बुठ्ठी

निरंजन's picture
निरंजन in जनातलं, मनातलं
15 Oct 2010 - 2:56 pm

माझी ती पहिलीच नोकरी होती. त्यावेळी मी मेडिकल इलेक्टॉनिक्स या क्षेत्रात काम करत होतो. मी ज्या कंपनीत काम करत होतो, ती कंपनी ऑपरेशन थिएटर व आयसीसीयुला लागणारी इलेक्टॉनिक मशिन पुरवायची. माझ काम होत, त्या मशीनची देखभाल करणं व ही मशीन कशी वापरायची त्याच ट्रेनिंग देणं. त्यामुळे हॉस्पिटलशी सतत संपर्क यायचा. असाच एकदा केईएम्‌ मधुन सकाळीच फ़ोन आला, एक ऑपरेशन चालू होणार होतं व त्यांना आमच्या कंपनीनी दिलेल्या "बलुन पंप" या मशिनची गरज लागणार होती. त्यावेळी हे मशिन नुकतच या हॉस्पिटलनी विकत घेतलेल होत. ते कस वापरायच याचं ट्रेनिंग पूर्ण दिलेल नव्हत. त्यामुळे मला हजर राहायला सांगितलं.

मी पोहोचलो तो पर्यंत ऑपरेशन चालू झालेल होत. मी ऑपरेशन थिएटरमधे जात असताना मला एका अति वृद्ध बाईनी बोलावल व माझ्या पायाला हात लाऊन म्हणाली माझ्या मुलाला वाचवा. एका वृद्ध बाईनी पायाला हात लावणं इतक विचित्र वाटल. मी तीला सांगितल की मी डॉक्टर नाही. व आत गेलो.

ऑपरेशन झाल पण पेशंटच ब्लड प्रेशर फ़टाफ़ट उतरतच गेल. त्यावेळी heart lung machine वापरली जायची. ऑपरेशन चालू असताना १२०/६० असलेल ब्लड प्रेशर उतरत गेल. सिस्टॉलिक ब्लड प्रेशर ४० च्या खाली गेल. "बलुन पंप" लावण्यात अर्थच नव्हता. डॉक्टरांनी तसा निर्णय घेतला. पेशंट वाचण अशक्य होत. बेडवरच पेशंट माझ्या समोरच गेला. मी ऑपरेशन थिएटरमधे पहिला मृत्यु.

बाहेर नातेवाईकांना ही बातमी सांगीतली गेली व थोड्याच वेळात मी ऑपरेशन थिएटरच्या बाहेर पडलो. बाहेर रडारड चालू होती आणि पेशंटची वृद्ध आई भिंतीला टेकुन थरथरत उभी होती. तीला रडतासुद्धा येत नव्हत. दोनतीन नातेवाईकांनी फ़क्त हाताला धरलेल होत. आणि तीची सून मोठ्यामोठ्यानी रडत व ओरडत होती.

"ये बुठ्ठी नब्बे सालकी हुई , ये नही मरती. चार बच्चोंको खा गयी है साली. चारो बच्चे हार्ट अ‍ॅटॅक आक एमर गये. इस बुठ्ठीको कुछ होता नही है. इसको मरनेको क्या हुआ था ? जा तू मर जा मेरे मरदकॊ वापिस ला."

मी त्या वृद्ध बाईकडे पाहिल, न रडता थरथरत ती बाई उभी होती. काय विचार असतील त्या माऊलीच्या मनात? का मन बधीर झाल असेल ? माझी नजर त्या वृद्धेच्या चेहर्‍याकडे गेली, ते डोळे ते भाव मी कधीच विसरु शकणार नाही.

कथाअनुभव

प्रतिक्रिया

रन्गराव's picture

15 Oct 2010 - 2:58 pm | रन्गराव

शब्द नाहीत प्रतिक्रिया द्यायला :(

गणपा's picture

15 Oct 2010 - 3:12 pm | गणपा

त्या माऊलीच दुखः बिचारी तिच जाणे.

अनामिक's picture

15 Oct 2010 - 5:26 pm | अनामिक

हेच म्हणतो.

यशोधरा's picture

15 Oct 2010 - 3:17 pm | यशोधरा

:(

ते डोळे ते भाव मी कधीच विसरु शकणार नाही. ....

येथे वाचुनही मन खुप बैचेन झाले आहे.
तीचे मन काय बोलत असेन .. तीला तर साथ देणारी, शब्दाने सांत्वन करणारी मआणसे पण नव्हती ..
बिच्चारी ...
---

अवांतर :

सिंहगड आणि आता हा धागा .. दोन्ही वाचुन .. समाजाची वेगवेगळी विदारक चित्रे पाहुन मन खरच हेलावुन गेलय ..

स्पा's picture

15 Oct 2010 - 5:00 pm | स्पा

:(

:(

:(

:(

परिकथेतील राजकुमार's picture

15 Oct 2010 - 5:01 pm | परिकथेतील राजकुमार

निरंजन काका नेहमीप्रमाणेच सुंदर लेखन :)

मिपावर स्वागत आहे.

बापरे!! वाचूनही सुन्न झालं, त्या म्हातारीला काय झालं असेल..

प्रभो's picture

15 Oct 2010 - 6:49 pm | प्रभो

:(

पाषाणभेद's picture

15 Oct 2010 - 8:25 pm | पाषाणभेद

सहमत आहे.
:-(

प्रदीप's picture

15 Oct 2010 - 8:12 pm | प्रदीप

लिहीले आहे, आवडले. हा अनुभव खरोखरीच सुन्न करणारा, वास्तवाचे भीषण दर्शन घडवणारा आहे.

ह्यावरून जी. एं.ची एक कथा आठवली, त्यातील म्हातारे सुब्राव व घरातील अगदी लहान मुलगी एकाचवेळी आजारी असतात. सुब्राव तापाच्या गुंगीत काही दिवस पडून असल्याने घरातील इतर घडामोडी त्यांना ठाऊक नाहीत. कथेच्या सुरूवातीस त्यांचा ताप गेला आहे, व अशावेळी जसे आपल्याला उल्हसित वाटते तसे त्यांना वाटत आहे. इतक्यात त्यांच्या कानी सुनेची कुजबुज पडते ती काही अशा अर्थाची की 'हा म्हातारा जगला पण आमची छोटी मात्र गेली'!

लिहीत चला.

मस्त कलंदर's picture

15 Oct 2010 - 11:13 pm | मस्त कलंदर

मलाही तीच कथा आठवली. त्या छोटीचे नांव 'राणी' असतं. बहुतेक अकरावी/बारावीच्या पुस्तकात होती. छोट्या छोट्या शब्दांतून त्यांनी आजोबांचे नैराश्य दाखवले होते.. मोलकरणीची, घरातल्यांची वागणूक, तो थंडगार कपाचा बुळबुळीत स्पर्श, आणि कुणी आले गेले की वाजणारा पायरीचा दगड आणि सरतेशेवटी राणी गेल्यावर ऐकू आलेली कुजबूज!!!!

काव्यवेडी's picture

15 Oct 2010 - 10:29 pm | काव्यवेडी

अस बोलणारी माणसे खरच असतात . मरण कोणाच्या हातात आहे?

पंचींग बॅग्ज असतात म्हातारी माणसं म्हणजे काही ठिकाणी. आला राग दाखवा दात. धरा डूख यांचेवर. परावलंबी बिचारी.

मिसळभोक्ता's picture

15 Oct 2010 - 11:04 pm | मिसळभोक्ता

अतिशोकात केलेली बडबड मनावर घ्यायची नसते.

पिवळा डांबिस's picture

16 Oct 2010 - 1:05 am | पिवळा डांबिस

अतिशोकात केलेली बडबड मनावर घ्यायची नसते.

करेक्ट!
आणि अतिषोकात केलेलीही!

चिगो's picture

16 Oct 2010 - 12:21 am | चिगो

:-(

स्पंदना's picture

16 Oct 2010 - 7:03 am | स्पंदना

कळ आली वाचुन !

ज्यांच्या खांद्यावर जायची स्वप्न बघायची तीच हाताचा पाळणा करुन जपलेली मुल गेलेली अन आता वर जगण्याच्या शापात भर घालणार्‍या नातेवाइकांचा तोंड पट्टा !!

नको रे देवा !! सोडव त्या जिवाला !!

कौशी's picture

16 Oct 2010 - 8:32 am | कौशी

कल्पना नाही करवत ... आज्जीच्या दुखाची...
नंतर काय हाल झाले असतील आज्जिचे देव जाणे...

मी तुमचा आभारी आहे.

शिल्पा ब's picture

16 Oct 2010 - 11:14 am | शिल्पा ब

म्हातारीबद्दल वाईट वाटले...तिची बिचारीची काय चूक? तिलाच वाटत असेल कि "मुलापेक्षा मलाच नेले असते तर बरे झाले असते ", पण कोणाच्या हातात आहे?
किती मोठा धक्का...बिचारीला धड रडता सुद्धा आले नाही :-(