आनंदात जगा

स्पा's picture
स्पा in काथ्याकूट
26 Aug 2010 - 3:34 pm
गाभा: 

आनंदात जगा
आयुष्य एकदाच मिळत :)

प्रतिक्रिया

स्पा's picture

26 Aug 2010 - 3:46 pm | स्पा

:(

शेलार मामा मालुसरे's picture

27 Aug 2010 - 10:12 am | शेलार मामा मालुसरे

'मी शिवाजीराजे भोसले बोलतो,हिम्मत असेल तर अडवा' हा सिनेमा तु किमान ८/१० वेळा तरी पहावास.
अरे मर्दासारखा मर्द तु हातपाय काय गाळून बसला आहेस ?
एकदा कोणत्याही गडावर फेरी मारुन ये.
४ दिवस रजा टाक्,मस्त कोकणात फिरुन ये.
वाटल्यास एखादे भन्नाट अफेअर कर .अरे तरणा पोर तू ,जोवर तुझ्या जगण्याचे इंटरेस्ट तुला गाव्ह्त नाहित तोवर तुझे मन असेच वढाय होणार.
अरे

  • या जन्मावर,या जगण्यावर शतदा प्रेम करावे,


हे ध्यानात ठेऊन जग आणी मग बघ तुझ्या जीवनात काय काय घडते.

विजुभाऊ's picture

28 Aug 2010 - 9:58 am | विजुभाऊ

व्यनी केला आहे.
फोन करा

स्पा राव
आपण लवकरात लवकर सायकियाट्रीस्टचा सल्ला घ्या. ह्या प्रकारचा आजार psycosomatic illness म्हणजे मनाचा शरिरावर होणारा परिणाम असु शकतो.

स्पा's picture

26 Aug 2010 - 3:58 pm | स्पा

मदतीची माफक अपेक्शा

मिसळभोक्ता's picture

27 Aug 2010 - 10:45 pm | मिसळभोक्ता

रावणपिठले ह्या नावाची पाककृती इथेच शोधून बघा.

सर्व आजार पळून जातील.

मृण्मयी दीक्षित's picture

28 Aug 2010 - 9:13 am | मृण्मयी दीक्षित

माझ्या मित्रांमध्ये एक असा मुलगा आहे. सुंदर शरीरयष्टी, गौरवर्ण, स्वभावहि तितकाच बोलका. पण त्याचा उजव्या डोळ्याला लहानपणीच मार लागल्यामुळे तो डोळा लाल व बारीक दिसतो. पण त्याचे राहणीमान आणि व्यक्तिमत्व पहिले तर कोणीही इम्प्रेस होईल. या बाबत त्याला विचारले असता. म्हणतो कि आता ह्यासोबत पूर्ण लाईफ जगायची आहे. एवढ्याने घुटमळून जगण्यापेक्षा just rock n roll. live ur life ....... कधी कधी एकांतात त्याला वाईट वाटते.

टग्या टवाळ's picture

26 Aug 2010 - 3:59 pm | टग्या टवाळ

जगण्यापेक्षा आत्महत्या करावी आत्महत्या पळपुटे लोक करतात तुम्ही तसे नाही आहात असता तर.................................. तुम्ही चांगल्या दवाखान्यात तुम्ही तपासनि करुन घ्या. नक्कीच फरक पडेल. आणी tension मुळे तर अस होत असेल तर tension घेउ नका जे जगाच होणार आहे ते आपल होइल. मित्रा मला तुझ्या पेक्शा जास्त tension असत पण मी मस्त टकाटक असतो सर सलामत...............................

माझे ही वजन तेवढेच होते २१ व्या वर्षी, पोहायला सुरवात केली आता वजन कसे कमी करावे या विचारात आहे :)

असुर's picture

26 Aug 2010 - 4:30 pm | असुर

रडता काय तिच्यायला,
सणसणीत खा, दणदणीत व्यायाम करा, मायला एकदा असं रुटीन सुरु करा म्हणजे दगड खाल्लेत तरी पचतील.

काय राव, जगात काय तुम्ही एकटेच काटकुळे असल्यासारखं काय करताय.
असं मस्त जगा की साला सगळ्यांना तुमचा हेवा वाटला पहिजे.

आणि हो, चांगलं दिसण्यापेक्षा चांगलं वागणं लै महत्वाचं आहे भौ!

आत्महत्या वगैरे फडतूस गोष्टींकडे अजिबात लक्ष देउ नका. आईच्यान, "आयुष्य लै सुंदर हाये, त्याला अजून सुंदर करायचं आपन" असं स्वतः नाना पाटेकर सांगून गेलाय.

--(ऐयाश) असुर

यशोधरा's picture

26 Aug 2010 - 4:37 pm | यशोधरा

असूर सुद्धा देवमाणसासारखे बोलतात की कधी कधी! :)

असुर's picture

26 Aug 2010 - 5:24 pm | असुर

त्याचं काय आहे तै, मागेच मी एकांना संगितलं, की असुर असलो तरी मर्त्य आहे मी. देवांनी (आपले देवकाका नाय वो) अमृतकुंभ पळवल्यापासून प्यायचे वांदे झाले ओ फार! त्यामुळे कोणी आयुष्याबद्दल हे असं गळा काढून रडायला लागलं ना,की आपली बत्ती गुल होते, आणि आपण सल्ले वगैरे देतो.
स्साला जगण्यामरण्याचं आम्हाला विचारा, लै टेंशन तै, अमरत्व गेल्यापासून तर आम्ही यमालापण घाबरायला लागलो आहोत. पूर्वी आम्ही येकाच हापिसात कामाला व्हतो, पन त्येंची बढती झाली.

--असुर

सूड's picture

26 Aug 2010 - 6:37 pm | सूड

येश्वदे हहपुवा ....

मेघवेडा's picture

26 Aug 2010 - 5:48 pm | मेघवेडा

>> "आयुष्य लै सुंदर हाये, त्याला अजून सुंदर करायचं आपन"
अगदी असेच! आणि अपचनाचं म्हणाल तर आधी हे असले आत्महत्येचे वगैरे निराशावादी विचार सोडा. नैराश्य आणि अपचन हे सख्खे नातेवाईक आहेत. च्यामारी आत्महत्या वगैरे गोष्टींचा विचार करत बसलात तर वजन अजून कमी व्हायचं.. काही दिवस उद्याचा विचार करायचाच नाही असं ठरवा.. "जो गया सो गया, जो आयेगा देखा जायेगा, साला आज का दिन अपना" या अ‍ॅटिट्युडनी बघा आयुष्याकडे! साला लै मजा आहे! फिकीरच नाय करायची.. आज ऐश मध्ये जगायचं बास्स..

टेन्शन नय लेनेका भाय से पूछनेका.. ;)

मृत्युन्जय's picture

26 Aug 2010 - 6:32 pm | मृत्युन्जय

असं स्वतः नाना पाटेकर सांगून गेलाय

अर्रे असुर कशाला एवढ्या लवकर घालवतोस त्याला. आहे तो अजुन. गेलेला नाय काय कुटे.

मजेत जगावे कसे हे शिवराज गोर्ले ह्यांचे पुस्तक वाचा नक्कीच काही ना काही फरक पडेल हि आशा !! पण आत्महत्त्या छे ! तसला विचारही करु नका राव जीवन एकचदा मिळत यार आणि कमी वजनानी काय फरक पड्तो tensions आयुश्यात चालतच असतात मी पण गेल्या १० वर्शांपासुन financial tensions मधे आहे आत्ता माझं वय ३४ आहे ! one thing i have learnt from life it goes on .... हे लक्षात राहु द्या !!

जिभेवरच्या तीनचार अर्वाच्य शिव्या गिळुन खालील प्रतिसाद लिहित आहोत.

काय बे रडतो.. एक काम कर.. लग्न कर.. म्हणजे आहे ही परिस्थीती बरी असं वाटायला लागेल. :)

हे खरं बोललास भाऊ लग्न कर :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Aug 2010 - 5:07 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

असा काही विचार करूही नका. माझा एक मित्र वयाच्या असाच २२-२३ वर्षाचा असताना ५० किलो वजनाचा होता, उंची ६ फूट २ इंचाच्या किंचित वर. आता त्याचं वजन ५४-५५ किलो आहे. आम्ही त्याला आधी काडीकिडा वगैरे म्हणून चिडवायचो, तो ही ते थट्टेवारी सोडून द्यायचा. माझी उंची त्याच्यापेक्षा एक फुटाने कमी आणि वजन नेहेमी माझंच जास्त म्हणून एकमेकांना चिडवून दाखवणंही होतंच. कॉलेजात असताना 'कहो ना प्यार है' आला, तेव्हापासून तो 'हृतिक' झाला आहे तो आजतागायत 'हृतिक' म्हणूनच आम्हां सगळ्यांमधे ओळखला जातो.

तुम्ही व्यवस्थित आहात, नॉर्मल आहात. काही काळजी करू नका. काही लोकं ओबीज, ओव्हरवेट असतात, तुमचं वजन थोडं कमी आहे; पण काळजी करण्यासारखं नाही असं डॉक्टरच म्हणत आहेत ना! कोणी तुम्हाला तुमच्या बारीक असण्यावरून हसलं तुम्ही त्यांना जाडे आहेत म्हणून हसा ... सगळ्यात उत्तम उपाय स्वतःवरच हसायला शिका! 'हृतिक'ही तेच करायचा, करतो आणि सगळ्या मित्रमंडळात अतिशय आनंदी प्राणी म्हणून हा प्रसिद्ध आहे.

जीव कसला देता...मस्त खा आन् तालमीत जा ..

सगळे प्रयत्न करून झाले, आनंदी राहायचे,
पण पोटात अन्न नसताना जेव्हा २ ३ तास लोकलचे धक्के खावे लागतात तेव्हा सगळा पोसिटीव attitude डब्यात जातो........
१२ तास कामाचे आणि ५ तास प्रवासाचे....
काहीच कळत नाही ......
मस्त खायला जातो आणि पोपट होतो ...............
कंटाळलोय या सर्वाला ......
मानसिक ताण एवढा वाढला आहे कि...... वेड लागेल अस वाटत...
आज हि site बघून मन मोकळं करावसं वाटलं...........

>>पण पोटात अन्न नसताना जेव्हा २ ३ तास लोकलचे धक्के खावे लागतात तेव्हा सगळा पोसिटीव attitude डब्यात जातो........

जगातलं सर्वोच्च दु:खच की हो तुमचं.. हा लेख जरा वाचा.

ऋषिकेश's picture

26 Aug 2010 - 5:46 pm | ऋषिकेश

स्वानुभवाने सांगतो लग्न करा.. वजन वाढतं :P

अर्धवट's picture

26 Aug 2010 - 5:51 pm | अर्धवट

कुणाचं ;)

थोडा थोडा व्यायाम सुरू करा.
दूध आणि केळं खा. पहील्यांदा थोड्यानी सुरूवात करा.
बी काँप्लेक्स च्या गोळ्या घ्या.

नगरीनिरंजन's picture

26 Aug 2010 - 5:56 pm | नगरीनिरंजन

१. अमुक एका वयाच्या, अमुक एका उंचीच्या माणसाचं अमुक एक वजन असलं पाहिजे असा काही नियम नाही
२. अमुक एक रक्कम महिन्याकाठी मिळालीच पाहिजे आणि त्यासाठी अमुक एक नोकरी करत राहिलं पाहिजे असं नाही
३. हे जग, नातेवाईक, समाज आपल्यासाठी आहे, आपण त्यासाठी नाही. कोणी चिडवत असेल तर फाट्यावर मारा.
४. सगळ्यानाच मरायचं आहे एक दिवस. थोडी मजा करुन घ्या.
५. प्रत्येक माणूस अद्वितीय असतो. इतरांशी तुलना करु नका. इतरांच्या मताप्रमाणे जगू नका.

मन प्रसन्न असेल तर शरीर नक्की साथ देईल. काळजी सोडा.

यशोधरा's picture

26 Aug 2010 - 5:56 pm | यशोधरा

ओ स्पा, खर्र खर्र सांगा, हा असला धागा टाकून, तुम्ही सगळे कसे कळकळीने सल्ले वगैरे देत आहेत, पाहून हसताय ना?

स्पा's picture

26 Aug 2010 - 6:05 pm | स्पा

मला फक्त मन मोकळा करावसं वाटलं, त्यातही माझी चूक झाली असेल तर माफ करा..
मी delet करतो हा धागा ..........

परिकथेतील राजकुमार's picture

26 Aug 2010 - 6:11 pm | परिकथेतील राजकुमार

त्यापेक्षा हे असले नको ते विचार आपण आपल्या डोक्यातुन डिलिट का करत नाही ?

बरोबर आहे.मनात असले प्रश्न असले कि नक्की वाटत कोणाशी तरी मन मोकळा करावा...कोणाशी बोलावं...तुम्ही केला ते बरोबरच आहे.

अहो तुम्ही असला विचार करुन काय डोक्याला ताप करुन घेताय राव !
लोकांच्या समोर कसले कसले कूटप्रश्न पडले हायेत अणि तुम्ही म्हणजे अगदीच साध्या प्रश्न्याला ढेपाळला आहात.
पहिली गोष्ट म्हणजे स्वतःला स्वीकारा.मनाशी चंग बांधा.
मी असाच आहे आहे आणि असाच राहणार.कोणाचा काही म्हणणं.

हे मनाशी पक्का ठरवा.
खूप खा.खूप मजा करा.खूप झोपा. आयुष्यात सुख सोधता आलं तर भरभरून आहे ...नाहीतर काहीच नाही.

आयुष्य खूप सुंदर आहे त्याला आणखी सुंदर बनवा.

ज्ञानोबाचे पैजार's picture

26 Aug 2010 - 6:45 pm | ज्ञानोबाचे पैजार

अरे मर्दा काय चालवलय हे? अरे धागा डिलीट करतो काय? आत्महत्या करतो काय? कसे रे तुम्ही असे. माणसाने कसे टणक असावे. दोन घ्यावे आणि दोन द्यावे. आणि आनंदात रहावे. (जरा व्यनि मधुन तुझा पत्ता कळव तुझ्या घरी येउन थोबाड फोडतो तुझे, साला फक्त २४ वर्षांचा तु, काय दुनिया पाहीलीस रे म्हणुन आत्महत्या करायला निघाला आहेस?)

आणि कायरे? खायला काय हवे ते तुझे तुला कळत नाही? चार वर्ष काय हवेवर जगलास?
लेका, लोक काय काहीही सांगतील. तु काय सगळे खात सुटणार काय? तुला काय पचते ते आठवुन बघ आणि तेच खा ना.

आणि वजनाचे म्हणशील तर काही मनावर घेउ नकोस गड्या. त्या पे़क्षा आनंदी रहायला शीक. असा कुढत रडत बसु नकोस. वजन वाढवण्याच्या तर मुळीच फंदात पडु नकोस.

अरे हे काय वय आहे का तुझे आत्महत्या वगेरे करायचे?

संध्याकाळी मस्त समुद्रावर, बागेत फीरत जा. महीन्यातुन एकदा तरी लांब डोंगरावर वगेरे सहलीला जात जा. पेपर तर अजिबात वाचु नकोस. टी.व्ही. वर सुध्दा कार्टुन नेटच पहात जा. जमलेच तर एखादी पोरगी पटव. मग बघ कस छान वाटेल तुझे तुलाच.

चार महीन्यांनी इकडेच एक धागा काढ " मैत्रीणिला कोणती भेटवस्तु द्यावी ?"

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Aug 2010 - 6:47 pm | बिपिन कार्यकर्ते

मी delet करतो हा धागा ..........

प्रयत्न तर करून बघा... ;)

खुद के साथ बातां: स्वसंपादनाच्या चर्चा वाचलेल्या दिसत नाहीयेत स्पाशेठने. ;)

अहो स्पा, स्वतःचं मन मोकळं करताना, इतरांच्या मनावर का ओझी ठेवताय?

प्रदीप's picture

26 Aug 2010 - 7:37 pm | प्रदीप

प्रथम तुम्ही स्पा ह्यांच्या इंटिग्रीटीबद्दलच शंका व्यक्त केलीत. मग त्यांनी थोडा त्रागा करून 'धागाच डिलीट करतो' म्हटल्यावर आता तुम्ही इतरांच्या मनावर ओझी का ठेवताय असे विचारताय! कुणी काही कोठेही लिहीले की ते वाचावयाचे बंधन वाचकांवर नसते. तेव्हा हा धागा त्रासदायक वाटत असेल तर खुशाल वगळून पुढे जावे की!

ह्या व्यक्तिने अगदी विमनस्क स्थितीत जे काही लिहीले आहे, त्यावर काही त्यांना धीर देण्यासारखे लिहीता येत नसेल तर ते ठीक आहे, (मलाही ते जमलेले नाही). पण दुसर्‍यांविषयी किमान आदर व विशेषतः अशा स्थितीविषयी अनुकंपा असावी, ती तुमच्या ह्या प्रतिसादांत अजिबात दिसून येत नाही.

प्रदीपजी, स्पष्ट सांगायचे तर, खरोखर विमनस्क स्थितीतली व्यक्ती, दुर्दैवाने जी आत्महत्येच्या टोकाच्या विचारापर्यंत पोहोचलेली असेल, ती धागा काढत बसेल ह्यावर विश्वास ठेवणे मला तरी कठीण जाते. बाकी स्पा ह्यानी आदर किंवा अनुकंपा व्यक्त करण्यासारखे काही केले, की मी अनुक्रमे आदर व/ किंवा अनुकंपा व्यक्त करेनच.

केवळ वजन कमी आहे आणि ते वाढत नाही ह्या कारणासाठी जीव देण्याचा मूर्खपणा आदरास किंवा अनुकंपेस पात्र आहे, असे मला व्यक्तिशः वाटत नाही.

प्रदीप's picture

26 Aug 2010 - 7:57 pm | प्रदीप

बाकी स्पा ह्यानी आदर किंवा अनुकंपा व्यक्त करण्यासारखे काही केले, की मी अनुक्रमे आदर व/ किंवा अनुकंपा व्यक्त करेनच.

एखाद्या नवीन सभासदाविषयी , आणि खरे तर कुठल्याही सभासदाविषयी आदर असावा हे लई नाही मागणं! त्यांच्या लिहीण्यातून त्यांच्याविषयी उघड अनादर व्यक्त करावा असे त्यांनी काही केलेले नाही.

मी त्यांच्या लिखाणातून जे समजलो त्यानुसार नुसते वजन कमी आहे इतकाच त्यांचा प्रॉब्लेम नाही. त्यांना बद्धकोष्ठाचा विकार जडला आहे, त्यामुळे दिवस बेचैनीत जातो. त्यातून १२ तास काम करायचे असते व जाण्यायेण्याचा प्रवास ३ तासाचा असतो. विकारामुळे आलेल्या निरूत्साहामुळे हे सगळे जीवावर येत आहे, असा एकंदरीत सूर आहे.

कुठल्या परिस्थितील व्यक्तिने येथे काही लिहावे व मन मोकळे करावे ह्याविषयी माझेतरी तुमच्या एव्हढे ठाम आडाखे नाहीत.

१. प्रदीपजी, हा धागा असा हॅक करण्यापेक्षा आपण ख व मधून बोलू शकतो. तेह्वा इथे माझा शेवटचा प्रतिसाद.
२. दुसरी गोष्ट, मी त्यांना इथे लिहू नका असे कुठेही म्हटलेले नाही, पण पब्लिक फोरम्वर लिहिणार, तर सर्व प्रकारचे लोक प्रतिसाद देणार. माझ्यासारखे दुष्ट लोकही. त्यांनी तसे देऊ नयेत असे तुम्हीही म्हणू शकत नाही.
३. एवढीच कळकळ आहे, तर माझ्या नावाने खडे फोडण्यापेक्षा स्पा ह्यांना उपाय सुचवा.

प्रदीप's picture

26 Aug 2010 - 8:31 pm | प्रदीप

१. आपल्या ह्या संवादामुळे हा धागा हॅक (sic) अथवा हायजॅक होत आहे, असे मलातरी वाटत नाही, म्हणून ह्याचे उत्तर इथेच देतो.

२. तुम्ही त्यांना इथे लिहू नका असे कसे सांगणार? पण तुमचा सगळा रोख त्यांनी जे काही लिहीले आहे, त्याविषयी सुरूवातीस सरळ अनादर व नंतर इथे कुणी काय लिहावे अथवा काय लिहू नये असे सुचवणारा होता.

३. स्पा ह्यांच्या प्रश्नांसाठी माझ्याकदे काहीच उत्तरे नाहीत, तेव्हा मी काही त्यांना उपाय सुचवू शकत नाही. पण कमीतकमी मी त्यांच्याविषयी कसलाही अनादर तरी व्यक्त करीत नाही. जगातील अनेक बाबींवीषयी मला कळवळा आहे की, पण त्यातील बर्‍याचशा गोष्टींबद्दल माझ्याकडे काहीही समर्पक उपाय नाही हे मला स्पष्ट दिसते, तेव्हा मी त्यांविषयी गप्प रहातो. त्यात काही गैर आहे असे मला वाटत नाही. माझ्या आक्षेपांची उत्तरे तुमच्याकडे नाहीत हे ह्या शेवटच्या उर्मट सुचवणूकीतून अधोरेखित होत आहे.

यशोधरा's picture

26 Aug 2010 - 8:40 pm | यशोधरा

हायजॅकच म्हणायचे आहे, चूक सुधारल्याबद्दल धन्यवाद. शक्य असले तर बदल करते.
पण, तुमच्या एकूणच लिखाणातला विरोधाभास गंमतीशीर आहे खरा. दुसर्‍याला ज्या पद्धतीने वागू नये ह्याचा उपदेश करता, तसेच स्वतः वागता? ग्रेट हं! अजून एक शंका येते की, मुद्दामच ह्या धाग्यावर प्रतिसाद ओढत आहात की काय? तसे असेल तर फसलेच की मी! असो. आता पुन्हा नाही लिहित हं.

मुक्तसुनीत's picture

26 Aug 2010 - 8:41 pm | मुक्तसुनीत

यशोधरा आणि प्रदीप यांना एक मित्रत्वाचा सल्ला : हे ऑफलाईन नेता येईल का पाहा. धन्यवाद.

अर्धवट's picture

26 Aug 2010 - 8:47 pm | अर्धवट

मुसुसेठ.. असुदे की हितंच..
अजुन थोडी म्याच रंगली तर 'स्पा'रावांचा आत्महत्येचा इचार क्यान्सल व्हैल की, जंगी सामना बघुन.. ;)

यशोधरा's picture

26 Aug 2010 - 8:48 pm | यशोधरा

मुसुराव, मी कधीच सांगितलं होतं तसं, वर वाचा की :)

मुक्तसुनीत's picture

26 Aug 2010 - 8:54 pm | मुक्तसुनीत

.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Aug 2010 - 6:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मन मोकळं केलं ते चांगलेच केले. आपण खूप चांगले जगत आहात फक्त मनात येणार्‍या वाईट विचारांना काढून टाका. कोणतेही विचार काढून टाकण्यासाठी मनाला कशात तरी गुंतवून घेतले पाहिजे. वाचन,संगीत,मित्र मैत्रिणींशी गप्पा, काय नी काय, अशा कितीतरी चांगल्या गोष्टीत आपल्या मनाला आपण गुंतवू शकतो. आपल्या आजूबाजूला पाहिले तर, कितीतरी कठीण असे शारिरीक कष्ट सोसून, आजार असूनही आनंदाने जगणारी माणसं असतात. काहीतर इतकी भयानक असतात की, त्यांच्यापेक्षा आपण कितीतरी चांगले जगत असतो. मी आजूबाजूला जेव्हा पाहतो तेव्हा तुम्ही जे वजनाचं म्हणत आहात ते तर फार म्हणजे फारच किरकोळ वाटले. तेव्हा आनंदाने जगा. मस्त जगा.

-दिलीप बिरुटे

विवेक मोडक's picture

26 Aug 2010 - 6:19 pm | विवेक मोडक

दुनीया गेली ****त. आपण आपल्याला आवडणार्‍या गोष्टी करायच्या. गाणी ऐकायची, चांगली पुस्तकं वाचावीत, दोन चार मित्र गोळा करुन दंगा करावा. नैराष्य आपोआप पळून जाइलः-)

विसोबा खेचर's picture

26 Aug 2010 - 6:24 pm | विसोबा खेचर

पण मी काय करू आता .... खूप depression मध्ये गेलोय ...
सगळ्या टेस्ट , reports नॉर्मल आहेत ....

असं जगण्यापेक्षा आत्महत्या करावी ...
ते तरी बरं.........................................

स्वगत : आत्महत्या हाच जर उपाय असता तर या तात्या अभ्यंकराने केव्हाच आत्महत्या केली असती..!

असो..आल्या परिस्थितीला धैर्यानं तोंड देणं हाच एकमेव उपाय.. सारे दिवस सारखे नसतात.. चांगले दिवसही नक्की येतील..

सगळे रिपोर्टस् नॉर्मल आहेत म्हणता मग कसली काळजी करता..? बिनधास्त राहा, काय चाहेल ते खा/प्या! मन प्रसन्न ठेवा.. काही खाताना ईश्वराचं नाव घेऊन बिनधास्त खा.. 'हे खाऊन आपल्याला कसला त्रास होईल..' अश्या विवंचनेला मनात प्रयत्नपूर्वक थारा देऊ नका..तुम्हाला नक्की जमेल ते. विश्वास बाळगा..!

सकाळी मोकळ्या हवेत भरपूर फिरा.. तज्ञ व्यक्तिकडून प्राणायाम शिकून घ्या..

सगळं काही ठीक होईल..गॉड ब्लेस.. ऑल इज वेल..!

मनापासून शुभेच्छा...

तात्या.

विसोबा खेचर's picture

26 Aug 2010 - 6:29 pm | विसोबा खेचर

तज्ञ व्यक्तिकडून प्राणायाम शिकून घ्या..

प्राणायमाचे आश्चर्यजनक फायदे होतात..!

(भोगी आणि योगी) तात्या.

आता त्याला तुमच्याएवढा अनुभवी कुटं मिळायचा वो तात्या. ;)

jaypal's picture

26 Aug 2010 - 9:51 pm | jaypal

जमल्यास प्राणायम माडीवर जाऊन करा

संदीप चित्रे's picture

26 Aug 2010 - 7:03 pm | संदीप चित्रे

हे नाव कधी ऐकलंय?
आमच्या आप्पांना (माझे वडील) त्यांच्या तरूणपणी हा असाध्य रोग जडला होता.
शेवटी त्यांना बरोबर घेऊनच गेला !!!

त्यांना उकळून मग रूम टेम्परेचरला आणलेलंच पाणी कायम प्यावं लागायचं, बिना तेल-तिखटाचे जेवण घ्यावं लागायच (घरी रोज दोन प्रकारचा स्वयंपाक व्हायचा -- त्यांचा पथ्याचा आणि आमचा नेहमीचा), लग्नात किंवा इतर समारंभात जवळपास जेवता यायचं नाहीच कारण काही पचायचं नाही, (पुढचं वाचायला थोडं ग्रोस वाटेल पण) दिवसभरात किमान चार - पाच वेळा स्टूल्समधून रक्त पडण ही नॉर्मल बाब होती, हा आकडा जेव्हा दिवसभरातून २-२५ वेळांवर जायचा तेव्हा हॉस्पिटलला अ‍ॅडमिट करावं लागायचं, कित्येक वेळा मी आणि माझा भाऊ शाळेत / कॉलेजमधे / नोकरीवर जाताना आप्पा घरी किंवा त्यांच्या ऑफिसमधे असायचे आणि नंतर अचानक हॉस्पिटलमधे अ‍ॅडमिट झालेले असायचे ! कधी कधी त्यांना फक्त शहा़ळ्याचं पाणी, इलेक्ट्रल पावडर पाण्यात मिसळून, कॉमप्लान पाण्यात मिसळून (कारण दूध पचायचं नाही) असाच आहार चालायचा, साधं केळंही पूर्ण पिकून काळं पडल्याशिवाय त्यांना दिलं तर पचायचं नाही...... आणि अजून बरंच काही !
हे सगळं लिहलंय त्यामगचा मुख्य मुद्दा वेगळाच आहे. असं सगळं असूनही माणूस अक्षरश: जगन्मित्र होता !

त्यांना स्वतःला काहीच फारसं खाता यायचं नाही पण घरी सतत येणी-जाणी आणि सगळ्यांना आग्रह करकरून जेवायला द्यायला आवडायचं त्यांना. लग्नात किंवा इतर समारंभांत त्यांना फार काही खाता यायचं नाही पण प्रत्येक ठिकाणी आचार्‍यांना भेटून, त्यांची चौकशी करून, त्यांच्या खाण्याची वगैरे विचारपूस आवर्जून करून यायचे आणि तेही अजिबात गाजावाजा न करता ! ते स्वतः हॉस्पिटलमधे अ‍ॅडमिट असताना त्यांनी एका सहकार्‍याचे लग्न जमवून दिल्याचे माहिती आहे आणि एका हॉस्पिटलच्या कॅन्टिनमधल्या मुलाला अजून चांगली नोकरी मिळावी म्हणून बेडवर पडल्यापडल्या लोकांना निरोप पोचवून प्रयत्न केलेले पाहिलं आहे :)
आप्पांबद्दल लिहायला लागलो तर जागा पुरणार नाही म्हणून इथेच थांबतो पण शेवटी महत्वाचं एकच सांगतो की त्यांचं शरीर आजारांनी पोखरून निघाले असतानाही त्यांना तीन गोष्टी कधीच झाल्या नाहीत -- १) उच्च रक्तदाब, २) हार्ट ट्रबल आंणि ३) डिप्रेशन.

सुदैवाने तुमचं वय तुमच्या बाजूने आहे. आत्महत्या वगैरेचे विचारही सोडून द्या.
तूर्तास इतकंच सांगू शकतो :)

अर्धवट's picture

26 Aug 2010 - 7:07 pm | अर्धवट

जियो..

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Aug 2010 - 7:12 pm | बिपिन कार्यकर्ते

+२

सहज's picture

27 Aug 2010 - 10:05 am | सहज

सलाम!

छोटा डॉन's picture

26 Aug 2010 - 7:08 pm | छोटा डॉन

चित्रेसाहेबांचा प्रतिसाद आवडला.
जास्ती काही लिहण्याची गरज नाही.

>>सुदैवाने तुमचं वय तुमच्या बाजूने आहे. आत्महत्या वगैरेचे विचारही सोडून द्या.
+१, इतकेच म्हणतो.

विकास's picture

26 Aug 2010 - 9:59 pm | विकास

:-)

चतुरंग's picture

26 Aug 2010 - 7:19 pm | चतुरंग

संदीप हे माहीत नव्हतं. तुमच्या अप्पांबद्दल आदर वाटतो. इतकी प्रबळ इच्छाशक्ती आणि पॉझीटिव मानसिकता कौतुकास्पद आहे.

स्पा, मला वाटते ह्यापेक्षा जास्त काही सांगायची आवश्यकता नसावी! अरे रोज मिसळपाववर येत राहिलास तरी पुरे आहे, एकेक धागे वाचून हसून हसून आपोआप वजन वाढेल, काय बोलतो? ;)

(वजन कमी कसे करावे ह्याचा धागा काढावा का?)चतुरंग ढोले पाटील

रोज मिसळपाववर येत राहिलास तरी पुरे आहे, एकेक धागे वाचून हसून हसून आपोआप वजन वाढेल, काय बोलतो?

क ड क...

हॅहॅहॅ...

टारझनाला भेटा.....

यशोधरा's picture

26 Aug 2010 - 7:07 pm | यशोधरा

संदीप, सह्ही लिहिलं आहेस! आजूबाजूला खरोखर इतके जेन्यूईन प्रॉब्लेम्स घेऊन आयुष्याशी झगडणारी माणसं असतात! शेवटी आपला दृष्टीकोन महत्वाचा. तात्कालिक नैराश्य कोणालाही येऊ शकते, पण त्यातच बुडून, कुढत आणि स्वतःबद्दल कीव बाळगत जगायचे की त्यावरही मात करुन, आनंदाने जगायचे हे ज्याचे त्यालाच कळायला हवे!

स्पा, तुम्ही दासबोध वाचा एकदा, खरच. तुमचे नैराश्य निघून जाईल काही प्रमाणात तरी.

असुर's picture

26 Aug 2010 - 9:00 pm | असुर

>>>स्पा, तुम्ही दासबोध वाचा एकदा, खरच. तुमचे नैराश्य निघून जाईल काही प्रमाणात तरी.

+१.

आणि त्यातच मुर्खांची लक्षणे दिली आहेत ती पण वाचा! म्हणजे तुम्ही जो मुर्खपणा करायच्या विचारात आहात ना, त्याऐवजी जरा बरा विचार कराल!

--असुर

जर डोक ठिकाणावर असेल तर या माणसा पासुन स्फुर्ती घे.
Nick Vujicic from razener on Vimeo.

शिल्पा ब's picture

27 Aug 2010 - 12:17 am | शिल्पा ब

मी हा video आधी पण एकदा पहिला होता..प्रचंड आदर वाटतो या माणसाबद्दल...केवढा तो आत्मविश्वास, आयुष्य आनंदात घालवण्याची वृत्ती...सुंदर.

बेसनलाडू's picture

28 Aug 2010 - 12:20 am | बेसनलाडू

हे देखील वाचा. यांसारखी असंख्य उदाहरणे आसपास सापडतील, ज्यांच्यापासून नक्कीच प्रेरणा घेता येईल.
(उत्प्रेरक)बेसनलाडू

उत्प्रेरक बहुदा अयोग्य आहे (रसायनशास्त्रातील संदर्भ पहा). प्रेरणादायी असे म्हणा.
असच(casually) लिहिल असेल तर माझे म्हणणे सोडून द्या.

सुहास..'s picture

26 Aug 2010 - 7:35 pm | सुहास..

वय - २४, वजन ४२, उन्ची - ५ फूट ७ इंच ...>>>>
मित्रा खर सांगतो !! नशीबवान आहेस. नाहीतर वजन कमी करायसाठी काय-काय करतात लोक.

जन्मापासुन वाळका-चळका

रेवती's picture

26 Aug 2010 - 7:37 pm | रेवती

स्पा, तुम्ही चांगल्या वैद्यांकडे जाणार का?
आयुर्वेदीक औषधानं गुण यायला वेळ लागतो पण गुण नक्की येतो.
आणि ४२ किलो आहे ना वजन मग काही फार कमी नाही.
संदीपनं इतका छान प्रतिसाद लिहिलाय त्यावरून मनस्थिती आनंदी ठेवणे हे एकच काम करा.
संदीप, तुझा प्रतिसाद खूप चांगला आहे. तुझ्या वडीलांना अल्सरेटीव्ह कोलायटीस झाला होता हे सांगितलस पण त्याच बरोबर महत्वाचं सांगितलस म्हणजे त्यांना अजून कोणतेही विकार झाले नव्हते. साधेपणानं राहणे म्हणजे हळवेपणा वगैरेची लेबलं मलाही नेहमी लावली जातात पण मी माझ्या मनाच्या तब्येतीसाठी जाणिवपूर्वक निवडलेला पर्याय आहे तो. लहान वयात काही दुखण्यांनी मला झलक दाखवली. आजकाल सर्रास आढळणारे विकार "हाय!" म्हणून गेले आणि ठरवले कि यापासून लांब रहायचे. अजून तरी त्याचे चांगले परिणाम दिसताहेत.

निलेश कवळे's picture

26 Aug 2010 - 7:47 pm | निलेश कवळे

+३

रामदास's picture

26 Aug 2010 - 7:53 pm | रामदास

वर्षभर रजा घ्या.
जे आवडेल तेच काम करा.
जेव्हढे जमेल ते करा.
भूक लागेपर्यंत वाट बघा.
जर फिरतीवर गेलात तर जास्तच चांगले.
कावीळ का झाली होती याचे कारण शोधण्याचा प्रयत्न करा.
प्रेमात पडा. (म्हणजे तुम्हाला स्वतःचा विसर पडेल.)
सारखा सारखा आपलाच विचार करणं टाळा.
स्वतःची किव करू नका.

पोट अजिबात साफ होत नाही ..
ही समस्या कदाचित बर्‍याच वेळा रोगांना निमंत्रण देते.
जंत झालेत का ?
आमांश आहे का ?
असे विचारण्याचे कारण असे की पाण्याच्या वाटेने येणार्‍या या आजारांनी भारतात बरेच जण त्रस्त असतात आणि आजाराने उग्र रुप धारण केल्याशिवाय ते लक्षात येत नाही.
तुमची समस्या इरीटेटींग असेल पण आत्महत्येसाठी क्वालीफाईड नाही.

अविनाशकुलकर्णी's picture

26 Aug 2010 - 8:03 pm | अविनाशकुलकर्णी

आपल्या भावना व वेदना पोहोचल्या व आपणास सहानुभुति.
पुण्यात खरे म्हणुन खुन्या मुरलीधर जवळ एक जण आहेत ते काविळी वर औशध देतात..
वेदना असह्य झाल्या कि असे विचार मनात येतात..पण धिर सोडु नका....
त्याने दर्द दिला तो दवा हि देइल..काहि मदत लागली तर अव्श्य कळवा..
आमच्या परीने जी होईल ति नक्किच करु...
आपणास शुभेच्छ्या ..
लवकर बरे होताल ..

त्याने दर्द दिला तो दवा हि देइल..>>>
एक नंबर रे अविनाश !!

काहि मदत लागली तर अव्श्य कळवा..>>>

मला पण !!

आत्महत्येसाठी क्वालीफाईड नाही.
हा हा हा!
आत्महत्येसाठी क्वालिफिकेशन?
अजून हसतेच आहे.

मुक्तसुनीत's picture

26 Aug 2010 - 8:11 pm | मुक्तसुनीत

मला प्रस्तावकर्त्याबद्दल सहानुभूती वाटते. अशा समस्यांचे निराकरण सोपे नाही. अशा व्यक्तींच्या परिस्थितीला हलके मानण्याची चूक तरी आपण टाळू शकतो.

मला सुचलेल्या काही गोष्टी मांडतो.

आपल्या अपेक्षांचे कॅलिब्रेशन (मराठी शब्द ?) बदलण्याचा प्रयत्न करणे. आपली परिस्थिती इतरांपेक्षा थोडी वेगळी आहे, सामान्य आयुष्याच्या फूटपट्ट्या काही काळ बाजूला ठेवणे आवश्यक आहे हे स्वीकारणे गरजेचे आहे. कुठल्याही व्यक्तीला - मग ती कुठल्याही वयाची, आर्थिक स्तरातली, धर्माची, लिंगाची असो, तिला काम न करता राहाणे कधीच पसंत पडणार नाही. परंतु प्रकृतीला उतार पडेस्तोवर पूर्णवेळ विश्रांती घ्यावी हा एक उपाय आहे. नोकरी गेली तर परत मिळेल, परंतु आजारी अवस्थेत शरीराला-मनाला जीवघेण्या वाटेल अशा परिस्थितीतून घालत राहाणे हे सर्वाधिक धोक्याचे असू शकते. तुम्हाला काही काळ तुमच्या कुटुंबीय/मित्र मंडळींच्या मदतीवर राहावे लागेल, परंतु या काळात प्रकृतीत सुधारणा घडवून आणून परिस्थितीवर मात करणे हा एक उपाय आहे. जर का हे शक्य असेल तर या नोकरीशिवायच्या काळात पूर्णवेळ विश्रांती घेणे , आहाराविहारावर नियंत्रण ठेवणे , शरीर-मनाची हेळसांड होवू न देणे ही तुमची जबाबदारी राहील.

व्यायम , योग्य आहार , विश्रांती याशिवाय नवे छंद जोडण्याचा प्रयत्न करणे हा एक उत्तम उपाय आहे.

वरील सर्व बाबींकरता , काही काळ तुम्हाला नोकरीशिवाय जगता येईल अशी "सपोर्ट सिस्टीम" असणे मी अध्याहृत धरतो आहे. ती बिलकुलच नसेल तर... तुम्हाला हिम्मत एकवटावीच लागेल.

रामदास's picture

26 Aug 2010 - 8:21 pm | रामदास

माझ्या मित्राच्या मुलाच्या सर्व अंगाला एक विचीत्र एक्जीमा झाला होता .
लहानपणी दम्यावर दिलेल्या औषधानी तो झाला असावा असे डॉक्टरांचे मत .
दिवसभर अंग खाजवायचा .
रात्रभरात सेकंडरी इन्फेक्शन व्हायचे मग त्यातून रक्तस्त्राव .
दिवसभर गुरासारखा रडा ओरडायचा .
अंगावर कपडे घालता येत नव्हते.बायका वापरतात तसा निळा गाऊन घालून बसावे लागायचे.(बिन बटनाचा)
रात्री झोपेत खाजवू नये म्हणून हात बांधून ठेवावे लागायचे.
त्यात भरीतभर म्हणून डॉक्टरांनी दिलेल्या औषधांनी त्याला स्त्री सारखे स्तन आले.
कॉलेजला जाता ये ईना. वर्गातली मुले त्याच्या बाजूला बसायची नाहीत.मग त्याचे ऑपरेशन .
दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला .त्याच्या पालकांनी उपचार आणि प्रार्थना यावर विश्वास ठेवला.
रोग आला तसा गेला. मुलगा आता फायनल इंजीनिअरींगला आहे .
तेव्हा डॉक्टरांनी त्याला हेच सांगीतले होते .
यस.इरीटेटींग बट नॉट इनफ फॉर सेल्फ डिस्ट्रक्शन.

माणूस म्हणून जगताना
हा एक हिशोब करुन तर बघा!
“किती जगलो” याऐवजी “कसे जगलो”?
हा एक प्रश्न जरा मनाला विचारुन तर बघा!
कधी असेही जगून बघा…..
संकटांमुळे खचून जाणारे तर शेकडोंनी मिळतात
कधीतरी अडचणींवर मात करण्याची हिम्मत दाखवुन तर बघा!
अतिसामान्य जीवन नशीबी असले म्हणून काय झाले?
कधीतरी सामान्यातले असामान्य होण्याची जिद्द दाखवून तर बघा!
चिमणीसारखा जन्म मिळाला असला तर काय झाले?
आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करुन तर बघा!
कधी असेही जगून बघा…..
आयुष्य रोजच वेगवेगळे रंग उधळते
त्या रंगांमधे आनंदाने रंगून तर बघा!
तसे जगायला काय?कुत्रे-मांजरीही जगतात हो
कधीतरी माणूस म्हणुन स्वतःच्या जगण्याचा उद्देश शोधून तर बघा!
कधी असेही जगून बघा…..
कविता माझि नाहि पन तुमच्या आरोग्यासाटीं

चतुरंग's picture

26 Aug 2010 - 8:41 pm | चतुरंग

इथे येत रहा. तुमचं मन मोकळं करत रहा. काय वाटते ते सांगत रहा. तुमच्या लिखाणावर क्वचित विचित्र प्रतिक्रिया आल्या तरी येणे थांबवू नका, लिहिणे थांबवू नका. आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष बघू शकत नसलो तरी मिसळपाव ही एक फार मोठी ताकद आहे यावर विश्वास असूदेत, हे वेळोवेळी दिसून आले आहे.
मिसळपावचे सदस्य हे तुमचे मित्रमैत्रिणी आहेत ते तुमच्या दु:खात आणि आनंदात सामिल आहेत. संवाद साधत राहिलात की उपाय सुचत जातात, वाटा दिसायला लागतात, प्रश्न सुटायला लागतात.
तुम्हाला ह्या निराश मनस्थितीतून बाहेर येण्यासाठी शुभेच्छा! :)

---------------------------------------------------
आता तुमच्या काविळीबद्दल. मला स्वतःला १० व्या वर्षी आणि पुन्हा १३-१४ व्या वर्षी अशी दोन वेळा कावीळ झाली होती. काविळीने लिवरवर परिणाम होतात आणि ते दूरगामी असतात. मला स्वतःला पोटाचे वेगवेगळे छोटेमोठे विकार पुढे बरीच वर्षे होत राहिले. हळूहळू त्यातून बाहेर पडलो. आहारावरील नियंत्रण आणि मुख्यतः पाणी स्वच्छ करुन उकळून गार केलेले पिणे हे अत्यावश्यक.
सकाळी नाष्टा न करता बाहेर पडू नका. सगळ्यात साधा आणि पौष्टिक नाष्टा एक कप गरम चहा आणि एक चपाती. रोज घ्या.
दुपारचे जेवण अतिशय हलके असूदे साळीच्या लाह्या आहारात असूदेत. रात्री सूर्यास्ताच्या सुमारास जेवा. रात्रीचे जेवण आणि झोप ह्यात कमितकमी २ तासाचे अंतर असूदेत. वजनाबद्दल चिंता करु नका. चिंतेने बद्धकोष्ठ वाढते.
---------------------------------------------------
तुम्हाला वैद्यांना भेटायचे असल्यास मला व्यक्तिगत निरोप पाठवा.

(पर्यायसूचक)चतुरंग

तुमच्या बद्दल सहानुभूती आहेच तरीही वरील सर्वांनी आपणहून दिलेल्या सल्ल्यांमुळे साला आपला मन भरून आला...

संवाद हा काय काय चमत्कार घडवू शकतो...
एकेमेकाविषयी वाटणारी कळकळ हि अशी सहजी मिळत नाही हो...
मिसळपाव rocks !!! :)

अशक्त's picture

26 Aug 2010 - 8:50 pm | अशक्त

मित्रा माझहि वजन ४५ होत वयाच्या २५ व्या वर्षि.
घरा शेजारि नविन जिम सुरु झालि म्हणुन मी जाउ लागलो. खायच एक रुटिन ठरवल. लगेच फरक जानवु लागलाय. नेटावर शोध वजन कस वाढवायच ते. युट्युब वर बघ skinny to muscle बरिच सापडतिल.

रोज कमित कमि ३००० calories खाव्या लागतिल. पण प्रमान काय असाव यासाठि ही साइट बघा. http://www.dietitian.com/calcbody.php . कोणत्या अन्नात हे घटक असतात ते नेटावर पाहुन घ्या.
कमि आहारामुळे पोट साफ होत नाही हा माझा अनुभव आहे.

मांसाहार करित असाल तर उत्तम. व्यायाम भरपुर आणि रोज कमित कमि एक तास करा. १ दिवस upper body, १ दिवस llower body अस रोज पहिले २ महिने न चुकता करा. (cheat on your girlfreind not your body). जिम नसलि तरि हरकत नाहि डम्बेल्स मिळतात जुन्या बाजारात. तुमच्या जवळ वेळ असेल तर p90x http://en.wikipedia.org/wiki/P90X प्रकार करुन पाहु शकता. विडिओज टोरंट वर मिळतिल.

माझ वजन सध्या ५५ आहे. सध्या तरि पुरेस वाटतय.

जाता जाता: "पाणी" लागल्याशिवाय वजन वाढत नाही अस ही ऐकुन आहे. अनुभव घेत्ल्यावर सांगेन.

चतुरंग's picture

26 Aug 2010 - 8:57 pm | चतुरंग

तुम्ही दिलेले सल्ले उत्तम असले तरी स्पा यांनी वर्णन केलेल्या आत्ताच्या स्थितीत त्यांना व्यायामापेक्षा योग्य आहार, औषधोपचार आणि विरंगुळा ह्यांची जास्त गरज आहे असे दिसते. एकदा तब्बेतीच्या तक्रारी दूर झाल्या/कमी झाल्या की व्यायाम करता येऊ शकेल असे वाटते.

(सावध)चतुरंग

अशक्त's picture

26 Aug 2010 - 9:11 pm | अशक्त

वेळ वाया घालवु नये हेच मत आहे. मी सुद्दा हिच चुक केलि होती.सुरु करता करता ४-५ वर्षे वाया घालवली. व्यायामा नंतर तब्येतिच्या तक्रारी आपोआप दुर झाल्यात.

पुण्या-मुंबई मधे असाल आणि महागडि जिम लावलि तर, एक वेळ वजन नाही वाढणार पण विरंगुळा ;) चांगला होतो.

नसेल जमत व्यायाम तर Art of living वाले आहेतच.

इन्द्र्राज पवार's picture

26 Aug 2010 - 9:00 pm | इन्द्र्राज पवार

श्री.स्पा ~~ ज्या अचूकतेने (टायपिंग मिस्टेक एकही नाही) तुम्ही हा प्रस्ताव मांडला आहे, तो वाचल्यानंतर एक गोष्ट मानली पाहिजे की त्या तथाकथित वजनव्यथेने तुम्ही त्रस्त झाला असला तरी तुमची मानसिक स्थिती अजून मजबूत आहे. आत्महत्या करावी की ना करावी असा सल्ला ज्यावेळी एखादी व्यक्ती खुल्या मंचावर मांडते त्यावेळी ती ९९% न करावी याच मताची असते (आणि देव करो तुम्ही याच मताचे असावे). आत्महत्या हे शूरपणाचे नसून भेकडपणाचे लक्षण आहे हे लक्षात ठेवा. आयुष्याच्या प्रवासात आतापर्यंत वजनाशिवाय अनेक टक्केटोणपे तुम्ही पचविले असतील (रोजच्या लोकल प्रवासात तर घडीघडीला अनुभव घेत असालच) त्यामुळे वजनाची डोकेदुखी - जी केवळ योग्य क्वालिफाईड डॉक्टरच सोडवू शकतो, बाकीचे केवळ उपाय सुचवू शकतात - हा एक मानसिक खेळ आहे असे समजून या किचकट रायडरकडे पाहाल तर गणित सुटायला वेळ लागणार नाही.

नाझीच्या छ्ळछावण्यातून केवळ अस्थिपिंजर (फक्त २२ ते ३२ किलो वजन) राहून वाचलेल्या हजारो ज्यू कैद्यांनी युद्धसमाप्तीनंतर पुढील आयुष्य किती यशस्वीरित्या जगले आणि स्वतःचाच नव्हे तर देशाचाही उत्कर्ष कसा साधला यासंदर्भातील अनुबोधपट "फॉक्स हिस्ट्री" चॅनेलवर सातत्याने दाखवित असतात, त्याची एकादी झलक पाहायला मिळाली तर तुम्हास समजून चुकेल की, "अरे वा ! मी तर यांच्यापेक्षा जास्त नशीबवान आहे. किमान मी मोकळा श्वास तरी घेवू शकतो..."

जगण्याचा मर्क्युरी कितीही वरखाली होवू दे ~~ "तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे ?" हा प्रश्न सतत मनात ठेवा.

इन्द्रा

सूर्यपुत्र's picture

26 Aug 2010 - 9:17 pm | सूर्यपुत्र

ईथे सर्वजण म्हणतायेत की आयुष्य सुंदर आहे, पण ते कसे याबद्दल कोणी मार्गदर्शन करेल काय??? प्लीज......

अशक्त's picture

26 Aug 2010 - 9:28 pm | अशक्त

जमल्यास हा चित्रपट पहा http://www.imdb.com/title/tt0038650/

आपल्या असण्या-नसण्याचा इतर लोकांवर किती फरक पडतो ते कळेल.

मेघवेडा's picture

26 Aug 2010 - 9:32 pm | मेघवेडा

जरा आजुबाजुला डोळे उघडे ठेवुन पहा. बरेच रंजले गांजलेले दिसतील जे त्या परिस्थितीतही हसत जगत असतात.
त्यांच्या कडे पाहुन देवाचे आभार माना. वर एक व्हिडियो दिला आहेच. जमल्यास तो ही पहा.

असुर's picture

26 Aug 2010 - 9:36 pm | असुर

आवो द्येवा, आयुष्य सुंदरच असतंय. तुमी कोणता चष्मा वापरता त्यावर लै गोष्टी अवलंबून असतात. आयुष्य सुंदर दिसेल असा चष्मा आधी घालायला लागेल, मग सगळं ऑपॉप (धमु धन्स!) सुंदर दिसायला लागतं!
बाकी आपल्याला स्वतःचं आयुष्य नेहेमीच सुंदर दिसत आलंय, विदाउट मार्गदर्शन! प्रयत्न केलात तर तुम्हाला पण दिसेल. त्यासाठी हार्दिक शुभेच्छा!!!

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

26 Aug 2010 - 9:28 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

लग्न झालेलं नसेल तर एकटे आई बाबांची परवानगी घेऊन या.
आणि झालेलं असेल तर बायकोला घेऊन सपत्निक या.
सांगा एका मैत्रिणीने रहायला बोलावले आहे.जाऊन येतो...
जॉब राहु द्या बाजुला महिनाभर..
टेन्शन्,ताण्तणाव जाउ द्या बोंबलत!
आणि हे जर शक्य नसेल तर
एकच सांगते..
जे आहे ते आपलं म्हणुन स्विकारा..
आहे ना बारीक तब्येत ...that is how i am..! (अर्थात मेडिकली unfit असाल तर get yourself treated to a good consultant)
समोर आलेला प्रोब्लेम आप्ल्यापर्यन्त खुप कमी होउन आलेला आहे असा विचार करत चला..
आप्ल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण / प्रत्येक घटना ही destined असते..यावर माझा तरी नितांत विश्वास आहे.
जे येइल ते स्विकारायचं तर असतं च आप्ल्याला..
मग चिंता...आत्म्क्लेष करुन का स्विकारायचं...
आयुष्याबद्दलचा एक स्ट्राँग acceptance तयार करा मनामध्ये..!
...अरे आहे काय यार....
....be by yourself....BE YOU!

सूर्यपुत्र's picture

26 Aug 2010 - 10:01 pm | सूर्यपुत्र

हे आमंत्रण कोणासाठी आहे??? (ह्.घ्या.)

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

26 Aug 2010 - 10:07 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

जरा चार दिवस..राह्तील्,मस्त खातील पितील्..त्यांच जरा बौद्धिक घेइन...
ते चल भोपळ्या टुणूक टुणुक गोष्टीतलं आठवतं का
लेकीकडे जाते...तुप रोटी खाते...
तस>
जाई कडे जातो,तुप रोटी (झालंच तर रा.पि.,खर्डा भाकरी,चॉकलेट मूस इ.इ.) खातो..
जाडाजूड होतो...
:)

jaypal's picture

26 Aug 2010 - 10:15 pm | jaypal

आदुगरच ते प्वॉट हालका हाय म्हंनतया अन तुमी असल (रा.पि.,खर्डा भाकरी) खाया घालुन तिकीट कनफर्मच करतयासा व्हय (ह.घ्या)

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

26 Aug 2010 - 10:31 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

अहो...ते मेनु कार्डावरच एक-दोन नाव. होती....
तुमी म्हण्जे कम्माल कर्ता राव!
तुप् मेत्कूट-भात,मऊ वरण भात्,आटवल्....मुगाचं कढण(लई बोअर अस्तं ना हे)
लापशी, कढी भात,... इ इ .. हे ही आहे पथ्यपण्याचं
आणि रापि.खर्डा भाकरी हे नंतर मजबूत झाल्यावरच खाण आहे...
तेन्व्हा तरी खातील ना....

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

26 Aug 2010 - 10:46 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

पक्की कोल्हापुरी पचनशक्ती (तना-मनाची) बनवूनच पाठवते त्यांना..
खाणच काय पण आयुष्यातले कोणतेही अनुभव पचवतील ते
त्यांच्या मध्ये आत्त्ताही आहे ती ताकद...फक्त जरा पॉलीस मारावे लागेल इतकेच...!
:)
(नंतर आपल्याला कोणाचे तरी हात पाय तोडायसाठी /जर्रा माल मस्साला द्यायसाठी 'स्पा भाय' ला व्य. नि. टाकावा लागेल!)

पिंगू's picture

26 Aug 2010 - 11:10 pm | पिंगू

चल काहीतरीच काय.. वजन कमी आहे म्हणून आत्महत्या.... च्यामारी मी इथे वजन कमी करण्यासाठी व्यायामाला जुंपून घेतलय...

चल तुला माझ्या एका मित्राची गोष्ट सांगतो.. तुझ्याच वयाचा असताना तो आजारी पडला होता आणि तब्बल ६ महिने इस्पितळात पडून होता. त्या अवधीत त्याचे २५ किलो वजन घटले होते.. आजारपणातून उठल्यावर त्याचे वजन होते ४० किलो... पण तो काही हार मानणारा पठ्ठ्या नव्हता.. त्याने लगेच भरपूर खाणे आणि व्यायाम सुरु केला आणि पुढील ६ महिन्यांत २१ किलो वजन वाढवून तंदुरुस्त झाला..

तुम्हीपण वैद्यकीय सल्ला घेउन पुढील पायर्या चढाव्यात आणि आत्महत्येच रडगाण सोडून द्यावे...

- (बॉडी बिल्डरप्रेमी) पिंगू

शिल्पा ब's picture

27 Aug 2010 - 12:20 am | शिल्पा ब

काय तिच्यायला रड गाणं लावलंय...जगात असाध्य रोग असलेले लोक असतात, प्रचंड समस्या असलेले लोक असतात... आणि तुम्ही वजन जरा कमी म्हणून आत्महत्या करायला निघाले...खरं तर मला विश्वास नाही कि एवढ्या टोकाचा विचार करण्याची वेळ आली असेल तर कोणी असे धागे टाकेल म्हणून...खरं खोटं तुमचा तुम्हाला माहिती...

पुष्करिणी's picture

27 Aug 2010 - 4:51 am | पुष्करिणी

तुमचे सर्व वैद्यकीय रिपोर्ट्स ठीक आहेत ही खूप दिलासा देणारी गोष्ट आहे. मलाही दोन वेळा काविळ होउन गेलीय. पहिल्यांदा तर काविळ झालीय हे काळायलाच फार उशीर झाला होता आणि शेवटच्या स्टेजला पोहोचली होती. रस्त्यावर चक्कर येउन पडले होते. नंतर बरेच दिवस आजूबाजूचे सगळे मला 'पाप्याचं पितर ' असंच म्हणायचे .

माझ्यामते तुम्ही खूप कंटाळला ( बोअर झाला )आहात . थोडे दिवस वजनाबद्द्ल विचार करणं सोडून द्या.
तुम्हांला काय करायला आवडतं / आवडेल याची एक यादी तयार करा आणि एक रूटिन चालू करा ( संगीत, वाचन, खेळ, व्यायाम, नविन भाषा शिका इ.). एखादा ट्रेकिंग, हायकिंग चा ग्रुप जॉइन करा.
स्वतः एखादा पदार्थ सुट्टीच्या दिवशी बनवून खा ( इथे पाकॄ टाकायला विसरू नका ).

तुमचा पेशन्स वाढवा , लगेच टोकाचा निर्णय डोक्यात आणू नका ( आत्महत्या करतो, धागा डिलिट करतो इ. ) .

५ तासाचा प्रवासाच्या वेळात काही करता येउ शकेल काय ?

अर्धवटराव's picture

27 Aug 2010 - 4:57 am | अर्धवटराव

मित्रा स्पा,
बुंद बुंद से सागर बने हे लक्षात ठेव. तुला सगळ्यात जास्त गरज आहे ति सकारात्मक विचारांची. बाकी सगळं मगोमाग येइल. तु रोज २/३ पोळ्या खातोस ना. मग आज पासुन चौतकर पोळी वाढव. दोन(च) घास सकाळी आणि दोन(च) घास संध्याकाळी जास्तीचे खा. अस आठवडा, दहा दिवस कर. तुप/लोणी/तेल, जे काहि पचत असेल ते पोळीला लाव. मग आणखी चौतकर पोळी वाढव. अस करुन येत्या दोन महिन्यात आपला आहार डबल कर. तुला एकदा अंदाज आला कि तु किती वेगाने आहार वाढवु शकतोस कि मग तुला आहार आणि व्यायामाच गणित बसवता येइल... आणि या दोन गोष्टी साध्य झाल्या कि बाकी काहि कराव लागत नाहि...

(लट्ठ) अर्धवटराव

स्पंदना's picture

27 Aug 2010 - 6:59 am | स्पंदना

बाकि सर्वांनी खुप छान उपाय सांगितले आहेत, त्यात ल्या त्यात 'संदीप चित्रे' नी तर जवळ जवळ तुमच्याच सारखी केस उदाहरण म्हउन दिलेली आहे.
माझ्या कडुन थोडीशी भर, लोकलचा प्रवास खुप वाटतो ना?
मग त्या लोकल मध्ये जी 'धमाल भजनी मंडळ' असतात ना ? ती जॉइन करा. बघा त्याच प्रवासाची वाट पाहु लागाल. काय एकेक विडंबन असत प्रत्येक गाण्याच ! व्वा ! उदाहरण ' हो..निले गगन के तले ...पटरी की ओर चले । हाथ मे लोटा लोटे मे पानी.."
आणी कोणी या प्रकाराला भंपक वगैरे म्हणत असेल तर लक्ष देउ नका. मस्त जिथ भरपुर हसु येइल मन ओझ्यातुन मुक्त हओइल अशी कुठलीही गोष्ट बिन्धास्त करा. आपल्याला कोणी मदत करायला येत नाही पण शहाणपण मात्र शिकवायला बरेच जण येतात तेंव्हा एका कानान ऐकणे अन सोडुन देणे.
तुम्ही मनापासुन लिहिल आहे अन आम्हा सर्वांना तुम्हाला काय सांगायच आहे ते कळतय्...धिर सोडु नको लेका..याच्या पेक्षा जन्म अन जगण वाईट असु शकत.
थोडा वेळ देवासमोर पण बसत जा !

तुमची समस्या फक्त वजनाची नाहिये (हे बर्‍याच प्रतिसादकर्त्यांच्या लक्षात आलेले नाहिये.) तुमची पचनशक्ती क्षीण झालेली आहे असे लेखनावरून वाटत आहे. त्यामुळे खाल्लेले पचत नाही. अन्न नीट न पचल्याने कोठा नीट साफ राहात नाही. जर कोठा साफ नसेल तर पूर्ण दिवसभर निरूत्साह जाणवत रहातो, भूक नीट लागत नाही. लागली तरी खाण्याची इच्छा नसते. न खाल्ल्याने शौचास होत नाही, कोन्स्टीपेशन वाढू लागते. असे हे चक्र चालूच रहाते.

एकदम आहार वाढवण्यापेक्षा आणि अचानक मोठ्या प्रमाणावर व्यायाम करण्यापेक्षा तुम्ही पचनशक्ती सुधारण्याकडे लक्ष द्या. माफक व्यायाम चालु शकेल ..जसे की नियमीत चालणे .

माझ्या एका जवळच्या मित्राला पोटाची समस्या आहे, कित्येक पदार्थ त्याला पचत नाही. ..पोट दुखू लागते. मळमळ होते. मग खाण्याची इच्छा होत नाही. असे सकाळी सुरु झाले तर संध्याकाळ पर्यत हा मित्र काहीच खात नाही कारण खावेसेच वाटत नसते. तो ही अंगाने बारीक आहे. मध्यंतरी असे अपचन आणि पोट दुखणे खूप वाढले असतना तो पार वैतागून गेला होता. आणि तब्येत ही खूप उतरली . अशातच ऑफिसमधील कामाचा मोठा डोंगर समोर असायचा. काम करणे तर भाग होते. मग काही औषध उपाय योजना केली. आयुर्वेदिक औषधे सुरू केली. त्याचा सख्खा भाऊ डॉक्टर असल्याने त्याचे ही मार्गदर्शन लाभले. आर्ट ऑफ लिव्हिंग चे कोर्सेस लावले. आता बरा आहे . समस्या पूर्णपणे सुटली नाही , अपचन होत रहाते कधी कधी. पण दोन वर्षापूर्वी ज्या त्रासातुन त्याला जाताना पाहिले त्या मानाने आता बरा आहे. वजनही वाढले आहे. (वाढले म्हणजे आधी पेक्षा..मी जाड या अर्थी म्हणत नाहिये.)
त्याची समस्या मी जवळून पाहिली असल्याने तुमची समस्या थोडीफार का होईना मला समजू शकते.

तुम्ही वजनाकडे थोडे दुर्लक्ष करा आणि पचनशक्ती कशी सुधारता येईल हे पहा. डॉक्टरांचा सल्ला घ्याच ह्या बाबतीत. पण जेवणाची काही पथ्ये आवश्यक पाळा.
जेवण शक्यतो ताजे आणि गरम घ्या. आहारात पचायला जड , तिखट, त़ळलेले , खूप तेल , तूप घातलेले (मिठाया वगैरे) पदार्थ टाळा. आहारात तंतूमय पदार्थांचा समावेश करा. जेणेकरून कॉन्स्टिपेशन होणार नाही. डॉक्टर ही ह्यावर काही औषध सांगू शकतील. जेवणाच्या वेळा पाळा. दोन जेवणाच्या मध्ये खूप मोठे अंतर ठेवू नका. एकदम खूप खाण्यापेक्षा थोडे थोडे काही ठराविक वेळाने खा. प्रवासात पचतील असे काही कोरडे पदार्थ , पाण्याची बाटली जवळ ठेवा. पाणी भरपूर प्या. कामाच्या ठिकाणी पाणी कमी प्यायले जाते.
नोकरी सोडणे अवघड असेल तर कधीतरी रजा घेऊन घरी थोडाफार आराम करा. कामाच्या स्ट्रेसनेही शरिरावर परीणाम होतो. जागरण टाळा आणी ८ तास झोप आवश्यक.

मऊ भात , मुगाचे वरण , पातळ तूप लावलेली पोळी हे पचायला हलके पदार्थ आहेत. तुम्हाला काय काय पचते ते पहा आणि तसे ते जेवणात घेत चला.
सर्वात महत्वाचे म्हणजे सकारात्मक दृष्टी ठेवा.
पचनशक्ती सुधारतीये असे वाटले की मग आहार ही वाढवा. व्यायामही भरपूर करा.

पक्या....... अगदी बरोबर ....
वजन कमी आहे म्हणून मी असा विचार करत नाहीये...
तर.. ते का कमी होतंय ..... यावर डॉक्टर सुधा काही स्पष्टीकरण देऊ शकत नाहीये ...
शत्रू कोण आहे ते कळलं, तर सावध राहता येत .. पण इथे काय चाललंय ते कोणालाच काळात नाहीये ..

परत नमूद करतो, वजन कमी असल्याने मी depression मध्ये गेलेलो नाहीये तर .. तर तो आजार detect होत नाहीये ....

पण तुम्ही वाढवलेल्या मनोधैर्याने खरच तुम्हा सर्वांचा शतश: ऋणी ......
मिसळपाव वर आता नियमित येणार एवढा मात्र नक्की ....

कोणीतरी नमूद केलं कि typing मध्ये चूक नाहीये ... त्यांच्या साठी ..

esakal .com वर जा .... कुठल्याही बातमीवर click करून प्रतिक्रियेच्या column मध्ये typing करा .. खूप सोप्पं जाईल .... तेच copy करा..

स्पा's picture

27 Aug 2010 - 8:16 am | स्पा

जाई अस्सल कोल्हापुरी .................
तुमच्या निमंत्रणा साठी खूप खूप धन्यवाद ....

शांताराम इंगळे's picture

27 Aug 2010 - 9:10 am | शांताराम इंगळे

मराठी टाईप करण्यासाठी बेस्ट साईट

http://www.google.com/transliterate/indic/Marathi

|| मजा करा आणि आनंदी राहा ||

दीपक साकुरे's picture

1 Sep 2010 - 11:29 am | दीपक साकुरे

हे खरच मस्त आहे ..
याच लिंक वर जाऊन टंकल आणि इथे आणून पेस्टल :)

कवितानागेश's picture

27 Aug 2010 - 9:24 am | कवितानागेश

काय 'खावे' ते सान्गु का?
१. रोजच्या जेवणात पुदिन्याची चटणी ठेवा. ( त्यात खोबरे नको.(जड असते) फक्त पुदिना कोथिंबीर, आले, लिम्बू, काले मीठ, साखर). हे पचन सुधरण्यसाथी एक चविष्ट आनि उत्तम औशध आहे.
२. रात्री गरम पाण्यात ७-८ काळ्या मनुका भिजवा. सकाळी ते पाणी प्या ( मस्त लागते- सरबतासारखे), आणी मनुका चावून चावून खा. ( यामूळे लोह वाढेल, लिव्हर फन्क्शन सुधारेल)
३. काविळीमुळे तुमचे लिव्हर मन्दावले आहे, त्यासाठी अ‍ॅक्युप्रेशर्चा एक पॉइण्ट आहे.
उजव्या तळहातावर करण्गळीच्या खाली ( नेमके हार्ट लाइनवर) अर्धे मिनिट दाब द्या, रोज २ वेळा.
४. सध्या तरी तेल-तुप बन्द करा.
५. उकडलेल्या भाज्या एकत्र करुन खाव्यात, म्हणजे छान लागतात.
एकच भाजी उकडली तर खूप बोअर होते.
६. या भाज्यांमध्ये मिरपूड, ओरिगनो बेसिल पार्सले इ. हर्ब्स वापरावेत, मस्त लागतात.
....वेळ मिळाला की अजुन लिहिते...

स्पा's picture

27 Aug 2010 - 9:29 am | स्पा

माउ.....खूप खूप आभार

सहज's picture

27 Aug 2010 - 9:42 am | सहज

अहो आता मिपाची सवय लावा. जेव्हा कधी वाटेल तेव्हा समस्या लिहा. मदत करायला इथे लोक आहेतच.

आणि हो, पदार्पणात शतकी धाग्याबद्दल शुभेच्छा!

हल्ली टॅलेंट कसं वरती यायला लागलय नै.

पदार्पणात शतक द्विशतक म्हणजे हॅ हॅ हॅ..

वेताळ's picture

27 Aug 2010 - 10:22 am | वेताळ

आत्महत्या करायला सल्ल्यासाठी मिपाचा वापर प्रथमच होत आहे.बाकी आत्महत्या करण्या अगोदर आपल्या शरीरातील चांगले अवयव योग्य हॉस्पिटलात दान करा निदान जगण्यासाठी धडपडणार्‍याना अंपगाना ते उपयोगी येतील.

नोकरीचा व प्रवासाच्या दगदगीतुन त्रास होत असेल तर लेका सोप्पा उपाय ती नोकरी सोड ना. जीवा पेक्षा का ती नोकरी महत्वाची आहे तुला?आसपास कुठे चांगल्या कमाईची एक दोन वर्षाकरीता नोकरी शोध घे. नंतर मिळालेला रिकामा वेळ तुला तुझी तब्येत सुधारायला वापर .सतत आनंदी राहयचा प्रयत्न कर. जगात तुच एकटा दु:खी आहेत हा तुझा गैरसमज आहे तो प्रथम मनातुन काढुन टाक.पण मी आजारी आहे व दु:खी आहे म्हणुन सर्वजण आत्महत्या करत नाहीत.तुला २४ वाढवायला ज्यानी कष्ट घेतले व आताच्या काळात तुझी काळजी करतात त्या आईवडीलाचा विचार कर.जर शहरी वातावरण सुट होत नसेल तर इतर ठिकाणी जॉब साठी प्रयत्न कर.लग्न झाले नसेल तर लग्न लगेच न करता प्रथम स्वःताला कणखर बनवण्याचा प्रयत्न कर.

मृत्युन्जय's picture

27 Aug 2010 - 11:40 am | मृत्युन्जय

अहो आत्महत्येची भाषा काय करताय. किती नशीबवान आहात तुम्ही आमच्या मानाने. मि पा वर २ वर्षे ८ आठवडे काढल्यावर आमच्या सगळ्या लेखांना मिळुन १०० प्रतिसाद नाही आलेले. तुम्ही पहिल्याच धाग्यावर शतक ठोकले. तुम्ही कमनशिबी कसे काय असु शकत ब्वॉ? खा प्या मजा करा.

सातबारा's picture

27 Aug 2010 - 3:11 pm | सातबारा

तुमच्या अग्नी मध्ये दोष वाटतो आहे.
सकाळ संध्याकाळ तडागी मुद्रा करा. तडागी मुद्रा करून फरक वाटला की अग्नीसार क्रिया करा .. बघा महीन्याभरात गुण येईल. हे कसे करायचे याबद्दल शंका असतील तर व्य. नी. करा.

"व्य. नी. करा" म्हणजे काय?

अनिल २७'s picture

27 Aug 2010 - 4:05 pm | अनिल २७

स्पा भाऊ.. तुझा लेख वाचला लेका.. स्वानुभव सांगतो.. आज माझं वय २५ आहे, ऊंची ५ फूट ९ ईंच.. पण जानेवारी २००९ पर्यंत माझं वजन ५० कि. च्या पुढे जात नव्हतच.. सगळे काडी म्हणायचे.. गाल खपाटीला गेले होते.. अक्षरशः वैताग आला होता.. लोकांपासून लपून रहायचो.. पण लेका हार नाही मानली, खरोखर टेंशन घेणं बंद केलं, जिमला जाऊ लागलो.. सकाळी ५ ते ७.. अन जेंव्हा जेव्हा शक्य झाले तेंव्हा बीयर ढोसू लागलो..(बीयरच्या आहारी गेलो नाही).. अरे मस्तपैकी जगू लागलो. डिसेंबर २००९ मधे माझं वजन ७३ कि. झालं होतं, ते मी आता ७० कि. वर मेंटेन ठेवलय.. तब्येत अशी आहे कि ३-४ जणांना एकटा भिडू शकतो.. तुला विश्वास नसेल तर मी तुला माझे तेंव्हाचे अन आताचे फोटो दाखवतो, साल्या तरूण आपण, काय करू शकत नाही? मनावर घे अन जिम जॉईन कर.. एंजॉय कर लाईफ, घाबरून पळू नकोस.. अन २ पैसे कमी मिळाले तर चालतील, पण तो १७ तासांचा फकिर जॉब सोडून दे..

वजन वाढवण्यासाठी बियर? ग्रेट आहात.

अनिल २७'s picture

1 Sep 2010 - 11:15 am | अनिल २७

धन्यवाद...

सूर्यपुत्र's picture

27 Aug 2010 - 5:49 pm | सूर्यपुत्र

शरीर आणि मन एकमेकांवर अवलंबून असतात; मग यापैकी काय आधी बिघडते? आणि नक्की काय बिघडले आहे ते कसे कळते??

प्रकाश घाटपांडे's picture

27 Aug 2010 - 9:33 pm | प्रकाश घाटपांडे

पहा आपले हितचिंतक किती आहेत मिपावर. आपल्या मनातील विचार नाहीसे होतील. सगळे दिवस सारखे नसतात. हे ही दिवस जातील. दु:ख हे शेअर केल्याने विभाजित होत तर आनंद हा गुणीत होतो. स्वतःवर वेगळे प्रयोग करुन पहा. ज्याने कमी त्रास होईल अशी जीवन शैली अनुसरा.
प्रत्येकाला काही ना काही त्रास असतात. आत्ता नसतील तर भविष्यात निर्माण होउ शकतात नव्हे होतातच. जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तुची शोधोनी पाहे|
काही प्रतिक्रिया कदाचित आपल्याला खोचक व दिलास न देणार्‍या वाटल्या ही असतील पण त्यामागील हेतु हा हितचिंतन हाच आहे.

सचिनमिसलप्रेमी's picture

27 Aug 2010 - 11:04 pm | सचिनमिसलप्रेमी

हा मानसिक प्रॉब्लेम आहे. क्रुपया मानसोपचार तज्ञाला भेटा.

कवितानागेश's picture

28 Aug 2010 - 8:29 am | कवितानागेश

हा मानसिक प्रोब्लेम नाही!
आयर्न आणी विटॅमिन डेफिशिअन्सी मध्ये डिप्रेशन येतच.
..( अहाहा, काय सुन्दर 'मराठी वाक्य आहे'!)
त्यासाठी सोपे उपाय आहेतच..
२ मिनिटानी लिहिते...

विसुनाना's picture

28 Aug 2010 - 11:40 am | विसुनाना

४ वर्षांपूर्वी मला कावीळ झाली होती.. ती व्यवस्थित बरी सुद्धा झाली ..
गेली ४ वर्ष मला भूकच लागत नाही ..

सगळ्या प्रकारचे उपाय, डॉक्टर , करून थकलो.. हजारो रुपये खर्च केले ..

सगळ्या टेस्ट , reports नॉर्मल आहेत ....

-आपण सर्व प्रयत्न केलेच असतील. तरीही एक प्रयत्न म्हणून (हा प्रयत्न जर केला नसेल तर-) हैद्राबाद येथील 'एशियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोएन्टरॉलॉजी' (http://www.aigindia.net/) या संस्थेत उपचार करून पहावेत.
वय वर्षे २४ हे उपचारांच्या दृष्टीने खूपच योग्य वय आहे. Hepatology & Nutrition या विभागात तुमचे औषधोपचार होण्याची दाट शक्यता वाटते.
निराशा टाळावी.
...तू शाहीन है परवाझ है काम तेरा
तेरे सामने आसमां औरभी है |

पंचकर्म म्हणजे नक्की काय करतात?
त्याने काही फायदा होऊ शकेल काय?

प्रभाकर कुळ्कर्णी's picture

8 Sep 2010 - 1:38 am | प्रभाकर कुळ्कर्णी

डीप्रेशन आलेल्याला सल्ला देवू नये म्हनुन वाचले आहे. पन " काय करावे ते समजत नाही?" असा प्रश्न विचारला आहे. तर मी ही जे
माहीत आहे ते सांगतो. स्पा. नीगेटीव विचार सोडुन दे. वजन एका महिन्यात वाढते. वजन वाढनारे अन्न भरपुर खा. जेवनच जात नाही. रोज एक बीयर पी. नन्तर भरपुर फ्याटी जेवन जेव. औषध समजुन त्या जेवनात चोथा असलेल्या कच्च्या भाज्या खा. स्वछ्च
धुतलेलच अन्न खा. नाहीतर अजुन दुसरेच रोग होतील. जे मनाला चांगले वाटत असेल ते कर. गाव बदलता आले तर ताबडतोब बदल. आर्थिक बाजु नीट असेल तर लवकरात लवकर लग्न कर. लग्न कोनत्या मुली शी करायचं ते " धोंडोपंत उवाच" " मराठी ब्लागस्पाट. नेट" वर वाच. मानसाच्या आयुष्यातील ९०% ह्याप्पीनेस हा त्याच्या बायकोवर अवलंबून असतो. जगातल्या ५०% लोकांना तू काय करतोस काय नाही ह्याचं काहीही देनं घेनं नाही. तू काहीही का करेनास. कोनीही विचारत नाही. उरलेल्या ५०% ना तुझं वाईट झालेल फार चांगलं वाटत असते( यु क्यान वीन - शीव खेरा). आत्म विश्वास वाढेल ह्या साठी जे ज्ञान घेता येइल ते घे.सावरकरांची "माझी जन्म ठेप" वाचली काय? मी वाचलं आहे की जो कुनी ते पुस्तक वाचतं तो कधीच आत्महत्या करत नाही. सायकियाट्रीस्ट कढे गेलास तर ते तुझी जवाबदारी नातेवाईकावर टाकतात. तू जाळ्यावर प्रश्न विचारत आहेस म्हनजे तुला विचारनारं कुनी नाही असं दिसत आहे. एकटा पडू नकोस. हिम्मतीने योग्य योजना करुन कामं कर. तू जगशील पन यशस्वी पन होशील. मला
रोग झालाय म्हनत रहाशील तर खरोखरच रोग होतो. डाक्टर म्हनाले तुला काहीच झाले नाहीतर तू आता पाझीटीवच विचार करायला लाग. मला काहीच झाले नाही. मी सगळं करू शकतो. आरे आहेच काय त्यात? जे आवडत नाही ते करु नकोस. जे आवडते ते कर. जे जरूरी आहे ते कर. ज्ञान वाढव. आल द बेस्ट!

स्पा's picture

8 Sep 2010 - 9:27 am | स्पा

एक चांगला विचार मनात रोवल्याबद्दल.. मनापासून आभार.....

अप्पा जोगळेकर's picture

8 Sep 2010 - 11:06 am | अप्पा जोगळेकर

हं. मित्रा तुला जे योग्य वाटेल ते कर. मला तर 'गाढव, मुलगा आणि त्याचा म्हातारा बाप' वाली गोष्ट आठवली.
अवांतर - स्पा चा अर्थ काय? डोंबिवलीत एक 'पाटील हेल्थ स्पा' नावाची व्यायामशाळा आहे. अन्य कुठेही हा शब्द ऐकला नाही.

कानडाऊ योगेशु's picture

8 Sep 2010 - 11:35 am | कानडाऊ योगेशु

स्पा साहेबांच्या ह्या धाग्यावर आलेल्या इतक्या प्रतिसादांमुळे त्यांच्या अंगावर मूठभरच काय तर मणभर मांस चढले असेल.
आता पुन्हा एकदा वजन करा पाहु स्पा भाऊ!
ते नक्कीच वाढले असणार!

"स्पा" या नावाचा १ विशिष्ट "fullform " आहे.........( S.P.A)

"पाटील हेंल्थ स्पा" शी याचा काहीही संबंध नाही....

विकाल's picture

2 May 2011 - 6:26 pm | विकाल

स्पा...

याला काय अर्थ नै...! मस्त खावाव बे...प्याव... अन दुन्या काळजी करू नै ...!!!

निम्मी जिन्गी तर काळ्जी खाती बघ बे...!

आम्च्या सोलापूर च्या लोकांच एक लै भारी वाक्य आहे.... जाउ दे सोड...(उच्चारः जाउ सोस्स्ड)...!!

टेंशन आलं की असं करून बघ....!!

अंयऽऽऽ विकाल, आरं आगष्टात धागा टाकलाय आन आजून त्ये स्पा धडधाकट हे. काय जीव बिव द्येत न्हाय गडी.

स्पा's picture

2 May 2011 - 9:01 pm | स्पा

मिसळपाव.कॉम नामक .. steroid खाल्ल्या गेल्या मुळे बाडी लय वाढली हाय... :D

प्रचेतस's picture

15 Jul 2011 - 2:12 pm | प्रचेतस

वय - २४, वजन ४२, उन्ची - ५ फूट ७ इंच .

आता वय २५,वजन किती???

सूड's picture

15 Jul 2011 - 2:23 pm | सूड

खिक्क् !!

:D

विश्वनाथ मेहेंदळे's picture

15 Jul 2011 - 2:46 pm | विश्वनाथ मेहेंदळे

मिपा वर होणाऱ्या स्तुतीमुळे अंगावर किमान मुठभर मास नक्की चढले असेल. त्यामुळे वजन ४२ पेक्षा जास्त धरायला हरकत नाही. ;-) काय स्पा ?