अंडा बिरयाणी,हॉटेलचा शेट व टीव्हीवरची मालिका.

शानबा५१२'s picture
शानबा५१२ in जनातलं, मनातलं
11 Sep 2010 - 9:54 am

नमस्कार्,नमस्कार.......
मिपाला तीन वर्षे झाली.खुप फास्ट प्रगती चाललेय.होउ दे,आपल्याला काय त्याचा फायदा होणार नाही.पण शुभेच्छा द्यायला पैसे लागत नाहीत,म्हणुन शुभेच्छा(कोरड्या) देतो.

आता सुरु करतो.

त्यादीवशी सकाळी खजुर जरा जास्त खाल्ले,म्हणुन जरा जास्त excite झालो होतो.डोळ्यांना फील्टर लावल्याप्रमाणे सगळीकडे स्त्रीयाच दीसत होत्या.एक जुन्या ओळखीची दीसली.मी "गुड मॉर्निग" म्हणालो.तिनेही काही न म्हणता फक्त नाजुक हसुन दाखवल,मी "चल लग्न करुया" हे मनात आलेले वाक्य खुप प्रयत्न करुन अडवल.नजर वेगळीकडे वळवत सटकलो.
ह्या सर्वात कुठे अपघात तर होणार नाही ना,ही भीती मनात धरत रस्त्यावर चालत होतो.
ठाण्याला जाणा-या एस्टीत बसलो.ट्रेनची सवय असल्याने एस्टीत बसायला भेटत म्हणुन मी सारखा आनंदात असतो.
ठाण्याला एस्टी थांबली.मी कामाच्या ठीकाणी जायला रीक्षा पाहु लागलो.कंपनीची मतलबी गाडी मला न घेतल्यास पेट्रोल कमी लागेल ह्या भावनेने पाच मिनिटे आधीच सटकली होती,पण आज राग आला नाही,मी सारखा हसत होतो,विनाकारण.
".हां बसा........... कळवा,कळवा,कळवा......" रीक्षावाला अस ओरडत होता.कळव्यासारख्या जागी आपले नशीब शोधणारे भारतीय रीक्षात बसत होते.
"कळवा,कळवा.........."रीक्षावाल्याच चालु होत.
"कळवतो,कळवतो............." म्हणत मी रीक्षात बसलो.माझा जोक आवडला असेल म्हणुन मी बाजुला बसलेल्या फ्रेंच कट व शेंडी ठेवलेल्या माणसाकडे बघुन हळुच पण छानपैकी हसलो.
"सकाळी सकाळी काय फालतु जोक मारतोय,यडपट साला!" अशा नजरेने त्याने माझ्याकडे बघितल.
मला मान बाहेर काढुन हवा घेणे जास्त सुरक्षित वाटल.
रीक्षा माझ्या मंजिलवर येऊन थांबली.३-४ रुपये रीक्षावाल्याला द्यावेत ह्या उदात्त हेतुने मी वीसची नोट देत,
"छुट्टा रहने दो,रहने दो!" अस म्हणालो.
रीक्षावाला थोडा वैतागत म्हणाला"ओ साब्,क्या छुट्टा रखु? पच्चीस रुपया हुआ,और पाच रुपया दो"
मी माझा पोपट झाला हे दु:ख मनात ठेउन खुर्च्या तोडायच्या कामावर निघालो.
आजचा दीवस भलताच अतरंगी आहे,ह्याची सर्व सिग्लल्स मिळाली होती.

आता मेन गोष्ट,
लंच टाईम झाला.मी मनावर दगड ठेउन त्या फालतु हॉटेलमधे शिरलो.तिथले वेटर काम जास्त करतात म्हणुन की अजुन काही माहीती नाही,पण सारखे येरवडा जेलमधे निष्पाप असताना सक्तमजुरी भोगावी लागत असल्याचे भाव चेह-यावर असतात.
"एक अंडा बिरयाणी ला"मी म्हणालो.
"जी" माझी होणारी बायको असल्यासारखा लाडात येउन तो म्हणाला.
गल्ल्यावर बसलेला शेट माझ्यापासुन ४० अंशाच्या कोनात समोर बसला होता.माझ्या मागे डोक्यावर जरा जास्तच वर बसवलेली एक टीव्ही होती.मला ती बघायला थोडेसे वळावे लागत होते.
मालक "टाईम क्या हुआ रे" अस ओरडत होता.
मी(मनात) : अरे मेल्या वर घड्याळ बघ ना,कशाला त्या दु;खी आत्मांना समोर आणतोस?
शेट त्याचा आवडता कार्यक्रम चालु झाला म्हणुन अ‍ॅडजस्ट होउन बसला.सेट मॅक्सवर स्वप्निल जोशी ज्या कार्यक्रमात काळा गुजराती बनला आहे,तो कार्यक्रम चालु होता,कदाचित त्याच नाव 'पापडपोल' आहे.
कार्यक्रम पाहताना शेट पैसे मोजतानाही टीव्हीवरची मालिका मिस होणार नाही ना,ह्याची काळजी घेत होता.
"ह्याला अंडा बिरयाणी का बोलाव?" असा प्रश्न निर्माण करणारं व्यजन समोर आले.
मी वैतागुन खाउ लागलो.
शेट हसत होता,मधेच चेहरा गंभीर करुन पहात होता.बोलल्या जाणा-या डायलॉग्सवर विचार करत होता.ब्रेक झाला की कार्यक्रम पुन्हा सुरु होईपर्यंत टीव्हीकडे पाहात नव्हता.

माझी अंडा बिरयाणी अर्धी खाउन झाली तेव्हा कार्यक्रम संपायला आला आहे,अस स्वप्निल जोशीच्या डायलॉग्स व कॉमेडी मालिकेचा करुण्,दु:खी शेवट करु पाहणारे म्युजिक ह्यावरुन वाटले.मला फक्त आवाज स्पष्ट ऐकायला येत होता.
स्वप्निल जोशी रडक्या आवाजात काहीस अस म्हणत होता,"आप हमारे पास पैसे नही ईसलिये हमसे नाता नही बनाना चाहते.क्या मेरा गरीब बाप पैसे नही ईसलिये जी नही सकता,राजेशबाबु? बताईये राजेशबाबु,हम क्या करे?" आवाजात दर्द होता.मी मनात त्याला "जा रे,^&*^&*$" अस काहीसे म्हणालो.
पण शेट भलाताच मग्न व भावुक झाला होता.स्वप्निल जोशीबरोबर हा रडतो की काय अशी शक्यता वाटल्याने मी शेटकडे टक लावुन पहात होतो.
स्वप्निल जोशीचा चेहरा अश्रुंनी भरला असेल हे मला आवाजावरुन समजल,शेटचे डोळे भरुन यायला लागले.मी जोरात हसणार तर नाही ह्याची मला भीती वाटायला लागली.मी हसणे दाबत आता आवडायला लागलेली बिरयाणी खात होतो.
शेटला कुणीच बघत का नाही,ह्याचे मला आश्चर्य वाटले.भरुन आलेले डोळे थोडे कोरडे झाले.
स्वप्निल जोशीने "हमारी यही गलती है के हम गरीब है!" असा अर्थाचे काहीतरी म्हणुन मोठा हंबरडा फोडला.मी लगेच शेटकडे बघितल,त्याच्या डोळ्यातुन पडलेला अश्रु त्याच्या त्याच्या गालावर घोळु लागला.मला अजुन खुप हासायच कारण पुढे मिळणार होतं.आता कार्यक्रम संपुन नाव पडायला लागली.
काउंटरवर एक बाई काहीतरी पार्सल घ्यायला आली.शेट डोळ्यावर असणारा अश्रु कसा पुसु ह्याचे उत्तर न मिळाल्याने थोडा खाली बघुनच लाजणा-या नवरीप्रमाणे "क्या चाहीये?" अस म्हणाला.
माझ्या तोंडातुन अन्न टेबलावर पडायच राहील होत्,माझ्याकडेच्या अनोळखींनी आधीच माझी वेड्यात गिणती केल्याने माझ्या हसण्याशी त्यांना काही घेणदेण नव्हत.बाई जे बोलली त्यावर शेट लगेच "नही है" म्हणाला.व बाई गेल्यावर लगेच अश्रु पुसुन हीशोबवहीत बघु लागला.
मी "अरे वेड्या ही टीव्ही सीरीयल आहे!' अस म्हणायचा मोह आवरला.
बिरयाणी थोडी तशीच ठेउन मी उठलो पण पैसे वसुल झाले होते.वेटरकडे पैसे देउन शेटकडे न बघता मी निघुन गेलो.
भावना खुप महत्वाच्या असतात,त्या मी माणसांना स्वःताशी जोडण्यासाठी वापरतो,अशा फालतु गोष्टींत रस घेणारे मला आवडत नाहीत.
असो,हा लेख माझ्या बालपणीच्या मैत्रीणीला अर्पण!

कथाविचार

प्रतिक्रिया

मराठमोळा's picture

11 Sep 2010 - 10:10 am | मराठमोळा

>>मिपाला तीन वर्षे झाली.खुप फास्ट प्रगती चाललेय.होउ दे,आपल्याला काय त्याचा फायदा होणार नाही.पण शुभेच्छा द्यायला पैसे लागत नाहीत,म्हणुन शुभेच्छा(कोरड्या) देतो.

पुढचे काहीही वाचलेले नाही.

तद्दन भिकार लेखाचा आणि लेखकाचा तीव्र निषेध!!!!
इथे पैसे देऊन्/घेऊन कुणीही येत नाही मि. शानबा..
इथे फक्त माणुसकी जपणारे लोकं येतात . (फॉर युवर काईंड इंफरमेशन)

( वेळी अवेळी दारु पिऊन काहीही लिहु नये )

शानबा५१२'s picture

11 Sep 2010 - 10:11 am | शानबा५१२

आपणास उपचाराची अवश्यकता असावी.
कोरड्या शुभेच्छा एवढ्या वाईट असतात का?
आमच्याबाबत व्ययक्तिक आकस असल्यास खरडवहीचा वापर करावा.
बाकी जे तुम्ही बोलताय तेच माझे विचार आहेत.पण मी ह्या विचाराच्या विरोधात अस काय म्हणालो?

हा,व्हा सुरु!

शानबा५१२'s picture

11 Sep 2010 - 10:15 am | शानबा५१२

'मला कुणाच्या प्रगती,आनंद ह्यात काहीच रस नसतो.मी शुभेच्छा देतो त्याही कोरड्या देतो,मनापासुन देत नाही' असा अर्थ अभिप्रेत होता.
लेखाचा त्य्च्याशी काहीच संबंध नाही,तरीही तुम्हाला त्रास असल्यास तो आपला प्रश्न आहे.

चालु द्या...............य्या भिशुम,य्या भिशुम!!

शानबा५१२'s picture

11 Sep 2010 - 10:31 am | शानबा५१२

( वेळी अवेळी दारु पिऊन काहीही लिहु नये )

आंधळ्याला सर्व जग आंधळ दीसत अस म्हणतात.

जीभेचा ताबा(कधीकाळी असला तर) तुम्हाला सोडताना काही वाटत नाही का?

आता कुठे आहात्,जास्त झाली का?

क्रुपया हा लेख व प्रतिक्रीया ऊडवल्या जाव्यात ही विनंती

शानबाभौ. तुमी लिव्हता चांगलं. तुमचा संदेश बरुबरबी असतो.
तुमी एक चांगला मित्र मिपावर करा.
त्याला तुमचं लिव्हलेले लेखावर हात फिराला लावा.
लैखन लय जोमदार व्हईन.

बाकी, आपूनच लिव्हलेल्या लेखनावर उग्गच प्रतिसाद
उगाचच्या उगा कौल हे काय बरं वाटत नाय गड्या.
आन् तेवढं प्रतिसादात येणारं चित्र काढता आला तर पाहा.

(शानबाचा सवंगडी) बाबुराव :)

प्रशान्त पुरकर's picture

11 Sep 2010 - 11:17 am | प्रशान्त पुरकर

शानब्या

का रे बाबा विनकारण वाद ओढ्वतोस प्रत्येक वेळेस, (रितसर सान्गुण पण ID cancel करता येतो..)

गोगोल's picture

11 Sep 2010 - 12:24 pm | गोगोल

म्हणून काहीही लेख टाकतो?
यू आर वेरी डेस्परेट .. गेट मॅरीड.

शानबा५१२'s picture

11 Sep 2010 - 12:29 pm | शानबा५१२

पहीली गोष्ट म्हणजे मी सध्या म्हणजे ह्यावेळेस काही करत नाहीये त्याला थॉडा वेळ आहे.

आणि काय रे बाबा चुकीच लिहल आहे.तुमचा कशाने तरी मनास्ताप झाला त्यात माझी काय चुक?

काय चुकीच लिहलेय ते सांगा नंतर टीका करा.

राजेश घासकडवी's picture

11 Sep 2010 - 12:40 pm | राजेश घासकडवी

शानबा,

लेख जमून गेला आहे. (त्यातला मिपाला कोरड्या शुभेच्छा चा भाग थोडा गालबोट लावून गेला) थोडा अजून विस्तार झालेला आवडला असता. क्षुल्लक घटनांकडे तऱ्हेवाईक दृष्टीतून बघण्याची अदा आवडली. काही काही वेळा टारझनच्या शैलीचा भास झाला. असंच लिहीत रहा.

प्रदीप's picture

11 Sep 2010 - 8:26 pm | प्रदीप

अगदी सहमत. भन्नाट लेख, तिरकस शैली, साध्यासुध्या घटनांकडे बघायची सिनीकल निरीक्षणशक्ति.. आवडले (मिपाला दिलेल्या कोरड्या शुभेच्छा सोडून).

हा लेख कुणी 'वेळी-अवेळी दारू' पिवून लिहीला असेल असे वाटत नाही. आणि तसे ते असलेच तर 'वेळी अवेळी दारू पित रहा, आणि असेच लिहीत रहा'.

llपुण्याचे पेशवेll's picture

12 Sep 2010 - 10:43 am | llपुण्याचे पेशवेll

शानबा५२ हाच टारझन आहे. ;)

शानबा५१२'s picture

12 Sep 2010 - 10:59 am | शानबा५१२

अरे नही भाय्,हम तो एक मामुली आदमी हु,आप सब के सामने का लिखुंगा हम?

चद्दर का पता नही......फैलाये का...............तंबुरा??

चिरोटा's picture

11 Sep 2010 - 12:52 pm | चिरोटा

लेख बरा जमलाय शानबा.बिर्याणी खातानाची केलेली निरिक्षण शक्ती आवडली.

पाषाणभेद's picture

11 Sep 2010 - 2:28 pm | पाषाणभेद

हॉटेलमधे मालकीण असती तर तिचे रडणे समजू शकतो पण मालक रडतो तेही हॉटेलातला हे नविनच.
हॉटेल सांभाळणे हे काही खाऊचे काम नसते.
आपल्या या हॉटेलचे मालक कसे सांभाळतात सगळ्यांना. त्यांच्याकडे शिकवणी लाव म्हणावं त्याला!

सुनील's picture

11 Sep 2010 - 2:48 pm | सुनील

छान आहे. कथेच्या शेवटी "कोरड्या" शुभेच्छांचा अर्थ समजला!

असेच लिहित चला.

अर्धवट's picture

11 Sep 2010 - 8:38 pm | अर्धवट

ठीक.. पण अनुभव म्हणुन लिहा हो.. उगच संस्थळांचे उल्लेख धाग्याचं काश्मीर करतील..
(का हाच छुपा उद्देश असावा..)

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Sep 2010 - 12:03 am | बिपिन कार्यकर्ते

मी थोडासा राजेश आणि प्रदीप यांच्याशी सहमत आहे. एवढी चांगली कुवत वाया जाऊ नये म्हणून मी थोडासा आटापिटा केला होता.

शानबा५१२'s picture

12 Sep 2010 - 12:33 am | शानबा५१२

बिपीनदा,मी का ते नक्की माहीती नाही,पण तुझा मनापासुन आदर करतो.

मी खरच कोणताही खोडकर उद्देश ठेउन काही लिहल नव्हत रे!माझ्या ध्यानी मनीही नव्हत की कोणाला असा आक्षेप असुन शकेल म्हणुन.
तशी रीतसर माफीही एका वेगळ्या लेखात मागितली आहे.

ह्याआधी खुप वेळा बोललो असेन आता परत म्हणतो 'पुन्हा असे वागणार नाही'

मस्त!!!!
लेख आवडला!! खूप हसले :)

चिगो's picture

12 Sep 2010 - 10:27 am | चिगो

छान लेख...

विनायक प्रभू's picture

12 Sep 2010 - 11:20 am | विनायक प्रभू

खजुर अ‍ॅफ्रोडेझिक असतात?

शानबा५१२'s picture

12 Sep 2010 - 12:00 pm | शानबा५१२

हो,खजुर aphrodisiac असतात ना,काही in vivo उष्णता निर्माण करणा-या गोष्टी असे परीणाम देतात.म्हणुन २-३ तीन खजुर खाल्यावर पाणी पियावे.पाणी उष्णता कमी करण्यास बाकी खजुर आपला परीणाम दाखवणारच.

मनात खराब विचार यायला काही खाव लागत नाही व काही खाउन मनात खराब विचार आपोआप येत नाहीत.

more correctly its sexual power enhancer,it does not provoke any DESIRE.

मी खातो कारण मला लोह संबधीत deficiency आहे/होती.खजुर खाउन मोसंबीचा ज्युस आठवड्यातुन दोनतीनदा घ्यावा ,तरच खजुर खाल्याचा १००% फायदा मिळेल.

हे सर्व माहीती देण्याच्या उद्देशाने सांगितले.