निवडक सुविचार संग्रह

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
16 Oct 2010 - 7:39 pm

* अनुभव म्हणजे तुमच्यासोबत जे घडले ते नव्हे.
तर जे घडले त्यावर तुम्ही जे केले तो अनुभव!

* लोक तुमच्याशी कसे वागतात, हे त्यांचे कर्म!
पण तुम्ही त्यावर कशी प्रतिक्रीया देता, हे तुमचे कर्म!

* एखादी समस्या सुटण्यासारखी असेल तर चिंता करुन काय उपयोग? कारण, ती केव्हा ना केव्हा सुटणारच!
एखादी समस्या सुटण्यासारखी नसेल, तरीही चिंता करून काय उपयोग? कारण, ती कधी सुटणारच नाही.

* पुत्र सुपूत्र असेल तर त्याच्यासाठी धनसंचय कशाला करायचा? तो पैसा स्वतः कमावेल.
पुत्र कुपूत्र असेल तर त्याच्यासाठी धनसंचय कशाला करायचा? तो मिळालेला पैसा गमावेल.

* एखाद्या कृतीमध्ये पाप नसते. त्यामागच्या हेतूमध्ये पाप असते. जग आपल्याला आपण केलेल्या कृत्यांवरून तोलते.
देव आपल्याला आपल्या हेतूंद्वारे मापतो. मग आपला हेतू आणि कृत्ये शुद्धच असली पाहिजेत. नाही का?

* समस्या कोणत्याही दिशेने येवू द्यात.
त्या समस्येवरचे समाधान तुमच्याकडुन जावू द्या!

* स्वप्ने पाहिली पाहिजेत. ती पूर्ण होतात.
नाहीतर, निसर्गाने आपल्याला ते पाहाण्याची शक्ती कशाला बरे दिली?

* काही लोक यशाची फक्त स्वप्ने बघतात.
इतर लोक जागे होवून ती स्वप्ने पूर्ण होण्यासाठी धडपडतात.

* कठीण काळ कायम टिकाऊ नसतो.
पण कठीण लोक असतात.

* मुर्खाचे हृदय जिभेवर असते.
शहाण्याची जीभ हृदयात असते.

* शब्द विविध पद्धतीने योजले असता वेगेवेगळा अर्थ निघतो.
आणि अर्थ वेगेवेगळ्या पद्धतीने योजल्यास वेगळा परिणाम साधता येतो.

* यशासारखे प्रेरणादायी दुसरे काहिही नाही. अपयशासारखा शिक्षक दुसरा कोणीही नाही.
जीवनात पुढे जाण्यासाठी आपणांस दोन्ही आवश्यक आहेत.

* अपयश कायम नसते.
यश सुद्धा!

* लोक तुमचा "सल्ला" मानत कधीच नाहीत.
ते तुमचे "उदाहरण" घेतात.

* चिंतेसारखे शरिराला जाळणारे दुसरे इतर काहीही नाही.

* "दिलेले वचन" एखाद्या "घेतलेल्या कर्जासारखेच" आहे.

* प्रशंसा - स्वीकारायला आणि करायला शिका.

* वाईट मनुष्य भीती दाखवली तरच आज्ञा पाळतो.
चांगला मनुष्य प्रेमाद्वारे.

* मनुष्य ज्याला घाबरतो त्यावर कधीही प्रेम करू शकत नाही.

* भीतीला टाळाल- तर ती वाढत जाते.
भीतीचा सामना कराल, तर ती पळून जाते.

* आपण एखादी गोष्ट करू शकतो की नाही, हे ती गोष्ट करून पाहील्याशीवाय समजत नाही.

* ज्याचा शेवट गोड, ते सगळेच गोड!

सुभाषितेविचार

प्रतिक्रिया

संजयशिवाजीरावगडगे's picture

16 Oct 2010 - 9:32 pm | संजयशिवाजीरावगडगे

आवडले चांगले आहेत !

पैसा's picture

16 Oct 2010 - 9:34 pm | पैसा

आवडले

कित्तेकदा सुविचार एकमेकांच्या उलट असतात. त्यामुळे नक्की काय समजायचे हा प्रश्न उभा राहतो.

वरचेच उदाहरण बघा:
तुम्ही म्हणता:
एखादी समस्या सुटण्यासारखी नसेल, तरीही चिंता करून काय उपयोग? कारण, ती कधी सुटणारच नाही.

आता दुसरा विचार बघा:
प्रयत्ने वाळूचे कण रगडता तेलही गळे

दिलेले उदाहरण एकदम जुळत नसेलही पण मला आत्ता या घडीला इतर उदाहरणे आठवत नाही.

निवेदिता-ताई's picture

16 Oct 2010 - 10:47 pm | निवेदिता-ताई

छान ..............सुंदर............

शिल्पा ब's picture

17 Oct 2010 - 12:31 am | शिल्पा ब

<<एखादी समस्या सुटण्यासारखी असेल तर चिंता करुन काय उपयोग? कारण, ती केव्हा ना केव्हा सुटणारच!
एखादी समस्या सुटण्यासारखी नसेल, तरीही चिंता करून काय उपयोग? कारण, ती कधी सुटणारच नाही.

* पुत्र सुपूत्र असेल तर त्याच्यासाठी धनसंचय कशाला करायचा? तो पैसा स्वतः कमावेल.
पुत्र कुपूत्र असेल तर त्याच्यासाठी धनसंचय कशाला करायचा? तो मिळालेला पैसा गमावेल.

हे काही पटत नाही..इतर सुविचार छान.

ढेकणासारखे चिरडून मरण्यापेक्षा डासासारखे गुणगुणत गुणगुणत मरा

सदाची पहुणी's picture

17 Oct 2010 - 12:19 pm | सदाची पहुणी

प्रत्येक प्रश्नाला उत्तर असते फक्त शोधावे लागते.---सदाची पाहुणी