कोल्हापुरी मिसळ......(फसलेला अनुभव)

गमत्या's picture
गमत्या in जनातलं, मनातलं
3 Apr 2008 - 7:20 pm

कोल्हापुरी मिसळ......(फसलेला अनुभव)

लेखाच्या नावावरुन अपणास असे वाटले असेल की मी कोल्हापुरी मिसळ बनवण्याचा प्रयत्न केला आणि तो फसला की काय !
पण असे झाले असते तरी मी आनंद मानला असता. पण....... माझा हा अनुभव म्हणजे कुर्‍हाडीवर पाय मारल्यासारखा आहे.

आता जास्त न ताणता सरळ मुद्याचे बोलतो नाही तर पहिल्या लेखात तुम्हा सर्वांना पकवल्याचे पातक डोक्यावर यायचे.

तर झाले असे कि मागच्या रविवारी कोल्हापुरला जाण्याचा योग आला. मग अंबाबाई चे दर्शन झाल्यावर विचार केला की येथील सुप्रसीद्ध मिसळीवर ताव मारावा म्हणुन कोल्हापुरस्तिथ एका स्नेह्याला दुरध्वनी करुन चांगल्या मिसळीचा ठाव ठिकाणा विचारला आणि पोहचलो प्रसीद्ध फडतरे यांच्या उपहारग्रुहात (हे उपहारग्रुहा हुतात्मा पार्क च्या मागे उद्यमनगर भागात) आहे. कोल्हापुर च्या रस्त्यांची जास्त माहिती नसल्याने जाताना एका ठिकाणी एका रिक्शावाल्याला मार्ग विचाराला तर त्याने समर्पक वाक्यात उत्तर दिले फडतरे मिसळ म्हणजे "नाव मोठे आणि लक्शन खोटे" पण तरी आता आलेच आहात तर बघा तुम्हाला आवडते का.

आता एवढा मोठा टोला त्याने लावला होता तरी विचार केला की आपण पुण्याहुन येथे आलो आहे तर बघुयात कशी आहे फडतरेंची मिसळ. फडतरेंच्या येथे पोहचलो आणि बघतो तर काय ही गर्दि. काही व्यक्ति तर डबे घेऊन दिसत होत्या मिसळ घरी बांधुन न्यायसाठी बहुतेक.

बर्‍याच कालावधी नंतर आमचा नंबर लागला. तसे एखाद्या उपहारग्रुहात नंबर लावुन खायचे आता मि पुण्यात आल्यापासुन चांगले शिकलो आहे. असो.. उपहारग्रुहात अजु बाजुला बघीतल्यावर आम्हाला फडतरे काकांच्या मिसळ बद्द्ल व्रुत्तपत्रात आलेल्या स्तुतिंचे फलक आढळले आता मात्र आम्हाला विश्वास आला कि आम्हि योग्य ठिकाणी आलो आहोत. पण हा आमचा विश्वास आलेली मिसळ खाल्यावर एकदमच फोल ठरला आणि मग आम्हाला परत त्या रिक्शावाल्या काकांचे शब्द आठवले फडतरे मिसळ म्हणजे "नाव मोठे आणि लक्शन खोटे".

लगेच तिथुन काढता पाय घेतला आणि त्याच रिक्शावाल्या काकांना परत चांगल्या कोल्हापुरी मिसळीचा पत्ता विचारुन रमापुरी गल्ली नं. ६ भागातील विजय मिसळ येथे झक्कास अश्या कोल्हापुरी मिसळीचा अस्वाद घेतला.

मौजमजाअनुभव

प्रतिक्रिया

llपुण्याचे पेशवेll's picture

3 Apr 2008 - 7:47 pm | llपुण्याचे पेशवेll

माझा पण फडतरे मिसळीचा अनुभव असाच काहीसा आहे. माझ्या कोल्हापूरकर मित्राचा फडतरे मिसळीवरचा शेरा म्हणजे ती 'सपक' असते. सपक चा अर्थ थोडक्यात म्हणजे 'अगदीच मिळमिळीत'. :)
पुण्याचे पेशवे

ब्रिटिश टिंग्या's picture

3 Apr 2008 - 9:03 pm | ब्रिटिश टिंग्या

मी ऐकलयं की फडतरे मिसळमध्ये 'साजुक तुपाची' तर्री घालतात म्हणे ?
असो, कधी खाण्याचा योग मात्र नाही आला.

आपला,
(रामनाथप्रेमी) टिंग्या ;)

छोटा डॉन's picture

4 Apr 2008 - 6:20 pm | छोटा डॉन

"मी ऐकलयं की फडतरे मिसळमध्ये 'साजुक तुपाची' तर्री घालतात म्हणे ?"
हा हा हा ... चांगलं हाणलयं ...
बाकी माझा पण अशा सर्व प्रसिद्ध " खाद्यपेठांचा अनुभव" नाव मोठे आणि लक्षण खोते असाच आहे ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

प्रभाकर पेठकर's picture

3 Apr 2008 - 11:17 pm | प्रभाकर पेठकर

अगदी थेट अस्साच अनुभव मला पुण्यात बेडेकर मिसळीचा आला. अर्धा-पाऊण तास तिष्ठत राहून शेवटी नंबर लागला. पण जी चिंच - गुळाची मिसळ समोर आली ती खाल्ल्यावर बेडेकर मिसळ हे नांव माझ्या, Eating Out, ह्या लिस्ट मधून कायमचे बाद झाले.

विसोबा खेचर's picture

4 Apr 2008 - 1:12 am | विसोबा खेचर

पण जी चिंच - गुळाची मिसळ समोर आली ती खाल्ल्यावर बेडेकर मिसळ हे नांव माझ्या, Eating Out, ह्या लिस्ट मधून कायमचे बाद झाले

अगदी सहमत आहे.

अलिकडेच मी रामनाथची मिसळ खाल्ली ती मात्र लै भारी होती!

तात्या.

llपुण्याचे पेशवेll's picture

4 Apr 2008 - 3:46 am | llपुण्याचे पेशवेll

माझी तर अगदी खास आवडती मिसळ आहे. आणि मिसळीच्या बोर्डावार तिथे लिहीलेले असते 'जवामर्द कोल्हापूरी मिसळ'.

पुण्याचे पेशवे

मनस्वी's picture

4 Apr 2008 - 10:09 am | मनस्वी

सहमत.
कोल्हापूरात मंदिराच्या २ चौक सोडून डावीकडे चोरग्यांची मिसळ चांगली वाटली.

मला श्री उपहार गृहाची आवडते.
आता रामनाथची पण ट्राय करायलाच हवी!

आनंदयात्री's picture

4 Apr 2008 - 11:01 am | आनंदयात्री

पण रिक्षावाल्या काकांच्या कृपेने का होइना 'कोल्हापुरी मिसळ' खायला मिळाली, हे ही नसे थोडके. :)

शैलेश दामले's picture

4 Apr 2008 - 11:32 am | शैलेश दामले

असे अनुभव वरचेवर लिहा

धन्यवाद

मनस्वी's picture

4 Apr 2008 - 11:41 am | मनस्वी

खालच्या खाली का नको?

धमाल मुलगा's picture

4 Apr 2008 - 11:46 am | धमाल मुलगा

मनस्वी, तू म्हणजे ना...

असो, शैलेश भाऊ, असे अनुभव वरचेवर लिहा म्हणताय म्हणजे? त्या गमत्यान॑ बिचार्‍यान॑ अस॑ उठसुठ फसवुन घेत, स्वतःचा पोपट करुन घेत फिरायच॑ का? (गम्मत करतोय मी! टेक इट ईझी)

- (गमत्या न॑२) ध मा ल.

कोल्हापुरवाले's picture

6 Dec 2012 - 5:04 pm | कोल्हापुरवाले

तुमच लक्श सगळ खलीच का?

गमत्या's picture

4 Apr 2008 - 11:59 am | गमत्या

माझ्या पहिल्या लेखास दिलेल्या ऊस्फुर्त प्रतिसादाबद्द्ल आपणा सर्वांचे आभार....

पुण्यात कर्वे रोड वर कोल्हापुरी काटा किर्ररर.. नावाचे एक ठिकाण आहे (जनता बॅंकेच्या समोर विपुल स्नॅक्स च्या रांगेत) तेथे अतीशय चवीष्ट 'कोल्हापुरी मिसळ' खायला मिळाते. रामनाथच्या पेक्शाही १०० पटिने जास्त भारी.....

- (गमत्या न॑१)

धमाल मुलगा's picture

4 Apr 2008 - 12:22 pm | धमाल मुलगा

पुण्यात कर्वे रोड वर कोल्हापुरी काटा किर्ररर..

जबर्‍या!!!
आपल॑ एकदम फेव्हरेट ठिकाण. तिथ॑ जाऊन एकदम तिखट मिसळ घ्यायची आणि तिच्या स॑गतीला मठ्ठ्याचे ग्लासवर ग्लास !!! अरे त्याबरोबर मस्त हिरव्या मिरच्या पण हाणायच्या!!!
बाकी त्या॑च्याकडे मठ्ठा इतका काही खास मिळत नाही :-((

- (मिसळ खाऊन काटा किर्रररर...) ध मा ल.

शैलेश दामले's picture

4 Apr 2008 - 2:49 pm | शैलेश दामले

खालच्या खाली का नको कारण त्या खासगी असतात. मिसळ्पाव हे खालच्या गोष्टी करण्याचे व सान्गायचे स्थान नाही.

मनस्वी's picture

4 Apr 2008 - 2:55 pm | मनस्वी

खालच्या खाली म्हणजे सखोल, खोली असलेले, अभ्यासपूर्वक!

म्हणजे काही खाजगी नई कई -- हेहे.

मिसळपाववर तुम्ही कोणत्याही विषयावर दिलखुलास गप्पा मारू शकता.

असे वरचेवर विचार करू नका दामले काका.

हघ्या

दिनेश५७'s picture

4 Apr 2008 - 4:48 pm | दिनेश५७

फडतरे मिसळीचा माझा अनुभव वेगळा आहे. मी जवळपास सहा महिन्यांपूर्वी, सकाळी साडेआठाच्या सुमारास, अर्धा तास रांगेत थांबून फ्डतरेंची मिसळ `चापली' होती. त्यानंतर, आजही, मुंबईत कुठेही मिसळ खाताना, त्या मिसळीच्या आठवणीने जिभेला पाणी सुटते. तेव्हा मी सकाळी कोल्हापुरात पाय ठेवताच रिक्षावाल्याला `फडतरे' एवढेच सांगितले, आणि रिक्शावाल्यानं तोंड भरून स्तुती करतच तिथपर्यंत नेऊन सोडले... पाठोपाठ तोही रांगेत उभा होता...
या चर्चेत ठाण्याच्या मामलेदारच्या मिसळीची नोंद झाली नाही, तर `मिसळ्पुराण' पूर्ण होणार नाही.

डॉ.प्रसाद दाढे's picture

4 Apr 2008 - 5:21 pm | डॉ.प्रसाद दाढे

काटा किर्र् र्र ची मिसळ जितकी छान तितकाच तिथला मठ्ठा पा॑चट ! आताशा मी एक तत्व पाळतो, 'जिथे जी चीज फेमस आहे तीच खावी' अन्यथा निराशा पदरी येते..जेथे पाव-भाजी चा॑गली मिळते असा बोलबाला आहे तेथे जर पिझ्झा मागवाल तर पस्तावायचीच पाळी येते.बाकी उत्कृष्ठ मिसळ (हमखास) मिळण्याची ठिकाणे पाहा..
http://www.misalpav.com/node/683
(बर्‍याचदा पस्तावलेला) प्रसाद

भोचक's picture

4 Apr 2008 - 5:59 pm | भोचक

नाशिकची रविवार पेठेतील लोकमान्यची मिसळही भन्नाट. आठवली तरी पाणी सुटते. कळकट असलेल्या या हॉटेलात मळकट कपड्यातला वेटर ग्लासमध्ये हात बुडवून समोर आणून ठेवतो. पण मिसळ समोर आली की या सगळ्याकडे दुर्लक्ष होतं. नव्हे करावंच लागतं. ती मिसळ खाताना ब्रह्मानंदी टाळी लागणं किंवा समाधी लागणं नावाचं जे काही घडतं ना, तसा काहीसा अनुभव येतो, असं माझं बुवा मत आहे. वगैरे.

प्रभाकर पेठकर's picture

4 Apr 2008 - 8:18 pm | प्रभाकर पेठकर

वेटर ग्लासमध्ये हात बुडवून समोर आणून ठेवतो.

ह्यावरून एक विनोद आठवला.

एकदा एक वेटर असेच ग्लासात बोटे बुडवून पाण्याचा ग्लास आणतो. गिर्‍हाईकाला अर्थातच ते आवडत नाही. पण तो डोके शांत ठेवून वेटरला समजावून सांगतो. 'बाबारे! पिण्याच्या पाण्याअशी बोटे बुडवू नये. त्या पेक्षा ग्लास हा असा बाहेरून पकडावा.'

वेटर मान्य करतो आणि त्याहून शांतपणे गिर्‍हाईकाला समजावतो. ' ठीक आहे हो. मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे ग्लास हा असा बाहेरून पकडून आणेन. पण, पाणी देणारा पोर्‍या पाण्याच्या पिंपात उभा आहे त्याचे काय?'

कोल्हापुरवाले's picture

6 Dec 2012 - 5:02 pm | कोल्हापुरवाले

गमत्या :
"रमापुरी गल्ली नं. ६ "

तुला राजारामपुरी गल्ली नं. ६ म्हनायच आहे का?

यसवायजी's picture

7 Dec 2012 - 9:19 pm | यसवायजी

पुण्यात कोल्हापुरीच्या नावाखाली तिखट-जाळ असं कायबी खपवत्यात . जरा सांगा की त्यांनला, कोल्हापुरी हि एक 'चव' हाय..फकस्त तिखट खाणं म्हंजी कोल्हापुरी न्हवं..
ती ६ व्या गल्लीतली मिसळ मला बी आवडल्याली.. दही टाकुन.. अगायाया..लई भारी..

आनंदी गोपाळ's picture

7 Dec 2012 - 10:50 pm | आनंदी गोपाळ

फार्फार वर्षांपूर्वी बालगंधर्वच्या पाठीमागे (त्याच कँपस्मधे) एक उपहारगृह होते. आता आहे की नाही माहीत नाही. तिथे बरीच गोड अशी 'मस्तानी' मिसळ मिळत असे. मिसळीतले डेझर्ट म्हणता येईल अशी नाजुक डिलिशियस चव असे. गफ्रेंसोबत जाण्यास उत्तम जागा होती ;)

तत्कालीण गफ्रेवंत असल्याने आनंदी (गोपाळ)

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Dec 2012 - 12:25 am | डॉ सुहास म्हात्रे

+१... बालगंधर्वच्या 'मस्तानी' मिसळीसाठी...

शिवाय तिथला बटाटावडाही मस्त होता. जुन्या आठवणी जाग्या केल्यात राव.

काळा पहाड's picture

8 Dec 2012 - 3:03 am | काळा पहाड

ओ हे रमापुरी नक्की कुठंय सांगा बघू. असं काही ठिकाण असल्याचं आठवत नाहिये.