Skip to main content

आनंदात जगा

लेखक स्पा यांनी गुरुवार, 26/08/2010 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
आनंदात जगा आयुष्य एकदाच मिळत :)

वाचने 34194
प्रतिक्रिया 131

प्रतिक्रिया

In reply to by स्पा

'मी शिवाजीराजे भोसले बोलतो,हिम्मत असेल तर अडवा' हा सिनेमा तु किमान ८/१० वेळा तरी पहावास. अरे मर्दासारखा मर्द तु हातपाय काय गाळून बसला आहेस ? एकदा कोणत्याही गडावर फेरी मारुन ये. ४ दिवस रजा टाक्,मस्त कोकणात फिरुन ये. वाटल्यास एखादे भन्नाट अफेअर कर .अरे तरणा पोर तू ,जोवर तुझ्या जगण्याचे इंटरेस्ट तुला गाव्ह्त नाहित तोवर तुझे मन असेच वढाय होणार. अरे
  • या जन्मावर,या जगण्यावर शतदा प्रेम करावे,
हे ध्यानात ठेऊन जग आणी मग बघ तुझ्या जीवनात काय काय घडते.

In reply to by स्पा

स्पा राव आपण लवकरात लवकर सायकियाट्रीस्टचा सल्ला घ्या. ह्या प्रकारचा आजार psycosomatic illness म्हणजे मनाचा शरिरावर होणारा परिणाम असु शकतो.

In reply to by स्पा

माझ्या मित्रांमध्ये एक असा मुलगा आहे. सुंदर शरीरयष्टी, गौरवर्ण, स्वभावहि तितकाच बोलका. पण त्याचा उजव्या डोळ्याला लहानपणीच मार लागल्यामुळे तो डोळा लाल व बारीक दिसतो. पण त्याचे राहणीमान आणि व्यक्तिमत्व पहिले तर कोणीही इम्प्रेस होईल. या बाबत त्याला विचारले असता. म्हणतो कि आता ह्यासोबत पूर्ण लाईफ जगायची आहे. एवढ्याने घुटमळून जगण्यापेक्षा just rock n roll. live ur life ....... कधी कधी एकांतात त्याला वाईट वाटते.

जगण्यापेक्षा आत्महत्या करावी आत्महत्या पळपुटे लोक करतात तुम्ही तसे नाही आहात असता तर.................................. तुम्ही चांगल्या दवाखान्यात तुम्ही तपासनि करुन घ्या. नक्कीच फरक पडेल. आणी tension मुळे तर अस होत असेल तर tension घेउ नका जे जगाच होणार आहे ते आपल होइल. मित्रा मला तुझ्या पेक्शा जास्त tension असत पण मी मस्त टकाटक असतो सर सलामत...............................

माझे ही वजन तेवढेच होते २१ व्या वर्षी, पोहायला सुरवात केली आता वजन कसे कमी करावे या विचारात आहे :)

रडता काय तिच्यायला, सणसणीत खा, दणदणीत व्यायाम करा, मायला एकदा असं रुटीन सुरु करा म्हणजे दगड खाल्लेत तरी पचतील. काय राव, जगात काय तुम्ही एकटेच काटकुळे असल्यासारखं काय करताय. असं मस्त जगा की साला सगळ्यांना तुमचा हेवा वाटला पहिजे. आणि हो, चांगलं दिसण्यापेक्षा चांगलं वागणं लै महत्वाचं आहे भौ! आत्महत्या वगैरे फडतूस गोष्टींकडे अजिबात लक्ष देउ नका. आईच्यान, "आयुष्य लै सुंदर हाये, त्याला अजून सुंदर करायचं आपन" असं स्वतः नाना पाटेकर सांगून गेलाय. --(ऐयाश) असुर

In reply to by असुर

असूर सुद्धा देवमाणसासारखे बोलतात की कधी कधी! :)

In reply to by यशोधरा

त्याचं काय आहे तै, मागेच मी एकांना संगितलं, की असुर असलो तरी मर्त्य आहे मी. देवांनी (आपले देवकाका नाय वो) अमृतकुंभ पळवल्यापासून प्यायचे वांदे झाले ओ फार! त्यामुळे कोणी आयुष्याबद्दल हे असं गळा काढून रडायला लागलं ना,की आपली बत्ती गुल होते, आणि आपण सल्ले वगैरे देतो. स्साला जगण्यामरण्याचं आम्हाला विचारा, लै टेंशन तै, अमरत्व गेल्यापासून तर आम्ही यमालापण घाबरायला लागलो आहोत. पूर्वी आम्ही येकाच हापिसात कामाला व्हतो, पन त्येंची बढती झाली. --असुर

In reply to by असुर

>> "आयुष्य लै सुंदर हाये, त्याला अजून सुंदर करायचं आपन" अगदी असेच! आणि अपचनाचं म्हणाल तर आधी हे असले आत्महत्येचे वगैरे निराशावादी विचार सोडा. नैराश्य आणि अपचन हे सख्खे नातेवाईक आहेत. च्यामारी आत्महत्या वगैरे गोष्टींचा विचार करत बसलात तर वजन अजून कमी व्हायचं.. काही दिवस उद्याचा विचार करायचाच नाही असं ठरवा.. "जो गया सो गया, जो आयेगा देखा जायेगा, साला आज का दिन अपना" या अ‍ॅटिट्युडनी बघा आयुष्याकडे! साला लै मजा आहे! फिकीरच नाय करायची.. आज ऐश मध्ये जगायचं बास्स.. टेन्शन नय लेनेका भाय से पूछनेका.. ;)

मजेत जगावे कसे हे शिवराज गोर्ले ह्यांचे पुस्तक वाचा नक्कीच काही ना काही फरक पडेल हि आशा !! पण आत्महत्त्या छे ! तसला विचारही करु नका राव जीवन एकचदा मिळत यार आणि कमी वजनानी काय फरक पड्तो tensions आयुश्यात चालतच असतात मी पण गेल्या १० वर्शांपासुन financial tensions मधे आहे आत्ता माझं वय ३४ आहे ! one thing i have learnt from life it goes on .... हे लक्षात राहु द्या !!

जिभेवरच्या तीनचार अर्वाच्य शिव्या गिळुन खालील प्रतिसाद लिहित आहोत. काय बे रडतो.. एक काम कर.. लग्न कर.. म्हणजे आहे ही परिस्थीती बरी असं वाटायला लागेल. :)

असा काही विचार करूही नका. माझा एक मित्र वयाच्या असाच २२-२३ वर्षाचा असताना ५० किलो वजनाचा होता, उंची ६ फूट २ इंचाच्या किंचित वर. आता त्याचं वजन ५४-५५ किलो आहे. आम्ही त्याला आधी काडीकिडा वगैरे म्हणून चिडवायचो, तो ही ते थट्टेवारी सोडून द्यायचा. माझी उंची त्याच्यापेक्षा एक फुटाने कमी आणि वजन नेहेमी माझंच जास्त म्हणून एकमेकांना चिडवून दाखवणंही होतंच. कॉलेजात असताना 'कहो ना प्यार है' आला, तेव्हापासून तो 'हृतिक' झाला आहे तो आजतागायत 'हृतिक' म्हणूनच आम्हां सगळ्यांमधे ओळखला जातो. तुम्ही व्यवस्थित आहात, नॉर्मल आहात. काही काळजी करू नका. काही लोकं ओबीज, ओव्हरवेट असतात, तुमचं वजन थोडं कमी आहे; पण काळजी करण्यासारखं नाही असं डॉक्टरच म्हणत आहेत ना! कोणी तुम्हाला तुमच्या बारीक असण्यावरून हसलं तुम्ही त्यांना जाडे आहेत म्हणून हसा ... सगळ्यात उत्तम उपाय स्वतःवरच हसायला शिका! 'हृतिक'ही तेच करायचा, करतो आणि सगळ्या मित्रमंडळात अतिशय आनंदी प्राणी म्हणून हा प्रसिद्ध आहे.

सगळे प्रयत्न करून झाले, आनंदी राहायचे, पण पोटात अन्न नसताना जेव्हा २ ३ तास लोकलचे धक्के खावे लागतात तेव्हा सगळा पोसिटीव attitude डब्यात जातो........ १२ तास कामाचे आणि ५ तास प्रवासाचे.... काहीच कळत नाही ...... मस्त खायला जातो आणि पोपट होतो ............... कंटाळलोय या सर्वाला ...... मानसिक ताण एवढा वाढला आहे कि...... वेड लागेल अस वाटत... आज हि site बघून मन मोकळं करावसं वाटलं...........

>>पण पोटात अन्न नसताना जेव्हा २ ३ तास लोकलचे धक्के खावे लागतात तेव्हा सगळा पोसिटीव attitude डब्यात जातो........ जगातलं सर्वोच्च दु:खच की हो तुमचं.. हा लेख जरा वाचा.

स्वानुभवाने सांगतो लग्न करा.. वजन वाढतं :P

थोडा थोडा व्यायाम सुरू करा. दूध आणि केळं खा. पहील्यांदा थोड्यानी सुरूवात करा. बी काँप्लेक्स च्या गोळ्या घ्या.

१. अमुक एका वयाच्या, अमुक एका उंचीच्या माणसाचं अमुक एक वजन असलं पाहिजे असा काही नियम नाही २. अमुक एक रक्कम महिन्याकाठी मिळालीच पाहिजे आणि त्यासाठी अमुक एक नोकरी करत राहिलं पाहिजे असं नाही ३. हे जग, नातेवाईक, समाज आपल्यासाठी आहे, आपण त्यासाठी नाही. कोणी चिडवत असेल तर फाट्यावर मारा. ४. सगळ्यानाच मरायचं आहे एक दिवस. थोडी मजा करुन घ्या. ५. प्रत्येक माणूस अद्वितीय असतो. इतरांशी तुलना करु नका. इतरांच्या मताप्रमाणे जगू नका. मन प्रसन्न असेल तर शरीर नक्की साथ देईल. काळजी सोडा.

ओ स्पा, खर्र खर्र सांगा, हा असला धागा टाकून, तुम्ही सगळे कसे कळकळीने सल्ले वगैरे देत आहेत, पाहून हसताय ना?

मला फक्त मन मोकळा करावसं वाटलं, त्यातही माझी चूक झाली असेल तर माफ करा.. मी delet करतो हा धागा ..........

In reply to by स्पा

बरोबर आहे.मनात असले प्रश्न असले कि नक्की वाटत कोणाशी तरी मन मोकळा करावा...कोणाशी बोलावं...तुम्ही केला ते बरोबरच आहे. अहो तुम्ही असला विचार करुन काय डोक्याला ताप करुन घेताय राव ! लोकांच्या समोर कसले कसले कूटप्रश्न पडले हायेत अणि तुम्ही म्हणजे अगदीच साध्या प्रश्न्याला ढेपाळला आहात. पहिली गोष्ट म्हणजे स्वतःला स्वीकारा.मनाशी चंग बांधा. मी असाच आहे आहे आणि असाच राहणार.कोणाचा काही म्हणणं. हे मनाशी पक्का ठरवा. खूप खा.खूप मजा करा.खूप झोपा. आयुष्यात सुख सोधता आलं तर भरभरून आहे ...नाहीतर काहीच नाही. आयुष्य खूप सुंदर आहे त्याला आणखी सुंदर बनवा.

In reply to by स्पा

अरे मर्दा काय चालवलय हे? अरे धागा डिलीट करतो काय? आत्महत्या करतो काय? कसे रे तुम्ही असे. माणसाने कसे टणक असावे. दोन घ्यावे आणि दोन द्यावे. आणि आनंदात रहावे. (जरा व्यनि मधुन तुझा पत्ता कळव तुझ्या घरी येउन थोबाड फोडतो तुझे, साला फक्त २४ वर्षांचा तु, काय दुनिया पाहीलीस रे म्हणुन आत्महत्या करायला निघाला आहेस?) आणि कायरे? खायला काय हवे ते तुझे तुला कळत नाही? चार वर्ष काय हवेवर जगलास? लेका, लोक काय काहीही सांगतील. तु काय सगळे खात सुटणार काय? तुला काय पचते ते आठवुन बघ आणि तेच खा ना. आणि वजनाचे म्हणशील तर काही मनावर घेउ नकोस गड्या. त्या पे़क्षा आनंदी रहायला शीक. असा कुढत रडत बसु नकोस. वजन वाढवण्याच्या तर मुळीच फंदात पडु नकोस. अरे हे काय वय आहे का तुझे आत्महत्या वगेरे करायचे? संध्याकाळी मस्त समुद्रावर, बागेत फीरत जा. महीन्यातुन एकदा तरी लांब डोंगरावर वगेरे सहलीला जात जा. पेपर तर अजिबात वाचु नकोस. टी.व्ही. वर सुध्दा कार्टुन नेटच पहात जा. जमलेच तर एखादी पोरगी पटव. मग बघ कस छान वाटेल तुझे तुलाच. चार महीन्यांनी इकडेच एक धागा काढ " मैत्रीणिला कोणती भेटवस्तु द्यावी ?"

In reply to by स्पा

मी delet करतो हा धागा ..........
प्रयत्न तर करून बघा... ;) खुद के साथ बातां: स्वसंपादनाच्या चर्चा वाचलेल्या दिसत नाहीयेत स्पाशेठने. ;)

In reply to by यशोधरा

प्रथम तुम्ही स्पा ह्यांच्या इंटिग्रीटीबद्दलच शंका व्यक्त केलीत. मग त्यांनी थोडा त्रागा करून 'धागाच डिलीट करतो' म्हटल्यावर आता तुम्ही इतरांच्या मनावर ओझी का ठेवताय असे विचारताय! कुणी काही कोठेही लिहीले की ते वाचावयाचे बंधन वाचकांवर नसते. तेव्हा हा धागा त्रासदायक वाटत असेल तर खुशाल वगळून पुढे जावे की! ह्या व्यक्तिने अगदी विमनस्क स्थितीत जे काही लिहीले आहे, त्यावर काही त्यांना धीर देण्यासारखे लिहीता येत नसेल तर ते ठीक आहे, (मलाही ते जमलेले नाही). पण दुसर्‍यांविषयी किमान आदर व विशेषतः अशा स्थितीविषयी अनुकंपा असावी, ती तुमच्या ह्या प्रतिसादांत अजिबात दिसून येत नाही.

In reply to by प्रदीप

प्रदीपजी, स्पष्ट सांगायचे तर, खरोखर विमनस्क स्थितीतली व्यक्ती, दुर्दैवाने जी आत्महत्येच्या टोकाच्या विचारापर्यंत पोहोचलेली असेल, ती धागा काढत बसेल ह्यावर विश्वास ठेवणे मला तरी कठीण जाते. बाकी स्पा ह्यानी आदर किंवा अनुकंपा व्यक्त करण्यासारखे काही केले, की मी अनुक्रमे आदर व/ किंवा अनुकंपा व्यक्त करेनच. केवळ वजन कमी आहे आणि ते वाढत नाही ह्या कारणासाठी जीव देण्याचा मूर्खपणा आदरास किंवा अनुकंपेस पात्र आहे, असे मला व्यक्तिशः वाटत नाही.

In reply to by यशोधरा

बाकी स्पा ह्यानी आदर किंवा अनुकंपा व्यक्त करण्यासारखे काही केले, की मी अनुक्रमे आदर व/ किंवा अनुकंपा व्यक्त करेनच.
एखाद्या नवीन सभासदाविषयी , आणि खरे तर कुठल्याही सभासदाविषयी आदर असावा हे लई नाही मागणं! त्यांच्या लिहीण्यातून त्यांच्याविषयी उघड अनादर व्यक्त करावा असे त्यांनी काही केलेले नाही. मी त्यांच्या लिखाणातून जे समजलो त्यानुसार नुसते वजन कमी आहे इतकाच त्यांचा प्रॉब्लेम नाही. त्यांना बद्धकोष्ठाचा विकार जडला आहे, त्यामुळे दिवस बेचैनीत जातो. त्यातून १२ तास काम करायचे असते व जाण्यायेण्याचा प्रवास ३ तासाचा असतो. विकारामुळे आलेल्या निरूत्साहामुळे हे सगळे जीवावर येत आहे, असा एकंदरीत सूर आहे. कुठल्या परिस्थितील व्यक्तिने येथे काही लिहावे व मन मोकळे करावे ह्याविषयी माझेतरी तुमच्या एव्हढे ठाम आडाखे नाहीत.

In reply to by प्रदीप

१. प्रदीपजी, हा धागा असा हॅक करण्यापेक्षा आपण ख व मधून बोलू शकतो. तेह्वा इथे माझा शेवटचा प्रतिसाद. २. दुसरी गोष्ट, मी त्यांना इथे लिहू नका असे कुठेही म्हटलेले नाही, पण पब्लिक फोरम्वर लिहिणार, तर सर्व प्रकारचे लोक प्रतिसाद देणार. माझ्यासारखे दुष्ट लोकही. त्यांनी तसे देऊ नयेत असे तुम्हीही म्हणू शकत नाही. ३. एवढीच कळकळ आहे, तर माझ्या नावाने खडे फोडण्यापेक्षा स्पा ह्यांना उपाय सुचवा.

In reply to by यशोधरा

१. आपल्या ह्या संवादामुळे हा धागा हॅक (sic) अथवा हायजॅक होत आहे, असे मलातरी वाटत नाही, म्हणून ह्याचे उत्तर इथेच देतो. २. तुम्ही त्यांना इथे लिहू नका असे कसे सांगणार? पण तुमचा सगळा रोख त्यांनी जे काही लिहीले आहे, त्याविषयी सुरूवातीस सरळ अनादर व नंतर इथे कुणी काय लिहावे अथवा काय लिहू नये असे सुचवणारा होता. ३. स्पा ह्यांच्या प्रश्नांसाठी माझ्याकदे काहीच उत्तरे नाहीत, तेव्हा मी काही त्यांना उपाय सुचवू शकत नाही. पण कमीतकमी मी त्यांच्याविषयी कसलाही अनादर तरी व्यक्त करीत नाही. जगातील अनेक बाबींवीषयी मला कळवळा आहे की, पण त्यातील बर्‍याचशा गोष्टींबद्दल माझ्याकडे काहीही समर्पक उपाय नाही हे मला स्पष्ट दिसते, तेव्हा मी त्यांविषयी गप्प रहातो. त्यात काही गैर आहे असे मला वाटत नाही. माझ्या आक्षेपांची उत्तरे तुमच्याकडे नाहीत हे ह्या शेवटच्या उर्मट सुचवणूकीतून अधोरेखित होत आहे.

In reply to by प्रदीप

हायजॅकच म्हणायचे आहे, चूक सुधारल्याबद्दल धन्यवाद. शक्य असले तर बदल करते. पण, तुमच्या एकूणच लिखाणातला विरोधाभास गंमतीशीर आहे खरा. दुसर्‍याला ज्या पद्धतीने वागू नये ह्याचा उपदेश करता, तसेच स्वतः वागता? ग्रेट हं! अजून एक शंका येते की, मुद्दामच ह्या धाग्यावर प्रतिसाद ओढत आहात की काय? तसे असेल तर फसलेच की मी! असो. आता पुन्हा नाही लिहित हं.

In reply to by मुक्तसुनीत

मुसुसेठ.. असुदे की हितंच.. अजुन थोडी म्याच रंगली तर 'स्पा'रावांचा आत्महत्येचा इचार क्यान्सल व्हैल की, जंगी सामना बघुन.. ;)

In reply to by स्पा

मन मोकळं केलं ते चांगलेच केले. आपण खूप चांगले जगत आहात फक्त मनात येणार्‍या वाईट विचारांना काढून टाका. कोणतेही विचार काढून टाकण्यासाठी मनाला कशात तरी गुंतवून घेतले पाहिजे. वाचन,संगीत,मित्र मैत्रिणींशी गप्पा, काय नी काय, अशा कितीतरी चांगल्या गोष्टीत आपल्या मनाला आपण गुंतवू शकतो. आपल्या आजूबाजूला पाहिले तर, कितीतरी कठीण असे शारिरीक कष्ट सोसून, आजार असूनही आनंदाने जगणारी माणसं असतात. काहीतर इतकी भयानक असतात की, त्यांच्यापेक्षा आपण कितीतरी चांगले जगत असतो. मी आजूबाजूला जेव्हा पाहतो तेव्हा तुम्ही जे वजनाचं म्हणत आहात ते तर फार म्हणजे फारच किरकोळ वाटले. तेव्हा आनंदाने जगा. मस्त जगा. -दिलीप बिरुटे

दुनीया गेली ****त. आपण आपल्याला आवडणार्‍या गोष्टी करायच्या. गाणी ऐकायची, चांगली पुस्तकं वाचावीत, दोन चार मित्र गोळा करुन दंगा करावा. नैराष्य आपोआप पळून जाइलः-)

पण मी काय करू आता .... खूप depression मध्ये गेलोय ... सगळ्या टेस्ट , reports नॉर्मल आहेत .... असं जगण्यापेक्षा आत्महत्या करावी ... ते तरी बरं.........................................
स्वगत : आत्महत्या हाच जर उपाय असता तर या तात्या अभ्यंकराने केव्हाच आत्महत्या केली असती..! असो..आल्या परिस्थितीला धैर्यानं तोंड देणं हाच एकमेव उपाय.. सारे दिवस सारखे नसतात.. चांगले दिवसही नक्की येतील.. सगळे रिपोर्टस् नॉर्मल आहेत म्हणता मग कसली काळजी करता..? बिनधास्त राहा, काय चाहेल ते खा/प्या! मन प्रसन्न ठेवा.. काही खाताना ईश्वराचं नाव घेऊन बिनधास्त खा.. 'हे खाऊन आपल्याला कसला त्रास होईल..' अश्या विवंचनेला मनात प्रयत्नपूर्वक थारा देऊ नका..तुम्हाला नक्की जमेल ते. विश्वास बाळगा..! सकाळी मोकळ्या हवेत भरपूर फिरा.. तज्ञ व्यक्तिकडून प्राणायाम शिकून घ्या.. सगळं काही ठीक होईल..गॉड ब्लेस.. ऑल इज वेल..! मनापासून शुभेच्छा... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

तज्ञ व्यक्तिकडून प्राणायाम शिकून घ्या..
प्राणायमाचे आश्चर्यजनक फायदे होतात..! (भोगी आणि योगी) तात्या.

हे नाव कधी ऐकलंय? आमच्या आप्पांना (माझे वडील) त्यांच्या तरूणपणी हा असाध्य रोग जडला होता. शेवटी त्यांना बरोबर घेऊनच गेला !!! त्यांना उकळून मग रूम टेम्परेचरला आणलेलंच पाणी कायम प्यावं लागायचं, बिना तेल-तिखटाचे जेवण घ्यावं लागायच (घरी रोज दोन प्रकारचा स्वयंपाक व्हायचा -- त्यांचा पथ्याचा आणि आमचा नेहमीचा), लग्नात किंवा इतर समारंभात जवळपास जेवता यायचं नाहीच कारण काही पचायचं नाही, (पुढचं वाचायला थोडं ग्रोस वाटेल पण) दिवसभरात किमान चार - पाच वेळा स्टूल्समधून रक्त पडण ही नॉर्मल बाब होती, हा आकडा जेव्हा दिवसभरातून २-२५ वेळांवर जायचा तेव्हा हॉस्पिटलला अ‍ॅडमिट करावं लागायचं, कित्येक वेळा मी आणि माझा भाऊ शाळेत / कॉलेजमधे / नोकरीवर जाताना आप्पा घरी किंवा त्यांच्या ऑफिसमधे असायचे आणि नंतर अचानक हॉस्पिटलमधे अ‍ॅडमिट झालेले असायचे ! कधी कधी त्यांना फक्त शहा़ळ्याचं पाणी, इलेक्ट्रल पावडर पाण्यात मिसळून, कॉमप्लान पाण्यात मिसळून (कारण दूध पचायचं नाही) असाच आहार चालायचा, साधं केळंही पूर्ण पिकून काळं पडल्याशिवाय त्यांना दिलं तर पचायचं नाही...... आणि अजून बरंच काही ! हे सगळं लिहलंय त्यामगचा मुख्य मुद्दा वेगळाच आहे. असं सगळं असूनही माणूस अक्षरश: जगन्मित्र होता ! त्यांना स्वतःला काहीच फारसं खाता यायचं नाही पण घरी सतत येणी-जाणी आणि सगळ्यांना आग्रह करकरून जेवायला द्यायला आवडायचं त्यांना. लग्नात किंवा इतर समारंभांत त्यांना फार काही खाता यायचं नाही पण प्रत्येक ठिकाणी आचार्‍यांना भेटून, त्यांची चौकशी करून, त्यांच्या खाण्याची वगैरे विचारपूस आवर्जून करून यायचे आणि तेही अजिबात गाजावाजा न करता ! ते स्वतः हॉस्पिटलमधे अ‍ॅडमिट असताना त्यांनी एका सहकार्‍याचे लग्न जमवून दिल्याचे माहिती आहे आणि एका हॉस्पिटलच्या कॅन्टिनमधल्या मुलाला अजून चांगली नोकरी मिळावी म्हणून बेडवर पडल्यापडल्या लोकांना निरोप पोचवून प्रयत्न केलेले पाहिलं आहे :) आप्पांबद्दल लिहायला लागलो तर जागा पुरणार नाही म्हणून इथेच थांबतो पण शेवटी महत्वाचं एकच सांगतो की त्यांचं शरीर आजारांनी पोखरून निघाले असतानाही त्यांना तीन गोष्टी कधीच झाल्या नाहीत -- १) उच्च रक्तदाब, २) हार्ट ट्रबल आंणि ३) डिप्रेशन. सुदैवाने तुमचं वय तुमच्या बाजूने आहे. आत्महत्या वगैरेचे विचारही सोडून द्या. तूर्तास इतकंच सांगू शकतो :)

In reply to by अर्धवट

+२

In reply to by बिपिन कार्यकर्ते

सलाम!

In reply to by संदीप चित्रे

चित्रेसाहेबांचा प्रतिसाद आवडला. जास्ती काही लिहण्याची गरज नाही. >>सुदैवाने तुमचं वय तुमच्या बाजूने आहे. आत्महत्या वगैरेचे विचारही सोडून द्या. +१, इतकेच म्हणतो.

In reply to by संदीप चित्रे

संदीप हे माहीत नव्हतं. तुमच्या अप्पांबद्दल आदर वाटतो. इतकी प्रबळ इच्छाशक्ती आणि पॉझीटिव मानसिकता कौतुकास्पद आहे. स्पा, मला वाटते ह्यापेक्षा जास्त काही सांगायची आवश्यकता नसावी! अरे रोज मिसळपाववर येत राहिलास तरी पुरे आहे, एकेक धागे वाचून हसून हसून आपोआप वजन वाढेल, काय बोलतो? ;) (वजन कमी कसे करावे ह्याचा धागा काढावा का?)चतुरंग ढोले पाटील

संदीप, सह्ही लिहिलं आहेस! आजूबाजूला खरोखर इतके जेन्यूईन प्रॉब्लेम्स घेऊन आयुष्याशी झगडणारी माणसं असतात! शेवटी आपला दृष्टीकोन महत्वाचा. तात्कालिक नैराश्य कोणालाही येऊ शकते, पण त्यातच बुडून, कुढत आणि स्वतःबद्दल कीव बाळगत जगायचे की त्यावरही मात करुन, आनंदाने जगायचे हे ज्याचे त्यालाच कळायला हवे! स्पा, तुम्ही दासबोध वाचा एकदा, खरच. तुमचे नैराश्य निघून जाईल काही प्रमाणात तरी.

In reply to by यशोधरा

>>>स्पा, तुम्ही दासबोध वाचा एकदा, खरच. तुमचे नैराश्य निघून जाईल काही प्रमाणात तरी. +१. आणि त्यातच मुर्खांची लक्षणे दिली आहेत ती पण वाचा! म्हणजे तुम्ही जो मुर्खपणा करायच्या विचारात आहात ना, त्याऐवजी जरा बरा विचार कराल! --असुर

In reply to by अनाम

मी हा video आधी पण एकदा पहिला होता..प्रचंड आदर वाटतो या माणसाबद्दल...केवढा तो आत्मविश्वास, आयुष्य आनंदात घालवण्याची वृत्ती...सुंदर.

In reply to by अनाम

हे देखील वाचा. यांसारखी असंख्य उदाहरणे आसपास सापडतील, ज्यांच्यापासून नक्कीच प्रेरणा घेता येईल. (उत्प्रेरक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

उत्प्रेरक बहुदा अयोग्य आहे (रसायनशास्त्रातील संदर्भ पहा). प्रेरणादायी असे म्हणा. असच(casually) लिहिल असेल तर माझे म्हणणे सोडून द्या.

वय - २४, वजन ४२, उन्ची - ५ फूट ७ इंच ...>>>> मित्रा खर सांगतो !! नशीबवान आहेस. नाहीतर वजन कमी करायसाठी काय-काय करतात लोक. जन्मापासुन वाळका-चळका

स्पा, तुम्ही चांगल्या वैद्यांकडे जाणार का? आयुर्वेदीक औषधानं गुण यायला वेळ लागतो पण गुण नक्की येतो. आणि ४२ किलो आहे ना वजन मग काही फार कमी नाही. संदीपनं इतका छान प्रतिसाद लिहिलाय त्यावरून मनस्थिती आनंदी ठेवणे हे एकच काम करा. संदीप, तुझा प्रतिसाद खूप चांगला आहे. तुझ्या वडीलांना अल्सरेटीव्ह कोलायटीस झाला होता हे सांगितलस पण त्याच बरोबर महत्वाचं सांगितलस म्हणजे त्यांना अजून कोणतेही विकार झाले नव्हते. साधेपणानं राहणे म्हणजे हळवेपणा वगैरेची लेबलं मलाही नेहमी लावली जातात पण मी माझ्या मनाच्या तब्येतीसाठी जाणिवपूर्वक निवडलेला पर्याय आहे तो. लहान वयात काही दुखण्यांनी मला झलक दाखवली. आजकाल सर्रास आढळणारे विकार "हाय!" म्हणून गेले आणि ठरवले कि यापासून लांब रहायचे. अजून तरी त्याचे चांगले परिणाम दिसताहेत.

+३

वर्षभर रजा घ्या. जे आवडेल तेच काम करा. जेव्हढे जमेल ते करा. भूक लागेपर्यंत वाट बघा. जर फिरतीवर गेलात तर जास्तच चांगले. कावीळ का झाली होती याचे कारण शोधण्याचा प्रयत्न करा. प्रेमात पडा. (म्हणजे तुम्हाला स्वतःचा विसर पडेल.) सारखा सारखा आपलाच विचार करणं टाळा. स्वतःची किव करू नका. पोट अजिबात साफ होत नाही .. ही समस्या कदाचित बर्‍याच वेळा रोगांना निमंत्रण देते. जंत झालेत का ? आमांश आहे का ? असे विचारण्याचे कारण असे की पाण्याच्या वाटेने येणार्‍या या आजारांनी भारतात बरेच जण त्रस्त असतात आणि आजाराने उग्र रुप धारण केल्याशिवाय ते लक्षात येत नाही. तुमची समस्या इरीटेटींग असेल पण आत्महत्येसाठी क्वालीफाईड नाही.

आपल्या भावना व वेदना पोहोचल्या व आपणास सहानुभुति. पुण्यात खरे म्हणुन खुन्या मुरलीधर जवळ एक जण आहेत ते काविळी वर औशध देतात.. वेदना असह्य झाल्या कि असे विचार मनात येतात..पण धिर सोडु नका.... त्याने दर्द दिला तो दवा हि देइल..काहि मदत लागली तर अव्श्य कळवा.. आमच्या परीने जी होईल ति नक्किच करु... आपणास शुभेच्छ्या .. लवकर बरे होताल ..