तुझं माझं घर...

जयवी's picture
जयवी in जे न देखे रवी...
6 Oct 2010 - 6:16 pm

तुझं माझं घर...एक झोका
कधी निळ्याशा ढगांत,
कधी पाचूच्या बनात.

तुझं माझं घर.... एक फुलबाग
कधी प्राजक्ती सडा
कधी धुंद केवडा.

तुझं माझं घर ... एक चांदणं
कधी टिपूर टिपूर
कधी गंधाळ आतूर.

तुझं माझं घर... एक पाऊस
कधी झिम्माड झिम्माड
कधी कोसळ द्वाड.

तुझं माझं घर.... एक मैफिल
कधी तुझिया सुरात
कधी माझिया तालात.

तुझं माझं घर ... एक देव्हारा
शांत समई प्रकाश
पराकोटीचा विश्वास

जयश्री अंबासकर

शृंगारकविता

प्रतिक्रिया

रामदास's picture

6 Oct 2010 - 8:12 pm | रामदास

आवडली .

धनंजय's picture

6 Oct 2010 - 8:18 pm | धनंजय

कविता आवडली.

दुसर्‍या कडव्याने चौकट मोडलेली आहे. (शेवटले समारोपाचे कडवे सोडले, तर बाकी सर्व कडव्यांत दुसर्‍या आणि तिसर्‍या ओळींत आभासी विरोधाचा समन्वय अर्थपूर्ण, सुंदर आहे. दुसर्‍या कडव्यात तसा आभासी विरोध नाही, समन्वय साधल्याचे समाधान नाही.) हे कडवे वेगळेच का म्हणून रचले, ते समजले नाही. त्यामुळे त्याचा वेगळेपणा अजूनपर्यंत आवडलेला नाही.

जयवी's picture

7 Oct 2010 - 12:56 am | जयवी

धनंजय, मला म्हणायचं होतं..... कधी प्राजक्तासारखी पखरण.... वर्षाव, तर कधी सुगंधी दरवळ... केवड्यासारखा!!

प्राजु's picture

6 Oct 2010 - 8:19 pm | प्राजु

तुझं माझं घर ... एक देव्हारा
शांत समई प्रकाश
पराकोटीचा विश्वास

क्लास!!

मदनबाण's picture

6 Oct 2010 - 8:19 pm | मदनबाण

छान... :)
बाकी, एक झोका हा शब्द दिसला अन् हे गाणं टाळक्यात आठवलं,,,

सुंदर कविता जयवी ताई. आवडली.

शुचि's picture

6 Oct 2010 - 10:24 pm | शुचि

फारच सुंदर :)

जयवी's picture

7 Oct 2010 - 12:59 am | जयवी

मित्रांनो, कविता आवडली ......... खूप खूप धन्यवाद :)

मदनबाणा, खरंय तुझं. झोका म्हटलं की हे गाणं हमखास आठवतं :)

माझं आवडतं कडवं -
तुझं माझं घर.... एक फुलबाग
कधी प्राजक्ती सडा
कधी धुंद केवडा.
:)

बेसनलाडू's picture

7 Oct 2010 - 1:44 am | बेसनलाडू

(घरमालक)बेसनलाडू

दिपाली पाटिल's picture

7 Oct 2010 - 8:00 am | दिपाली पाटिल

अतिशय छान, आवडली

सहज's picture

7 Oct 2010 - 8:34 am | सहज

नाव वाचून ये तेरा घर ये मेरा घर गाणे आठवले पण त्यातील ओळी हे घर सुंदर आहे पण नेहमीच्या काव्यात्म उपमांना साजेस नसलेले तरी रहाणार्‍यांच्या मनातले आहे असा आशय. वरच्या कवितेत पुन्हा एकदा पाउस, झोका, फुलबाग त्यामुळे पारंपारीक गुडीगुडी काव्यगुणधर्माने जाणारे वाटले.

ते गाण पुन्हा एकदा!

जयश्रीताई खुप सुंदर आहे कविता.

फ्रॅक्चर बंड्या's picture

7 Oct 2010 - 2:30 pm | फ्रॅक्चर बंड्या

आवडली कविता ...

जयवी's picture

14 Oct 2010 - 12:43 am | जयवी

तहे दिल से शुक्रिया :)