✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बुठ्ठी

न
निरंजन यांनी
Fri, 10/15/2010 - 14:56  ·  लेख
लेख
माझी ती पहिलीच नोकरी होती. त्यावेळी मी मेडिकल इलेक्टॉनिक्स या क्षेत्रात काम करत होतो. मी ज्या कंपनीत काम करत होतो, ती कंपनी ऑपरेशन थिएटर व आयसीसीयुला लागणारी इलेक्टॉनिक मशिन पुरवायची. माझ काम होत, त्या मशीनची देखभाल करणं व ही मशीन कशी वापरायची त्याच ट्रेनिंग देणं. त्यामुळे हॉस्पिटलशी सतत संपर्क यायचा. असाच एकदा केईएम्‌ मधुन सकाळीच फ़ोन आला, एक ऑपरेशन चालू होणार होतं व त्यांना आमच्या कंपनीनी दिलेल्या "बलुन पंप" या मशिनची गरज लागणार होती. त्यावेळी हे मशिन नुकतच या हॉस्पिटलनी विकत घेतलेल होत. ते कस वापरायच याचं ट्रेनिंग पूर्ण दिलेल नव्हत. त्यामुळे मला हजर राहायला सांगितलं. मी पोहोचलो तो पर्यंत ऑपरेशन चालू झालेल होत. मी ऑपरेशन थिएटरमधे जात असताना मला एका अति वृद्ध बाईनी बोलावल व माझ्या पायाला हात लाऊन म्हणाली माझ्या मुलाला वाचवा. एका वृद्ध बाईनी पायाला हात लावणं इतक विचित्र वाटल. मी तीला सांगितल की मी डॉक्टर नाही. व आत गेलो. ऑपरेशन झाल पण पेशंटच ब्लड प्रेशर फ़टाफ़ट उतरतच गेल. त्यावेळी heart lung machine वापरली जायची. ऑपरेशन चालू असताना १२०/६० असलेल ब्लड प्रेशर उतरत गेल. सिस्टॉलिक ब्लड प्रेशर ४० च्या खाली गेल. "बलुन पंप" लावण्यात अर्थच नव्हता. डॉक्टरांनी तसा निर्णय घेतला. पेशंट वाचण अशक्य होत. बेडवरच पेशंट माझ्या समोरच गेला. मी ऑपरेशन थिएटरमधे पहिला मृत्यु. बाहेर नातेवाईकांना ही बातमी सांगीतली गेली व थोड्याच वेळात मी ऑपरेशन थिएटरच्या बाहेर पडलो. बाहेर रडारड चालू होती आणि पेशंटची वृद्ध आई भिंतीला टेकुन थरथरत उभी होती. तीला रडतासुद्धा येत नव्हत. दोनतीन नातेवाईकांनी फ़क्त हाताला धरलेल होत. आणि तीची सून मोठ्यामोठ्यानी रडत व ओरडत होती. "ये बुठ्ठी नब्बे सालकी हुई , ये नही मरती. चार बच्चोंको खा गयी है साली. चारो बच्चे हार्ट अ‍ॅटॅक आक एमर गये. इस बुठ्ठीको कुछ होता नही है. इसको मरनेको क्या हुआ था ? जा तू मर जा मेरे मरदकॊ वापिस ला." मी त्या वृद्ध बाईकडे पाहिल, न रडता थरथरत ती बाई उभी होती. काय विचार असतील त्या माऊलीच्या मनात? का मन बधीर झाल असेल ? माझी नजर त्या वृद्धेच्या चेहर्‍याकडे गेली, ते डोळे ते भाव मी कधीच विसरु शकणार नाही.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3019 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

शब्द नाहीत प्रतिक्रिया

रन्गराव
Fri, 10/15/2010 - 14:58 नवीन
शब्द नाहीत प्रतिक्रिया द्यायला :(
  • Log in or register to post comments

वाईट वाटल :(

गणपा
Fri, 10/15/2010 - 15:12 नवीन
त्या माऊलीच दुखः बिचारी तिच जाणे.
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो.

अनामिक
Fri, 10/15/2010 - 17:26 नवीन
हेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

(विषय दिलेला नाही)

यशोधरा
Fri, 10/15/2010 - 15:17 नवीन
:(
  • Log in or register to post comments

ते डोळे ते भाव मी कधीच विसरु

गणेशा
Fri, 10/15/2010 - 16:48 नवीन
ते डोळे ते भाव मी कधीच विसरु शकणार नाही. .... येथे वाचुनही मन खुप बैचेन झाले आहे. तीचे मन काय बोलत असेन .. तीला तर साथ देणारी, शब्दाने सांत्वन करणारी मआणसे पण नव्हती .. बिच्चारी ... --- अवांतर : सिंहगड आणि आता हा धागा .. दोन्ही वाचुन .. समाजाची वेगवेगळी विदारक चित्रे पाहुन मन खरच हेलावुन गेलय ..
  • Log in or register to post comments

(विषय दिलेला नाही)

स्पा
Fri, 10/15/2010 - 17:00 नवीन
:( :( :( :(
  • Log in or register to post comments

निरंजन काका नेहमीप्रमाणेच

परिकथेतील राजकुमार
Fri, 10/15/2010 - 17:01 नवीन
निरंजन काका नेहमीप्रमाणेच सुंदर लेखन :) मिपावर स्वागत आहे.
  • Log in or register to post comments

बापरे!! वाचूनही सुन्न झालं,

प्राजु
Fri, 10/15/2010 - 18:33 नवीन
बापरे!! वाचूनही सुन्न झालं, त्या म्हातारीला काय झालं असेल..
  • Log in or register to post comments

(विषय दिलेला नाही)

प्रभो
Fri, 10/15/2010 - 18:49 नवीन
:(
  • Log in or register to post comments

सहमत आहे.

पाषाणभेद
Fri, 10/15/2010 - 20:25 नवीन
सहमत आहे. :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

छान स्फूट

प्रदीप
Fri, 10/15/2010 - 20:12 नवीन
लिहीले आहे, आवडले. हा अनुभव खरोखरीच सुन्न करणारा, वास्तवाचे भीषण दर्शन घडवणारा आहे. ह्यावरून जी. एं.ची एक कथा आठवली, त्यातील म्हातारे सुब्राव व घरातील अगदी लहान मुलगी एकाचवेळी आजारी असतात. सुब्राव तापाच्या गुंगीत काही दिवस पडून असल्याने घरातील इतर घडामोडी त्यांना ठाऊक नाहीत. कथेच्या सुरूवातीस त्यांचा ताप गेला आहे, व अशावेळी जसे आपल्याला उल्हसित वाटते तसे त्यांना वाटत आहे. इतक्यात त्यांच्या कानी सुनेची कुजबुज पडते ती काही अशा अर्थाची की 'हा म्हातारा जगला पण आमची छोटी मात्र गेली'! लिहीत चला.
  • Log in or register to post comments

राणी!!!!!

मस्त कलंदर
Fri, 10/15/2010 - 23:13 नवीन
मलाही तीच कथा आठवली. त्या छोटीचे नांव 'राणी' असतं. बहुतेक अकरावी/बारावीच्या पुस्तकात होती. छोट्या छोट्या शब्दांतून त्यांनी आजोबांचे नैराश्य दाखवले होते.. मोलकरणीची, घरातल्यांची वागणूक, तो थंडगार कपाचा बुळबुळीत स्पर्श, आणि कुणी आले गेले की वाजणारा पायरीचा दगड आणि सरतेशेवटी राणी गेल्यावर ऐकू आलेली कुजबूज!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

अस बोलणारी माणसे खरच असतात .

काव्यवेडी
Fri, 10/15/2010 - 22:29 नवीन
अस बोलणारी माणसे खरच असतात . मरण कोणाच्या हातात आहे?
  • Log in or register to post comments

पंचींग बॅग्ज असतात म्हातारी

शुचि
Fri, 10/15/2010 - 22:45 नवीन
पंचींग बॅग्ज असतात म्हातारी माणसं म्हणजे काही ठिकाणी. आला राग दाखवा दात. धरा डूख यांचेवर. परावलंबी बिचारी.
  • Log in or register to post comments

अतिशोक

मिसळभोक्ता
Fri, 10/15/2010 - 23:04 नवीन
अतिशोकात केलेली बडबड मनावर घ्यायची नसते.
  • Log in or register to post comments

सहमत

पिवळा डांबिस
Sat, 10/16/2010 - 01:05 नवीन
अतिशोकात केलेली बडबड मनावर घ्यायची नसते. करेक्ट! आणि अतिषोकात केलेलीही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

सुन्न...

चिगो
Sat, 10/16/2010 - 00:21 नवीन
:-(
  • Log in or register to post comments

कळ आली वाचुन ! ज्यांच्या

स्पंदना
Sat, 10/16/2010 - 07:03 नवीन
कळ आली वाचुन ! ज्यांच्या खांद्यावर जायची स्वप्न बघायची तीच हाताचा पाळणा करुन जपलेली मुल गेलेली अन आता वर जगण्याच्या शापात भर घालणार्‍या नातेवाइकांचा तोंड पट्टा !! नको रे देवा !! सोडव त्या जिवाला !!
  • Log in or register to post comments

कल्पना नाही करवत ...

कौशी
Sat, 10/16/2010 - 08:32 नवीन
कल्पना नाही करवत ... आज्जीच्या दुखाची... नंतर काय हाल झाले असतील आज्जिचे देव जाणे...
  • Log in or register to post comments

प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद !!!!!

निरंजन
Sat, 10/16/2010 - 08:34 नवीन
मी तुमचा आभारी आहे.
  • Log in or register to post comments

म्हातारीबद्दल वाईट

शिल्पा ब
Sat, 10/16/2010 - 11:14 नवीन
म्हातारीबद्दल वाईट वाटले...तिची बिचारीची काय चूक? तिलाच वाटत असेल कि "मुलापेक्षा मलाच नेले असते तर बरे झाले असते ", पण कोणाच्या हातात आहे? किती मोठा धक्का...बिचारीला धड रडता सुद्धा आले नाही :-(
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा