माझा एक मित्र हरवलाय
कृपया आंतरजालीय आथवा प्रत्यक्ष मैत्रीचा ह्या कवितेशी काहीही संबंध जोडू नये
माझा एक मित्र हरवलाय
मीच घातलेल्या पसा-यात
एकदा चालत होतो रस्त्याने
घालून हातात हात
मधे खड्डा, खड्ड्यात मी
हातातून सुटलेला हात
इतकच आठवतय मला
त्यानंतर दिसलाच नाही परत
माहीत आहे मला
आहे तो इथेच माझ्या आसपास
पहातोय मला टपो-या डोळ्यांनी
हसतोय गालातल्या गालात
देतेय हा friendship band ---------XXXXXXXX------- त्याच्यासाठी
म्हणाव रूसू नकोस ये परत
परत नाही रे करणार असं
नाही सोडून जाणार हात
वाट पहातेय तुझी मी
तुला तुझीच मैत्री परत करण्यासाठी !!!
- सोनाली
आमच म्हन्न
मला तर...
माझा आख्खा एक देश हरवलाय.
माझा मोबाईल हरवला आहे.
म्ह्णुनच