माझा पण फडतरे मिसळीचा अनुभव असाच काहीसा आहे. माझ्या कोल्हापूरकर मित्राचा फडतरे मिसळीवरचा शेरा म्हणजे ती 'सपक' असते. सपक चा अर्थ थोडक्यात म्हणजे 'अगदीच मिळमिळीत'. :)
पुण्याचे पेशवे
"मी ऐकलयं की फडतरे मिसळमध्ये 'साजुक तुपाची' तर्री घालतात म्हणे ?"
हा हा हा ... चांगलं हाणलयं ...
बाकी माझा पण अशा सर्व प्रसिद्ध " खाद्यपेठांचा अनुभव" नाव मोठे आणि लक्षण खोते असाच आहे ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
अगदी थेट अस्साच अनुभव मला पुण्यात बेडेकर मिसळीचा आला. अर्धा-पाऊण तास तिष्ठत राहून शेवटी नंबर लागला. पण जी चिंच - गुळाची मिसळ समोर आली ती खाल्ल्यावर बेडेकर मिसळ हे नांव माझ्या, Eating Out, ह्या लिस्ट मधून कायमचे बाद झाले.
पण जी चिंच - गुळाची मिसळ समोर आली ती खाल्ल्यावर बेडेकर मिसळ हे नांव माझ्या, Eating Out, ह्या लिस्ट मधून कायमचे बाद झाले
अगदी सहमत आहे.
अलिकडेच मी रामनाथची मिसळ खाल्ली ती मात्र लै भारी होती!
तात्या.
माझ्या पहिल्या लेखास दिलेल्या ऊस्फुर्त प्रतिसादाबद्द्ल आपणा सर्वांचे आभार....
पुण्यात कर्वे रोड वर कोल्हापुरी काटा किर्ररर.. नावाचे एक ठिकाण आहे (जनता बॅंकेच्या समोर विपुल स्नॅक्स च्या रांगेत) तेथे अतीशय चवीष्ट 'कोल्हापुरी मिसळ' खायला मिळाते. रामनाथच्या पेक्शाही १०० पटिने जास्त भारी.....
- (गमत्या न॑१)
पुण्यात कर्वे रोड वर कोल्हापुरी काटा किर्ररर..
जबर्या!!!
आपल॑ एकदम फेव्हरेट ठिकाण. तिथ॑ जाऊन एकदम तिखट मिसळ घ्यायची आणि तिच्या स॑गतीला मठ्ठ्याचे ग्लासवर ग्लास !!! अरे त्याबरोबर मस्त हिरव्या मिरच्या पण हाणायच्या!!!
बाकी त्या॑च्याकडे मठ्ठा इतका काही खास मिळत नाही :-((
- (मिसळ खाऊन काटा किर्रररर...) ध मा ल.
खालच्या खाली म्हणजे सखोल, खोली असलेले, अभ्यासपूर्वक!
म्हणजे काही खाजगी नई कई -- हेहे.
मिसळपाववर तुम्ही कोणत्याही विषयावर दिलखुलास गप्पा मारू शकता.
असे वरचेवर विचार करू नका दामले काका.
हघ्या
फडतरे मिसळीचा माझा अनुभव वेगळा आहे. मी जवळपास सहा महिन्यांपूर्वी, सकाळी साडेआठाच्या सुमारास, अर्धा तास रांगेत थांबून फ्डतरेंची मिसळ `चापली' होती. त्यानंतर, आजही, मुंबईत कुठेही मिसळ खाताना, त्या मिसळीच्या आठवणीने जिभेला पाणी सुटते. तेव्हा मी सकाळी कोल्हापुरात पाय ठेवताच रिक्षावाल्याला `फडतरे' एवढेच सांगितले, आणि रिक्शावाल्यानं तोंड भरून स्तुती करतच तिथपर्यंत नेऊन सोडले... पाठोपाठ तोही रांगेत उभा होता...
या चर्चेत ठाण्याच्या मामलेदारच्या मिसळीची नोंद झाली नाही, तर `मिसळ्पुराण' पूर्ण होणार नाही.
काटा किर्र् र्र ची मिसळ जितकी छान तितकाच तिथला मठ्ठा पा॑चट ! आताशा मी एक तत्व पाळतो, 'जिथे जी चीज फेमस आहे तीच खावी' अन्यथा निराशा पदरी येते..जेथे पाव-भाजी चा॑गली मिळते असा बोलबाला आहे तेथे जर पिझ्झा मागवाल तर पस्तावायचीच पाळी येते.बाकी उत्कृष्ठ मिसळ (हमखास) मिळण्याची ठिकाणे पाहा..
http://www.misalpav.com/node/683
(बर्याचदा पस्तावलेला) प्रसाद
नाशिकची रविवार पेठेतील लोकमान्यची मिसळही भन्नाट. आठवली तरी पाणी सुटते. कळकट असलेल्या या हॉटेलात मळकट कपड्यातला वेटर ग्लासमध्ये हात बुडवून समोर आणून ठेवतो. पण मिसळ समोर आली की या सगळ्याकडे दुर्लक्ष होतं. नव्हे करावंच लागतं. ती मिसळ खाताना ब्रह्मानंदी टाळी लागणं किंवा समाधी लागणं नावाचं जे काही घडतं ना, तसा काहीसा अनुभव येतो, असं माझं बुवा मत आहे. वगैरे.
वेटर ग्लासमध्ये हात बुडवून समोर आणून ठेवतो.
ह्यावरून एक विनोद आठवला.
एकदा एक वेटर असेच ग्लासात बोटे बुडवून पाण्याचा ग्लास आणतो. गिर्हाईकाला अर्थातच ते आवडत नाही. पण तो डोके शांत ठेवून वेटरला समजावून सांगतो. 'बाबारे! पिण्याच्या पाण्याअशी बोटे बुडवू नये. त्या पेक्षा ग्लास हा असा बाहेरून पकडावा.'
वेटर मान्य करतो आणि त्याहून शांतपणे गिर्हाईकाला समजावतो. ' ठीक आहे हो. मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे ग्लास हा असा बाहेरून पकडून आणेन. पण, पाणी देणारा पोर्या पाण्याच्या पिंपात उभा आहे त्याचे काय?'
पुण्यात कोल्हापुरीच्या नावाखाली तिखट-जाळ असं कायबी खपवत्यात . जरा सांगा की त्यांनला, कोल्हापुरी हि एक 'चव' हाय..फकस्त तिखट खाणं म्हंजी कोल्हापुरी न्हवं..
ती ६ व्या गल्लीतली मिसळ मला बी आवडल्याली.. दही टाकुन.. अगायाया..लई भारी..
फार्फार वर्षांपूर्वी बालगंधर्वच्या पाठीमागे (त्याच कँपस्मधे) एक उपहारगृह होते. आता आहे की नाही माहीत नाही. तिथे बरीच गोड अशी 'मस्तानी' मिसळ मिळत असे. मिसळीतले डेझर्ट म्हणता येईल अशी नाजुक डिलिशियस चव असे. गफ्रेंसोबत जाण्यास उत्तम जागा होती ;)
तत्कालीण गफ्रेवंत असल्याने आनंदी (गोपाळ)
प्रतिक्रिया
माझाही असाच अनुभव आहे.
खरयं.....
हाहाहा ...
बेडेकर मिसळ...
सहमत आहे..
रामनाथची मिसळ आहेच भारी.
सहमत
चला
कोल्हापुरी मिसळ......(फसलेला अनुभव)
का?
हा हा हा...
तुमच लक्श सगल खलीच का?
सर्वांचे आभार....
पुण्यात
मनस्वी
अहो दामले काका
फडतरे
काटा
लोकमान्य
विनोद..
पत्याची दुरुस्ती
कोल्हापुरीच्या नावावर
सपक, गोड इ. मिसळ.
+१
ओ हे रमापुरी नक्की कुठंय