comments

अरे बाबा ती फोटोफ्रेम

विजुभाऊ
Mon, 12/06/2010 - 15:16 नवीन
अरे बाबा ती फोटोफ्रेम नाहिय्ये. ती त्या विहीरीच्या अ‍ॅडमिन्स्ट्रीट्रेटरची जागा आहे. जातानाच्या मार्गावर प्रवेशद्वारातच दोन्ही बाजूना दोन मस्त ऐसपैस केबीन्स आहेत.
  • Log in or register to post comments

अच्छा ! म्हणजे तुम्ही

अवलिया
Mon, 12/06/2010 - 15:18 नवीन
अच्छा ! म्हणजे तुम्ही विहीरीचे अ‍ॅडमिन आहात तर.. हां! मागे सांगितले होते तुम्ही आता गुजरातेत अ‍ॅडमिन म्हणुन जात आहे.. समजलं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

अच्छा ! म्हणजे तुम्ही

परिकथेतील राजकुमार
Mon, 12/06/2010 - 15:26 नवीन
अच्छा ! म्हणजे तुम्ही विहीरीचे अ‍ॅडमिन आहात तर..
छुपे का छुपे ? नाही विजुभौ अ‍ॅडमीन असतील तर विहीरीवरच्या शिलालेखांचे स्क्रिनशॉट घेउन ठेवलेले बरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

म्हंजे

रामदास
Tue, 12/07/2010 - 11:48 नवीन
विजूभाऊ विहीरनारायण झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

मस्तच विहीर आहे. नाव काय आहे

नगरीनिरंजन
Mon, 12/06/2010 - 15:20 नवीन
मस्तच विहीर आहे. नाव काय आहे विहीरीचे? पहेली चित्रपटातही एक अशीच विहीर दाखवली आहे ती आणि ही वेगवेगळ्या आहेत वाटते.
  • Log in or register to post comments

सुरुवातीलाच लिहिले आहे

विजुभाऊ
Mon, 12/06/2010 - 15:28 नवीन
सुरुवातीलाच लिहिले आहे नाव. याला अडालज नी वाव किंवा रुडाबाईनी वाव असे म्हणतात सुरभी कार्यक्रमात एकदा याचे दा चित्रीकरण दाखवले होते
  • Log in or register to post comments

अप्रतिम विजुभाउ! काय फोटो

स्पंदना
Mon, 12/06/2010 - 15:35 नवीन
अप्रतिम विजुभाउ! काय फोटो आहेत! एक सुफी गुरु त्याच्या शिष्यांना घेउन अश्या एका विहिरीच्या ओवर्‍या ओवर्‍यात बसुन रियाझ करायचे. अन ते करत असलेल्या रियाझाचे साद पडसाद घुमत घुमत एक मेकात मिसळायचे अस वर्णन कुठेतरी वाचल्याच आठवत. तेंव्हा फक्त कल्पना केली होती अश्या विहिरीची , आज तुमच्या मुळे ती कल्पना प्रत्यक्षात डोळ्यासमोर उतरल्या सारख वाटल.
  • Log in or register to post comments

मस्त

डावखुरा
Mon, 12/06/2010 - 16:09 नवीन
मस्त विहिर ...मस्त वर्णन.. अवलिया (पणा केलाच) अपर्णा ताई सुफींची गोष्ट मस्तच...
  • Log in or register to post comments

आश्चर्याची गोष्ट म्हणजे या

विजुभाऊ
Mon, 12/06/2010 - 16:21 नवीन
आश्चर्याची गोष्ट म्हणजे या विहीरीत एकोज / आवाज घुमणे वगैरे अजिबात होत नव्हते.
  • Log in or register to post comments

शक्य आहे. कारण तुम्ही वर्णन

स्पंदना
Mon, 12/06/2010 - 17:03 नवीन
शक्य आहे. कारण तुम्ही वर्णन करताना अगदी खाली पर्यंत हवा अन उजेड पोहोचु शकतो अस म्हंटलय. एको साठी आवाज कुठेतरी धडकुन परत फिरावा लागतो नाही का? आणखी असतील तर टाका फोटोज. अप्रतिम शिल्प आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

फारच सुंदर.... कॅमेरा अजून

चांगभलं
Mon, 12/06/2010 - 17:10 नवीन
फारच सुंदर.... कॅमेरा अजून चांगला हवा होता
  • Log in or register to post comments

अप्रतिम!

स्वाती२
Mon, 12/06/2010 - 18:10 नवीन
अप्रतिम!
  • Log in or register to post comments

एका अनोख्या ठिकाणाची ओळख करुन

मदनबाण
Mon, 12/06/2010 - 18:58 नवीन
एका अनोख्या ठिकाणाची ओळख करुन बद्धल धन्स... :) या ठिकाणा बद्धलचा हा इडियो पाहण्या सारखा आहे...:)
  • Log in or register to post comments

धन्यवाद रे बाण्या. गुजरात

विजुभाऊ
Tue, 12/07/2010 - 10:16 नवीन
धन्यवाद रे बाण्या. गुजरात सरकार ने हे ऐतिहासीक स्थळ ज्या पद्धतीने जपलय तसे आपण शनिवार वाडा जाऊदे छअत्रपतींचा एकसुद्धा किल्ला तितक्या चांगल्यापद्धतीने जपलेला नाहिय्ये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

गुजरात सरकार ने हे ऐतिहासीक

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 12/09/2010 - 16:01 नवीन
गुजरात सरकार ने हे ऐतिहासीक स्थळ ज्या पद्धतीने जपलय तसे आपण शनिवार वाडा जाऊदे छअत्रपतींचा एकसुद्धा किल्ला तितक्या चांगल्यापद्धतीने जपलेला नाहिय्ये. नरेंद्र मोदी जिंदाबाद. नरेंद्र मोदी जिंदाबाद. नरेंद्र मोदी जिंदाबाद. नरेंद्र मोदी जिंदाबाद. नरेंद्र मोदी जिंदाबाद. नरेंद्र मोदी जिंदाबाद. नरेंद्र मोदी जिंदाबाद. नरेंद्र मोदी जिंदाबाद. नरेंद्र मोदी जिंदाबाद. नरेंद्र मोदी जिंदाबाद. नाही का हो विजुभाऊ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

झक्कास!! खूप छान आहे.

प्राजु
Mon, 12/06/2010 - 21:16 नवीन
झक्कास!! खूप छान आहे.
  • Log in or register to post comments

मदनबाण व्हिडिओ मस्तच....

डावखुरा
Mon, 12/06/2010 - 22:17 नवीन
मदनबाण व्हिडिओ मस्तच....
  • Log in or register to post comments

छान

सुनील
Tue, 12/07/2010 - 00:08 नवीन
अजब! छान माहिती.
  • Log in or register to post comments

छान माहिती!

पिवळा डांबिस
Tue, 12/07/2010 - 01:22 नवीन
विहिर व स्थापत्य अप्रतिमच आहे! हे स्थळ नॅशनल हेरिटेज म्हणून जपायला हवं!!! एक शंका: खाली उतरून विहिरीचं पाणी पिऊन पुन्हा पाच मजले वर चढून यायचं तर पुन्हा तहान लागणार! मग काय, बोंबलायचं? :) -प्यासा डांबिस
  • Log in or register to post comments

तसं नाही

रामदास
Tue, 12/07/2010 - 11:53 नवीन
तिथे विहीरीजवळ बैठक जमवायची.पाणी हाताशीच आहे. येताना रीकाम्या बाटलीत पाणी घ्यायचे .मग वर यायचे.पुन्हा एक बैठक .मग पाणी भरायला परत खाली उतरायचे.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

सुंदर! पाच मजले जमिनीखाली,

पुष्करिणी
Tue, 12/07/2010 - 01:36 नवीन
सुंदर! पाच मजले जमिनीखाली, अजिबात कल्पना येत नाही..
  • Log in or register to post comments

सुंदर! पाच मजले जमिनीखाली,

पुष्करिणी
Tue, 12/07/2010 - 01:36 नवीन
सुंदर! पाच मजले जमिनीखाली, अजिबात कल्पना येत नाही..
  • Log in or register to post comments

छान. माझ्या माहेरी विहीर आहे

जागु
Tue, 12/07/2010 - 11:39 नवीन
छान. माझ्या माहेरी विहीर आहे त्याला आत जाण्यसाठी पायर्‍या म्हणजे जिनाच आहे. तिन जिने आहेत दोन पुर्ण आणि एक अर्धा. अर्धा जिना संपुन भोगदा लागतो. उन्हाळ्यात त्या भोगद्यात बसुन मी अभ्यास करायचे. कारण तेंव्हा पाण्याची पातळी भोगद्याच्या खाली जायची. पावसाळ्यात मात्र जिने भरुन जायचे.
  • Log in or register to post comments

सुलतानांच्या काळात हे बांधकाम

अवलिया
Tue, 12/07/2010 - 11:56 नवीन
सुलतानांच्या काळात हे बांधकाम झाले म्हणुन याला इस्लामी स्थापत्य शैली असे म्हणता येईल काय?
  • Log in or register to post comments

खुप छान. (पन्हाळ गडावर पण अशी

अमोल केळकर
Tue, 12/07/2010 - 12:51 नवीन
खुप छान. (पन्हाळ गडावर पण अशी पायर्‍या असलेली विहिर आहे बहुतेक. एवढी मोठी नाही ) फोटो मस्तच अमोल केळकर
  • Log in or register to post comments

पन्हाळ गडावर पण अशी पायर्‍या असलेली विहिर आहे

चिंतामणी
Wed, 12/08/2010 - 01:10 नवीन
कुठे आहे???? जरा संदर्भ देणार का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल केळकर

माझ्या माहीतीनुसार

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 12/09/2010 - 16:06 नवीन
माझ्या माहीतीनुसार पन्हाळ्यावरची विहीर ही खरेतर फसवा दरवाजा आहे. म्हणजे पायर्‍या वगैरे आहेत असे वाटून तिथं पुढं दरवाजा आहे असे वाटून सैनिक पुढे गेले तर त्या अंधार्‍या दरवाजातून आतमधे डायरेक्ट पाण्यात पडून मरत. मग तिथे दुसरीकडेच कुठेतरी खरा दरवाजा आहे किल्ल्याचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

फार सुरेख

शहराजाद
Sat, 12/11/2010 - 02:28 नवीन
रानी बावडी (पहेली चित्रपटात दिसलेली) बद्दल ऐकून होते. ही नवी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद विजुभौ. जमले तर बघायला अतिशय आवडेल.
  • Log in or register to post comments

अहमदाबादचा एक धागा आला

विजुभाऊ
गुरुवार, 10/17/2013 - 23:40 नवीन
अहमदाबादचा एक धागा आला त्यावरून हे आठवले
  • Log in or register to post comments

निव्वळ अप्रतिम. शब्द नाहीत.

बॅटमॅन
Fri, 10/18/2013 - 00:29 नवीन
निव्वळ अप्रतिम. शब्द नाहीत. चेपुवर गुजरातेतल्या एका मशिदीचे फटूही पाहिले होते, तेदेखील असेच कोरीव कामाने गच्च्च्च्च्च भरलेले. डोळे ठरेनात. गुजरातेत असले गच्च्च भरलेले शिल्पकाम लै जास्त असते असे दिसते. जायला लागतं एकदा तिकडे.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा