तुझं माझं घर...एक झोका
कधी निळ्याशा ढगांत,
कधी पाचूच्या बनात.
तुझं माझं घर.... एक फुलबाग
कधी प्राजक्ती सडा
कधी धुंद केवडा.
तुझं माझं घर ... एक चांदणं
कधी टिपूर टिपूर
कधी गंधाळ आतूर.
तुझं माझं घर... एक पाऊस
कधी झिम्माड झिम्माड
कधी कोसळ द्वाड.
तुझं माझं घर.... एक मैफिल
कधी तुझिया सुरात
कधी माझिया तालात.
तुझं माझं घर ... एक देव्हारा
शांत समई प्रकाश
पराकोटीचा विश्वास
जयश्री अंबासकर
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2796
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
कविता
आवडली
ह्म्म्म
In reply to आवडली by धनंजय
तुझं माझं घर ... एक
छान... बाकी, एक झोका हा शब्द
सुंदर कविता जयवी ताई. आवडली.
फारच सुंदर
आभार !!
माझं आवडतं कडवं - तुझं माझं
कविता आवडली
अतिशय छान, कवितेतलं फार काही
वेगळेच
जयश्रीताई खुप सुंदर आहे
आवडली कविता ...
तहे दिल से शुक्रिया