(बदली ड्रायव्हर)

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in काथ्याकूट
14 Sep 2010 - 3:02 am
गाभा: 

गाडीचे चालक अनेक कारणांनी पाहिजे तसे काम देत नाही किंवा अधिक गाड्या चालवण्यापायी मुळ गाडीवरची हात कमी बसत जातो. अशावेळी गाडी न वापरल्याने वा घसारा न झाल्याने गाडी गॅरेजमध्ये उभीच राहते. अशा गाडीवर लगेच बदली ड्रायव्हर उपलब्ध असेल तर गाडीची वाहतूक थांबणार नाही हे निश्चित. थांबली ती गंजली म्हणतातच की.

बदली ड्रायव्हर नावाची चीज कामचलाऊ असली तरी थांबून राहणार्‍या गाडीला नवी उमेद देते हे खरे. पण मैत्रीणींनो आपण बदली ड्रायव्हर घेवून धावतोय हे मुळ ड्रायव्हरला समजू नये यातच खरी मौज दडलेली असते. यासाठी मुळ ड्रायव्हरचा पत्ता मोठ्या विश्वासाने कट करावा लागतो. बदली ड्रायव्हर शोधावा लागतो. त्या बदली ड्रायव्हरची इतर गाड्या चालविण्याची हिस्ट्री पहावी लागते. अशा वेळी नवोदीत ड्रायव्हर मिळणे भाग्याचे असते. त्याला हरभर्‍याच्या झाडावर चढवता येते. ह्या गाडीचा अनुभव देता येतो. सिट पुढेमागे करणे समजवून देता येते. हॉर्न कसा अन कुठे आहे? तो कुठे दाबायचा? स्टिअरींग व्हिल किती फिरवायचे? त्यात पॉवर किती आहे? हे समजवून देण्यात पुढील काम मार्गी लागणार असते.

बदली ड्रायव्हरला घेतलेय हे मुळ ड्रायव्हरला कळू न देण्यातच खरा मुरब्बीपणा. बदली ड्रायव्हरला घेतल्याची खबर कोणालाही लागू न देता हा गनिमीकावा पार पाडावा लागतो. तसे पाहिले तर बदली ड्रायव्हरला नुसताच बाळगून फायदा नाही, तर त्याचा वेळोवेळी काळजीपूर्वक वापर करता यायला हवा. बदली ड्रायव्हर लावून सुखाचा प्रवास सुरु झाला की गाडीला वाटते आपल्यामुळेच ड्रायव्हर जोराचा मारतोय तर बदली ड्रायव्हरला मात्र कळून चुकते की आपण दूर झाल्यावर गाडी गंजलीच म्हणून समजा. म्हणून तोही सहसा पळून जाण्यापासून जपत असतो. अर्थात गाडीलाही गॅरेजमध्ये पडून राहण्यापेक्षा ड्रायव्हरला दौड दिल्याचे विलक्षण समाधान लाभत असतेच म्हणा. तिलाही चालू स्थितीत फार बरे वाटत असावे. शेवटी काय तर एकमेकांवर अवलंबून राहण्यात बरेच फायदे गवसतात. जसे की बदली ड्रायव्हर!

प्रतिक्रिया

सुनील's picture

14 Sep 2010 - 3:07 am | सुनील

स्टेपनी लावलेली गाडी एखादा बदली ड्रायवर चालवतो आहे, असे चित्र डोळ्यासमोर आले!

धमाल मुलगा's picture

14 Sep 2010 - 6:09 pm | धमाल मुलगा

अग्गायायायाया.....
=))

अवांतरः पाषाणभेद, यु टु? =))

निशदे's picture

14 Sep 2010 - 3:17 am | निशदे

सध्या तरी एवढीच प्रतिक्रिया.......आता दोन्ही धागे नीट follow करावे लागतील...........

राजेश घासकडवी's picture

14 Sep 2010 - 8:11 am | राजेश घासकडवी

खरं आहे तुमचं. अहो गाडी जशी जुनी होते, तसाच ड्रायव्हरपण म्हातारा होतो. जमत नाही म्हणून वळणावळणाच्या रस्त्यांवर जाण्यापेक्षा त्याच त्या सरळ रस्त्यावर गाडी नेणं पसंत करतो. रक्त सळसळेल अशी बेफाम गाडी हाकणं तारुण्याबरोबर सोडून देतो.

चांगल्या तरुण ड्रायव्हरबरोबर गाडी गेली तर तिच्यावरचा गंज उडून जातो. शॉक अॅब्सॉर्बर्सना थोडे दाणदाण धक्के बसले की इंजिन ऑईल कसं मोकळं होतं. मूळ ड्रायव्हरला संशय येऊ नये म्हणून ओडॉमीटर रिसेट करावा लागतो असं वाटेल. पण आश्चर्याची गोष्ट अशी की बदली ड्रायव्हरबरोबर ड्रायव्हिंग झालं की ओडॉमीटरचे आकडे उलटेच फिरतात. तंत्रज्ञानाचा हा अद्भूत चमत्कार आहे.

मात्र ड्रायव्हरांची युनियन लय भारी आहे. लायसन असेल तरच व तीच गाडी ड्राईव्ह करावी असे नियम आहेत. आधुनिक, शहरी गाड्यांना त्या मानाने जरा मोकळीक असते. पण गावच्या रस्त्यांवर हे नियम फार काटेकोरपणे पाळले जातात. दुर्दैवाने बदली ड्रायव्हरला गुन्ह्याबद्दल शिक्षा कमी होते. गाड्यांचे हाल कुत्रा खात नाही.

ही युनियनगिरी फार माजली आहे साला.

काही विशिष्ठ ड्रायवरना ४-४ गाड्यांचे लायसन मिळतात.

गांधीवादी's picture

14 Sep 2010 - 9:40 am | गांधीवादी

>>काही विशिष्ठ ड्रायवरना ४-४ गाड्यांचे लायसन मिळतात.
त्या विशिष्ट ड्रायवरांच्या कळपात घुसून चांगले ४-५ लायसन घेऊन, फुलटू गाड्यावर मजा मारून, परत आपल्या कळपात येता येते का ?

आम्हाला आमची गाडी चालवून इतका प्रदीर्घ अनुभव आलेला आहे आता रणगाडा देखील चालवू शकतो.

llपुण्याचे पेशवेll's picture

14 Sep 2010 - 10:22 am | llपुण्याचे पेशवेll

हम्म. म्हणजे आवडी निवडी बदलत आहेत तर. गाडीवरुन गाड्यापर्यंत प्रवास कसा झाला ते लिहा एकदा. :)

llपुण्याचे पेशवेll's picture

14 Sep 2010 - 9:39 am | llपुण्याचे पेशवेll

काही ड्रायव्हर प्रोफेशनल ड्रायवर असतात. विशिष्ठ वेतन घेऊन ते कोणतीही गाडी चालवू शकतात. त्यांचा अनुभव आणि जजमेंट प्रचंड असतात. :)

विनायक प्रभू's picture

14 Sep 2010 - 11:29 am | विनायक प्रभू

पुपेशी सहमत
अशी ड्रायविंग लायसन्सेस वय १५ लाच मिळतात.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

15 Sep 2010 - 2:46 am | विश्वनाथ मेहेंदळे

>>आधुनिक, शहरी गाड्यांना त्या मानाने जरा मोकळीक असते. पण गावच्या रस्त्यांवर हे नियम फार काटेकोरपणे पाळले जातात.
गैरसमज आहे मालक तुमचा. ते राज कपूर च्या सिनेमात ठीक आहे, गावकरी भोळे आणि शहरातील माणसे चालू वगैरे. गावकरी लई पुढे हायेत बगा. तुमच्यासारक्या शेरातल्या मानसांना काय बी खबर लागनार नाही तिते काय चालते याची. :)

बाकी प्रतिसाद नेहमीप्रमाणे क...ड...क

सविता's picture

14 Sep 2010 - 1:28 pm | सविता

क....ह्......र......

वा वा वा एक धागा कमी पडत होता म्हणुन हा दुसरा :)

भडकमकर मास्तर's picture

14 Sep 2010 - 4:11 pm | भडकमकर मास्तर

अतिशय मार्मिक विवेचन...

सुहास..'s picture

14 Sep 2010 - 5:16 pm | सुहास..

हाण्ण !!

सूड's picture

14 Sep 2010 - 6:31 pm | सूड

अवलिया's picture

14 Sep 2010 - 6:39 pm | अवलिया

हा हा हा

सुनील's picture

14 Sep 2010 - 9:30 pm | सुनील

चालू द्या!!!!!

चिंतामणी's picture

15 Sep 2010 - 12:53 am | चिंतामणी

बदली ड्रायव्हरला घेतलेय हे मुळ ड्रायव्हरला कळू न देण्यातच खरा मुरब्बीपणा. बदली ड्रायव्हरला घेतल्याची खबर कोणालाही लागू न देता हा गनिमीकावा पार पाडावा लागतो.

हा उतारा दिसतोय (अर्थातच सुज्ञास अधिक सांगणे न लगे")

पाषाणभेद's picture

15 Sep 2010 - 1:03 am | पाषाणभेद

PSPO झाला बघा तुमचा. अरे इसको विडंबन नय मालूम!

अथांग's picture

15 Sep 2010 - 4:02 am | अथांग

माननीय श्री. दादा कोंडके यांचे अनुयायी वावरताहेत
असा भास मला उगीचच होतोय की काय?
काहिही म्हणा, वाचून करमणूक चांगली झाली.

Pain's picture

15 Sep 2010 - 4:33 am | Pain

:D