चित्तथरारक सत्यकथा !!!

गौरीदिल्ली's picture
गौरीदिल्ली in जनातलं, मनातलं
2 Aug 2010 - 11:51 am

कशी कुठून सुरुवात करावी काही कळत नाही. एक सत्यकथा मांडून सगळ्यांना सावध करायचा फक्त हाच हेतू...

ठिकाण :- दिल्ली ... दुबई

तारीख :- नक्की माहीत नाही . असेल जानेवारी महिना

माझ्या मैत्रिणीच्या नात्यातली गोष्ट ..

तिच्या नातातल्या एका भावाचे( नाव समीर देऊ) लग्न झाले जानेवारी मध्ये आणि नवविवाहितं जोडपे हनीमूनला गेले दुबईला. तिथे एका नामवंत हॉटेलात बुकिंग करून आजूबाजुची प्रेक्षणीय स्थळे पाहण्यात काही दिवस भुर्रकन उडून गेले.

ज्या हॉटेलात राहत होते त्या हॉटेलातील शेजारच्या खोलीत राहणाऱ्या एका "शेख" शि ओळख झाली आणि ३-४ दिवस गप्पागोष्टी झाल्यावर त्या शेखने त्या नवविवाहितं जोडप्याला घरी जेवणाचे निमंत्रण दिले. ते उभयंता जेव्हा त्याच्या घरी गेले तेव्हा दुबईतल्या पद्धतीप्रमाणे शेखने त्याच्या बायकोला आतल्या खोलीत शेखच्या बायको बरोबर बसायला सांगितले. शेखची बायको येऊन तिला आतल्या खोलीत घेऊन गेली.

समीर आणि शेख ह्यांच्या गप्पा आणि जेवण उरकल्याबरोबर समीरने शेखचा पाहुणचाराचे कौतुक करून निरोप घेऊन उठला आणि म्हणाला " तुमच्या बायकोला सांगून माझ्या बायकोला बोलावता का ? आम्ही निघतो आता. त्यावर तो शेख म्हणाला " कोणती बायको. तू येताना एकटाच आला होतास . त्यावर समीरच्या पायाखालची जमीनच सरकली. समीर त्याच्या गयावया करू लागला. आतल्या खोलीत जाउन पाहूनही आला . आत मात्र एकदम चिडीचूप शांतता होती. कुठल्या हि बाईचा मागमूसही नव्हता .समीर त्या शेखच्या अंगावर धावुन गेला पण तिथे तो एकटा पडला आणि त्या शेखच्या अंगरक्शकाने समीरला घराबाहेर काढले.

समीरने बरेच प्रयत्न केले ... दुबई पोलिसांची मदत घेऊ पाहिली. पण पदरात नुसते नैराश्यच आले.

नंतर मी ऐकले की दुबई पोलिस पूर्णं जगात सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी आहे.

सध्या समीर दिल्लीत परत आला आहे आणि हवालदिल झाला आहे.

बायको बद्दल :- ह्युमन रिसोर्स मध्ये एम. बी. ए केले होते म्हणे आणि एका नामवंत आय. टी कंपनीमध्ये कार्यरत होती.

त्याच्या बायकोचे आईवडील सैरभैर झाले आहेत. प्रयत्न चालू आहेत तिला शोधण्याचे पण... माहीत नाही कधी यश येईल...

तेव्हापासून आतापर्यंत मन नुसते सुन्न झाले आहे ... देव करो आणि ती परत मिळो...

कथालेख

प्रतिक्रिया

छोटा डॉन's picture

2 Aug 2010 - 11:56 am | छोटा डॉन

ही खरोखर सत्यकथा आहे का ?

गौरीदिल्ली's picture

2 Aug 2010 - 11:57 am | गौरीदिल्ली

मी समिरला पाहिले आहे... :(

कथा खरी वाटत नाही.
किंवा समीर मंद असावा.
हनीमुनला आलेल जोडप कधी अनोळखी माणसाच्या घरी कधी जाइल का?

छोटा डॉन's picture

2 Aug 2010 - 12:11 pm | छोटा डॉन

किंवा समीर मंद असावा.
हनीमुनला आलेल जोडप कधी अनोळखी माणसाच्या घरी कधी जाइल का?

जाणे अगदीच अशक्य नाही, हे घडु शकते.
ह्यासाठी समीर मंद असणे किंवा समोरच 'शेख' असणे ह्या दोन्हीही बाबी अत्यावश्यक नाहीत.
हे घडु शकते.

पण काही प्रश्न तसेच अनुत्तरीत राहतात :
१. एखाद्या दुसर्‍या देशाचा नागरिक जर एखाद्या देशात गायब होत असेल तर त्याची उच्चस्तरिय दखल घेतली जात नाही का ?
हे काही घुसखोर नव्हते की ज्यांचे काहीच रेकॉर्ड दुबई पोलिसांकडे नाही.
ऑफिशियली ते व्हिसा वगैरे काढुन आले असतील, तसे रेकॉर्ड त्यांच्या पासपोर्टवरही असेल.

२. भारतीय वकिलातीने ( मराठीत : कॉन्स्युलेट ) काही हस्तक्षेप केला नाही का ?
भ्रष्टाचार आणि ही घटना ह्यात बराच मुलभुत फरक आहे.

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Aug 2010 - 1:20 pm | बिपिन कार्यकर्ते

डान्राव, तुम्ही बाहेर फार फिरला नाही आहात. त्यामुळे तुम्हाला परदेशातल्या भारतीय वकिलातींच्या दिव्यत्वाबद्दल माहित नाहीये. असो.

मिसळभोक्ता's picture

2 Aug 2010 - 1:53 pm | मिसळभोक्ता

बिकाशेठशी सहमत आहे.

चार-पाच महिन्यांपूर्वी, आमच्या परिचयातल्या एका तरुण विद्यार्थ्याने आत्महत्या केली. त्याच्या रक्ताच्या नात्यातले एथे कुणीच नव्हते. त्याची डेड बॉडी भारतात त्याच्या आई-वडिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी सॅनफ्रन्सिस्को कौंसुलेटची मदत मि ळवणे, हे किती कठीण काम होते, ह्याविषयी काही दिवसांत लिहिणार आहे.

प्रदीप's picture

3 Aug 2010 - 6:49 pm | प्रदीप

.

मस्त कलंदर's picture

2 Aug 2010 - 12:08 pm | मस्त कलंदर

अशीच सेम कथा ढकलपत्रातून वाचली होती. तेव्हा अशीच बनवाबनवी असेल म्हणून सोडून दिले होते.

देव करो आणि त्या समीरची बायको व्यवस्थित भारतात परत येवो....

प्रीत-मोहर's picture

28 Dec 2010 - 9:10 pm | प्रीत-मोहर

मीसुध्धा एका व्यक्तीच्या तोंडुन ऐकली होती ही कथा

गौरीदिल्ली's picture

2 Aug 2010 - 12:13 pm | गौरीदिल्ली

हनीमुनला आलेल जोडप कधी अनोळखी माणसाच्या घरी कधी जाइल का?.....

आहो १०१% खरी आहे ....

नितिन थत्ते's picture

2 Aug 2010 - 12:14 pm | नितिन थत्ते

कथा खरी असेल तर धक्कादायक आणि भयंकर आहे.

काही कच्चे दुवे:

शेखचे घर दुबईत असताना तो हॉटेलात का रहात होता?
बायकोला गायब केल्याबद्दल पोलीसांनी समीरला का पकडले नाही?

गोष्ट अशीच घडली आहे कि काही वेगळेच घडले आहे?

(शंकेखोर)

स्वाती दिनेश's picture

2 Aug 2010 - 12:16 pm | स्वाती दिनेश

ही जर खरी घडलेली घटना असेल तर... देव करो आणि त्या समीरची बायको लवकर परत मिळो.. अशीच सदिच्छा,
स्वाती

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Aug 2010 - 1:18 pm | बिपिन कार्यकर्ते

ओ ताई, ही अगदी हुबेहुब गोष्ट मी बरोब्बर ११ वर्षांपूर्वी सौदीला गेलो तेव्हा दुसर्‍याच दिवशी मला सांगितली गेली. त्यात एक साऊथ इन्डियन माणूस आणि त्याची नविन लग्न झालेली बायको असे होते. माझाही विश्वास बसला. मनातल्या मनात सौदीची जी प्रतिमा होती ती घट्ट झाली. मग नंतरच्या चार वर्षात मी हीच गोष्ट नाव / गाव / पात्रं बदलून इतक्या वेळा ऐकली की विचारू नका...

आणि आज तुम्ही म्हणताय की हे नुकतेच दुबईत घडले. मी स्वतः दुबई चांगली ओळखतो. दुबई पोलिस प्रामाणिकपणा आणि कार्यक्षमतेच्या इन्डेक्सवर जगभरात टॉपटेन वगैरे मधे असावेत. तिथे स्थानिक विरूद्ध बाहेरचे असा भेदभाव सहसा दिसत नाही. दुबईचे बहुतेक पोलिस हिंदी / ऊर्दू बोलतात त्यामुळे आपली भाषिक पंचाईत होत नाही. अरब देशांमधे दुबई हे अगदी मिस्फिट आहे. त्यामुळे अशी घटना, ऑफ ऑल द प्लेसेस, दुबईमधे घडली असेल आणि तिचा नंतर काहीच छडा लागला नसेल अथवा या बाबतीत त्याला काहीच मदत मिळाली नसेल यावर, कमीत कमी या जन्मात तरी, माझा विश्वास बसणार नाही. दुबई म्हणजे अतिस्वच्छ + अतिसुरक्षित + अतिशिस्तशीर मुंबई.

आणि शेखचे घर दुबईत होते तर तो हॉटेलमधे कशाला राहत होता? तुम्ही सामान्य (नॉन-मल्याळी / नॉन-तमिळ) भारतीय लोकांप्रमाणे सगळ्याच आखाती देशांना तर दुबई म्हणत नाही आहात? ते जोडपं नक्की कोणत्या देशात / शहरात गेलं होतं.

जर का खरोखरच मुलगी हरवली असेल तर काही प्रश्न.... तुम्ही या मुलाला ओळखता का? म्हणजे त्याचा पूर्वेतिहास वगैरे? जरा चेक करून बघा. त्यात असेल याचे उत्तर. अर्थात, ही नुसतीच कल्पना.

योगी९००'s picture

2 Aug 2010 - 1:44 pm | योगी९००

ही गोष्ट समजायची आणि वाचून थोडा धडा घेऊन सोडून द्यायची..अशा गोष्टी भारतात पण होऊ शकतात..

खालील धडा घ्यायचा..
१) आखाती देशात हनिमूनला जायचे नाही. (आयला वाळवंटात हनिमून..? लोकं तर थंड हवेच्या प्रदेशात जातात..)
२) जर गेलो..तर हॉटेलवर उतरायचे नाही..कोणीतरी ओळखीचे पकडायचे..(मग कसला हनिमून..?)
३) कोठेही हनिमूनला गेलो आणि हॉटेलात उतरलो तर बाजूच्या रुममधल्या माणसाशी बोलायचे नाही.. किंवा त्याच्या घरी जायचे नाही.
४) समजा त्याच्या घरी गेलो..तर बायकोला एकटे सोडायचे नाही. आपणही बायकोच्या मागे मागे रहायचे..नाहीतर बरोबर एखादा भ्रष्ट नसलेला पोलिस घेऊन त्याच्या घरी जायचे..
५) समजा खरोखर बायको पळवली गेली तर मि.पा. वर लेख लिहायच्या भानगडीत पडायचे नाही..लोकं चेष्टा करतात..

जासुश's picture

2 Aug 2010 - 1:23 pm | जासुश

हे खरे असु शकते कि शेख ने समिर च्या बायकोला गायब केले पण ह्यात कदाचित समीर पण मिळालेला असु शकतो. ही
फक्त शंका आहे..खरे काय ते तो शेख आणि समीर जाणो..

परिकथेतील राजकुमार's picture

2 Aug 2010 - 1:26 pm | परिकथेतील राजकुमार

छान !

आता ही कथा वाचुन अनेकजण आपल्या बायकोला दुबईला घेउन जायला उत्सुक असतील.

पर्‍या, शेखा, हलकटा. =)) =))

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Aug 2010 - 1:33 pm | बिपिन कार्यकर्ते

च्यायला परा!!! =)) =)) =))

मिसळभोक्ता's picture

2 Aug 2010 - 1:49 pm | मिसळभोक्ता

पर्‍या,

आज सकाळीसकाळीच ?

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Aug 2010 - 2:09 pm | बिपिन कार्यकर्ते

मिभोकाका, त्याला सकाळ झालेली तर कळली पाहिजे की नाही?

हा प्रतिसाद अवांतर असेल का?

हे आले हंटर घेउन ;)
उडवा उडवा आमचा ही आवंतरच आहे प्रतिसाद :D

माफ करा.हंटर नाही... धडधडीत पक्षपाताचा पुरावा दाखवला फक्त.

:D :D :D :D :D

डी.प्रासाद's picture

2 Aug 2010 - 1:49 pm | डी.प्रासाद

म्हनजे हनिमून ला दुबइ ला नको जयला.... (अजुन लग्न नाहि झले... )

स्वछंदी-पाखरु's picture

2 Aug 2010 - 3:11 pm | स्वछंदी-पाखरु

अहो जर का कोणा कडे त्या शेखचा मो. नंबर आहे का???
कमीत कमी त्याचा विरोप पत्ता मिळेल का??

माझी बायको दुबई मधे आहे त्याला म्हणाव जरा मदत कर रे ब्वा......

अर्चि's picture

2 Aug 2010 - 3:29 pm | अर्चि

यावर विश्वास बसत नाहि.

बेभान's picture

2 Aug 2010 - 3:58 pm | बेभान

आखाती शेखांच काय, नाहीतरी त्यांना वीस-वीस, बावीस-बावीस बायका करण्याचा "शौक" असतोच म्हणा.
अमेरिकेत माझ्या एका मित्राने त्याच्या मित्राबरोबर घडलेला असाच एक किस्सा सांगीतला: तो(त्याचा मित्र) आणि त्याची बायको (दोघेही अमेरीकन) सौदीमध्ये कुठल्यातरी मॉलमध्ये खरेदी करत असताना कोण्या एका शेखची त्याच्या बायकोवर नजर पडली. जेंव्हा त्याला कळाले की तिचा नवरा तिच्या सोबत आहे . शेख चक्क तिच्यासाठी नव-यासोबत काही ’शे’ उंटाचे नेगोशिएशन(मराठी शब्द नाही आठवत) करु लागला. नव-याने पटकन त्याच्या बायकोला घेवुन त्या मॉल मधुन काढता पाय घेतला. त्यानंतर त्याने तिला कुठेही कार मधुन बाहेरच येऊ दिले नाही.
असो समिरची बायको सुखरूप त्याला परत मिळो.

दिपाली पाटिल's picture

2 Aug 2010 - 9:51 pm | दिपाली पाटिल

बापरे...हे खरंच झालं असेल तर समीरला त्याची बायको परत मिळो...पण एक प्रश्न आहे खरा...की हनीमूनला गेल्यावर एखाद्या शेखशी ओळख झाली म्हणून कुणी त्याच्या घरी कसं काय जाईल? जर शेखचं स्वतःचं घर आहे तर तो हॉटेलात कां राहत होता? हे असले प्रश्न खरंतर समीरला पडायला हवे होते ...
(ही चेष्टा नाहीये)

नावातकायआहे's picture

2 Aug 2010 - 10:47 pm | नावातकायआहे

>>जर शेखचं स्वतःचं घर आहे तर तो हॉटेलात कां राहत होता?

शेख घर सोडुन हाटेलात का रहात आसल हे 'येगळ' सांगायला पायजे व्ह्यय?

कर्णपिशाच्यः त्या शेखचा घराचा हाटेलातन पत्ता कसा काय नाय काडला?
पत्ता आनि घर दोनि ख्वट आसल तर त्यान कार्ड बिर्ड वापरल आसलच कि नाय तर हाटेलातल्या केमेरात गावला असलच कि..

शिल्पा ब's picture

2 Aug 2010 - 10:56 pm | शिल्पा ब

भयंकर...हि कथा जर सत्य असेल तर समीरची मनस्थिती समजू शकते...पण वर खूप जणांनी लिहिल्याप्रमाणे परक्या देशात परक्या माणसाच्या (अजिबात ओळख नसलेल्या) घरी कसे काय जाऊ शकतो? झाले ते झाले पण आता बायको परत मिळवण्यासाठी काय उपाय करता येतील हे पहिले पाहिजे...

अगदी काहीच नाही तरी कौन्सुलेटमध्ये वरिष्ठ अधिकार्यांकडे तक्रार दाखल करून बायको इथे आल्याचा पुरावा देऊन (जो पासपोर्ट, तिकीट, हाटेलातील वास्तव्य) दबाव आणू शकतो....

कायदेशीर मार्गाने आलेली व्यक्ती गायब होते हे शोधता येऊ शकते...कारण ती आलेली आहे याचा पुरावा असतो.

विश्नापा's picture

2 Aug 2010 - 11:02 pm | विश्नापा

घडू शकते

हि बातमी खरी असेल तर -
पेपर मध्ये कशी काय आली नाही?
समीर ने दुबई पोलिसात तक्रार दिली नाही काय? अ़जून जिथे शक्य आहे तिथे आवाज उठवला नाही काय?
की समीर च ह्यात सामील असावा ?

अवघड आहे . असे पण घडू शकते?

अमोल मेंढे's picture

3 Aug 2010 - 6:44 pm | अमोल मेंढे

मी सुद्धा विचार करतोय दुबईला जायचा...

प्रियाली's picture

3 Aug 2010 - 7:09 pm | प्रियाली

गोष्टीत लूपहोल्स बरीच आहेत. दुबई पोलिस इतके भ्रष्ट असल्याचे ऐकलेले नाही. उलट, तेथिल यंत्रणा उत्तम असल्याचे ऐकले आहे. असो.

गोष्ट खरी असल्यास खेदजनक आहे.

दुबईत इतके देशी असताना शेखच्या घरी कडमडायचे काय पडले होते कोणजाणे? पण असे होऊ शकेल.

पर्नल नेने मराठे's picture

28 Dec 2010 - 7:19 pm | पर्नल नेने मराठे

मी कसे हे पाहिले नाही =))

एकावे ते नवलच.....

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

28 Dec 2010 - 7:51 pm | निनाद मुक्काम प...

मला अबुधाबीच्या वास्तव्यात शेख लोकांचा चांगला अनुभव आला
.अर्थात पंचतारांकित हॉटेलात ते कशासाठी येतात हे कुणीही सांगेन .
आपल्या कडे पंचतारांकित हॉटेलात काही वेगळे घडत नाही .
अर्थात तेथे स्थानिक लोकांविषयी तक्रार करून काहीही फायदा नाही .
बाकी अभू धाबी येथील भारतीय दूतावासाचा अत्यंत चांगला अनुभव आला आहे .
त्याची कार्य तत्परता व सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपुलकी (सरकारी ऑफिसात मला अपेक्षित असलेली ) मी आणि माझी पत्नी खूपच प्रभावित झालो
आखाती देशात आपल्या देशातून होणार्या पर्यटनाला खीळ बसण्याच्या दृष्टीने कदाचित हा डाव असू शकतो .
बाकी समीर अजून प्रसार्माध्यामंत का जात नाही .