✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

(बदली ड्रायव्हर)

प
पाषाणभेद यांनी
Tue, 09/14/2010 - 03:02  ·  लेख
लेख
गाडीचे चालक अनेक कारणांनी पाहिजे तसे काम देत नाही किंवा अधिक गाड्या चालवण्यापायी मुळ गाडीवरची हात कमी बसत जातो. अशावेळी गाडी न वापरल्याने वा घसारा न झाल्याने गाडी गॅरेजमध्ये उभीच राहते. अशा गाडीवर लगेच बदली ड्रायव्हर उपलब्ध असेल तर गाडीची वाहतूक थांबणार नाही हे निश्चित. थांबली ती गंजली म्हणतातच की. बदली ड्रायव्हर नावाची चीज कामचलाऊ असली तरी थांबून राहणार्‍या गाडीला नवी उमेद देते हे खरे. पण मैत्रीणींनो आपण बदली ड्रायव्हर घेवून धावतोय हे मुळ ड्रायव्हरला समजू नये यातच खरी मौज दडलेली असते. यासाठी मुळ ड्रायव्हरचा पत्ता मोठ्या विश्वासाने कट करावा लागतो. बदली ड्रायव्हर शोधावा लागतो. त्या बदली ड्रायव्हरची इतर गाड्या चालविण्याची हिस्ट्री पहावी लागते. अशा वेळी नवोदीत ड्रायव्हर मिळणे भाग्याचे असते. त्याला हरभर्‍याच्या झाडावर चढवता येते. ह्या गाडीचा अनुभव देता येतो. सिट पुढेमागे करणे समजवून देता येते. हॉर्न कसा अन कुठे आहे? तो कुठे दाबायचा? स्टिअरींग व्हिल किती फिरवायचे? त्यात पॉवर किती आहे? हे समजवून देण्यात पुढील काम मार्गी लागणार असते. बदली ड्रायव्हरला घेतलेय हे मुळ ड्रायव्हरला कळू न देण्यातच खरा मुरब्बीपणा. बदली ड्रायव्हरला घेतल्याची खबर कोणालाही लागू न देता हा गनिमीकावा पार पाडावा लागतो. तसे पाहिले तर बदली ड्रायव्हरला नुसताच बाळगून फायदा नाही, तर त्याचा वेळोवेळी काळजीपूर्वक वापर करता यायला हवा. बदली ड्रायव्हर लावून सुखाचा प्रवास सुरु झाला की गाडीला वाटते आपल्यामुळेच ड्रायव्हर जोराचा मारतोय तर बदली ड्रायव्हरला मात्र कळून चुकते की आपण दूर झाल्यावर गाडी गंजलीच म्हणून समजा. म्हणून तोही सहसा पळून जाण्यापासून जपत असतो. अर्थात गाडीलाही गॅरेजमध्ये पडून राहण्यापेक्षा ड्रायव्हरला दौड दिल्याचे विलक्षण समाधान लाभत असतेच म्हणा. तिलाही चालू स्थितीत फार बरे वाटत असावे. शेवटी काय तर एकमेकांवर अवलंबून राहण्यात बरेच फायदे गवसतात. जसे की बदली ड्रायव्हर!
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3925 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

छान छान!!

सुनील
Tue, 09/14/2010 - 03:07 नवीन
स्टेपनी लावलेली गाडी एखादा बदली ड्रायवर चालवतो आहे, असे चित्र डोळ्यासमोर आले!
  • Log in or register to post comments

अग्गायायायाया..... =)) अवांतर

धमाल मुलगा
Tue, 09/14/2010 - 18:09 नवीन
अग्गायायायाया..... =)) अवांतरः पाषाणभेद, यु टु? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

अरे वा......

निशदे
Tue, 09/14/2010 - 03:17 नवीन
सध्या तरी एवढीच प्रतिक्रिया.......आता दोन्ही धागे नीट follow करावे लागतील...........
  • Log in or register to post comments

खरं आहे तुमचं. अहो गाडी जशी

राजेश घासकडवी
Tue, 09/14/2010 - 08:11 नवीन
खरं आहे तुमचं. अहो गाडी जशी जुनी होते, तसाच ड्रायव्हरपण म्हातारा होतो. जमत नाही म्हणून वळणावळणाच्या रस्त्यांवर जाण्यापेक्षा त्याच त्या सरळ रस्त्यावर गाडी नेणं पसंत करतो. रक्त सळसळेल अशी बेफाम गाडी हाकणं तारुण्याबरोबर सोडून देतो. चांगल्या तरुण ड्रायव्हरबरोबर गाडी गेली तर तिच्यावरचा गंज उडून जातो. शॉक अॅब्सॉर्बर्सना थोडे दाणदाण धक्के बसले की इंजिन ऑईल कसं मोकळं होतं. मूळ ड्रायव्हरला संशय येऊ नये म्हणून ओडॉमीटर रिसेट करावा लागतो असं वाटेल. पण आश्चर्याची गोष्ट अशी की बदली ड्रायव्हरबरोबर ड्रायव्हिंग झालं की ओडॉमीटरचे आकडे उलटेच फिरतात. तंत्रज्ञानाचा हा अद्भूत चमत्कार आहे. मात्र ड्रायव्हरांची युनियन लय भारी आहे. लायसन असेल तरच व तीच गाडी ड्राईव्ह करावी असे नियम आहेत. आधुनिक, शहरी गाड्यांना त्या मानाने जरा मोकळीक असते. पण गावच्या रस्त्यांवर हे नियम फार काटेकोरपणे पाळले जातात. दुर्दैवाने बदली ड्रायव्हरला गुन्ह्याबद्दल शिक्षा कमी होते. गाड्यांचे हाल कुत्रा खात नाही. ही युनियनगिरी फार माजली आहे साला.
  • Log in or register to post comments

काही विशिष्ठ ड्रायवरना ४-४

शुचि
Tue, 09/14/2010 - 09:00 नवीन
काही विशिष्ठ ड्रायवरना ४-४ गाड्यांचे लायसन मिळतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

>>काही विशिष्ठ ड्रायवरना ४-४

गांधीवादी
Tue, 09/14/2010 - 09:40 नवीन
>>काही विशिष्ठ ड्रायवरना ४-४ गाड्यांचे लायसन मिळतात. त्या विशिष्ट ड्रायवरांच्या कळपात घुसून चांगले ४-५ लायसन घेऊन, फुलटू गाड्यावर मजा मारून, परत आपल्या कळपात येता येते का ? आम्हाला आमची गाडी चालवून इतका प्रदीर्घ अनुभव आलेला आहे आता रणगाडा देखील चालवू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

हम्म. म्हणजे आवडी निवडी बदलत

llपुण्याचे पेशवेll
Tue, 09/14/2010 - 10:22 नवीन
हम्म. म्हणजे आवडी निवडी बदलत आहेत तर. गाडीवरुन गाड्यापर्यंत प्रवास कसा झाला ते लिहा एकदा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी

काही ड्रायव्हर प्रोफेशनल

llपुण्याचे पेशवेll
Tue, 09/14/2010 - 09:39 नवीन
काही ड्रायव्हर प्रोफेशनल ड्रायवर असतात. विशिष्ठ वेतन घेऊन ते कोणतीही गाडी चालवू शकतात. त्यांचा अनुभव आणि जजमेंट प्रचंड असतात. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

१+

विनायक प्रभू
Tue, 09/14/2010 - 11:29 नवीन
पुपेशी सहमत अशी ड्रायविंग लायसन्सेस वय १५ लाच मिळतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

>>आधुनिक, शहरी गाड्यांना त्या

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 09/15/2010 - 02:46 नवीन
>>आधुनिक, शहरी गाड्यांना त्या मानाने जरा मोकळीक असते. पण गावच्या रस्त्यांवर हे नियम फार काटेकोरपणे पाळले जातात. गैरसमज आहे मालक तुमचा. ते राज कपूर च्या सिनेमात ठीक आहे, गावकरी भोळे आणि शहरातील माणसे चालू वगैरे. गावकरी लई पुढे हायेत बगा. तुमच्यासारक्या शेरातल्या मानसांना काय बी खबर लागनार नाही तिते काय चालते याची. :) बाकी प्रतिसाद नेहमीप्रमाणे क...ड...क
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

क....ह्......र......

सविता
Tue, 09/14/2010 - 13:28 नवीन
क....ह्......र......
  • Log in or register to post comments

वा वा वा एक धागा कमी पडत होता

गणपा
Tue, 09/14/2010 - 15:44 नवीन
वा वा वा एक धागा कमी पडत होता म्हणुन हा दुसरा :)
  • Log in or register to post comments

अगागागा

भडकमकर मास्तर
Tue, 09/14/2010 - 16:11 नवीन
अतिशय मार्मिक विवेचन...
  • Log in or register to post comments

हाण्ण !!

सुहास..
Tue, 09/14/2010 - 17:16 नवीन
हाण्ण !!
  • Log in or register to post comments

चान चान

सूड
Tue, 09/14/2010 - 18:31 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

हा हा हा

अवलिया
Tue, 09/14/2010 - 18:39 नवीन
हा हा हा
  • Log in or register to post comments

चालू द्या....

सुनील
Tue, 09/14/2010 - 21:30 नवीन
चालू द्या!!!!!
  • Log in or register to post comments

हा हा हा

चिंतामणी
Wed, 09/15/2010 - 00:53 नवीन
बदली ड्रायव्हरला घेतलेय हे मुळ ड्रायव्हरला कळू न देण्यातच खरा मुरब्बीपणा. बदली ड्रायव्हरला घेतल्याची खबर कोणालाही लागू न देता हा गनिमीकावा पार पाडावा लागतो. हा उतारा दिसतोय (अर्थातच सुज्ञास अधिक सांगणे न लगे")
  • Log in or register to post comments

PSPO झाला बघा तुमचा. अरे इसको

पाषाणभेद
Wed, 09/15/2010 - 01:03 नवीन
PSPO झाला बघा तुमचा. अरे इसको विडंबन नय मालूम!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

इथे

अथांग
Wed, 09/15/2010 - 04:02 नवीन
माननीय श्री. दादा कोंडके यांचे अनुयायी वावरताहेत असा भास मला उगीचच होतोय की काय? काहिही म्हणा, वाचून करमणूक चांगली झाली.
  • Log in or register to post comments

(विषय दिलेला नाही)

Pain
Wed, 09/15/2010 - 04:33 नवीन
:D
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा