वेध गणेश उत्सवाचे...

मदनबाण's picture
मदनबाण in कलादालन
16 Aug 2010 - 5:37 pm

आज जरा वेळ मिळाल्यावर एका गणेश मूर्ती विकणार्‍या दुकानात चक्कर टाकुन आलो आणि गणपती बाप्पाचे काही निवडक फोटो टिपले... गणेश उत्सव म्हणजे चैतन्य !!! आता त्याचेच वेध लागले आहेत... :)

कॅमेरा --- निकॉन पी -१००

(हौशी फोटोग्राफर)
मदनबाण.....

संस्कृतीछायाचित्रणस्थिरचित्र

प्रतिक्रिया

आंबोळी's picture

16 Aug 2010 - 6:13 pm | आंबोळी

बाण्या,
आलाय आलाय म्हणणारा गणेशोत्सव लेका तु अगदी दारात आणून उभा केलास....
मस्तच आलेत फोटो.

परिकथेतील राजकुमार's picture

16 Aug 2010 - 6:21 pm | परिकथेतील राजकुमार

बाणा झ का स !!
एकदम प्रसन्न वाटले यार :) गरुडावर बसलेली मुर्ती तर क्लासच.

घाटावरचे भट's picture

16 Aug 2010 - 6:44 pm | घाटावरचे भट

लै भारी........

मीनल's picture

16 Aug 2010 - 6:52 pm | मीनल

मला साई गणपतीचा फोटो आवडला.
त्यात वृध्दत्व नव्हे तर बाल्य दिसतंय.

अनाम's picture

16 Aug 2010 - 6:53 pm | अनाम

गणपतीबाप्पा मोरया

सूड's picture

16 Aug 2010 - 7:03 pm | सूड

सगळेच फोटु झकास, पण पहिली मूर्ती जरा जास्तच आवडली. रंगवल्यावर ती आणखी छान दिसेल..

स्वाती दिनेश's picture

16 Aug 2010 - 8:13 pm | स्वाती दिनेश

बाणा,फोटो बघून गौरी गणपतीचे दिवस अगदी उंबर्‍याशी येऊन ठेपलेत ह्याची जाणीव झाली,
छानच!
स्वाती

माझा गोंडु गणुल्या बघुन एकदम उत्साह संचारला!!

मदनबाण's picture

18 Aug 2010 - 12:38 pm | मदनबाण

प्रतिसाद देणार्‍या सर्व मंडळींचे आभार !!! :)
स्वतःची अमुल्य प्रतिक्रिया स्वतःजवळच ठेवणार्‍यांसाठी मंडळ आभारी आहे. ;)

llपुण्याचे पेशवेll's picture

18 Aug 2010 - 12:50 pm | llपुण्याचे पेशवेll

यामूर्ती शाडूमातीच्या होत्या का पीओपीच्या?

यामूर्ती शाडूमातीच्या होत्या का पीओपीच्या?

पीओपीच्या...

मनीषा's picture

18 Aug 2010 - 8:44 pm | मनीषा

सुरेख फोटो ....

गणेशोत्सवाचं वातावरण तयार केलस रे बाणा!
तुझे धागे नेहमी वेगळे आणि चांगले असतात.
माझ्या वाचनात आलेल्या तुझ्या प्रतिसादातून सामाजिक जाणीव, देशप्रेम दिसते.

विलासराव's picture

18 Aug 2010 - 9:31 pm | विलासराव

मदनबाण सर्व फोटो आवडले.
दोन वर्षापुर्वी लालबागला रहात होतो.अगदी राजा पासुन २ मिनिटाच्या अंतरावर. छान आठ्वन जागवली.माझ्याकडे कॅमेरा नसल्याने फोटो काढता आले नाहित.

जयवी's picture

22 Aug 2010 - 12:52 am | जयवी

मदन बाणा...... किती प्रसन्न सुरवात केलीस रे गणपती उत्सवाची.
खूप छान फोटो आहेत :)