नमस्कार...
मी इथे नवा आहे त्या मुळे माझा लेख इंग्रजीमधुन लिहीत आहे. पण मी वचण देतो की पुढ्चा लेख हा माझा मराठीतच असेल.
Aajacha aanubhav… na sampavasa vatnara pravas…
Kamanimitta mala aaj sandhyakali 8.30 paryanta officemadhe thambava lagnar hota…
8 vajta sagla aatopun mi bus stop kade nighalo… rastyat 2 te 3 mitra bhetle… ashach futkal gappa marun mi bas kade nighalo… aaj bus madhe tasa konich olkhicha navta… tyamule agdich pudhchya sit var baslo… manat vicharancha kolahal challa hota…
Pudhchi 45 min aata mala eka jagevar basun kadhaychi hoti…mhanun mi mobilecha earphone kadhun kuthlitari gain aikavi mhanun mobile challa… tyat Rafi, R.D. Burman, Kishor chi gaani disli… tyat mukeshchihi gaani hoti…
Ya agodar mi mukesh kadhich manapasun aikla navta… tyachyabaddal mazhya manat purvagraha hota… tyachi sagli gaani sadist astat mhanun… pan ti gaani aikavishi vatli…
Aani jya veli gannyanna survat zhali… aha ha ha ha…
Khidki ughdi hoti. Baher thandi asunahi bochra vara navta… hava khup allhadadayak padli hoti… konitari agdi haluvar funkar ghalavi tashi…Tyat kanatun thet manaparyanta to daivi aajav…. Prattek gaana premabhangachi parshwabhumi (background) aslela… pan konas thauk tya veli prakket gaana khup allhadadayak vatat hota… Manat agdi kholparyanta shantata vatat hoti…
Jevnachi vel talon geli hoti tari bhukechi janiv evdhi hot navti… Ganyanshivay dusra kahich aiku yet navta… Rasta viruddha dishela dhavat hota… Rastyavar pavsamule olsarpana hota… var aabhal tambus disat hota…Rastyavarchya pivlya pandhrya divyanchya prakashamule to olsarpana ruperi zhala hota…
Prattek shwasaganik manat mohak sugandha jaat hota… havevar pis tarangava tasa halka vatat hota…mazha bolna suddha gongat vatat hota… nakosa vatat hota…
Ha pravas kadhich sampu naye asa vatat hota…
Ghari yeun jevan zhalay…
Varchya kholit lait banda karun ti mukeshchi gaani aiktoy…
Asach nipchip padun ti gaani aikat rahavashi vatatayt…
Kholvar tya gannyani manatli taar chedli…
Shanta panyavar jya paddhatine taranga aapoaap uthatat… aani ti kinaryakade vahat jatat tashi avasta…
Tyach tarangavar tarangat challoy asa vatatay… kadhich sampu naye asa pravas…
***
आजचा अनुभव… न संपावासा वाटणारा प्रवास…
कामानिमित्त मला आज संध्याकाळी 8.30 पर्यंत ऑफिसमध्ये थांबवं लागणार होता…
8 वाजता सगळा आटोपून मी बस स्टॉप कडे निघालो… रस्त्यात 2 ते 3 मित्र भेटले… अशाच फुटकळ गप्पा मारून मी बस कडे निघालो… आज बस मध्ये तसा कोणीच ओळखीचा नवता… त्यामुळे अगदीच पुढच्या सीट वर बसलो… मनात विचारांचा कोलाहल चालला होता…
पुढची 45 मिनिटं आता मला एका जागेवर बसून काढायची होती…म्हणून मी मोबाईलचा इअरफोन काढून कुठलीतरी गाणी ऐकावी म्हणून मोबाइल चालवला… त्यात रफी, आर.डी. बर्मन, किशोर ची गाणी दिसली… त्यात मुकेशचीही गाणी होती…
या अगोदर मी मुकेश कधीच मनापासून ऐकला नवता… त्याच्याबद्दल माझ्या मनात पूर्वग्रह होता… त्याची सगळी गाणी सॅड असतात म्हणून… पण ती गाणी ऐकावीशी वाटली…
आणि ज्या वेळी गाण्यांना सुरवात झाली… आहा हा हा हा…
खिडकी उघडी होती. बाहेर थंडी असूनही बोचरा वारा नवता… हवा खूप आल्हाददायक पडली होती… कोणीतरी अगदी हळुवार फुंकर घालावी तशी…त्यात कानातून थेट मनापर्यंत तो दैवी आवाज…. प्रत्येक गाणं प्रेमभंगाची पार्श्वभूमी (बॅकग्राउंड) असलेला… पण कोणास ठाऊक त्या वेळी प्रत्येक गाणं खूप आल्हाददायक वाटत होतं… मनात अगदी खोलपर्यंत शांतता वाटत होती…
जेवणाची वेळ टळून गेली होती तरी भुकेची जाणीव एवढी होत नवती… गाण्यांशिवाय दुसरा काहीच ऐकू येत नवता… रस्ता विरुद्ध दिशेला धावत होता… रस्त्यावर पावसामुळे ओल्सार्पणा होता… वर आभाळ तांबूस दिसत होता…रस्त्यावरच्या पिवळ्या पांढर्या दिव्यांच्या प्रकाशामुळे तो ओल्सार्पणा रुपेरी झला होता…
प्रत्तेक श्वासागणिक मनात मोहक सुगंध जात होता… हवेवर पीस तरंगावा तसा हलका वाटत होता…माझह बोलना सुद्धा गोंगाट वाटत होता… नकोसा वाटत होता…
हा प्रवास कधीच संपू नये असा वाटत होता…
घरी येऊन जेवण झ्हालय…
वरच्या खोलीत लाईट बंद करून ती मुकेशची गाणी ऐकतोय…
असाच निपचिप पडून ती गाणी ऐकत राहावाशी वाटतायत…
खोलवर त्या गन्ण्यानी मनातली तार छेडली…
शांत पाण्यावर ज्या पद्धतीने तरंग आपोआप उठतात… आणि ती किनार्याकडे वाहत जातात तशी अवास्त…
त्याच तरंगावर तरंगत चाललोय असा वाटतंय… कधीच संपू नये असा प्रवास…
प्रतिक्रिया
13 Aug 2010 - 10:11 pm | शिल्पा ब
आम्हाला विंग्रजी येत न्हाई ...त्यामुळं वचान देत्ये कि फूडचा लेक मराटीत आसन त वाचीन..
13 Aug 2010 - 10:18 pm | झंम्प्या
तुम्ही सांगीत्ल्यपरमानं मी पुढ्चा लेख लिहील्यावर् तुम्हाला नक्की सांगेन.
तुम्हि माझ्या लेखाच्या पहिल्याच वाचक अस्ल्याने माझ्यासाठी तुम्ही खास आहात.
पुन्हा एक्दा धन्यावाद...
झंम्प्या...
13 Aug 2010 - 10:59 pm | चिरोटा
मी साठावा वाचक आहे.मी आपणासाठी खास असलो तर मी लेख वाचतो.
13 Aug 2010 - 11:21 pm | जानम
आजचा अनुभव … न संपवसा वाटणारा प्रवास …
कामानिमित्त मला आज संध्याकाळी 8.30 पर्यंत ओफ्फिचे मध्ये थांबवा लागणार होता …
8 वाजता सगळा आटोपून मी बस स्तोप कडे निघालो … रस्त्यात 2 ते 3 मित्र भेटले
..
..
..
..
आजुन मदत हवि अस्ल्यास :
http://www.tamilcube.com/translate/marathi.aspx
14 Aug 2010 - 8:27 pm | झंम्प्या
मनापासून धन्यवाद. ज्या पद्धतीने तुम्ही माझ्या पहिल्याच लेखाला एवढ्या चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिलाय आणि मदत करण्याचा चांगुलपणा दाखवलाय त्या वरून खरच मला अजून लिखाण करण्याची उर्मी आलीये..
जरी काही लोकांनी माझ्या लेखाबद्दल उपहासात्मक लिहिला असेल तरीही ते मी मनावर नाही घेतलं... हा मिसळ पाव चा कट्टा मला माझ्या कॉलेज कट्या सारखा वाटतो.. जिथे सगळे मित्र एकमेकांची खेचतात.. पण त्यात फक्त आणि फक्त मैत्रीजा आनंद असतो. बाकी काही नाही..
पुन्हा एकदा धन्यवाद.
20 Aug 2010 - 2:32 pm | परिकथेतील राजकुमार
झंप्याशेठच्या दिलखुलासपणाला आपला सलाम.
13 Aug 2010 - 11:26 pm | उपाशी बोका
मराठी लिहायची सवय होईल हळू हळू. जमेल तसे लिहित रहा.
(टोमणे मारणारे बरेच दिसतील, त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे.)
14 Aug 2010 - 10:41 am | शिल्पा ब
<<<(टोमणे मारणारे बरेच दिसतील, त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे.)
मीसुद्धा अगदी हेच म्हणते ( पण कोण टोमणे मारतंय हो झंप्याभाऊ ? नाव सांगा, त्यांचं घर अगदी वाळवंटात बांधू आपण)
पण जर कोणी मदत करत असेल तर तिचा लाभ घ्या.
14 Aug 2010 - 1:38 pm | प्राजक्ताचि फुले
+१
14 Aug 2010 - 12:06 am | राजेश घासकडवी
http://scriptconv.googlelabs.com/
गुगल स्क्रिप्ट कन्व्हर्टर मध्ये चटकन मराठीत येतो. मात्र संपूर्ण लेख एकदम येत नाही, मला तीन भाग करावे लागले. कदाचित दोन भागांतही होईल, पण मी प्रयत्न केला नाही. (शुद्धलेखनाची जबाबदारी घेत नाही)
आजचा अनुभव… न साम्पावासा वाटणारा प्रवास…
कामानिमित्त मला आज संध्याकाळी 8.30 पर्यंत ऑफिसमध्ये थांबवा लागणार होता…
8 वाजता सगळा आटोपून मी बस स्तोप कडे निघालो… रस्त्यात 2 ते 3 मित्र भेटले… अशाच फुटकळ गप्पा मारून मी बस कडे निघालो… आज बस मध्ये तसा कोणीच ओळखीचा नवता… त्यामुळे अगदीच पुढच्या सीत वर बसलो… मनात विचारांचा कोलाहल चालला होता…
पुढची 45 मीन आता मला एका जागेवर बसून काढायची होती…म्हणून मी मोबिलेचा इर्फोने काढून कुठलीतरी गाईन ऐकावी म्हणून मोबिले चालला… त्यात रफी, र.द. बर्मन, किशोर ची गाणी दिसली… त्यात मुकेश्चीही गाणी होती…
या अगोदर मी मुकेश कधीच मनापासून ऐकला नवता… त्याच्याबद्दल माझ्या मनात पूर्वग्रह होता… त्याची सगळी गाणी सदिस्त असतात म्हणून… पण ती गाणी ऐकावीशी वाटली…
आणि ज्या वेळी गन्न्यांना सुरवात झली… आहा हा हा हा…
खिडकी उघडी होती. बाहेर थंडी असूनही बोचरा वर नवता… हवा खूप अल्ळाददायक पडली होती… कोणीतरी अगदी हळुवार फुंकर घालावी तशी…त्यात कानातून थेट मनापार्यांता तो दैवी आजव…. प्रत्तेक गाना प्रेमभंगाची पार्श्वभूमी (बच्क्ग्रौंद) असलेला… पण कोणास ठाऊक त्या वेळी प्रक्केत गाना खूप अल्ळाददायक वाटत होता… मनात अगदी खोल्पर्यांता शांतता वाटत होती…
जेवणाची वेळ तालोन गेली होती तरी भुकेची जाणीव एवढी होत नवती… गाण्यांशिवाय दुसरा काहीच ऐकू येत नवता… रस्ता विरुद्ध दिशेला धावत होता… रस्त्यावर पावसामुळे ओल्सार्पणा होता… वर आभाळ तांबूस दिसत होता…रस्त्यावरच्या पिवळ्या पांढर्या दिव्यांच्या प्रकाशामुळे तो ओल्सार्पणा रुपेरी झला होता…
प्रत्तेक श्वासागणिक मनात मोहक सुगंध जात होता… हवेवर पीस तरंगावा तसा हलका वाटत होता…माझह बोलना सुद्धा गोंगाट वाटत होता… नकोसा वाटत होता…
हा प्रवास कधीच संपू नये असा वाटत होता…
घरी येऊन जेवण झ्हालय…
वरच्या खोलीत लाईट बंद करून ती मुकेशची गाणी ऐकतोय…
असाच निपचिप पडून ती गाणी ऐकत राहावाशी वाटतायत…
खोलवर त्या गन्ण्यानी मनातली तार छेडली…
शांत पाण्यावर ज्या पद्धतीने तरंग आपोआप उठतात… आणि ती किनार्याकडे वाहत जातात तशी अवास्त…
त्याच तरंगावर तरंगत चाललोय असा वाटतंय… कधीच संपू नये असा प्रवास…
14 Aug 2010 - 3:38 am | अर्धवटराव
तुमची नशा पोहोचली माझ्या पर्यंत. (राजेशजींच्या थ्रू बर ;) )
लिहीत रहा !
(मुकेश फॅन) अर्धवटराव
14 Aug 2010 - 8:22 am | गुंड्या बावळा
http://www.google.com/transliterate/indic/marathi
वापरून पहा.आता लिहिलंत तसेच लिहीत सुटा.आपोआप मराठी अक्षरे उमटतील space दिल्यावर!!
धन्यवाद!!!
14 Aug 2010 - 10:10 am | बोलघेवडा
वर म्हणाल्या प्रमाणे गुगल ट्रान्स वर लिहिता येत. पण त्यावर लिखाण सेव्ह करत येत नाही. त्यामुळे मजकूर मधूनच उडून जाऊ शकतो. मोठा मजकूर लिहिला आणि उडाला तर आणखीच त्रास होत. एपिक ब्रौसार मध्ये मराठीतून लिहिण्याची उत्तम सोय आहे आणि ते लिखाण तुम्ही सेव्ह हि करू शकता. बघा वापरून !!
http://www.epicbrowser.com/
14 Aug 2010 - 10:37 am | प्रदीप
तुम्हाला एका पावसाळी संध्याकाळी, बसप्रवासात मुकेश अवचित भेटला, त्याचे सुंदर व उत्स्फूर्त वर्णन आवडले.
सदर लेख अशा तर्हेने लिहीला आहे त्यामुळे उगाच टिंगल होईल, त्याकडे दुर्लक्ष करावे, पुढील लेख मराठीतून लिहीण्याची संवय करावी, हळूहळू जमू लागेल, पुढील लेखनास शुभेच्छा.
14 Aug 2010 - 1:35 pm | बिपिन कार्यकर्ते
घासकडवींनी केलेलं रूपांतर मूळ लेखात टाकलंय. काही सुधारणाही केल्या आहेत.
तुम्ही लिहित रहा हो. कसंही चालेल पण मराठीतच लिहा. लोकं चेष्टा करतील पण मदत / कौतुकही करतील. सुरूवातीला थोडं रॅगिंग चालायचंच ना... काय?
14 Aug 2010 - 2:11 pm | अर्धवट
+१
14 Aug 2010 - 3:54 pm | मी-सौरभ
मुकेश, किशोर, केके यांची दर्दभरी गाणी नेहमीच अश्या एकांती छान वाटतात :)
बाकी : 'वचण' हा शब्द मणाला भिडला ... :)
14 Aug 2010 - 7:23 pm | चिर्कुट
>>'वचण' हा शब्द मणाला भिडला ...
डिट्टो...
झंप्याभाऊ, चांगला अनुभव आहे.. कुणाच्या प्रेमात-बिमात पडला नाहीत ना?? =))
14 Aug 2010 - 6:31 pm | स्पंदना
अहो झंप्पा अण्णा मी शुद्ध लेखणा सकट तुमच्या ख. व. त लिहिलेले तुम्ही पाहिलेले दिसत नाही.
छान लिहिता हो, तुम्ही लिहा आम्ही दुरुस्ती करु. भाव महत्वाचे, बाकि सार सार येइल हळु हळु.
14 Aug 2010 - 6:45 pm | परिकथेतील राजकुमार
काटा उभा राहिला अंगावर !
20 Aug 2010 - 7:08 am | विश्वनाथ मेहेंदळे
छान लिहिले आहे. असेच लिहित रहा. कुजकटपणा करणाऱ्यांना फाट्यावर मारा.
घासकडवी गुर्जींचे खास कौतुक करावेसे वाटते. नुसती टीका न करता पुढाकार घेऊन मदत केल्याबद्दल. असे सदस्य आहेत म्हणून यावेसे वाटते इथे.
20 Aug 2010 - 1:57 pm | स्वाती दिनेश
प्रयत्न करत रहा, मराठी टायपिंग सरावाने जमेल. उजव्या कोपर्यात मिसळपावचे धोरण च्या खाली मराठीत लिहिण्यासाठी मदत उपलब्ध आहे, त्याचा उपयोग करा.
स्वाती
20 Aug 2010 - 2:38 pm | ऋषिकेश
वर्णन आवडले.. लिहित राहिलात की व्यवस्थित लिहायची सवय होईल.. पुलेशु
बाकी "ओल्सार्पणा" आवडला ;)
20 Aug 2010 - 4:01 pm | चतुरंग
असं कोणाचं गाणं अचानक सापडावं हा अतिशय हळुवार क्षण असतो. आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल धन्यवाद! :)
(लिहीत रहा, वाचतोय.)
चतुरंग
16 Dec 2012 - 6:44 pm | तिमा
तुम्ही ऐकलेल्या गाण्यांत,ही गाणी होती का हो?
हम छोड चले है मेहेफिलको
आंसु भरी है ये जीवनकी राहे
चांदीकी दिवार ना तोडी
मतवाली नार ठुमक ठुमक चली जाय
कही दूर जब दिन ढल जाये
सब कुछ सीखा हमने
ये मेरा दीवानापन है
16 Dec 2012 - 7:09 pm | बोलघेवडा
"पण मी वचण देतो की पुढ्चा लेख हा माझा मराठीतच असेल".
व...च...ण संपलो. फुटलो (लोळून हसल्याची स्मायली )
18 Dec 2012 - 10:54 am | आनन्दिता
लेख खुप आवडला . पहिला च प्रयत्न असून ही चांगला वाटला .
मला व्यक्तिश: मुकेश ची गाणी खुप आवडतात.
तुमच्या सारखा विचार करणारे बरेचजण आहेत त्यांच्याही आयुष्यात असा प्रसंग येवो...
पुढच्या मराठी लेखाची वाट पाहत आहे ...
18 Dec 2012 - 11:10 am | इरसाल
द १६५४ वा वाचक.