Skip to main content

माझा एक मित्र हरवलाय

लेखक अनुप्रिया यांनी रविवार, 22/08/2010 22:34 या दिवशी प्रकाशित केले.
कृपया आंतरजालीय आथवा प्रत्यक्ष मैत्रीचा ह्या कवितेशी काहीही संबंध जोडू नये माझा एक मित्र हरवलाय मीच घातलेल्या पसा-यात एकदा चालत होतो रस्त्याने घालून हातात हात मधे खड्डा, खड्ड्यात मी हातातून सुटलेला हात इतकच आठवतय मला त्यानंतर दिसलाच नाही परत माहीत आहे मला आहे तो इथेच माझ्या आसपास पहातोय मला टपो-या डोळ्यांनी हसतोय गालातल्या गालात देतेय हा friendship band ---------XXXXXXXX------- त्याच्यासाठी म्हणाव रूसू नकोस ये परत परत नाही रे करणार असं नाही सोडून जाणार हात वाट पहातेय तुझी मी तुला तुझीच मैत्री परत करण्यासाठी !!! - सोनाली
लेखनविषय:

वाचने 2419
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

आमच म्हन्न अस हाय कि जव्हा सोताच सोताच हरवुन बसतो तव्हा काय करायच? त्याच्याव बी यखांदी कविता पाडा

In reply to by प्रकाश घाटपांडे

मला तर ही कविता स्वतःच स्वतःला हरवण्याविषयीच वाटली.

माझा आख्खा एक देश हरवलाय. अधून मधून कधीतरी त्याची एक झलक बघायला मिळते, बस्स....... तुम्ही कविता चागली आहे. पण, हे पाकिस्तान विषयी लिहिले आहे का ?

म्ह्णुनच म्हटल होता कुंभ के मेले में मत जाव!